|
Bee
| |
| Monday, May 15, 2006 - 7:49 am: |
| 
|
अश्विनी, काय नुसती बीबी उघडून निवांत बसली आहे. एखाद दोन जुन्याच कविता टाकायच्यात की. बीबी मिळाल्याबद्दल तुझे अभिनंदन! तुझ्या क्षेत्रातील एक प्रश्न विचारतो. लहान मुलांच्या अंगावरील लव आपोआप जातात की दुध बेसन लावावे लागते. काही माहिती मिळू शकेल का?
|
Ashwini
| |
| Friday, May 26, 2006 - 2:01 pm: |
| 
|
अरेच्च्या, इकडे लक्षच गेले नाही. बी, तुझ्या प्रश्नाचे उत्तर इथे आहे.
|
Moodi
| |
| Friday, May 26, 2006 - 2:11 pm: |
| 
|
आश्विनी अभिनंदन!! आता तुझ्या या घरात तुझ्या आम्ही न वाचलेल्या कवितांचा संग्रह, तुझ्या आयुर्वेदीक ज्ञानाचा संग्रह अन बर्याच चमकदार पैलूंची मांडणी कर. घर कसे निसर्गाच्या नवलाईने भरुन जाईल बघ. 
|
Ninavi
| |
| Friday, May 26, 2006 - 2:16 pm: |
| 
|
अभिनंदन, अश्विनी! House Warming कधी आहे? 
|
Chinnu
| |
| Friday, May 26, 2006 - 3:10 pm: |
| 
|
अश्विनी वाट पाहत आहे. अभिनंदन!
|
Shyamli
| |
| Friday, May 26, 2006 - 3:14 pm: |
| 
|
अभिनंदन, अश्विनी!.. .. ..
|
Dineshvs
| |
| Friday, May 26, 2006 - 5:50 pm: |
| 
|
अश्विनी, एकेका औषधी वनस्पतिचा फोटो आणि त्या सोबत त्याची माहिती, असा एखादा संग्रह ईथे असावा, अशी माझी फार ईच्छा आहे. या बाबतीत मी सहकार्य करु शकेन.
|
Tanya
| |
| Saturday, May 27, 2006 - 8:44 am: |
| 
|
अश्विनी..... अभिनंदन! .. ... .. ..
|
Champak
| |
| Saturday, May 27, 2006 - 1:33 pm: |
| 
|
मल डाॅक्टर लोकांची खुप भीती वाटते. लहानपणी, मला जेंव्हा मला इंजेक्शण देण्या ची वेळ येत असे, तो सोहळ अगदी संस्मरणीय असे. हे नेहमी च घडत असे कारण, धडपडुण हात पाय फ़ोडुण घेने अन मग धनुर्वाताची इंजेक्शन घेणे हा एक न संपणारा कार्यक्रम मी राबवत होतो. त्यावेळी मी इतका मोठ्याने आरडत असे, कि बास्स!!! ते शब्दबद्ध करणे शक्य नाही! डाॅ. येळाई नावाचे डाॅक्टर मग मला, आता नवीन प्रकारचे न दुखणारे आणी न टॉचणारे इंजेक्शन आणले आहे, असे सांगुण गुप चुप इंजेक्शन देण्या चा प्रयत्न करीत असत. पण ते टोचले कि मी मोठ्याने बोम्बलत असे. मी १० वी ला असताना तर डाॅ. कोकणे ह्यांच्या दवाखान्या च्या आस पास ची लोक नेहमी जमा होत असत. कारण मी जोर जोरणे ओरडत असे. लहाणपनी मला असे इंजेक्शन न देणारे आयुर्वेदिक डाॅक्टर का नाही भेटले? इथे भेटले, बरे झाले! तुम्ही असाच आयुर्वेदा चा खुप प्रचार करा, अन लहाण पोरांना इंजेक्शन च्या जुलुमा पासुण वाचवा. तुम्हाला शुभेच्छा!!!
|
Dineshvs
| |
| Saturday, May 27, 2006 - 3:42 pm: |
| 
|
चंपका आता तु पण ईंजेक्शन न देणारा डॉक्टर होणारेस कि.
|
Ashwini
| |
| Saturday, May 27, 2006 - 5:42 pm: |
| 
|
सगळ्यांना शुभेच्छांबद्दल धन्यवाद. House Warming साठी मुहूर्ताच्या शोधात आहे. दिनेश, मूडी तुमच्या सूचना चांगल्या आहेत. बघूया काय काय जमतय आता. चंपक, तुम्ही वगैरे म्हंटलं की जरा भीति वाटते रे. मी अजून एवढी मोठी (कुठल्याच अर्थाने) नाही झाले. 
|
Moodi
| |
| Sunday, May 28, 2006 - 3:10 pm: |
| 
|
आश्विनी तू मागे पुण्यातील वैद्य श्री मनोज पत्की यांचा पत्ता दिला होतास च्यवनप्राशसाठी. तर मला असे विचारायचे आहे की श्री पत्की हे वैद्य म्हणुन उपचाराकरता तेवढेच प्रभावी आहेत का? तू स्वत तर डॉक्टर आहेस पण पुण्यातील बाकी कुणाला त्यांचा अनुभव आहे का? अन असल्यास सांगशील का? कारण माझ्या वडिलांना आयुर्वेदीकच उपचार सुरु करावेत असे मी आईला सांगीतलेय.
|
Bee
| |
| Monday, May 29, 2006 - 4:00 am: |
| 
|
अश्विनी, खूपच छान माहिती मिळाली त्याबीबीवरती पण अजून काही माहिती विचारली आहे. जर सवड मिळाली तर कृपा करून उत्तर लिहि.
|
Ashwini
| |
| Tuesday, May 30, 2006 - 6:52 pm: |
| 
|
मूडी, मनोज पत्कींची practice पण आहे. पण त्यांची speciality औषधी निर्माण ही आहे. आणि अक्षरशः डोळे झाकून घ्यावीत इतकी शुद्ध आणि दर्जेदार औषधे तिथे मिळतात. मी तुला उपचाराकरता वैद्य दिलीप गाडगिळ (निंबाळकर तालमीपाशी त्यांचा दवाखाना आहे), वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर(औंध), वैद्य दिवाकर जुवेकर (तुळशीबागवाले कॉलनी), वैद्य नरेंद्र पेंडसे(बिबवेवाडी) अशी नावे सुचवीन. त्यांचे फोन नं. आत्ता माझ्याकडे नाहीत पण मी शोधून देते.
|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 9:08 pm: |
| 
|
अश्विनी धन्यवाद गं. गाडगीळ वैद्य जवळ आहेत त्यामानाने. पण बाकी वैद्यांचे फोन. नं. पण चालतील दिले तरी. 
|
Moodi
| |
| Saturday, September 09, 2006 - 9:20 pm: |
| 
|
खूपच सुरेख कविता आहे गं नीरजची. अभिनंदन तुझे आणि नीरजचे देखील. एवढ्या लहान वयात त्याला सुरेख वारसा मिळालाय. यश आणि प्रतिभेच्या अशाच उत्तुंग पायर्या चढु दे अजून. अनेक शुभेच्छा त्याला. 
|
Ninavi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 2:45 pm: |
| 
|
अरे वा. छान आहे गं कविता तुझ्या लेकाची.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:51 pm: |
| 
|
नीरजची कवीता फारच छान! त्याचं अभिनंदन!!
|
Apurv
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:49 pm: |
| 
|
फारच छान कविता, किती मोठा आहे तो? दुसरे कडवे फारच आवडले आणि शेवटचे ही!
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 2:21 am: |
| 
|
कविता वाचून केन्व्हाच झाली होती पण प्रतिक्रिया द्यायला विसरलो. अश्विनी, एकदम छान आहे ही कविता.. तुझ्यापेक्षा अधिक छान लिहितो :-)
|
Ashwini
| |
| Thursday, September 14, 2006 - 4:24 pm: |
| 
|
सगळ्यांना धन्यवाद. अपूर्व, नीरज ९ वर्शाचा आहे. ही कविता त्याने मागच्या वर्षी तिसरीत असताना केली होती.
|
Nirmala
| |
| Monday, August 13, 2007 - 5:08 am: |
| 
|
Ashwini==== this poem is very good lage rahooooooooooooooooo
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|