राजापूरच्या आठवणी
काल्-परवा कधीतरी होळी झाली ना?
क्लीवलंडमध्ये महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम झाला अस ऐकल आणि आमच्या राजापूरातल्या होळीची आठवण झाली!
होळीचा आदली रात्र म्हणजे 'होम'! अम्हा पोरा-सोरांना रात्री १२-१ वाजेपर्यंत भटकायची फुल परमिशन मिळण्याचा एकमेव दिवस! रात्री सगळ्या आळीत हिन्डून लाकडे गोळा करयची..प्रत्येक घराच्या समोर जाऊन घरमालकाच्या नावाने बोंबा ठोकायच्या..उदहरणार्थ.."मामा जोश्यांच्या बैलाला..!"
घरमालक बाहेर येऊन लाकडे देईपर्यंत बोंबा थांबत नसत! होळीच्या दिवशी मात्र कोणाला त्याचे काही वाटत नसे.. एकदा लाकडे गोळा झाली की मग पोलीस ग्राऊंडवर मोठा 'होम' आणी होम पेटला की पुन्हा बोंबा!! 'होळी रे होळी, पुरणाची पोळी; साहेबाच्या वर बंदुकीची गोळी!!'
दुसर्या दिवशी सकाळी, एका ठरावीक पोफळीच्या (सुपारीचे झाड) बागेतून पोफळीचे एक झाड उपटून काढायचे, त्याची पूजा करायची, त्याच्या जागी पोफळीचे एक नवीन रोपटे लावायचे
आणि मग १५-२० पोरांनी 'होळी(ते झाड) गावातून नाचवत नाचवत नदीपाशी न्यायचे! दिवसआखेरीस हात चांगलेच दुखून येत असत!
त्यादिवशी मग पुरणपोळी आणि नारळाचे दूध अस बेत..
होळीपासून शिमगा सुरू होत असे..महिनाभर. मग महिनाभर लहान लहान गावातून येणर्या पालख्या आणि खेळे! 'तिठवली' गावाची पालखी आमची फेवरीट! आमच्या आळीत ती आली की मी आणि माझा भाऊ, त्या पालखीबरोबर प्रत्येक घराच्या आंगणात जाउन पालखी नाचवत असू! पालखी बरोबर मी एक दोन वेळा ढोल्-ताशा पण वाजवलेला आहे!
खेळे हा अजून एक निराळा प्रकार! ४-५ वर्षांचा असतान मी गोमूचे एक गाणे नेहमी म्हणत असे- " गोमू तुझा नवरा गे बाय, हाय गो फ्याशानवाला; त्याने लावीला गॉगल काला!"
good old days..