|
Shyamli
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:37 am: |
|
|
दिनेशदा, खरं सांगायच तर आता या ३-४ वर्षात मीही उप-यासारखीच जातीये औरंगाबादला. पण काहि ठिकाणं अजुनही नाही बदलली आणि काहि अगदिच ओळ्खताही येणार नाही अशी झालीयेत. जसं आठवत तस लिहून काढायचा प्रयत्न करतिये.बघु या कसं कसं जमतय ते. पंचा, अहो आता तरी पूर्ण ओळख द्या तुमची . एवढे लोक भेट्तायत ओळखीचे तर
|
छान माहिती देतेयस शामली... तोंडाला पाणी सुटतय बघ खाण्याच्या ठिकाणांची वर्णनं वाचुन.. पुढच्या वेळी भारतात आलीस की औरंगाबादला चक्कर मारायलाच पाहिजे
|
Krishnag
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:03 am: |
|
|
श्यामली, छान!! औरंगाबादला कधी येणारेस सांग!! तेन्व्हाच औरंगाबादला यायचा प्लान ठेवावा म्हणतोय!!
|
Pancha
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:18 am: |
|
|
बायकोचे वय, नवर्याचा पगार आणि ID ची ओळख कधी विचारु नये असे म्हणतात. बाकी संभाजीनगर वासी काय म्हणतात?
|
ID ची ओळख कधी विचारु नये असे म्हणतात.>>>.{}
|
श्यामली मस्त लिहीत आहेस. पंचा ओरंगाबाद गवर्मेंट का?
|
Runi
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:17 pm: |
|
|
अरे वा. पुर्णानंद मला एकदम माझा दहावीचा उन्हाळी जाधव कोचिंग क्लास आठवला. खुप वेळा जायचो तेव्हा आम्ही तिकडे. श्यामली मस्त चाललय. येवु दे अजुन.
|
Dineshvs
| |
| Friday, August 10, 2007 - 5:27 am: |
|
|
पंचा, तु नसावास बहुतेक. तिथल्या सुधा आंटि मेहरोत्रांचा मुलगा, माझा खास मित्र आहे. आता तो चेन्नै ला असतो. शिवाय त्याला मराठी येत नाही. चला एक शक्यता मी दुर केली.
|
Shyamli
| |
| Friday, August 10, 2007 - 6:50 am: |
|
|
ID ची ओळख कधी विचारु नये असे म्हणतात>>>बरं बरं राहु द्या आग्रह नाही अजिबात. मयुरेश, कृ, खरच याच तुम्ही सगळे एकदा रुपाली, जाधव कोचिंग क्लासला कधी होतीस? जरा मेल कर बघु केदार, धन्यवाद , वाचतायत लोक म्हट्ल्यावर बरं वाटत जरा
|
Runi
| |
| Friday, August 10, 2007 - 1:44 pm: |
|
|
श्यामली, तुला मायबोलीवरुन मेल केली आहे. चेक कर.
|
Princess
| |
| Friday, August 10, 2007 - 3:51 pm: |
|
|
श्यामले.... अग कित्ती आठवणी जाग्या केल्यात. मी पण जाधव क्लासेसची स्टुडंट खुप मज्जा आली पुर्णानंद आठवुन. आणि हो साबुदाणा वडाची गाडी... औरंगपुरामध्ये गेले की ते एक करायचीच मी. यस्स, गायत्री मधली मुंग भजी. तेच आठवत नव्हते मला. लिहित राहा ग. खुप्प छान वाटतय.
|
श्यामली मास्टर कुक जालना रोड ला आहे. (हे मास्टर्स दुसरे का?) आज काल एक ठाट बाट नावाच देखील चांगले राजस्थानी हॉटेल उघडलय म्हणे.
|
Shyamli
| |
| Sunday, August 19, 2007 - 3:03 am: |
|
|
अरे हो केदार, आलं लक्षात थॅंक्स रे हो ठाटबाट माहितीये मला पण चांदिची ताटंवाट्या याशिवाय यांची काहिच खासियत नाहीये. विवेकानंद collage समोर आहे हे hotel.
|
Ldhule
| |
| Sunday, August 19, 2007 - 10:10 pm: |
|
|
शामली, छान लिहिलयस हं. ... औरंगाबादचे धाबे तर मस्तच... मी आणि अश्विणीने एंगेजमेन्ट ते लग्न या दरम्यानच्या दोन महिन्यात ही सगळी रेस्टाॅरंटस पालथी घातली होती. गेल्या महिन्यात जावुन आलो औरंगाबादला. सिडकोत कॅनाॅट प्लेस मधे पण खुप रेस.टाॅरंटस झालीत आता.
|
Dineshvs
| |
| Monday, August 20, 2007 - 3:35 pm: |
|
|
श्यामली, तुमच्या औरंगाबादेत एवढी खाण्याची ठिकाणं आहेत ? आजवरच्या माझ्या सगळ्या ट्रिपा फुकट गेल्या की.
|
दिनेश, अहो ओरंगाबाद मध्ये पुण्या पेक्षा जास्त फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. (ताज सहीत). यार एवढा डिस्काऊंट देऊ नका मराठवाड्याला
|
दिनेश, अहो ओरंगाबाद मध्ये पुण्या पेक्षा जास्त फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. (ताज सहीत). यार एवढा डिस्काऊंट देऊ नका मराठवाड्याला >>>>> केदार सगळे जग पालथे घालून तुला अजून फाईव्ह स्टार हॉटेले ही खाण्याचे ठिकाण नसते हे कळू नये ना!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 21, 2007 - 5:37 pm: |
|
|
केदार, आजवरच्या सगळ्या भेटी धावत्याच झाल्या. खुपदा औरंगाबाद हे लांबच्या प्रवासात रात्री थांबण्याचे ठिकाण होते. आता निवांतपणे जायला हवे. बाकि फ़ाईव्ह स्टारमधे खाण्यासारखे काहि नसते, यावर मात्र एकमत.
|
रॉबीनहुड, दिनेश खरय तुमच, तसे न्हवते म्हणायचे मला. ते फाईव्ह स्टार फक्त रुपक आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:24 pm: |
|
|
असु दे रे, नाहीतरी पुण्याची कसली आलीय तुलना ? शिवाय मी नेहमी औरंगाबादली खुप रात्री पोहोचत असे, मग जे हॉटेल उघडे दिसेल तिथे खात असे. मित्र होता तोपर्यंत कुठे बाहेर जायचा प्रश्णच नव्हता. आता तो चेन्ने ला असतो. पण तरिही श्यामलीने खास औरन्गाबादचा खाद्यपदार्थ कुठला ते लिहिले नाही. प्रादेशिक खासियती मला चाखायला आवडतात, पण हॉटेलमधे मात्र नेहमीच मिळतात असे नाही. एकना जुन्नरला हॉटेलात मी मेनु मागितला, तर नेहमीचाच मद्रासी पंजाबी मेनु होता. जुन्नरचे खास काय असे विचारले तर, कांदा जुन्नरचा आहे, असे उत्तर मिळाले होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|