Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dwidhamedha » Archive through March 02, 2007 « Previous Next »


Friday, September 08, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखा पाहू कोणाचा बी बी आहे ते?


Friday, September 08, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या खाली Owner मधे दिसतंय नाव ते पाहिलंच नाही मी.

बरेच दिवस आपली हक्काची बडबड करण्याची जागा हवी असं वाटत होतं पण त्या लिखाणाला शोभेसा आय डी सुचत नव्हता. शेवटी माझ्या नेहेमीच्या ' मैं इधर जाऊं या उधर जाऊं' या परिस्थितीला जुळणारा आणि नावाच्या प्रासात बसणारा शब्द सहज मनात आला. Admin नी ही फटकन नव्या आय डी ला परवानगी दिली.

श्रावण आणि गणपतीचे दिवस ' आज करू, उद्या करू' अशा चालढकलीत गेले. शेवटी पितृपक्षात सुरुवात तरी झाली. दोन्हीकडच्या आजोबांना लेखन आणि त्यापेक्षा जास्ती वाचनाचं व्यसन होतंच नाहीतरी. मग यापेक्षा जास्त चांगलं श्राद्ध काय करू शकते मी?




Saturday, September 09, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वीसेक वर्षांपूर्वी, मुम्बैमधे नोकरी करत होते तेंव्हा कंपनी ने २-३ दिवसांच्या ट्रेनिन्ग प्रोग्रॅमला पाठवलं होतं. आमच्याच कंपनीच्या लोकांकरता होतं हे ट्रेनिन्ग. एका चर्च मधून बाहेर पडून संसार मान्डणारा एक ex प्रीस्ट आणि त्याची बायको असे दोघे ट्रेनर होते. लोणावळ्याच्या जवळ एका अतिशय सुन्दर resort मधे राहिलो होतो. ( आता नाव विसरले).

त्या माणसाने पहिल्याच सेशनमधे एक प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाहीये. तो म्हणाला की त्याच्या अनेक वर्षांच्या अनुभवात त्याला असं कोणीही भेटलं नव्हतं की ज्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

वरकरणी अगदी साधाच प्रश्न आहे. पण गेली वीस वर्षं मला त्याचं उत्तर सापडत नाहीये.


तो प्रश्न असा ' What would you like to see written on your epitaph ?'

त्याने दहा मिनिटांचा अवधी दिला होता. आम्ही १८-२० जणं होतो. बहुतेकांनी २-४ मिनिटातच पेन खाली ठेवलं होतं. मी मात्र अजुनही त्या पेनच टोक कुरतडत बसल्यात जमा आहे. आता कधी कधी वाटतं की इरावतीबाईंना सुद्धा ज्याने परिपूर्ती वाटली होती त्या मातृत्वा वर हे जीवन ओवाळून टाकावं का She was a mother!' ही एवढीच नोंद पुरेशी आहे का? In the absence of anything better हे चालेल का?

तुम्हाला काय वाटतं?



Tuesday, September 12, 2006 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अमेरिकेत शिकत असतानाच्या मित्र मैत्रिणींचा ग्रूप आहे. या ना त्या निमित्ताने अजूनही महिन्या दोन महिन्यातून सर्व जण एकत्र भेटत असतो. सुरुवातीला फ़ूट बॉल गेम, नवा टी व्ही इत्यादी कारणे असत. मग हळु हळु नवीन घरे, भावी वधू वा वर यांची भेट, यथावकाश केळवणे डोहाळजेवणे, बारशी इत्यादी कारणांनी भेटू लागलो. आताशा फक्त मुलांचे वाढदिवस, dance recirtal इत्यादी निमित्त्ते असतात. सीझनमधे फ़ूटबॉल गेम अजूनही असतातच.

उन्हाळा सम्पत आला तेंव्हा एक मैत्रीणीने ठराव मांडला की एका शनिवारी फक्त parents night करायची. बरीच ईमेल देवाणघेवाण झाल्यावर शेवटी एकदाचा प्लॅन ठरला. त्याप्रमाणे मागच्या शनिवारी ६ जोडपी आपापल्या मुलांना baby sitter किंवा आजी- आजोबांकडे ठेवून एकत्र भेटलो आणि धमाल केली. Dave & Busters मधे पूल खेळलो. मग Old City भागात एका martini bar च्या बाहेर रस्त्या कडेवर बसून गप्पा मारल्या. शेवटी Indonesian रेस्टॉरन्ट मधे जेवून घरी पोचे पर्यंत curfew time व्हायची वेळ आली होती. We should do it at least once every quarter म्हणत एकमेकांचा निरोप घेतला.

'जुन्या स्मृतींना सुखद उजाळा देण्याकरता गुणवत्तेशी अपरिहार्य तडजोड' असे HMV च्या काही रेकॉर्डिंग वर लिहिलेले असे त्याची आठवण झाली. प्रत्येकाच्या मनात मुलांना सोडून आल्याबद्दल थोडीशी खंत, आता पूर्वीसारखी जागरणं सोसणार नाहियेत याची तीव्र जाणीव, आणी तरिही जिवलग मित्रमैत्रिणींबरोबर थोडा वेळ तरी जुन्या गोष्टींची मजा लुटायला मिळाली म्हणून आनंद.



Wednesday, September 13, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास बी च्या आग्रहास्तव हिन्दी पुस्तके लेखक इत्यादी

in no particular order
कमलेश्वर
धर्मवीर भारती
अमृता प्रीतम
महादेवी वर्मा
शिवानी
इस्मत चुघताई
स'आदत हसन मन्टो
हरिवंशराय बच्चन
उप्नेद्रनाथ अश्क
फणीश्वरनाथ रेणु
प्रेमचंद
गुलझार
राजेन्द्रसिन्ग बेदी


अजून आठवतील तशी लिहीन पुस्तकांबद्दल पण सवडीने लिहीन.
हे सर्व जरा जुने लेखकलेखिका. गेली अनेक वर्षे धर्मयुग वाचले नसल्याने नवीन कोणी मला माहीत नाही. धर्मयुग सुद्ध अजून चालू आहे का नाही कोणास ठाऊक?




Thursday, September 14, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्मत चुघताई यांचे सर्वात पहिल्यांदा पुस्तक वाचले तेंव्हा मी दहावी- अकरावीमधे होते.

फाळणीच्या अगोदर, आताच्या भारत-पाकिस्तान सीमाभागात राहणार्‍या मोठ्या एकत्र कुटुंबाची गोष्ट होती. आता पुस्तकाचे नाव आठवत नाही- पण कथेतली 'मी' त्या कुटुम्बातली एक लहान मुलगी असते, साधारण लम्पन च्या वयाची ( ref प्रकाश नारायण संत).

त्याच कुटुम्बात त्या मुलिची एक लग्नाळू मावशी का आत्या असते. पुढे अनेक वर्षांनी एक मुलगी या कथालेखिकेला भेटायला येते आणि सांगते की ती त्या आत्या ची मुलगी. त्या आत्याने घरातून पळून जाउन लग्न केलेलं असतं. त्या एकत्र कुटुम्बात शिकवणी करायला येणार्‍याशी.
कथा लेखिक म्हणते ' किती नशीबवान तुझी आई, ज्याच्यावर प्रेम जडलं त्याच्याशीच लग्न करून संसार मांडता आला' वगैरे वगैरे. तर ती मुलगी सांगते माझ्या बाबांचं आईवरती प्रेम तर खरंच पण त्याहीपेक्षा जास्त दिव्य प्रेम 'मच्छुचाचांचं'. कथालेखिका गोन्धळते. कारण मच्छुचाचा म्हणजे कोणी तरी दूरचा, आश्रित टाईप माणूस असतो आणि घरातले सर्व बुजुर्ग त्याच्या नावाने बोटं मोडत असतात.

ती मुलगी सांगते की पळून जाऊन लग्न करायला आनि पुढेही संसार थाटायला मदत मच्छू चाचांनीच केलेली असते. यावर कथालेखिका थोडिशी गप्प होते. तर ती मुलगी सांगते ' मला माहिति आहे की मच्छु चाचांच माझ्या आईवर निस्सीम प्रेम होतं. पण त्यांना हे ही माहित होतं की आईचं मन कोणावर आहे? आणि आइला सुखी बघण्यासाठी त्यांनी स्वत:कडे सर्व प्रकारचा वाईटपणा घेऊन तिला मदत केली. मी अल्ला कडे नेहेमी मागते की माझ्यावर कोणी मच्छु चाचांसारखं प्रेम करणारा मला लाभू दे'

तीसेक वर्षे झाली असतील हे पुस्तक वाचून पण मुस्तकीम हे त्या मच्छु चाचांचं खरं नाव पण अजून लक्षात आहे. पुढच्या वेळी घरी गेले की ते पुस्तक शोधले पाहिजे.



Thursday, September 28, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव आनंद

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया मधला जो लायटर आहे तो मिळवण्यासाठी सिगरेट प्यायची सुद्धा तयारी होती माझी आणि माझ्या मैत्रिणींची एके काळी.

मी दहावी ला असताना हम दोनो टि व्ही वर लागला होता. व्हिडीओ च्या अगोदरचा काळ ( खूप खूप वर्षांपूर्वी) होता तो. त्यामुळे जुने चित्रपट गणपती उत्सवात नाहीतर टि व्ही वर लागले तरच. तो चित्रपट दाखवणार म्हणून कळल्यापासून इतकी उत्सुकता काय विचारू नका!

तो पर्यंत फक्त अभी न जाओ छोडकर गाण्यावरून माहिती होता हा चित्रपट. पण सिगरेटच्या धुराच्या वलयात ' मैं ज़िन्दगीका साथ निभाता चला गया' बघितलं आणि ते गाणं अभी ना जाओ छोडकर पेक्षा कितीतरी वरच्या नम्बरवर पोचलं होतं.

काला बाझार मधे गाडीतलं गाणं ( उपरवाला जानकर अंजान है) आणि खोया खोया चांद हे गाणं छायागीत वाल्यांचं एकदम फ़ेवरिट असावं. पण त्यांच्या कृपेने ते कितीही वेळा पाहिलं तरी परत तितकीच मजा यायची. एक एक सीन तोंडपाठ असे त्या गाण्यांमधला. अगदी अपलक बघितलेली आणि कानात, डोळ्यात साठवलेली गाणी.

पिकलेले केस आणि वयाच्या खुणा दिसू लागलेला मॅकेन्रो बघताना स्वत:च्या वाढत्या वयाची जाणीव कशी तीव्र होते? देव आनंद ला मात्र कधीही पहा. कायम तो दहावीत असताना पाहिलेल्या, सिगरेटची वलयं सोडत गाणं म्हणाणार्‍या मेजर ची आठवण करून देतो.

त्याच्या नव्या चित्रपटांना यश न मिळाल्याबद्दल त्याची टिंगल करणारे करू देत खुशाल. माझ्या लेखी ' हर फिक्र को धुएं मे उडा' वर हलकासा पॉझ घेणारा देव खरंच त्याचं गाणं जगलाय!



Wednesday, October 04, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती( कराडकर) कडून मिळालेलं नातिचरामि वाचतेय सध्या पण भाषा आणि विषय दोन्ही मनाची पकड घेत नाहीयेत. इतरांना का आवडलं नसावं आणि तरी इतका गाजावाजा का झाला हे कळेल म्हणून चिवटपणे वाचते आहे.

थोडेसे Ullysses सारखे stream of consciousness टाइप लिखाण वाटते. त्यामुळे वास्तव की स्वप्नरंजन, वर्तमान की भविष्य की भूत याचा फार गोंधळ उडतो वाचताना.

दुसरी मला जाणवलेली गोष्ट अशी, की निदान मी तरी अगदी कळत्या-नकळत्या वयाच्या सीमारेषेवर Mills and Boon पासून Harold Robins पर्यंत आणि नंतर देखील Anais Nin सारखी पुस्तके वाचली आहेत.

पण मराठीतून स्त्री पुरुष सम्बधांबद्दल वाचताना कसंसंच वाटतं. काहीवेळा तर अशा वर्णनांनी मूळ कथानकाचा रसभंग होतो असं वाटतं.

प्र ना संतांच्या एका पुस्तकात लम्पू सुमीला चुम्बन चा अर्थ विचारतो त्यात त्याला सुमी कशी दिसते, तिला पाहून त्याला काय वाटतं हे इतकं सुरेख लिहिलंय. तसं इतर कोणाच्याही लिखाणात का आढळत नाही? त्या लिखाणापेक्षा जास्त adult दृष्टीकोनातून लिहिलेलं मराठीतून वाचायला ( अगदी चानी सुद्धा) का खटकतं?

मातृभाषेतून हे चुम्बन आलिंगन व्यतिरिक्त काही वाचायला का जड जातं? तुमचं काय मत





Thursday, October 05, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे New York Times मधले आवडते लेखक कालच वारले. त्यांनी लिहिलेला शेवटचा लेख आज प्रसिद्ध झाला आहे. आणि त्यात तृष्णा चा उल्लेख आहे. वाचून तोंडाला पाणी तर सुटलंच पण डोळे ही भरून आले.
तृष्णा मधली सगळ्यात महागडी डिश जेंव्हा ७ रुपयांची होती तेंव्हा तिथे कितीदा गेले असेन कोणास ठाऊक? आतासुध्दा इथनं जाणार्‍या भारतीय वा अभारतीय लोकांना सांगायच्या रेस्टॉरंट मधे तृष्णा आणि महेश असतातच.

http://www.nytimes.com/2006/10/05/travel/05applepics.html?pagewanted=3&;ref=travel


Friday, October 06, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश रेस्टॉरंटला जाण्याचा रस्ता

आधी Strand bookstall कुठे आहे ते शोधून काढून तिथे जावे. तिथं जाऊन खिसा ऑलमोस्ट रिकामा झाला की तिथून बाहेर पडावे आणि बाहेर विचारावे 'महेश रेस्टॉरंट कैसा जानेका?'. पायी जाता येईल तिथून (पुस्तकांचं वजन फार नसेल तर).

महेश आणि तृष्णा मधे शाकाहारी काहितरी मिळेल पण ते चेसापीक बे भागात उन्हाळ्यात जाऊन चिकन नगेट खाण्यासारखं आहे. तरी दोन्ही ठिकाणी वेटरला विचारून 'मंगळूरी स्पेशल' काय मिळेल ते मागवावे.

( बी ने प्रश्न विचारायच्या अगोदरच सांगते मेरीलॅंड आणि व्हर्जिनिआ मधला चेसापीक ( chesapeake ) बे हा भाग खेकड्यांकरता प्रसिद्ध आहे. अनेक अमेरिकन लोकांना ते खायला जमत अथवा आवडत नाही. त्यांचं दुर्दैव दुसरं काय? )



Friday, October 06, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवचटांचं कार्यरत किंवा सुनीता देशपांडे यांचं मण्यांची माळ वाचून बर्‍याच जणांची अवस्था माझ्या सारखी झाली असेल.

आपणही डोळसपणे काहीतरी करावं असं प्रकर्षाने वाटतं पण प्रत्यक्षात काही करायला जमेल की नाही असं वाटतं.

कालच्या न्यू यॉर्क टाइम्स मधे Energe Diet म्हणून एक छान लेख वाचला. सर्व साधारण संसारी माणसाला पेलवतील असे उपाय आणि त्यांचे परिणाम सांगितले आहेत.

मला तरी फार आवडला तो लेख म्हणून त्याची लिन्क
http://www.nytimes.com/2006/10/05/garden/05green.html?em&;ex=1160280000&en=347b7c69f95f9364&ei=5087%0A


Saturday, October 28, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bill Martin Jr व John Archambault यांची माफी मागून

क म्हणाला ख ला
चल जाऊ या कुलाब्याला
वाळूमध्ये खेळायला

ग म्हणाला आलोच मी
घ आणि ङ म्हणाले
आम्हालापण घ्या ना सोबतीला

सुका सुका बोम्बील सुका बोम्बील

च अन छ म्हणाले
चला चला चट चट
ज झ आणि ञ पण निघाले झटपट

सगळे चालले कुलाब्याला
सुका सुका बोंबील
पाण्यात पोहायला कोण कोण येतील?

ट ने मारली टुणकन उडी
ठ ने ठोकळी आरोळी मोठी
ड आणि ढ दोघांची जोडी
ण त्यांच्या मागे तोंड वेंगाडी

सुका सुका बोंबील सुका बोंबील
किल्ला बांधायला कोण कोण येतील

त आणि थ थांबले थोडे
द आणि ध पण दूर उभे राहिले
न मात्र लगेच निघाला
दर्याकिनारी गम्मत पहायला

प आणि फ पुढे पळाले
ब आणि भ भराभरा निघाले
म ने मोठी मोळीच आणली
किनार्‍यावरती शेकोटी करायला
सुका सुका बोंबील सुका बोंबील
मालाडचा म्हातारा शेकोटीला येईल


य म्हणाला झाडून सारे या
र, ल आणि व म्हणाले वा रे वा

श आणि ष दोघे जुळे भाउ
म्हणाले आपण एकत्रच जाउ
स आणि ह म्हणाले हसता का रे?

सुका सुका बोंबील सुका बोंबील


ळ म्हणे मी सगळ्यात पुढे
क्ष त्याचे काडतो वाभाडे
ज्ञ कसा समजूतदार
म्हणे माझ्या आज्ञेत चला
सगळे मिळून जाउया कुलाब्याला

सुका सुका बोंबील सुका बोंबील
सगळे जमले की खरंच धमाल येईल



Monday, October 30, 2006 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Strand Books चे मालक शानभाग यांची मुलाखत आलीय लोकसत्ता मधे त्याची लिंक

http://www.loksatta.com/daily/20061015/chatura16.htm

मुम्बै ला जाऊन strand मधे न जाता परत आले तर सहार विमानतळावर अडकून पडावे लागते मला :-)

इथे वर्षभर amazon, Borders, eBay सर्व काही हाताच्या अंतरावर असून सुद्धा मी strand मधे जाऊन वेळ घालवते म्हणून घरच्यांना राग येतो. मग त्यांना पण सोबत न्यायचे आणि उचलवतील तितकी पुस्तके घ्या म्हणायचे हा सोपा उपाय. पुस्तके शानभागांकडेच ठेवायला सांगून महेश मधे जाऊन हादडून यायचे. Bombay stores जेंव्हा Bombay Swadeshi होते तेंव्हा तिथनं ही खरेदी असायची आणि मग टॅक्सीत बसून घरी!

स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच!


Friday, November 03, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rainer Maria Rilke नावाचा एक कवी आणि लेखक होता. त्याने लिहिलेली काही पत्रे letters to a poet या नावाने संग्रहित करून एक पुस्तकात छापली होती. त्या पुस्तकाची अनेक भाषांमधे अनेकांनी भाषांतरे केलि आहेत. छोटेखानी पुस्तक आहे, पण एका दमात वाचता येत नाही. थोडे थोडे वाचून, त्यावर विचार करून पुढचे वाचावे. एकदा वाचून झाल्या वर देखील परत मधूनच एखाद दोन पानं वाचावीत असं पुस्तक आहे. इथे कवितांवर, कवितांच्या रसग्रहणावर, समिक्षेवर आणि जाता जाता कवि-कवयित्रींवर चिकार V&C चालतंय. म्हणून त्या पत्रांच्या अनुवादाची एक लिन्क

http://www.sfgoth.com/~immanis/rilke/letter1.html

अमेरिकेतील सर्व स्थानिक वाचनालयात सहज मिळावे


Sunday, December 10, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात जायची तयारी सुरू झाली की दर वर्षी मी संकल्प सोडते 'यंदा तरी आपल्या कडे असलेल्या मराठीहिन्दी पुस्तकांची यादी करून न्यायची' पण गेल्या कित्येक वर्षात ते काही जमलं नाही. या वर्षीच्या उन्हाळ्यात नव्या घरात रहायला आलो. पहिल्यांदाच पुस्तकं बर्‍यापैकी नीट मावू शकतील एवढी जागा मिळाली. महतप्रयासाने, सर्व मराठी पुस्तकं लेखकाच्या आडनावाच्या 'अकारविल्हे' प्रमाणे लावली. दोन धृव ( खांडेकर ), दाद, आपुलकी आणि साठवण, आहे मनोहर तरी ( देशपांडे) या पुस्तकांच्या दोन दोन प्रती सापडल्या. तेंव्हापासून ह्या यादी करण्याच्या संकल्पाने परत उचल खाल्ली होती. आता निघायला उणेपुरे दोन आठवडे उरले आहेत. तर आज 'आठवड्याच्या स्वयम्पाकाची पूर्व तयारी' कडे दुर्लक्ष करून एकदाची सर्व गद्य पुस्तकांची यादी केली. कवितांची पुस्तके आता उद्या करीन.

पण ही कागदावरची गिचमीड सुवाच्य अक्षरात आणि easy to edit स्वरुपात नोंदून ठेवण्यासाठी हा प्रपंच.



Monday, December 11, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ आचार्य अत्रे कर्हेचे पाणी - भाग दोन
२ केल्याने देशाटन
३ घराबाहेर
४ झालाच पाहिजे
५ निवडक अत्रे
६ मराठी माणसे, मराठी मने
७ मी कसा झालो
८ मुद्दे आणि गुद्दे
९ यू आर अनंतमूर्ती संस्कार
१० एस ए अय्यर आझाद हिंद फौजेची कथा
११ अनिल अवचट अमेरिका
१२ आप्त
१३ कार्यरत
१४ छंदांविषयी
१५ धागे आडवे उभे
१६ प्रश्न
१७ माणसं
१८ मोर
१९ स्वत:विषयी
२० ह ना आपटे गड आला पण सिंह गेला
२१ बाबा आमटे ज्वाला आणि फुले
२२ महेश एलकुंचवार वाडा चिरेबंदी
२३ शिरीष कणेकर इरसालकी
२४ खटलं आणि खटला
२५ गोतावळा
२६ चापलूसकी
२७ यादोंकी बारात
२८ मधु मंगेश कर्णिक कॅलिफोर्नियात कोकण
२९ अनंत काणेकर निशिकांताची नवरी
३० वसंत कानेटकर वादळ माणसाळतंय
३१ विषवृक्षाची छाया
३२ गिरीश कार्नाड हयवदन
३३ शिवराम कारंथ मिटल्यानंतर ( अळियदमेळे ?)
३४ अनंत कालेलकर माझं होम, माझी मुलं
३५ काकासाहेब कालेलकर पूण्यभूमी गोमांतक
३६ व पु काळे आपण सारे अर्जुन
३७ काही खरं काही खोटं
३८ वपुर्वाई
३९ अण्णासाहेब किर्लोस्कर सौभद्र
४० शांता किर्लोस्कर भातुकली
४१ जी ए कुलकर्णी अमृतफळे
४२ आकाशफुले
४३ ओंजळधारा
४४ निळासावळा
४५ पारवा
४६ पिंगळावेळ
४७ रक्तचंदन
४८ रमलखुणा
४९ हिरवे रावे
५० सांज शकुन
५१ स्नेहसुधा कुलकर्णी - प्रज्ञावंतांची दैनंदिनी
५२ दादा कोंडके एकटा जीव सदाशिव
५३ माधव कोंडविलकर आता उजाडेल
५४ अशोक कोठावळे( संपादक) लेखकाचे घर
५५ चिं त्र्य. खानोलकर अजगर
५६ आपुले मरण
५७ गणुराया आणि चानी
५८ निवडक खानोलकर
५९ राखी पाखरू
६० वि स खांडेकर अभिषेक
६१ अविनाश
६२ गोकर्णीची फुले
६३ क्रौंचवध
६४ ढगाआडचे चांदणे
६५ दवबिंदू
६६ दोन धृव
६७ प्रसाद
६८ मुखवटे
६९ ययाति
७० रानफुले
७१ विकसन
७२ हिर्वा चाफ़ा
७३ क्षितिजस्पर्श
७४ भा द खेर सारथी सर्वांचा
७५ माधव गडकरी राम गणेश गडकरी
७६ रा ग गडकरी एकच प्याला
७७ प्रेमसन्यास
७८ भाव बंधन
७९ राजसन्यास
८० प्रतिभा गणोरकर बा भा बोरकर
८१ वीणा गवाणकर नाही चिरा - डॉ खानखोजे
८२ गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत - भाग दोन
८३ सुधीर गाडगीळ लाइफ़स्टाईल
८४ लक्ष्मण गायकवाड वडार वेदना
८५ मिलींद गुणाजी माझी मुलुखगिरी
८६ शरच्चंद्र गोखले माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर
८७ मंगला गोडबोले अशी घरं अशी माणसं
८८ आणि मी
८९ झुळूक
९० पोटाचा प्रश्न
९१ सहवास हा सुखाचा
९२ नीलम गोर्हे नारीपर्व
९३ ना ग गोरे कारागृहाच्या भिन्ती
९४ ग्रेस मितवा
९५ आनंद घोरपडे नामवंतांचे विनोद
९६ वि द घाटे काही म्हातारे व एक म्हातारी
९७ जयकांतन जयकांतनच्या कथा
९८ अशोक जैन सोंग आणि ढोंग
९९ चिं वि जोशी आरसा
१०० एरंडाचे गुर्हाळ
१०१ ओसाडवाडीचे देव
१०२ ना मारो पिचकारी
१०३ पाल्हाळ
१०४ मेषपात्रे
१०५ रहाटगाडगे
१०६ लंकावैभव
१०७ विनोद चिंतामणी
१०८ संचार
१०९ संशयाचे जाळे
११० मुकुंद टांकसाळे सक्काळी सक्काळी
१११ मनिषा टिकेकर कुंपणा पलीकडला देश
११२ लक्ष्मीबाई टिळक स्मृती चित्रे
११३ ग ल ठोकळ ठोकळ गोष्टी
११४ शरदिनी डहाणुकर फुलवा
११५ मृणालिनी ढवळे दृष्टी आडची सृष्टी
११६ अरुणा ढेरे काळोख आणि पाणी
११७ कृष्ण किनारा
११८ नाग मंडल
११९ भगव्या वाटा
१२० लावण्य यात्रा
१२१ लोकसंकृतीची रूपे
१२२ गोपीनाथ तळवलकर सहस्त्र धारा
१२३ गोविंद तळवलकर अभिजात
१२४ बहर
१२५ लाल सलाम
१२६ वाचता वाचता -२
१२७ पूर्णचंद्र तेजस्वी चिदम्बर रहस्य
१२८ प्रिय तेंडुलकर ज्याचा त्याचा प्रश्न
१२९ पंचतारांकित
१३० विजय तेंदुलकर कादम्बरी -एक
१३१ मधुकर तोरडमल आयुष्य पेलताना
१३२ पुष्पा त्रिलोकेकर वेध
१३३ जयवंत दळवी निवडक ठणठणपाळ
१३४ परममित्र
१३५ माजघर
१३६ सारे प्रवासी घडीचे
१३७ अरुण दाते शतदा प्रेम करावे
१३८ गो नी दांडेकर हे तो ष्रींची इच्छा
१३९ फादर फ्रांसिस दिब्रिटो ओअसिस च्या शोधात
१४० सीमा देव सुवासिनी
१४१ गोविंद बल्लळ देवल शारदा
१४२ गौरी देश्पांडे आहे हे असं आहे
१४३ पु ल देश्पांडे अघळ पघळ
१४४ अपूर्वाइ
१४५ असा मी असामी
१४६ आपुलकी
१४७ आम्ही लटिके ना बोलू
१४८ एक झुंज वार्याशी
१४९ एका कोळीयाने
१५० उरलं सुरलं
१५१ कान्होजी आंग्रे
१५२ काय वाट्टेल ते होईल
१५३ कोट्याधीश पु ल
१५४ खोगीर भरती
१५५ गणगोत
१५६ गुण गाईन आवडी
१५७ गोळा बेरीज
१५८ चार शब्द
१५९ चित्रमय स्वगत
१६० जावे त्यांच्या देशा
१६१ तीन पैशांचा तमाशा
१६२ ती फुलराणी
१६३ तुझे आहे तुजपाशी
१६४ दाद
१६५ नवे गोख़ुळ
१६६ नस्ती उठाठेव
१६७ पुरचुंडी
१६८ पुलकित शट्कार
१६९ पु ल पंचाहत्तर
१७० पूर्वरंग
१७१ पोरवय
१७२ बटाट्याची चाळ
१७३ भाग्यवान
१७४ मराठी वांग्मयाचा गाळीव इतिहास
१७५ मित्रहो
१७६ मुक्कम शांतिनिकेतन
१७७ मैत्र
१७८ मोठे मासे , छोटे मासे
१७९ रवींद्रनाथ -तीन व्याख्याने
१८० रसिकहो
१८१ रेदिओवरील भाषणे व ष्रुतिका -१ व २
१८२ वटवट वटवट
१८३ वयम मोठम खोटम
१८४ वंगचित्रे
१८५ व्यक्ती आणी वल्ली
१८६ विठ्ठल तो आला आला
१८७ पु ल एक साठवण
१८८ स्वगत
१८९ सुंदर मी होणार
१९० हसवणूक
१९१ सुनिता देशपांडे आहे मनोहर तरी
१९२ आहे मनोहर तरी वाचन आणि विवेचन
१९३ मण्यांची माळ
१९४ मनातलं अवकाश
१९५ सोयरे सकळ
१९६ नारायण धारप स्वप्न मोहिनी
१९७ शं ना नवरे सर्वोत्कृष्ट शन्ना
१९८ जयंत नारळीकर यक्षांची देणगी
१९९ याला जीवन ऐसे नाव
२०० वामन परत न आला
२०१ भालचंद्रा नेमाडे कोसला
२०२ जरीला
२०३ झूल
२०४ बिढार
२०५ साहित्याची भाषा
२०६ सेतू माधवराव पगडी अहकामे आलमगिरी
२०७ नेसोनी शालू हिरवा
२०८ अप्पा पटवर्धन गावाचे गोकुळ
२०९ वसुंधर पटवर्धन हाय
२१० दया पवार बलुतं
२११ पासंग
२१२ दिलीप प्रभावळकर अवती भवती
२१३ मीना प्रभु दक्षिणरंग
२१४ कमल पाध्ये बंध अनुबंध
२१५ भाउ पाध्ये बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
२१६ वासूनाका
२१७ म गो पाठक लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव
२१८ के ज पुरोहित व्रात्यस्तोम
२१९ श्री न पेंडसे रथचक्र
२२० हद्दपार
२२१ प्रभाकर पेंढारकर रारंगढांग
२२२ भालजी पेंधारकर साधा माणूस
२२३ शिरीष पै मी
२२४ माझे मला
२२५ टिप फुले टिप ग
२२६ ना सी फडके निवडक कथा
२२७ बावनकशी
२२८ सितारा मंझिल
२२९ सुधीर फडके गाजलेली गीते
२३० य दि फडके नाही चिरा नाही पणती
२३१ शकुंतला फडणीस फोटोवर टिच्चून
२३२ न र फाटक लोकमान्य
२३३ बाळ फोंडके जंतर मंतर
२३४ जावे विज्ञानाच्या गावा
२३५ वसंत बापट अहा देश कसा छान
२३६ ताणे बाणे
२३७ विसाजी पंताची वीस कलमी बखर
२३८ विद्या बाळ संवाद
२३९ वि आ बुवा नवर्यांवर पी एच डी
२४० विश्राम बेडेकर रणांगण
२४१ दुर्गा भागवत आस्वाद आणि आक्षेप
२४२ दुपानी
२४३ पूर्वा
२४४ पैस
२४५ भावमुद्रा
२४६ रानझरा
२४७ व्यासपर्व
२४८ भा रा भागवत छगनचे चर्हाट चालूच
२४९ हाजीबाबाच्या गोष्टी
२५० मनोज भाटवडेकर आपली मुलं आणि आपण
२५१ विनोबा भावे महाराष्ट्रीयांशी हितगूज
२५२ सुभाष भेंडे आमचा गोवा, आम्हाला हवा
२५३ ऐसी कळवळ्याची जाती
२५४ साहित्य संस्कृती
२५५ एस एल भैरप्पा पर्व ( अनुवाद उमा कुलकर्णी)
२५६ बा सी मर्ढेकर मर्ढेकरांच्या कादम्बर्या
२५७ रमेश मंत्री ओठ सलामत तो
२५८ सह्याद्रीची चोरी
२५९ ह मो मराठे निवडक कथा
२६० निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
२६१ श्री म माटे बारा शस्त्रज्ञ
२६२ ग दि माडगूळकर कृष्णाची करंगळी
२६३ गदिमा
२६४ चंदनी उदबत्ती
२६५ जोगिया
२६६ थोरली पाती
२६७ बांधावरल्या बाभळी
२६८ बोलका शंख
२६९ भाताचे फूल
२७० मंतरलेले
२७१ सोने आणि माती
२७२ व्यंकटेश माडगूळकर उम्बरठा
२७३ कोवळे दिवस
२७४ चरित्र रंग
२७५ चित्रकथी
२७६ पांढर्यावर काळे
२७७ बाजार
२७८ व्यंकटेश माडगूळकर यांची कथा
२७९ द मा मिरासदार फर्मास गोष्टी
२८० अम्बरीष मिश्र शुभ्र काही जीवघेणे
२८१ केशव मेश्राम ज्वाला कल्लोळ
२८२ दि बा मोकाशी मोकाशी यांची कथा
२८३ गंगाधर मोरजे मराठी लावणी वांग्मय
२८४ बाबू मोशाय चित्राची गोष्ट
२८५ शहेनशहा
२८६ सण्डे के सण्डे
२८७ आनंद यादव आत्म चरित्रा मीमांसा
२८८ मं वि राजाध्यक्ष भाषाविवेक
२८९ प्रतिभा रानडे ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी
२९० यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी
२९१ फिरोझ रानडे काबूलनामा
२९२ नार्ला वेंकटेश्वर राव वेमना



Saturday, December 16, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युनिकोड, मायक्रोसॉफ़्ट एक्सेल आणि मी अशा तिरंगी सामन्यात शेवटच्या स्थानावर कोण आहे ते कळतंय पहा किती स्पष्ट :-(

माझ्या हस्ताक्षराची गिचमीड परवडली म्हणायची वेळ आलीये.

हितगुजवर इतरत्र वेगवेगळ्या रंगात, Strike through,italics इत्यादी लिहिणार्‍यांना माझे शिरसाष्टांग नमस्कार!



Tuesday, December 19, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ऑफ़िसमधल्या मैत्रिणीने cookie exchange ला बोलवले होते. एका Art Gallert- Cafe मधे रविवारी दुपारी ३ ते सहा या वेळात बोलावलं होतं. जिने बोलावलं ती मैत्रीण सगळ्यांकरता स्नॅक्स आणि वाईन आणणार होती.

साध्या Christmas Cookies किंवा पॉलिटिकली करेक्ट म्हणायचं तर Holiday Themed Cookies ! प्रत्येकीने आपल्या आवडीच्या सहा डझन cookie आणायच्या. तिथे जितक्या बायका येतील त्या संख्येने बहात्तर ला भागायचे. प्रत्येकीला सर्वांच्या कूकीस मधून तितक्या कूकीस मिळणार.

इथल्या बर्‍याच बायका Christmas च्या सुमारा वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीस करुन त्या शेजारपाजार्‍यांना, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना वाटतात. आपल्या दिवाळी फराळासारखंच थोडक्यात. घरच्या करता पण बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीस करायची पद्धत आहे.

माझी ही कूकी एक्सचेंज ची पहिली खेप. माझे गेल्या अनेक वर्षांपासून Holiday baking चे बहुधा अयशस्वी प्रयोग आठवून नवर्‍याने त्याच्या ऑफ़िसजवळच्या बेकरी मधून कूकी आणायची तयारी दाखवली होती. पण मी नुकतेच Julie adn Juliaa वाचले असल्याने भारावलेली होते. Baking with Julia नावाच्या पुस्तकात एक बिस्कॉटी ची रेसिपी वाचली होती ती शोधून काढली आणि त्याप्रमाणे बिस्कॉटी केल्या. त्या सगळ्या एका मोठ्या डब्यात घालुन घेऊन गेले होते.

तिथे आलेल्या बाकी बायका मात्र मार्था स्टुअर्ट कडे कित्येक वर्षांची शिकवणी असल्यागत सुंदर कूकीस, त्याहूनही सुंदर टोपल्या, डबे आणि ट्रे मधे घालून घेऊन आल्या होत्या. काहींनी सहा-सहा कूकी एका छोट्या रंगीबेरंगी पिशव्यांमधे आणल्या होत्या. होस्टेस ने सर्वांच्या रेसिपी आधी मागवल्या होत्या त्या सर्व Index Cards वर छापून त्या सर्व कार्डांचा एक्-एक गठ्टा करून तो एक रंगीत रिबीनेने बांधून प्रत्र्येक रिबिनिमध्ये एक्-एक छोटं कूकी कटर बांधून आलेल्या सर्वांना दिला होता.

त्या आर्ट गॅलरी मधे काही तैल रंगातली चित्रं, काही ' encaustic नावाचे प्रकार ( हे गूगल करणार होते विसरलेच की) आणी बरेचसे पॉटरी चे प्रकार होते. ) छोटे चायनीज चहाचे कप किंवा साधारण त्या आकाराचे मीठ मिरी Sprinklers सुध्दा पन्नासेक डॉलरच्या आसपास होते. (मिनोती तू ही अशी एखादी आर्ट गॅलरी शोध बरं लवकर! )


रविवारी दुपारी पुस्तके वाचणे किंवा गेम पहाणे हे आवडीचे. पण संसारसंगे बहू शिणले मी म्हणताना वाचन टी व्ही पहाणे यांना वेळ मिळत नाही. ते दोन्ही न करताही एक दुपार सत्कारणी लागली. दोन्-चार नव्या ओळखी झाल्या आणि कमीत कमी पंधरा वीस प्रकारच्या home made कूकीस मिळाल्या. Santa must have overlooked at least some of (mis) deeds this year.



Friday, March 02, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर वर्षाप्रमाणे भारतातून येताना बरीचशी पुस्तकं आणली- औंध मधलं Crossword आणि पार्ल्यात जवाहर ह्या दोनच ठिकाणी जाता आलं तरी ' बहुत माल मिल गया'. बंगळूर मधे पण landmark मधून दोन्-तीन इंग्रजी पुस्तकं आणली.

इथे आल्या आल्या घरकाम, ऑफ़िसचं काम यात इतकी बुडून गेले की बरीचशी पुस्तकं अजूनही पेटीतच आहेत.

माझं लग्न ठरताना आईने तिच्या जावयाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या
१. तिला स्वैपाक अजिबात येत नाही
२. पुस्तकांचं व्यसन आहे. जेवणाच्या टेबलवर सुद्धा वाचत असते.

अर्थात तो माझा चांगला मित्र असल्याने त्याला दोन्ही गोष्टी माहिती होत्या. पण पुस्तकांच्या व्यसनाची तीव्रता त्याला कळली नव्हती. लग्न झाल्यावर एकत्र संसार म्हणजे बँक अकाउन्ट एकत्र करणे, गाड्यांचे इन्शुरंस एकत्र करणे घराचे रजिस्ट्रेशन बदलणे, रिटायरमेन्ट फंडाचे नॉमिनेशन बदलणे इत्यादी व्यापातून जात होतो. तेंव्हा मी माझ्या पश्चात माझ्या इस्टेटिची ( एक भरपूर कर्ज असलेलं घर, पाच वर्ष जुनी आनि एक लाख मैल असलेली गाडी, घरातलं सामान सुमान आणि तीन्-चारशे पुस्तकं गडगंजच झाली की इस्टेट) कशी वाटणी करावी ते सांगितलं होतं.

"घर, गाडी सामान सुमान सगळं तुला, दागिने जे काही आहेत ते सर्व nieces ना वाट. मैत्रिणींच्या मुलींना वगळू नकोस आणि लग्नात देऊ म्हणून थाम्बू नकोस. मराठी आणि हिन्दी पुस्तकं अमेरिकेत रहाणार्‍या आणि मराठी पुस्त्कांवर अपार प्रेम करणार्‍या माझ्या मेव्हण्याला देशील. इंग्रजी पुस्तकं असाच अजून एक मेव्हणा आहे पुस्तकवेडा त्याला देशील. त्या दुसर्‍याला मराठी लिहिता वाचता येत नाही. "

तेंव्हा पासून माझं हे 'मृत्युपत्र' फारसं बदललं नाही. घरं बदलली, गाड्या बदलल्या, सामान सुमान अनेक पटींनी वाढलंय. पुस्तकांच्या संख्येत पण वाढ झालीये. पण नॉमिनेशन तेच आहे अजून.

अलिकडेच मराठी पुस्तकं ज्याच्या नावावर केली होती तो मेव्हणा सहकुटुम्ब भारतात परत गेला. त्याने आपल्या सगळ्या पुस्तकांचं काय केलं हे अजून विचारलेलं नाही. पण आता माझ्या पुस्तकांचं काय करावं असा विचार आलाच मनात.

त्याच सुमारास आईने म्हटलं की कुठल्याशा लेखकाने दुर्गा भागवतांनी त्यांना सल्ला दिल्याचं लिहिलंय.दुर्गाबाईंनी म्हटलं होतं की 'वयाची सत्तरी उलटल्यावर सगळी पुस्तकं सत्पात्री दान करावीत. मोह ठेवू नये' पण त्या लेखकांनी कबूल केलंय की त्यांना काही या सल्ल्याचे पालन करणं जमलं नाही. प्रत्येक पुस्तका मागे काही न काही कहाणी आहे. अगदी पुस्तक आवडलेलं नसलं तरी ते देऊन टाकवत नाही आणि 'सत्पात्र' कोण ते ठरवणे फार कठीण.

मलाही त्या लेखकांचं म्हणणं पटलं एकदम. आपल्या हयातीत पुस्तकं देऊन टाकणं मला काही जमणार नाही. आणि आपल्या माघारी ती पुस्तकं गराज सेल मधे विकली जातील ही कल्पनाही कशीशीच वाटते. बरं मराठी पुस्तकं गराज सेल मधे कोण घेईल?

दोन चार दिवसांपूर्वी U of Penn च्या लायब्ररी मधली मराठी पुस्तकं शोधत होते. तेंव्हा विचार आला की या लायब्ररीलाच द्यावी पुस्तकं. निदान 'ती फुलराणी' मधले रशियन हेर तरी ती पुस्तकं वाचतील.

हितगुजवर माझ्या सारखे पुस्तकवेडे अनेक असतील. तुम्ही आपल्या पुस्तकांचं काय करणार आहत?



Friday, March 02, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तकांच्या बाबतीत दोन स्वप्ने आहेत्- एकमेकांशी निगडित आहेत.

पहिलं म्हणजे माझं पुस्तकांचं वेड पाहून, माझ्या घरात, जीवनात पुस्तकांना किती मानाचं स्थान आहे हे पाहून कुणीतरी बुजुर्ग त्यांचा पुस्तक संग्रह मला देऊन टाकतील. त्यात दुर्मिळ उत्तमोत्तम पुस्तकं असतीलच. पण त्यात त्या पुस्तकप्रेमींनी लिहिलेल्या नोंदी, खुणा असतील आणि त्यामुळे ती पुस्तकं वाचण्याचा आनंद द्विगुणित होइल.

मग दुसरं स्वप्न काय आहे म्हणता? कधी तरी मलाही माझी पुस्तकं वाचेल, जिवापाड जपेल अशी एखादी व्यक्ती भेटेल आणि मी माझी इस्टेट तिलात्याला देऊन टाकेन.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators