Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » मराठी गाणी » आद्याक्षराप्रमाणे » « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 11, 200530 11-11-05  6:11 pm

Sharmila_72
Saturday, November 12, 2005 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

XaÜnaUÊip`yaa tumhI kolaolyaa sauQaarNaoba_la Qanyavaad ² maI ivaraivart mhNajao vaIr AaiNa Aivart Asao kahIsao samajat hÜto.

Pendhya
Friday, January 06, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण तुजसम सांग मज गुरुराया, कैवारी सदया,
पाहिजे ते अंगी स्वीकाराया, भव दु : ख हराया,
कोण तुजसम सांग मज गुरुराया..

तूची विष्णू, तूची शिव, तू धाता,
तू विश्वंभरता,
तूची व्यापक, व्याप्याते प्रसवीता, तू मायेपरता,
कोण तुजसम सांग मज गुरुराया..

तूची शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता,
तोची देशी तत्वनिधी निजहाता, तारक बलवंता,

कोण तुजसम सांग मज गुरुराया, कैवारी सदया.

नाटक : सं. सौभद्र.




Mbhure
Friday, January 20, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चं : नारी जातीची थोरवी या दुनियेने गायिली
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली

कोण होतीस तू? काय झालीस तू?
अगं, वेडे कशी वाया गेलीस तू? -२

(कोण होतीस तू? काय झालीस तू?
कोण होतीस तू? काय झालीस तू?)


सुंदर रूप तुझे निर्मळ भारी
होतीस अशी तू पवित्र नारी

डोईवर पदर
पदरात चेहरा
डोळ्याच्या पापणीत
लाजेचा पहारा

होती यशोदा तू, होतीस तारा तू
होतीस राधा तू, होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली
राजवैभव टाकून आली...

काळ बदलला
तूही बदलली
सार्‍यांना भुलवित रस्त्याने चालली

पदराच भान नाही
अब्रुची जाण नाही
'सडक की लैला' अशी बदनाम झालीस तू

तू अशी नारी होती लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू . १

कोण होतीस तू? काय झालीस तू?
अगं वेडे कशी वाया गेलीस तू?


(कोण होतीस तू? काय झालीस तू?
कोण होतीस तू? काय झालीस तू?
हैऽऽऽऽऽ

उः पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गायिली
अनेक रूपे तुझी ही त्याच दुनियेने पाहिली
कोण होतास तू? काय झालास तू? -२
अरे, वेड्या कसा वाया गेलास तू? -२

(कोण होतास तू? काय झालास तू?
कोण होतास तू? काय झालास तू? )


तेजस्वी रूप तुझे
करारी बाणा
होतास असा तू मर्दाचा राणा
सिंहाची छाती होती
उरात आग होती
वाघाची झेप होती
डोळ्यात जाग होती

होतास राम तू, होतास बुद्ध तू
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू

भगतसिंग तो महान झाला
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला...

काळ बदलला
तूही बदलला
करीत इशारे तू रस्त्याने चालला

पोरींची छेडाछेडी
लोचट लाडीगोडी
'सडक का मजनू' असा बदनाम झालास तू...

तू असा शूर होता
लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू


कोण होतास तू? काय झालास तू?
अरे, वेड्या कसा वाया गेलास तू?

(कोण होतास तू? काय झालास तू?
है ऽऽऽऽऽ

चं : ओऽऽऽ ( एक झ्याक आलाप घेतो,)

लाजवंती कालची तू, चंचल छचोर होई
बेछूट तुझ्या वागण्याला धरबंध आज नाही


कोण होतीस तू? काय झालीस तू? - २
अगं, वेडे कशी वाया गेलीस तू? -२

(कोण होतीस तू? काय झालीस तू?
कोण होतीस तू? काय झालीस तू?)


आखूड केस हे, आखूड कपडे
पाठही उघडे, पोटही उघडे
कालची सीता आज पॅरीसची रीटा झाली
साडी बिचारी खाली घसरली
नवा तुझा ढंग हा बघण्याजोगा
पुढून मुलगी, मागून मुलगा

लाखाच तारुण्य उधळीत चाललीस तू...

तू अशी नारी होती लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू

कोण होतीस तू? काय झालीस तू?
अगं वेडे कशी वाया गेलीस तू?

(कोण होतीस तू? काय झालीस तू?
कोण होतीस तू? काय झालीस तू?
है ऽऽऽऽ)

उः ओऽऽऽ एक मस्तपैकी पल्लेदार आलाप घेऊन,)

काल तुझ्या हाती तलवार होती
लढवय्याचा तू वारसा
आज तुझ्या हाती कंगवा
घडीघडी बघसी तू आरसा

कोण होतास तू? काय झालास तू? -२
अरे, वेड्या कसा वाया गेलास तू? -२
(कोण होतास तू? काय झालास तू?
कोण होतास तू? काय झालास तू? )


काय तुझी वेषभूषा
आता कहर झाला
कालचा हिरो हा
आज झिरो झाला

कमरेला बेलबॉटम
अंगात पोलका
लांब लांब केस हे
मिशीला चटका

तर्‍हा तुझी बायकी
बघण्याजोगी
पुढून मुलगा, मागून मुलगी
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू

तू असा शूर होता
लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू

कोण होतास तू? काय झालास तू?
अरे, वेड्या कसा वाया गेलास तू?

(कोण होतास तू? काय झालास तू?
है ऽऽऽऽ)

चित्रपटः झुंज
गायक, गायिकाः चंद्रशेखर गाडगीळ, उषा मंगेशकर
संगीतः राम कदम
गीतः जगदीश खेबुडकर

मुळ लेखनः गजानन देसाई
विषेश आभारः प्रिया

निळ्या अक्षरातील भाग चित्रपटात नाही, लाल अक्षरातील भाग CD वर नाही


Moodi
Friday, January 20, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुषण,गजानन अन प्रिया तुमचे लाखाने आभार. मस्त गाणे आहे हे.

Chatursakhi
Thursday, March 23, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala kunitari"KA RE DURAWA..KA RE ABOLA.." HE GANE LIHUN DYAL KA? IT IS SUCH A NICE SONG BUT I DONT HAVE THE LYRICS!

Milindaa
Thursday, March 23, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे पाहा

http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/355.html

Mekhla
Wednesday, April 26, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सांगू मी सांगू तुम्हाला आज आनंदी आनंद झाला
ह्या गाण्याचे शब्द कुणाला माहित असल्यास लिहाल का?


Mbhure
Wednesday, April 26, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या ईथे हे गाणे आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Images/WordsGif/489.gif?IctQual=100

Ku1mesh
Sunday, January 07, 2007 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

text/richtextsandip khare's poems
Lyrics_sandip_khare.rtf (18.4 k)




Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators