सुचीपत्र
१. प्रतापगडाचा फोटो
२. नोटांच्या हाराचा फोटो
३. कन्येचा फोटो
४. पुनःश्च हरिओम - मृत्युशी लपंडाव (१)
५. मृत्युशी लपंडाव (२)
६. मृत्युशी लपंडाव (३)
७. मृत्युशी लपंडाव (४)
८. डुलकी
<***************************>
पुणे जी टी जी दिनांक ११ एप्रिल, २००४
स्थळ इस्क्वेअर चित्रपट गृह
निमित्त श्वास चित्रपट बघणे नि जमल्यास अज्जुका नि तिच्या टीमला भेटणे
वेळ ११.३० सकाळी
हुश्श्य!
उपस्थित आय्डीज
१. गिरिरज
२. सायबरमिहिर
३. इट्समी
४. कुलगाय
५. आपलेकर
६. बडबडी
७. जीएस
८. सई
९. अक्षय
१०.मिल्या
११.धृव
१२.संस्कृती
१३. वकड्या
१४. सौ वकड्या
अभ्यागत
१. सव्यसाची नि त्याचा मित्र
२. एक जपानी की कोरिअन मुलगी
अनुपस्थित
वरील यादीत जे नाहीत ते सर्व
सर्वप्रथम, मिहीर आणि इट्स्मी चे नि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन! कारण जवळपास २००० रुपयांची तिकिटे अंगावर पडण्याची भिती न बाळगता त्यांनी आधिच खरेदी करुन ठेवली आणि अगदी आयत्या वेळेस तिथे पोहोचलेल्यांना देखिल उपलब्ध करुन दिली! वर १४ आय्डिज चि नावे लिहिली आहेत, पण प्रत्यक्षात सगे सोयरे धरुन व्यक्ती जास्त होत्या, नि सगळीच नावे माझ्या लक्षात नाहीयेत, तेव्हा जे कोणी राहिले असेल त्यांनी कृपया सुचित करावे हि विनंती.
तर मंडळी, त्याचे झाले असे की आम्ही नेहेमीप्रमाणेच पेन्शनरांच्या वेळेत म्हणजे वेळे आधी तब्बल अर्धा तास तिथे पोहोचलो. थिएटरची वास्तु नविन, वातावरण नविन, माणसे नविन, तेव्हा त्या वातावरणाचा नाही म्हणले तरी माझ्या वर थोडा परिणाम झालाच होता! तशात माझी गोची झालेली, नेहेमीचाच प्रश्र्न! आता माझ्या कडे तिकिटे नाहीत म मी आत जावुन दोन नंबरची सोय कशी काय करु? तरी पार्कींग लाॅटमध्ये जावुन तिथली सोय बघितली! ती काही मनास पसंद पडेना, तेव्हा एकटाच सरळ रिक्षाने शिवाजीनगर स्टॅंडवरच्या सुलभतेचा आसरा घ्यावयास गेलो, नि परत आलो तोवर पावणे बारा होत आलेले!
जीएस, अक्शय, सव्यसाची असे काहीजण तिथे आलेले होते! माझ्या पत्निने त्यांना ओळखले होते! तेव्हा त्यांच्याकडे गेलो! मग प्रत्येकाशी ओळख करुन देणे घेणे वगैरे नेहेमीचेच उपचार! अरे मला जरा चांगला आय डी द्या रे कोणीतरी? हे काय आपले वाकड्या म्हणुन सांगताना प्रत्यक्ष भेटीत मला फ़ारसे काही नाही वाटले तरी ऐकणार्याचा विचार नको का करायला? तर असो.
मग आम्ही स्टिलच्या रेलिंग पाशी टेकुन उभे राहिलो तर तिथे एक भले मोठे स्टिलचेच पिंप! मग कळले की ती कचरा पेटी होती! वाकड्याला उभे रहायला दुसरी जागा पण मिळाली नाही का? तेव्हड्यात एक जण सिगारेटचे थोटुक टाकायला आला! झाकण कसे उघडायचे ते समजेना तर बाजुच्या कडीतुन ते थोटुक आत सरकते का बघु लागला! पोस्ट पेटीला कसे असते ना पत्र टाकायची जागा तशी ती कडी दिसत होती. त्याने तसेच थोटुक खाली टाकले ते शेवटी मी विझवले! च्च्या बुवा!
तेव्हड्यात इट्स्मी तिकिटे वाटु लागली! बहुतेक तिला माहीत नसावे पण तिची गाडी काही माझ्या कडे वळेना, म्हणले उगाच नंतर अडचण नको व्हायला! तेव्हा तिच्याकडुन तिकिटे मागुन घेतली, तिने दिलीही! पण पैशाचे कोणच बोलेना? मी आपली तिकिट नामाक त्या चपट्या चिठ्ठीवर काय काय लिवलय ते उत्सुकतेने वाचत होतो! असे उघड्यावर वाचायचे नसते असा काही रिवाज आहे का हो? कारण बाकी बराच मोठा समुदाय माझ्या वाचण्याकडे कसलेतरी गालातल्या गालात हसुन बघत होता! काय की बुवा! आकड्याच्या चिठ्ठीसारखे ते तिकिट मला तरी नविन होते! हो, पण मी लग्गेच तिकिटाचे पैसे देवुन टाकले बरे का मिहिरकडे! हो विचारुन घ्या हवे तर त्याला! तेव्हड्यात सव्यसाचीने त्याच्या डिजिटल कॅमेरॅतुन फ़ोटो काढला! म्हणजे असे तो म्हणाला! मी फ़्लॅशची वाट बघत होतो पण तसे काहीच घडले नाही की नाही आवाज आला क्लिक चा!
आत जायचे की नाही यावर एकमत होत नसल्याने पहले आप पहले आप करीत सिनेमा संपुन जायचा तरी आम्ही आपले तिथेच असे व्हायला नको म्हणुन मग मीच पुढे झालो! आतील काहीच माहीती नव्हती तर बावळटासारखे नव्हे तर शहाण्यासारखे विचारीत विचारीत ३ र्या मजल्यावर पोहोचलो! सगळीकडे पाॅपकाॅर्न चा घमघमाट सुटला होता! सुरवातीस बरे वाटले. नंतर मात्र तो वास डोके उठवु लागला!
सिनेमागृहात आम्ही स्थानापन्^न झालो! सिनेमा बघितला! सर्वजण बाहेर आलो! खरे तर येव्हडा सुंदर सिनेमा बघितल्या वर कुणाचीच कुणाशी बोलायची सुरवातीची काही मिनिटे तरी तयारी नव्हती! कारण सरळ होते! सिनेमातील घटनांचा झालेला परीणाम इतक्या झटकन पुसला जाणे केवळ अशक्य! तरीही औपचारिकता पार पाडीत, ज्यांना लवकर जायचे होते ते आमच्या सहीत हळुन कटले! बाकीचे जण थांबले होते! आता त्यांनी काय काय केले गे सांगावे!
काय फ़लित या जी टी जी चे? काय निश्कर्ष? तर एका मायबोलिकरिणीचा सहभाग असलेला चित्रपट, तो देखिल मराठी, पहाण्यास पंधरा एक मायबोलीकर आवर्जुन उपस्थित रहातात! एकत्र येतात! या उप्पर अजुन वेगळे ते काय असते? हे तर सहजिवनाचा आस्वाद घेवु इच्चीणार्या मनुष्या प्राण्याच्या जिवंतपणाचे लक्षण नव्हे काय?
मायबाप वाचक मंडळी, बोअर झाला असाल तर माफ़ी असावी!
कुठे जागा नाही मिळाली म्हणुन हे इथे लिहिले आहे!