Mbhure
| |
| Friday, May 30, 2008 - 3:24 pm: |
| 
|
ढमा ढम ढोल तो ढमा ढम वाजवी नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी बाः उद्याच्या पोटाची काळजी कश्याला आभाळ पांघरू, दगड उशाला गाळूनी घाम कसा, मागूया भाकरी . १ कृः पोळातली नार मी, रंग माझा बैंगणी उर होई खालीवर, खुरट माझी ठेंगणी जवानीनं सोडली रं रानफुल डोंगरी .. २ सुः वीसावं वरीस, आलया भराला भिंगाची चोळी गं, दाटते उराला सोन्याच बाण कसा शंभर नंबरी ... ३ कृः हातामध्ये घेतली आडवी किवाटी तारेवरी डोलतं नाचतो कोलाटी माणसं झाली गं कावरीबावरी .... ४ सुः गोलाटी अंगाची वाकली कमान गोलांटी मारतो गिरक्या घेऊन करती कवतुक शेजारी पाजारी ..... ५ कृः काठी भली लांबडी दाताने धरीतो वार्यावर भोऊनी(?) रिंगण घालीतो चढुनी उतरीतो पायरी पायरी ...... ६ बाः जात अशी रांगडी, भोळी तशी भाबडी भल्यासंग भली रं, बुर्यासंग वाकडी पायाला आमच्या बांधली भिंगरी ....... ७ नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी ढमा ढम ढोल तो ढमा ढम वाजवी नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी चित्रपट केला इशारा जाता जाता गायक-गायिकाः बाळकराम, सुलोचना चव्हाण, कृष्णा कल्ले संगीत राम कदम गीत्कार जगदिश खेबुडकर
|