|
| |
| Tuesday, June 28, 2005 - 4:56 pm: |
| 
|
हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!

|
| |
| Wednesday, June 29, 2005 - 4:00 pm: |
| 
|
alreadyuploaded {87244,chiral} माझे कार्यक्षेत्र इतिहास औषध कंपन्यांची बाजु अजुन थोडी माहीती
|
| |
| Thursday, June 30, 2005 - 5:18 pm: |
| 
|

|
| |
| Friday, July 01, 2005 - 5:36 am: |
| 
|
आजच्या दिवशी जागा उपलब्ध करुण द्यावी असा बाल(?)हट्ट मायबोली व्यवस्थापना कडे केला अन त्यांनी अत्यंत तातडीने जागा उपलब्ध करुण दिली. त्याबद्दल मायबोली व्यवस्थापनाचा मी आभारी आहे! खर तर कुटुंबातील ६ वे अपत्य असल्याने माझ्या जन्माबद्दल आई व्यतिरिक्त इतर कुणाला आनंद झाला असेल तर ती शंका च आहे. अन म्हणुनच बर्याचवेळा इतरांकडुन मिळणारा ignorance माझ्या पाचवीला च पुजलेला असावा. (परंतु मला आजवर अनेक खुप चांगले सहकारी अन मित्र ही मिळाले आहेत हे विशेष करुण नमुद करावेसे वाटते! ) माझी जन्म तारिख १ जुलै. पण ती ही कदाचित शाळेत घालताना ठरवली गेली असावी. जर कुणाला जन्म तारीख माहीत नसेल तर शाळेत दाखल करितांना गुरुजींना वाटेल ती जन्म तारीख त्या मुलाची जन्म तारीख असते. अन म्हणुनच ग्रामीण भागात अनेकांची जन्म तारीख १ जुन ते १ जुलै अन विषेश करुन १० ते १५ जुन असते! असे कुठेतरी वाचले होते. असो. मायबोली व्यवस्थापना चे पुन्हा एकदा आभार!
|
| |
| Friday, July 01, 2005 - 6:07 am: |
| 
|
स्वत : च्या वाढदिवसाच्या दिवशी पहीली आठवण कुणाची येत असेल तर आई ची अन म्हणुनच आजच्या दिवशी माझ्या रंगिबेरंगी विभागाची सुरुवात करितो आहे, माझ्या आई बद्दल दोन शब्द लिहुण
माझी आई तिच्या माहेरी ही तिच्या बहीणींत सर्वात मोठी अन सासरी ही तिच्या ईतर जावांमध्ये सगळ्यात थोरली त्यामुळे तिला सर्व जण मोठ्याई मोठी आई च म्हणतात. तिचे वय ६० - ६५ चसेल. ती कधीच शाळेत गेलेली नसल्याने नक्की जन्मतारीख कुणालाच माहीती नाही. विशेष म्हंजे तिच्या लहानपणी माझ्या मामांच्या वाड्यासमोर च शाळा भरत असे पण तरीही आई कधीही शाळेत गेली नाही. फ़क्त पाटी घेउण तिला कोळश्याणे घासुण काळे करणे अन माझी पाटी सर्वात स्वcछ काही लिहिले च नाही त काय खराब होणार म्हणुन वाड्यात मिरवणे हाच तिचा छंद. पुस्तकी ज्ञान नसले तरी तीचे साधे भोळे बोल ऐकुण भले भले सुन्ना होतात. राज्य शासनाने साक्षरता अभियानात एक बोधवाक्य वापरले होते ` अडाणी आई अन घर वाया जाई ` पण माझ्या आईने मात्र त्याला अपवाद केला. साक्षरता अभियाना ला जेंव्हा सुरुवात झाली तेंव्हा मी ५ - ६ वी त असेल. मी तिला अंक अन मुळाक्षरे शिकवण्याचा जाम प्रयत्न केला पण अनेक पाट्यांचा कपाळमोक्ष झाला अन अनेक अंकलिप्या अन उजळणी ची पुस्तके तिची चुल पेटवण्या च्या कामी आली. शेवटी मी तो नाद सोडला. सुखवस्तु म्हणावे असे माहेर अन सासर असल्याने तिचा स्वभाव खुप शांत अन प्रचंड धार्मीक अन त्यामुळे च अडल्या नडल्या गरजुंना मदत करावी ह्या वृत्तीचा तिच्या ह्या स्वभावाने खुप विनोदी प्रसंगांना जन्म दिलेला आहे.) तिच्या धार्मिक पणामुळे त तिला आम्ही तु चुकुण ब्राम्हण कुटुंबा त जन्मण्या च्या ऐवजी ईकडे जन्माला आली असे च म्हणतो. दररोज देव्हार्यातले देव धुतल्याशिवाय ती जेवत नाही. लहानपणी, अन अगदी १२ वी पर्यांत मी पण देवाला आंघोळ घालण्या चे कामात तिला अगदी मन लावुन सहाय्य केले. (देवा साठी नाही पण आई साठी.) १२ वी नंतर होस्टेल ला रहायला गेलो तो आजतागायत कधी देव धुतल्याचे आठवत नाही. आता त्या कामात मोठ्या भावांची मुले तिला मदत करितात. तिचे देव कधी कधी अचानक संख्येने कमी होतात कारण ही बालके उर्फ़ वानरसेना ते देव च खेळायला म्हणुन पळवुन नेतात! . तिचे वअत वैकल्ये अन उपवास त ईतके कि ती जेवते कधी हा च प्रश्न असतो. उपवास पण भयानक कडक असतात. अजुनही कित्येकदा ती निर्जली पाणी देखील न पिता) उपवास करते. घरी असलो कि मी तिला चतुर्थीला, एकादशीला किंवा असेच कधी तिला वाटले कि पावन गनपतीला ज्ञानेस्वरीला नेवासा) किंवा देवगड दत्त मंदिर, किसनगिरी बाबा अन भास्करगिरी महाराज्) ला नेत असतो. (अन्यथा मी एकटा कधी देवळात जात नाही.) घरात ज्या दिवशी नाॅन व्हेज जेवण बनवले असेल त्या दिवशी फ़क्त बुधवार अन रविवारी च नाॅन व्हेज ला तिची परावणगी असते तिच्या परवाणगी शिवाय जेवणाच्या ताटांना अन विशेष करुण पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला कुणी ही हात लाउ शकत नाही. (ती नाॅन व्हेज खात नसली तरी बनवते अगदी उत्तम!!) तिचे माहेर माझे आजोळ खुप च धार्मिक आहे.माझ्या आजोळी त मामांची एक पुर्ण खोली च वेग वेगळ्या देवादिकांनी व्याप्य्ण टाकली आहे. अन सकाळ संध्याकाळ देवपुजा चालते. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आमची बदली नगर जिल्ह्यात अन आस पास अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी होत असे. अन जिथे ही आम्ही जाउ तिथे तिचा हा धार्मिक अन गावातील गरजु स्त्रियांना मदत करण्याचा स्वभाव अनेक गमतीशीर प्रसंगांना जन्म देत असे. याबात प्रचंड किस्से आजही हसु आणतात त्यातील थोडेसे
.. ग्रामीण भागात पैश्याचे व्यवहार नेहमी च पुरुषांकडे असल्याने आम्ही जेथे राहत असु तिथे आसपासच्या स्त्रिया आई ल पैशाची मदत मागत असत. वडिल नोकरीला असल्याने आई कडे पैसे असणारच ही आस पास च्या महिलांची पक्की समजुत होत असे, पन आई कडे खरेदी ची वेळ फ़ारच कमी वेळा येत असल्याने तिच्या कडे पैसे नसत तरीही घरात वडिलांच्या पेटीत काही पैसे नेहमी ठेवलेले असत त्यातुण ति पैसे देत असे. (पैसे तरी किती तर एका स्त्री ला एका वेळी जास्तीत जास्त ५० रुपये पाहीजे असत.)( आईला अक्षर ओळख नसल्याने ती जेंव्हा पैसे मोजते तो प्रसंग एक गंमत असते. किरकोळ खरेदी किंवा अडि नडीला लागणार्या वस्तु ह्या केवळ आम्हा भावंडा कडुन मागवण्या वर च तिचे काम भागत असे. पण तिला पैसे मोजण्याचा प्रसंग येतो तो अश्या वेळी. १० च्या ३ अन ५ च्या ३ नोटा दिल्या तरी तिची तारांबळ उडते. तिला ४५ रुपयी पंचेचाळीस असे सांगुन्ण समजत नाहीत, ते ५ कमी प^न्^नास असे सांगावे लागते ) यावरुन तिची चेष्टा मात्र आम्ही सर्व भावंडे करित असु. कारण ज्या ही स्त्रियांना तीने पैसे दिले त्यातील शक्यतो कुणीही तिला पैसे ठरलेल्या वेळेत अन जितके घेतले तितके च पैसे परत दिल्याचे आम्हाला च काय पण तिला ही आठवत नाही कुणी दिले पण ४ - ५ महीने उश्रीआ, कुणी दिले त २० रुपये पण ४ वेळा करुण! ग्रामीण भाग असल्याने ते सहाजिक च होते म्हणा. पण तिने कधी कुणाला नाही म्हटले नाही. ति माहेरी अन सासरी खाउन पिउन सुखी कुटुंबातील आहे अन त्यामुळे अश्या छोट्या रकमेची ती पर्वा करित नाही. कुठल्याही स्त्रीचे माहेर हा एक हळवा कोपरा.मग जर कुणा बाईला तिने माहेरी जायला पैसे दिले त ती परत घेत पण नाही धान्याच्या बाबतीत आम्ही अन विशेष करुण आजोबा तिला खुप चिडवत. आम्हाला घरुण बदलीच्या ठिकाणी धान्य येत असे. गावाकडे धान्याचे खळे सुगी चा हंगाम झाले कि आमचे आजोबा दर वर्षी ज्वारी, गहु अन बाजरी स्वत : टेंपो करुण घेउन येत असत. त्यामुळे आस पास च्य स्त्रियांना अडि नडि ला धाण्य मागण्यासाठी एक हक्काचे ठिकाण होत असे. घरात खाणारी लोक कमी अन धान्याची पोती संपण्याचा वेग जास्त असे. आमच्या आजीची शिकवण आहे कि घरी आलेला पाहुणा अन दारासमोरचा भिकारी उपाशी माघारीजाता कामा नये. आपण जितके अन्ना दाण करु त्यापेक्षा कितितरी जास्त धान्य आपली जमीण आपल्याला देईल ही तिची धारणा. अन तो च वसा आई ने चालवला आहे. काही स्त्रिया तिला धान्या च्या बदली पैसे कबुल करित असत पण ते ही कधी देत नसत.
. ह्या बाबतीत माझी छोटी चुलती चे किस्से एकदम नमुनेदार आहेत. घरासमोर भिकारी च काय पण कुत्रा, गाय,शेळी, म्हैस, ई ई जे कि शहरी लोक मोकाट प्राणी समजतात ते जरी आले तरी अर्धा चतकोर भाकर खाल्ल्याशिवाय जाणार नाही ह्याची ती काळजी घेते. आठवा संत एकनाथ अन भाकर पळवणारे कुत्रे पण ते नंतर कधी तरी लिहील. ती तालुक्याcया गावाला राहते अन शेजारी एक हाॅस्पिटल आहे त्यामुळे तालुक्यातील जे कुणी नातेवाईक अन ओळखीचे असेल ते जर दवाखाण्यात आले कि अडचणीच्या वेळी आमच्या घरी च अगदी हक्काने येतात आम्ही भावंडे मात्र आईला म्हणत असतो कि तु अशी धार्मीक अन लोकांना मदत करुण जे काही पुण्य कमावते आहे त्यामुळे आम्हाला कोणाला आता पुण्या कमवायची गरज नाही तिचा वावर घरापुरता अन नातेवाईकांच्या त च मर्यादित असल्याने सगळ्या आठवणी ह्या अश्या घरगुती आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दुकाणात जाणे अन खरेदी करणे हे विरळच. मागील वेळी देशात गेलो तेंव्हा चा एक किस्सा. तीच्या माहेरच्या कुणा एका नातेवाईकाला मुलगा झाला म्हणुन मी तिला घेउन त्या गावी तिच्या सोबत गेलो होतो. मुला साठी तिने एक ग्रॅम सोन्याची अंगठी घ्यायचे ठरवले. अन आम्ही मग सोनाराच्या दुकाणात गेलो. तिथे अंगठी घेतली अन मी बिल देताना आई सोनाराला म्हणे कि का रे बाबा, आमच घरदार नेहमी सोने तुझ्याकडुन च घेतो त काही पैसे कमी कर. यावर त्याने ५०० च्या बिलातुन ५ रुपये कमी केले. तर आई खुश एकदम. ईतके मोठे बार्गेनिंग मला म्हणे बघ तु काही बोलला नसता त त्याने ५ रु जादा घेतले असते ना? तो सोनार नेहमीचा च ओळखीचा असल्याने मी त्याकडे बघुन जाम हसत होतो. आई जेंव्हा कासाराकडे मंगळसुत्र अन नाकातील नथ गाठायला जाते ते ही खुप मजेदार असते. पैसे देताना ती जाम बारगेनिंग चा आव आणते पण कासार काही ऐकत नाही. अशी माझी भोळसर अन साधी सुधी आई. देवावर प्रचंड श्रद्धा असल्याने तिला एक प्रकारचे नैतिक बळ प्राप्त आहे असे मला वाटते. त्याचा एक अनुभव. आमच्या शेजारया गावा जवळील वस्तीवर काही वर्षांपुर्वी जबरी दरोडा पडला होता. त्याच गावातील पारधी समाजाच्या लोकांनी तो दरोडा टाकल्याचे तपासात समजले. तिथे वस्तीवरिल एक घरातील एका चा मृत्यु अन अनेक मुले अन महिला जबर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे शेजारील गावचे गावकरी खुप संतापले अन त्यांनी पारधी लोकांची घरे पेटवुन दिली होती. तो खटला खुप गाजला. त्या गावात माझी एक बहीण दिलेली आहे. अन पारध्यांची घरे पेटवण्याच्या खटल्यात माझे दाजी पण आरोपी होते. खटल्यातुन सुटल्यानंतर काही पारधी लोकांनी बदला घेउ अशी धमकी दिल्याने गावकरी जाम तणावात होते. एक दिवस त्या पारध्यांच्या घरातील कर्ती बाई, तिचे नाव रखमा, ती आमच्या घरी आली. (बलुतेदारी पद्धातीमुळे हे लोक आमच्याकडे धान्य अन ईतर गोष्टींसाठी येत असतात. पारधी लोक जिथे राहतात तिथे ते कधीही आस पासच्या गावांत चोरी व ईतर गुन्हे करित नाहीत. खाल्ल्या अन्नाला जागणारे रामोशी, पारधी अन भिल्ल समाज
सही च एकदम त्यामुळे च जेंव्हा ह्या लोकांनी गावात च दरोडा टाकला म्हणुन तिथल्या गावकर्यांनी चुकीची शिक्षा म्हणुन घरे पेटवली होती.) तर, ती रखमा जेंव्हा घरी आली तर तिला आई ने असे काय फ़टकारली कि ती रखमा ढसा ढसा रडु लागली. सगळे गाव पारध्यांना टरकुण अन आई ने तिची अगदी घरासमोर च हजेरी घेतली. ¨ तुह्या पोरांना अन नवर्याला पण नीट समजुन सांग जर क माझ्या पोरीला माझी बहीण अन जावयाला काही झाले त याद राख ¨ असा दम भरला
.. आम्ही भावंडे घरी च होतो तर आम्हा ला हसावे का रडावे ते च समजेना! कारण काही का असेना, पण त्या लोकांनी पुन्हा कधीही त्रास दिला नाही. लोकांना मदत करण्याच्या सवयी पायी काही वेळा त तिने दुपारी घरी कुणी नसतांना बदलीच्या गावी वडिल अन आम्ही भावंडे शाळेत गेलेले असु तेंव्हा) अगदी चोरांना ही जेवु खावु घातले होते. एकदा एका चोराने जेवण झाल्यावर गळ्यातले दागिणे च पळवुन नेले होते. कपाळावर ठसठशीत कुंकु अन नाकात भली थोरली खर्या मोत्याची नथ,
. मुर्ती लहान पण किर्ती महान अशी माझी आई
.. दोन वर्षे झाली भेट नाही करण देशात गेलो नाही. दिवाळीचे अन बहीणींच्या लग्नाचे फ़ोटो आले त्यात दिसली फ़क्त. यंदा मी देशात जाणार आहे.(नाचॅक्स अन आता त दिवस मोजतो आहे.( फ़क्त २८ दिवस राहीले आहेत. गेलो कि लगेच तिच्या हातच्या पुरण पोळ्या खायला मिळणार
.. ढॅटा टॅडॅंग टॅंटॅ टॅडॅंग
.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|