माझी PhD हा काही तसा 'लेखनविषय' होणार नाही. त्यामुळे थोडक्यात सांगितलेलं बरं. मला चंपक सारखं सर्वांना समजेल अशा भाषेत सांगायला जमेलच असं नाही पण प्रयत्न करतो.
मी pharmacy (औषधनिर्माण शास्त्र) चा विद्यार्थी. PhD साठि specialization होतं Pharmaceutics . साध्या भाषेत सांगायचं तर औषधं गोळ्या ज्या बाजारात येतात त्या तयार करण्यामागचं शास्त्र.
मागे चंपकने लिहिलं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. तो नवीन औषधं (drug molecules) तयार (synthesize) करतो. आमचं काम इथुन पुढे सुरु होतं. ते औषध लोकांपर्यंत योग्य त्या रुपात पोहोचवणं हे pharmaceuticist चं काम. खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे कि जगात वर्षाला असंख्य नवीन drug compounds तयार होतात. पण प्रत्यज़ बाजारात मात्र लाखातून एखादं पोहोचतं. Pharmaceutics हा तसा खूप व्यापक विषय आहे. पण अर्थातच त्यातला एक अत्यंत लहान मुद्दा घेऊन मी त्यावर काम केलं.
Isothermal titration calorimetry नामक एक उपकरण आहे. ते काय करतं हे साध्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की कुठल्याही रासायनिक (chemical) किंवा biochemical / biophysical interaction मध्ये जी ऊष्णता निर्मां होते (evolve) किंवा शोषली जाते (absorb) , ती या उपकरणाणे एका स्थिर तापमानाला मोजता येते. या उपकरणाचा उपयोग protein-ligand binding चा अभ्यास करणासाठी बराच केला जातो. त्याचाच आधार घेऊन मी या उपकरणाचा वेगळा, म्हणजे protein stability अभ्यासण्यासाठी, उपयोग करता येतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला. यश आलं असं साधारण म्हणता येईल.