Hkumar
| |
| Sunday, October 07, 2007 - 5:16 am: |
| 
|
चाफ़ा उत्तम. मी सुद्धा ATM ची पावती घेणे कटाक्षाने टाळतो. सद्ध्या त्या यंत्रांवर खात्यातील शिल्लक दिसतेच की. पावतीची गरजच नाही.
|
Bee
| |
| Monday, October 08, 2007 - 2:11 am: |
| 
|
ATM हे उदाहरण झालं पण आणखी काय काय सांगितले त्या Operah मधे अजून माहिती मिळू शकेल का? पाण्याच्या बाटली ऐवजी मी तांब्याचा जग वापरतो. तो दिसतोही छान आणि त्यातील पाणी शरिराला उत्तम. खास करून १२ तासानंतर त्याच्यातील पाणी आणखी उत्तम होते. रात्री भरून ठेवलेले पाणी सकाळी पिले तर त्वचेचे रोग उद्भवत नाही असे म्हणतात. शरिराला हवा असणारा Oxide मिळतो. मला असे दोन तीन जग भारतातून येताना आण अशी विनंती करण्यात आली. शोनू, सुंदर लिहिलेस.. अगदी खरे आहे..
|
Giriraj
| |
| Monday, October 08, 2007 - 5:49 am: |
| 
|
हे थोडे विचित्र वाटेल पण आपण भारतिय toilet paper ऐवजी पाण्याचा वापर करून कितीतरी झाडांचे प्राण वाचवतो!
|
Hkumar
| |
| Monday, October 08, 2007 - 6:50 am: |
| 
|
विचित्र अजिबात नाही. उलट स्वच्छतेच्या द्रुष्टीने पाणी वापरणे कधीही चांगलेच.
|
Storvi
| |
| Monday, October 08, 2007 - 4:25 pm: |
| 
|
मी आणि माझ्या काही मैत्रिणी कितीही मोठी party असली तरीही dishwasher safe ताटं वाट्याच वापरतो. आम्ही सगळ्यांनी अश्या dishes वगैरे आणुन ठेवल्या आहेत. disposables आम्ही हल्ली वापरतच नाही.
|
Hkumar
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:26 am: |
| 
|
सध्या एका बाजूस जाहिराती छापलेले खूप कागद घरात येउन पडतात. मी त्यांची पाठकोरी बाजू लिखाणासाठी वापरतो. असे कागद टेलिफ़ोनच्या खाली ठेवले की निरोप वगैरे लिहायला उपयोगी पडतात.
|
Hkumar
| |
| Thursday, October 11, 2007 - 4:23 am: |
| 
|
प्लॅस्टीकचा कचरा कमी करण्यासाठी ज्या अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक पेनांशी संबंधित आहे. मी शक्य तेवढे fountain pen च वापरतो. स्वतासाठी बाॅलपेन विकत घेत नाही. जे बाॅलपेन मला परीषदांच्या निमित्ताने भेट मिळते ते त्याची रिफ़ील बदलून अनेक वर्षे वापरतो. परंतु, शाळा व college ची मुले जेव्हा ballpens चा कचरा वाढवतात तेव्हा वाइट वाटते.
|
Hkumar
| |
| Saturday, October 13, 2007 - 1:09 pm: |
| 
|
पुण्यात आता भरपूर माॅल्स सुरू झाले. त्यामुळे प्लॅस्टीक च्या पिशव्यांच सुळसुळाट. मी एका माॅलमधील विक्रेत्याशी याबाबत बोललो. ग्राह्काला आपली कापडी पिशवी counter पाशी ठेवू द्यावी व सर्व खरेदी झाल्यावर स्वताच्या कापडी पिशवीत भरू द्यावा. त्याला हे पटले. त्याने तशी सूचना माॅलच्या मालकांना केली आहे. त्याने असेही सुचवले आहे की ग्राहकाने कापडी पि. आणल्यास बिलात १०% सूट द्यावी! बघू या प्रयत्नांना यश येतय का
|
Hkumar
| |
| Sunday, October 21, 2007 - 10:15 am: |
| 
|
दसर्याच्या दिवशी मी आपट्याची पाने ओरबाडत किंवा आणत नाही. पण इतर जण देतात ती मात्र घ्यावी लागतात. हा मुद्दा लोक गांभिर्याने घेत नाहीत याचे वाईट वाटते.
|
Hkumar
| |
| Tuesday, October 23, 2007 - 10:40 am: |
| 
|
वीजबचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मी माझ्या हॉस्पीटलमध्ये आणि इतर ठिकाणी दोन मजल्यांपर्यंतची अंतरे जिन्यानेच चढतो व lift चा वापर कटाक्षाने टाळतो. तरूण लोक जेंव्हा १-२ मजले सुद्धा lift ने उतरताना दिसतात तेंव्हा वाईट वाटते. मर्यादित जिने चढण्या-उतरण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. त्याने आपले cholesterol नियंत्रणात राहते.
|
Monakshi
| |
| Wednesday, October 24, 2007 - 7:44 am: |
| 
|
तुम्ही जो लिफ्ट्चं सांगितलं आहे ते बरोबर आहे पण आमच्या ऑफिसमध्ये जर जीन्याने जायचे झालं तर वजन आटोक्यात राहील पण टि.बी. नाहीतर कॅन्सर सारखे रोग होतील इतकं लोकं धूम्रपान करत असतात जिन्यात उभे राहून.
|
Hkumar
| |
| Wednesday, October 24, 2007 - 8:13 am: |
| 
|
मोनाक्षी, घाबरू नका त्या धूर सोडणार्यांना. भरभर जिने चढा, आपोआप दीर्घ श्वसन होते. मग काय बिशाद आहे क्षयरोग व कॅन्सरची तुमच्या वाट्याला जायची!
|
Maanus
| |
| Monday, December 03, 2007 - 3:38 pm: |
| 
|
अजुन एक चांगली जाहीरात. asking them to use paper towels with care.

|
Hkumar
| |
| Tuesday, December 04, 2007 - 5:07 am: |
| 
|
जाहिरात चांगली आहे. पण, हात पुसायला कागद वापराएवजी जवळ रुमाल बाळगणे ही सवय सगळ्यांनीच लावणे अधिक चांगले नाही का?
|
Hkumar
| |
| Saturday, February 02, 2008 - 10:56 am: |
| 
|
गेल्या महिनाभर मी घरातील फ़्रीज बंद ठेवला आहे. दूध बंद करून त्याऐवजी पावडर वापरतो. इतर कशाला गरज लागणार नाही हे बघतो. आपल्या आजी- आजोबांच्या संसारात कुठे फ़्रीज होते? पण सगळे खणे पिणे कसे मस्त होते!
|
Hkumar
| |
| Saturday, February 02, 2008 - 11:02 am: |
| 
|
पुण्याला माझ्या माहितीचे एक श्रीमंत व्यावसाईक ग्रुहस्थ आहेत. त्यांना फ़्रीज़मधून बाहेर पडणार्या वायूंमुळे श्वसनाला त्रास होतो. म्हणून त्यांच्या घरी फ़्रीज़ नाही. ते रोज रात्री ताजी भाजी आणतात. खरे तर निसर्गस्नेही जीवन शैलीत घरात फ़्रीजला स्थान नकोच. पण तसे वागण्याला मोठा अडथळा म्हणजे ''लोक काय म्हणतील?'' हा होय!!
|
Maanus
| |
| Saturday, March 29, 2008 - 3:14 pm: |
| 
|
आज रात्री ८ ते ९ वीज वापरु नका, http://www.google.com/ http://www.google.com/intl/en/earthhour/
|
Runi
| |
| Saturday, March 29, 2008 - 4:09 pm: |
| 
|
माणसा आम्ही पाळणार आहोत आज Earth Hour
|
काल रात्री नाशिक मध्ये मी व माझ्या इमारतीत सर्वांनी अर्थ अवर पाळला. त्यानंतर ४ तास म. रा.वि.मं ने वीज कापून तो पुढे वाढवण्यास हात भार लावला (भारनियमन करून हात भार लावला- )
|
Hkumar
| |
| Sunday, March 30, 2008 - 10:31 am: |
| 
|
रुनी, रवी उत्तम! सध्या आम्ही रात्री गप्पा मारत बसतो तेव्हा फक्त झिरोचा बल्ब्च चालू ठेवतो. वीजही वाचते व उष्णताही कमी होते.
|
Maanus
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:13 pm: |
| 
|
मी desktop ची background काळा रंग ठेवला आहे, त्यामुळे computer lock केला किंवा वापरत नसलेल्या monitor वरच्या windows minimize केल्या की तेवढीच विजेची बचत होते.
|
अमेरिकेत पेट्रोल भरायला कार नेली की बर्याचदा मोठि लाईन असते विशेषत्: कॉस्टको इत्यादी जागी. लायनीत कार उभी असताना शक्य तेवढ्या लवकर कार बंद करावी म्हणजे पेट्रोल वाचते आणि प्रदूषणही कमी होते. मला वाटते १ मिनिटापेक्षा जास्त वेळ कार एका जागी उभी असेल तर ती बंद करणे योग्य आहे नाहीतर इंजिन सुरू करण्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. तीच गोष्ट ड्राइव्ह थ्रूची. झटपट रेस्टरॉंट मधे ड्राइव्ह थ्रू करायचे असेल आणि मोठी रांग असेल तर कारचे इंजिन बंद करावे.
|
म. टा. वृत्तसेवा, सातारा 'इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज' या संस्थेला नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात सातारा जिल्ह्यातील डॉ. राजेंद शेंडे यांचा समावेश आहे. साता-यातील आणि राज्यातील व्यक्तीचा नोबेल सन्मानात समावेश असण्याची ही पहिलीच वेळ आहे. संस्थेच्यावतीने आर. के. पचोरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मात्र, पुरस्कारात सर्व सहकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगत सहकाऱ्यांनाही त्यांनी नोबेल पारितोषिकाचे प्रमाणपत्र पाठवले आहे. १९९२ मध्ये संयुक्तराष्ट्र संघाने त्यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून निवड केली होती. त्यांनी विजेशिवाय चालणारा फ्रिज तयार करण्यात यश मिळवले आहे.
|