कॉपी कॅट
आम्ही अमेरिकेत ज्या भागात रहातो, इथे बर्यापैकी मराठी वस्ती आहे. सहाजिकच एकमेकांची ओळख सुद्धा आहे. competitiveness तर भलताच आहे. आम्ही फ़ार competitiveness च्या भानगडित पडत नाही. आधिच कही कमी कामं असतात का, की दुसरे काय करतायत आणि मग आपण त्यांचा वरचढ कसे ठरू हे असले विचार करायला ?
पण हे असं आहे. आणि वर वर हसवणारी ही गोष्टं, मला कुठेतरी अस्वस्थं करते आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
" त्यांची " आणि आमची ओळख होऊन आता दोन अडीज वर्षं झाली असतील. मी लोकांना सहसा लेबल चिकटवायला कचरते, पण ते मात्र ( निदान आम्ही जेव्हढे भेटलो ) , त्यावरून अग्दीच टिपिकल वाटले.
म्हणजे असं की तो h-1 वर आलेला. दोन वर्षानी लग्नं करून ती आलेली. पुढे दोन वर्षं तिची नोकरी करायची धडपड. त्यात नोकरी न मिळणं. मग नोकरी न करण्याचिच सवय होणं. पुढे दोन तीन वर्षात मूल होणं. मग त्यात बिझी. वगरे. तिला त्याचा support बहुतेक वेळा नसायचा. अर्थात, हे माझं impression होतं, चुकिचही असेल कदाचित.
त्या उलट त्यांना आम्ही अगदीच atypical वाटलो असू बहुतेक. म्हणजे मी नोकरी करणारी. independent आणि तो independence अतीशय fiercely जपणारी. काही बाबतित माझ्या पेक्षा superior आहोत, किव्हा मी चुकते आहे, हे महित असून सुद्धा तसं चार चौघात न दाखवणारा माझा नवरा. एकमत नसलं तरी एकमेकांच्या मागे १०० % support देणारे आम्ही. वगरे.
ह्यात चुकिचं कोणिच नाही आहे खरतर. फ़क्त विचार करायची पद्धत वेगळी आहे.
सहाजिकच आमच्यात तशी फ़ारशी common topics नसायची. पण तरीही ते आवरजून आणी मुद्दाम आमच्याशी संबंध वाढू पहात होते. आम्हालाही मैत्रि करायला ना नव्हती. पण हळू हळू एक गोष्ट लक्षात आली. ते म्हणजे आमच्या घरी ते आले, की घरातल्या एखद्या वस्तू बदल विचारायचे, आणि पुढल्यावेळी अम्ही त्यांच्या कडे गेलो, की तीच वस्तू आम्हाला त्यांच्या कडे दिसायची !
पहिल्यांदा आलेले, तेव्हा पडद्यां विषयी विचारलेलं. तेव्हा ते पडदे मीच शिवले असल्या कारणाने, त्याचं कापड कुठुन आणलं पसून सुरुवात करून मी अगदी आनंदानी त्यांना सगळं सांगितलं. पुढे त्यंच्या कडे जेवायला गेलो असताना, तेच नवीन पडदे मला त्यांच्या कडे दिसले. तेव्हा मी नवर्याला देखिल म्हटलं. पण माझा काही तरी गैरसमज झाला असेल असं म्हणुन आम्ही दोघांनीही सोडुन दिलं.
दुसर्यावेळी आमच्या dining room मध्ये उगीचच जागा वाया जाते आहे, म्हणुन मी एक बैठक केली होती. ही बैठक kitchen ला लागून असल्या मुळे, तिचा खुपच वापर व्हायचा. त्यातच ते दोघं चहा साठी आले. त्यांनी ती बैठक बघितल्या क्षणीच मी ओळखलं की त्यांच्या कडे पण आता dining room मध्ये बैठक येणार. आणि तसच झालं. आता मात्र आम्हा दोघांना हे मान्य करावच लागणार होतं की ते आम्हाला कॉपी करतायत.
मी pregnancy announce केल्यावर ३ महिन्यात तिने पण pregnancy announce केली. आता मला माहित आहे की ही काही कॉपी नाही, पण the timing made it out to be that way! .
पुढे आमच्या बेड वरची duvet , bathroom च्या पेंट चा रंग वगरे सगळं त्यांनी हळू हळू कॉपी केलं. तो पर्यंत आम्हाला त्यांचा काहिच त्रास नव्हता, पण मग त्यांनी मझ्या मुलीच्या खोली ची सजावट ( ज्यात मी स्वतः एक म्युरल केलं होतं ) , ती सुद्धा हुबे हुब उचलली आणि आम्ही त्यांना हळू हळू टाळू लागलो.
आता गेल्या आठवड्यातल्या घडा मोडीं कडे वळूया. मी haircut साठी सहसा फ़ार महागड्या salon वगरे मध्ये जात नाही. तसच नेहेमी प्रमाणे मी एका haircutting chain store मध्ये गेले. पण त्या वेळी मात्रं तिकडच्या बाईने माझे केस इतके विचित्रा सारखे कापले, की काय विचारू नका. म्हणजे दोन्ही बाजुने asymmetrical . मानेवरचे केस हे खांद्यान्वर येणार्या केसां पेक्षा तोकडे. वगरे. मी सांगितले होते तसे अजिबातच जमले नाही आणि वर ती बाई मला स्वतःहून सांगत होती की तिला जमलं नाही, सॉरी वगरे. तिथून घरी न येता मी त्या महागड्या salon मध्ये गेले, आणि म्हटल अहो ह्याचं काही करता येइल का. तर तिथल्या माणसाने सांगितलं की आताच केस कापले आहेत तर पुन्हा लगेच कापू नका. एखाद महिना जऊ द्या, मग मी नीट करून देतो. त्या प्रमाणे मी महिन्या भरा नंतरची appointment घेऊन बाहेर पडले.
आता नाइलाज असल्या मुळे सगळी कडे ते तसे कापलेले केस घेऊन जावं लागलं. मी विचार केला, काही हरकत नाही, आपल्याला थोडिच बघावे लगतायत केस ? जे बघतील ते काय समजायचं ते समजतील. त्यात एका मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता, त्याला gift घ्यायला गेले होते. तिथे " ती " भेटली.
ती - " ए केसाच काय केलं आहेस ? "
आधिच त्रासलेली, आणि त्यात हिला भेटल्या मुळे आजुनच डोकं फ़िरलेली मी, तिची फ़िरकी घ्यायची ठरवली :
मी - " latest style आहे बाई. कालच कापून आले. बरोबर एक magazine cutting नेलं होतं, त्यातून बघून कापले त्या hairstylist ने. "
असं म्हणुन तिने माझ्या भोवती गोल चक्कर मारली आणि पूर्ण haircut पाहुन घेतला. नंतर ती तिच्या मुलां बरोबर आणि मी माझ्या मुली बरोबर घरी आलो.
ह्या weekend ला बरेच दिवस बाहेर जेवायला गेलो नाही, म्हणुन एका indian lunch buffet ला गेलो. तिथे ते दोघं दोन्हि मुलांना घेऊन आलेले दिसले. माझ्या नवर्यानी मला एक कोपर खळी मारली. न लक्षात येऊन मी पुन्हा त्यांच्या कडे नजर वळवली. पहाते तर तिने तिचे केस, माझ्या सारखे कापून घेतले होते !
-----------------------------------------------------------------------------------------
वास्तवीक इतक्या हास्यास्पद असलेल्या गोष्टिने मला उगीचच अस्वस्थं केलं आहे. मी तिला restaurant मधून निघताना म्हटलं, की तिला ती स्टाईल खूपच सूट होते आहे, पण ते तिला बरं वाटावं म्हणुन, की स्वतःला बरं वाटावं म्हणुन, हे मात्र आजुनही समजू शकलेली नाही आहे.