Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
seema_
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » seema_ « Previous Next »

||करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मी प्रसन्न||


धन्यवाद मायबोली आणि अर्थातच admin याना.
मला काही लिहिता वगैरे येत नाही. आणि जरी मी काही लिहिल तरी विस्कळीत,
त्रोटक,तेच तेच , बरं यापेक्षा अधिक काही असणार नाही.

**************
आलासा. या. हात पाय तेन धुन, आखडुन न बस्ता चांगल मोकळ ढाकळ व्हा. फ़्यान घालतो थांबा.
तुम्ही समदीजन मला वळिखतायसाच.
आत मंदी मंडळी च्या,फ़ोहे च बघायल्यात.घ्या पाणी, घ्या तवर. अलिकडं काय कराइलाइसा?

आमच पाणी कस ग्वाड हाय बघा! तुम्हास्नी सांगतो सपुर्न देशात म्हाराश्टा सारख राज्य न्हायी. आणि कोल्लापुर सारक शिरमंत गाव न्हायी अस राजीव गांधी म्हणुन गेल्यात.

पालिटिकल मंडळी ह्याच्यावर इश्वास नाही म्हणत्यात . च्यायला ! कबुल केल तर ह्यांच्या नरड्यास्नी जनु काटं टोचत्यात .
आम्ही म्हणलो "जावा, सोनियाजीना इचारुन या जावा . न्हायीतर पवारास्नी तेन विचारा.
उगाधरणी लई ट्यॅव ट्यॅव करुन च्यामारी आमच्या डोस्क्याला काव आणु नगसा."

बर . फ़ोहे, च्या घ्या. अवं लई नाही ते. मर्दाच्या खा कि. बशीभर फ़ोहे जास्तीच झाल व्हय.?चांगल केल्त का फ़ोहे?केल्त?

बर ते जाउद्या . आऽऽत्ता. राव काढा कि.... तंबाखु. आता जास्तीच लांबड न लावता बाइकवरन तराट सुटुया.
Stressed is just Desserts spelled backward

गंमत आहे नाही , आता dessert खायला हरकत नाही मग
happy birthday
OAKWOOD
OAKWOOD Lake ,Brookings , South Dakota
siouxfalls

Sioux falls,SD
winter
winter ला अजुन वेळ आहे , पण तरीही .....
आमच्या इथे १०७ F असल्यान कधी एकदा winter येईल अस झालय .
ice cream

ICE CREAM!!!
गणेशोत्सवाच्या बीबी वर लिहिलेल हे वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे आभार

गौरी गणपती

आमच्याकडे पण अशीच असते गौर .
पण आमच्याकडे तेरड्याच्या झाडामध्ये थोडी झेंडुच्या फ़ुलासकट फ़ांद्या,दुर्वा,आघाडी याना एकत्र करतात . मग पांढर्‍या चाफ़्याची पाच पान बाजुला लावुन याचा गुच्छ तयार करतात आणि तो रिकाम्या तांब्यात ठेवतात .
मुखवटे वगैरे नसत .
मग दुपारनंतर नदिवर, boring वर किंवा ओढ्यावर, किंवा विहिरीवर सगळ्या मुली बायका जातात. सगळ्या जणि इतक्या नटलेल्या असतात ना!! जणु त्याच गौरी सारख्या दिसत असतात. पुढे band लावलेला असतो. आनि मागे हि मिरवणुक. नदीवर पाच खडे घेवुन त्याची पुजा करुन ते या तांब्यात टाकतात आणि पाणि भरुन वरती ती गौर ठेवतात.

ओढ्यावर शंकराच मंदिर होत . अगदी चित्रात काढल्यासारख. मग झिम्मा, फ़ुगडी वगैरे खेळ खेळले जायचे. चिरमुरे,भेंड बताशे वाटायचे. मग घरी आल्यावर गौरीची स्थापना करायची. मग हळदीकुंकु.

गौराक्का एक दिवस शेपुची भाजी,भाकरी आणि एक दिवस पुरण पोळी जेवायची.
आई नैवेद्य दाखवताना इतकी तृप्त असायची ना ! मला तर तीच गौर होवुन आली आहे अस वाटायच .

इतके सुंदर दिवस होते ना ते!! आता सुद्धा आमच्याकडे तशीच गौर बसवली जाते. त्याच style चा गणपती आणला जातो आणि त्याच्या शेजारचा छोटा मातीचा गणपती सुद्धा त्याच कुंभाराच्या घरातुन येतो.
फ़क्त आम्ही बहीनी तीथ नसतो इतकच.
आई सांगत होती आता तो कुंभार फ़ार वाकलाय. त्याला काम होत नाही. त्याची मुल मोटार लावलेल चाक वापरुन भांडी तयार करतात.
पण गणपतीत मात्र अजुनही तो ते मातीचे गणोबा तयार करतोच.
वरती मोटोळीचा उल्लेख निघालाय म्हणुन आमच्याकडे फ़ळाच्या माळा करतात. शेंगदाने,चुर्मुर्याच्या पण माळा तयार करतात आणि त्या गणपती समोर बांधतात.

एरवी मी इतकी homesick होत नाही. बहुदा वय वाढेल तस आठवणी पण बोथट होत जातात. पण गणपती आणि दसरा दिवाळी ला मात्र जुने सगळे दिवस आठवतातच. आणि मग आश्चर्य वाटत रहात कि इतके पटकन कसे संपले ते दिवस. बहुदा बालपणातले हे दिवस म्हणजे त्या bombay मिठाई सारखे असतात वाटत.
जिभेवर ठेवुन आस्वाद घ्यावा तोवर संपुन पण जातात.
पण मागे रेंगाळणारी ती चव मात्र विसरता विसरु येत नाही.
आपण फ़ार मोठे झालो नाही याची तेवढीच एक खुण.

devi

माय भवानी तुझे लेकरु
कुशीत तुझिया येई.
सेवा मानुन घे आई.
diwali

फ़राळाला या .
दिपावलीच्या सर्व मायबोलीकरांना असंख्य शुभेच्छा .
नविन वर्ष भरभराटीचे , आरोग्यदायी आणि आनंददायी जावो ही सदिच्छा .

या वेळच्या दिवाळी अंकातल्या ( संच क्र . ३ ) निम्म्याहुन जास्त कथामधली तरुण पिढी अमेरिकेला ( परदेशाला ) आहे.किंवा येनकेन प्रकारे कथेची गरज नसताना परदेशाचा उल्लेख तरी घुसडलेला आहेच .
परदेशात असण ही आता अपुर्वाईची गोष्ट राहीली नाही . पण कथांमध्ये मात्र ही क्रेझ खुपच वाटली . अगदी भाव मारुन सांगितल्यासारखी .
बर्‍याच कथा नेहमी प्रमाने स्त्री प्रधानच आहेत.
typical संसारी स्त्रीया रंगवल्या आहेत प्रत्येक गोष्टीत . बर ते ही असुदेत . पण तेच ते नोकरी करावी कि करु नये , सासु सुन प्रश्न !
काही कथा वाचुन तर अस वाटत होत कि अजुन ८० , ९० चाच जमाना आहे . राजे , देवधर , क्षेत्रमाडे style बर्‍याच कथा .
अर्थात हे एक general observation. काही कथा नक्कीच चांगल्या आहेत .
पण अस वाटत राहिल कि त्या मानाने मायबोलीवरच्या कथांमध्ये बरेच नव नवे विषय हाताळले जातात .
असो . तक्रार करायची खोड जात नाही हेच खर .
अंकातल्या ' अचला जोशींच्या ' सुंदर लेखातल हे वाक्य :
" जे मिळाल त्यात आनंद न मानता त्या पलिकडच ' आणखी काही ' न मिळाल्याच असमाधान मानणारा हा माझा स्वभाव सगळ्यांतली अशी गंमत का घालवतो ?

वाचुन कुणीतरी समदु:खी भेटल्याचा आनंद झाला .
अंक घरबसल्या वाचायला मिळाले ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही हेच खर .

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner seema_ Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators