|
Asami
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:51 pm: |
| 
|
नाहि होत रे हुरहुर कमी. चिंता नको करूस
|
Dineshvs
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:53 pm: |
| 
|
चंपक तुला कुठे मिळाला तर, लाईक ईन हेव्हन, ऑन अर्थ, नावाचा सिनेमा बघ. जन्माला येऊ घातलेल्या बाळांच्या विश्वाबद्दल छान सिनेमा आहे तो.
|
Moodi
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:40 pm: |
| 
|
चंपक मध्यंतरी NGC वर छान कार्यक्रम दाखवला होता animation अन खर्या pictures च्या स्वरुपात लहान मुलांच्या जन्मावर.
|
Storvi
| |
| Thursday, March 09, 2006 - 8:15 pm: |
| 
|
कमी कशी होईल.. ते ultrasound मध्ये कसंही दिसलं तरी प्रत्यक्षात कसं दिसेल हे थोडीच त्यातुन कळणार आहे? कसं हसेल डोळ्यांचा रंग काय असेल शिवय उद्या agadI तुला फोटो सार्ख चित्र मिळालं बाळाचं तरी प्रत्यक्षात ते पिल्लु येईल तेंव्हाची excitement त्या चित्राने कशी भागेल? 
|
Bee
| |
| Friday, March 10, 2006 - 4:04 am: |
| 
|
National Geographic वरती in the womb म्हणून एक episode आहे. त्याचे फ़क्त दोनच भाग होते. परत परत दाखविल्या जातात. हे दोन भाग बघितले तर अगदी conceive होण्यापासून ते baby crown बाहेर येईपर्यंत त्यांनी सविस्तर दाखविले आहे. माहिती तर एकदम छान दिली आहे. आपण 10% Gynacologiest झालो आहोत असे वाटते.
|
Moodi
| |
| Monday, March 13, 2006 - 11:40 am: |
| 
|
तसा विचार चुकुनही मनात आणु नकोस रे बी. अन काय हे चंपक? आता तुला कसली बाधा झाली म्हणाव? माणसाने झपाटले का? आता डॉक्टरेट मिळायची वाट बघु नकोस बर, एक छानशी प्रेमळ समजुतदार चंपी बघुन लगिन करुन टाक लवकर. बरिस्ता, फिरस्ता, गुदस्ता, गुलदस्ता वाली नको बघुस. आपली छानशी बघ नगर कडली. 
|
Shyamli
| |
| Monday, March 13, 2006 - 11:49 am: |
| 
|
ह्या माणसानी सगळ्यांनाच झपाटुन टाकलय.... करा तयारी.... आम्ही आहोतच मदतिला....काय ग मुडे?
|
Moodi
| |
| Monday, March 13, 2006 - 12:13 pm: |
| 
|
हो ग श्यामले, मी मागेच सांगीतलय याला तुझ्या लग्नात शेव, बुंदी, जिलेबी ठेव म्हणुन. चला आता लागा तयारीला, बी अन चंपक दोघांचा बॅंड वाजवुया. 
|
Maanus
| |
| Monday, March 13, 2006 - 2:15 pm: |
| 
|
का रे चंपक, काय झाले तुला? उद्या होळी आहे, आणि तु आज हे असेल काहीतरी काय बोलतोयस. एक काम कर येत्या शुक्रवारी lab मधल्या चार लोकांना घरी बोलव जेवायला. make sure you atleast invite two girls. मस्त पिठल भात बनव, आणि आपल्या नगरात मिळते तसली लस्सी बनव. बघ बरे वाटतेय का नाही. मायबोलीकरांनो, चंपक ची बहीन पन मायबोलीकर आहे ना, तिला गाठा आणि घरी चंप्या च्या लग्नाचा प्रस्ताव मांडा. मुडी, मी बी लग्नाचा आहे.
|
चंपक, अगदीच सगळे उपाय थकले तर माझ्याबरोबर नाणी शोधायला ये!
|
Shyamli
| |
| Monday, March 13, 2006 - 3:56 pm: |
| 
|
सागर आमच लक्ष आहे रे तुझ्याकडे... 
|
Giriraj
| |
| Monday, March 13, 2006 - 4:03 pm: |
| 
|
चम्प्या,काय रे झालं तुला? चल आपण लग्नाळू मुलांचा एक क्लब बनवूत आणि तू त्याचा अध्यक्ष!
|
Dineshvs
| |
| Monday, March 13, 2006 - 4:36 pm: |
| 
|
चंपक, तुला आता होमसिक वाटतय दुसरे काहि नाही. चार पाच दिवसात भेट पोचेलच. सध्या पोटेटो सुप, कोबी खात जा. सिमला मिरची, चीज पण खात जा, त्याने हा मुड जातो.
|
Naatyaa
| |
| Monday, March 13, 2006 - 4:51 pm: |
| 
|
बी अन चंपक दोघांचा बॅंड वाजवुया. >> पुर्वी हे नव्हतं... शोभत नाही हो!! diva ghya re doghanni!!
|
आजवर मी कोणा तरुणी वर छाप पाडु शकलो नाही कि मला कोणी तरुणी मोहात पाडु शकली नाही, हे अचानक्पणे प्रकर्षाणे जाणवु लागले आहे. >>काय बात करतोस चंपक! मी तर कुठल्यातरी त्या चंपीबद्दल पन्नास तरी पोस्ट वाचली असतील तुझी 
|
Anilbhai
| |
| Monday, March 13, 2006 - 5:00 pm: |
| 
|
चंपी ने टांग दिलेली दिसतेय. उगी रे चंपक. ~D 
|
Seema_
| |
| Monday, March 13, 2006 - 5:30 pm: |
| 
|
सध्या पोटेटो सुप, कोबी खात जा. सिमला मिरची, चीज पण खात जा, त्याने हा मुड जातो. >>>
मला माहित नव्हत हे . बाकी चंपक खरच उदास वाटत असेल तर अख्खा एक दिवस उदासीतच घालवायचा . कुणी काहीही म्हणोत " मी उदास रहाणारच " अस म्हणुन . अजिबात हसायच नाही . काय जे काही आठवणी काढायच्या त्या काढुन त्रास करुन घ्यायचा . उदास गाणी वगैरे ऐकायची . उदास ही अगदी मनसोक्त व्हायच . दिवस संपला कि बास , झाल.मनाच भरपुर कोडकौतुक करुन झालेल असत . अगदीच practicle व्हायच . तो एक दिवस असा घालवला कि मग मनाला ही कंटाळा आलेला असतो . काम पडुन असतात . उदास होण्याचे तोटेही दिसत असतात . दुसर्या दिवशी मात्र अजिबात उदासपणाचे विचारही मनात येत नाहीत . हा सल्ला नव्हे बर का . अनुभवातुन तयार केलेली strategy आहे .
|
Maanus
| |
| Monday, March 13, 2006 - 5:41 pm: |
| 
|
मला पन आज जाम कंटाळा आलाय, म्हणुन आज मी WFH (Work From Home) करतोय आणि Eminem चे सुमधुर कर्णकर्कश्य संगीत ऐकतोय. नसरुद्दिन शहा चा तो सिनेमा कोणता, त्यात तो हिरोईनला सल्ला देतो, असे काही वाटायला लागले की जोरजोरात ओरडायचे, मन मोकळे होते मग. त्यात नसरुद्दिन चे एक वाक्य आहे फटा पोस्टर निकला हिरो.
|
Nalini
| |
| Monday, March 13, 2006 - 5:53 pm: |
| 
|
माणुस, चंपकचे दोनाचे चार ह्याच वर्षी करणार आहोत आम्ही. फ़क्त त्याचे thesis sumbit व्हायची वाट बघतोय. आणि हो फक्त चंपकसाठीच मुलगी शोधु का? गिरीसाठीपण वधुसंशोधन करतेय. तुझा काय विचार आहे? तुझ्यासाठीपण शोधायला सुरुवात करते, तु म्हणत असशील तर. मैत्रेयी, चंपी ही एक स्वप्न परी आहे चंपकची.
|
Moodi
| |
| Monday, March 13, 2006 - 6:09 pm: |
| 
|
मी असे म्हटले नव्हते की बी अन चंपकचा एकत्र बॅंड वाजवा म्हणुन. शेवटी आपली भाषा दादा कोंडकेचीच. वाकेल तशी वाकते. मला वाटत एक भले मोठ्ठे जी टी जी करुन सगळ्या लग्नाळू मायबोलीकरांचे एकाच मंडपात लग्न लावावे. म्हणजे परस्परांशी नाही हो, त्यांना आवडेल, पसंत असेल त्या जोडीदाराशी. सागर तू पण आहेस रे त्या लाईनीतच. चंपकची परवाणगी घेऊन माझे आवडते गाणे लिहीते. ए मेरे उदास मन चल दोनो कही दूर चले मेरे हमदम तेरी मंझील ये नही, ये नही कोई और है इस बगियांका हर फूल देता है चुभन कांटोंकी सपने हो जाते है धुल क्या बात करे सपनोंकी मेरे साथी तेरी दुनिया ये नही ये नही कोई और है ए मेरे उदास मन.... चंपक दिल छोटा मत करना. 
|
चंपक.. लिम्ब्या..... आपला criteria येगळा हे! खुरपे घेउन खुरपायला जायची जिची तयारी असेल ती च आपली कारभारीन हुणार >>> do you remember this post? तर अशी मुलगी क्रश व्यक्त करणे जरा अवघडच आहे आणि तुला ती तुझ्या आत्तच्या गावी सापडणे त्याहून अशक्य.. त्यामुळे wait and watch or change criteria .. what say? ~D
|
Shyamli
| |
| Monday, March 13, 2006 - 6:28 pm: |
| 
|
हा नवीन BB उघडल्यापासुन धमाल चाललिये अगदी.... वातावरण अगदीच लग्नाळु झालय...... बघ सागर,चंपक,तो तिकडे जास्वंद....बरीच मोठी यादी आहे..... नलीनी आम्ही पण आहोत ग तुझ्याबरोवर......
|
Arch
| |
| Monday, March 13, 2006 - 6:33 pm: |
| 
|
माझी मानाची साडी तेवढी विसरू नका म्हणजे झाल. 
|
>>प्रेमाची ची tender feeling माझ्या परिसरातील साखर कारखान्यातील tender प्रमाणे मल अहुलकावणी देउन गेली आहे असे वाटते आहे. LOL Champak!
|
चंपक तुला QLC झाल्यासारखं वाटतयं का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|