|
गजाननाला बाबूशाची सवय लागली तर पुढच्या GTG चं काही खरं नाही... मुम्बईला मी येणार आहे हे सांगू का नको? ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
बा गजानना, काहीतरी लिही पुढे. नाहीतर सर्वाना वाटेल की तुझी साडी आणि शाळा एकदमच सुटली
|
Moodi
| |
| Thursday, June 01, 2006 - 9:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिलिंदा कठिण आहेस रे बाबा तू.. ![](/hitguj/clipart/rofl.gif) ![](/hitguj/clipart/rofl.gif)
|
लिहितो, जरा वेळ मिळाला की पुढचे लिहितो. ललिता, रचना, निनावी, झक्की, दिनेश धन्यवाद! झक्की धैर्य की काय ठाऊक नाही पण तेव्हा मला दुसरे काहीच [रडायचे पण :-) ] सुचले नाही हो. दिनेश, फुडं अभ्यास, शाळा असल्या शिग्नलमुळं, 'यळ पुरत न्हाय' ह्या ठेसनाला गाडी लवकरच लागली.. विनय, मग शेवटी काय ठरलं तुमचं?
|
Ldhule
| |
| Friday, June 09, 2006 - 1:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कशाच काय ठरल ? पितांबर नेसुन जीटीजीला येण्याच ? ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
मी येणार हे ठरलं.. पण बाबूशाची सवय लागली तुला, तर मात्र पीतांबर नेसून येऊ नको.. दिवे... दिवे... ![](/hitguj/clipart/rofl.gif)
|
तो पितांबर सोडून येतो! आणि सुटायच त्याच्या का हातात आहे??
|
Moodi
| |
| Monday, June 12, 2006 - 4:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गजानन खरा निसर्ग अनुभवलास रे तू या वनविहारानिमित्ताने. खुप गोड वर्णन केलस. सगळ्या मायबोलीकरांमध्ये जर सुखी जर कुणी असेल तर तो तुच आहेस.(तुझी फेवरीट कोट पण याची साक्ष देते) ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
सही कसला lucky आहेस. अमच्या स्काऊट डेज ची आठवण झाली. लिखो लिखो और लिखो
|
गजा, मला वाटत की पण गावातल्याच शाळेत असायला हव होत. हे सर्व नाही अनुभवायला मिळाल . खरच लकी आहेस. असो. यानिमित्ताने तू वनभोजनाचा आनांद आम्हालाही घेऊ दिलास त्यासाठी thanks
|
मस्तच पण पावटाच का? दुसर्या भाज्या का नसायच्या?
|
Karadkar
| |
| Tuesday, June 13, 2006 - 10:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मैत्रेयी, शहरातले माहित नाही पण गावाकडे पावटा खुप आवडीने खल्ला जातो. एकतर ह्याच्या वाळलेल्या बियाना खुप लवकर भुंगा धरतो आणि तो स्वाद पण रहात नाही. ही भाजी करायला फ़ारसा मसाला वापरत नाहीत. घरुन शेन्गा सोलुन आणता येतात. जेव्हा गावरान पावटा शेतात पिकतो तो सुगंध अवर्णनिय असतो अर्थात तो ज्याला अवडतो त्यालाच. ही काही कारणे असावित असे वाटते. बेंगलोर कडे तर पावटा इतका चवीने आणि ढंगाने खाल्ला जातो की बास! मी तर चिवड्यामधे पण तळलेला पावटा खाल्लय. पावट्याच्या सिझन मधे लग्नात पण शिजवुन घातला जातो. आणि नसेल तर सरळ मुलिच्या वडिलाना परवडत नाही असा सोयिस्कर अर्थ काधतात.
|
असं आहे होय, मला नव्हते माहित! आमच्याकडे पण पावटा खाल्ला जातो, नाही असे नाही, पण 'आवडत्या' किन्वा 'खास' भाज्यांच्या यादीत नव्हता कधी. त्यामुळे जरा वेगळे वाटले.
|
Seema_
| |
| Tuesday, June 13, 2006 - 11:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि दुसर म्हणजे सांगली , कोल्हापुर भागाकडे पावटा होतो पण भरपुर . तुरीच्या शेंगाच्या अधुन मधुन सुद्धा त्याच पिक घेतात . ताज्या पावट्याचा वास खरच विकतच्या पावट्याच्या वासापेक्षा खुप वेगळा असतो . किंबहुना विकतच्या पावट्याला फ़ारसा वास येतच नाही . गजानन तुम्हाला ऐतवडे बुद्रुक किंवा केळ्याच ऐतवडे माहीत असेल ना ?
|
Chingutai
| |
| Wednesday, June 14, 2006 - 4:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सीमा... अगदी अगदी!!! गजानन, अजून येवु देत.....मजा आली....वनभोजनाची. -चिंगी
|
मैत्रेयी, हो यामुळे आमच्याकडे पावटा खूप लोकप्रिय आहे. मिनोती आणि सीमाने सांगितलंय त्यामुळेच. (आमच्याकडच्या लहान मुलांच्या गोष्टींत पण पावटा असतो) :D सीमा, ऐतवडे ऐकून माहित आहे. कांदे, मांगले या साईडला आहे तेच ना? की ते खुर्द? प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार!
|
Sayonara
| |
| Wednesday, June 14, 2006 - 5:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि शिवीत पण असेल ना 'पावट्या' वगैरे? छान वाटलं तुझं वनभोजन वाचून. मला आधी वाटलं की तू हुरड्याबद्दल लिहिणार आहेस. हुरडा वेगळा असतो का ह्यापेक्षा?
|
सायो, हो हुरडा वेगळा असतो. ज्वारीची कणसे किंवा गव्हाच्या लोंब्या भरल्यावर जून व्हायच्या आधी खुडून घेतात आणि लाकडाच्या निखार्यांवर त्या खरपूस भाजतात. त्यांचे दाणे त्या कणसापासून / लोंबीपासून (ती कणसे दोन सपाट दगडांमध्ये चोळून) वेगळे काढतात. हे दाणे म्हणजे हुरडा! बाकी इथे बघ. ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Dineshvs
| |
| Thursday, June 15, 2006 - 5:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सीमा, कोल्हापुरचा पावटा !! नुस्ता शिजत असला तरी काय छान दरवळ सुटतो त्याचा. गजानन आणखी एक प्रकार असतो. त्याला काय म्हणतात ते माहित नाही. पहिला पाऊस पडला कि शेतात पडलेल्या कडधान्याला मोड येतात, ते वेचुन आणतात व त्याची भाजी करतात. त्याचवेळी भूईफोडं म्हणुन एक मश्रुम ऊगवतं त्याचीहि भाजी करतात. बाकि वर्णन मस्तच. आमच्या शाळेत सहभोजन असायचे, पण असे नसायचे.
|
दिनेश, भुईफोडाची भाजी करतात? हे ठाऊक नव्हतं मला. त्याला गम्मत म्हणून kick मारून फोडणे एवढेच माहीत होते. दुसर्या प्रकारचे एक आळींब येते त्याची मात्र भाजी आवडीने केली जाते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|