ग्रामविकास bb सुरु केल्या बद्दल धन्यवाद, बायोगैस बाबत मराठीतून माहीती कुठे मिळेल?
|
Aaspaas
| |
| Friday, March 02, 2007 - 5:24 pm: |
| 
|
चिंतामण, बायोगैस बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. पुणे किंवा साताराच्या जवळ असशील तर `आरती' संस्थेची केंद्र पाहून ये. बरीच नवी माहिती मिळेल. मला वाटते तु कृषी सबंधी तु कुठे लिहीले होतेस का? मला सापडत नाहिय.
|
गुलमोहरमध्ये गावाकडच्या गोष्टी आहेत किंवा गुर्हाळाबद्दल वाचलं असेल
|
Aaspaas
| |
| Saturday, March 03, 2007 - 4:55 pm: |
| 
|
बरोबर, गुर्हाळाबद्दल विचारले होतेस ना? बर, तुला काही उपयोग झाला का? कि माहितच होते तुला?
|
Shravan
| |
| Sunday, March 04, 2007 - 11:07 am: |
| 
|
ग्रामविकास म्हणजे काही तशा योजना असतील तर मांडणे किंवा त्यादृष्टीने काही संघटन वगैरे अशी काही उद्दीष्ट्ये आहेत का या BB चा??
|
श्रवण, ग्रामविकासाबाबत काही योजना असतील तर त्यांची माहीती व्हावी व ग्रामविकासाबाबत कोणी प्रयोग केले असतील तर त्यांची माहीती येथे द्यावी हा उद्देश आहे.
|
Aaspaas
| |
| Wednesday, March 07, 2007 - 4:26 pm: |
| 
|
चिंतामन, या बी. बी. चा उद्देश असा ही असू शकतो की, ग्राम विकास कसा असू शकतो?, कसा असायला हवा? आपल्यासारख्या शहरी लोकांचा काय सहभाग असू शकतो? की विकास म्हणजे रस्ते, फोन,कारखाने. अशाप्रकारचे अनेक आयाम या ग्रामविकासाला आहेत. असे अनेक गोष्टींची चर्चा येथे होऊ शकते. तसेच कोणी प्रयोग करत असल्यास ते लोकांपर्यंत कसे पोहोचतील आणि त्यासाठी आपल्या सारख्या वेगवेगळी कौशल्य असलेल्या लोकांचा कसा उपयोग करता येईल? असे अनेक गोष्टी यात बोलता येतील. एकाच वेळी नको. ओघाने येतीलच.
|
ईन्टरनेट तन्त्राचा ग्रामविकासाला काही उपयोग होऊ शकतो. पण ईकडे कोणी फिरकतच नाही. आसपास तुम्हीसुध्दा?
|
पाटील तुमच्या आस्थेचा आदर करूनही एका गोष्टीची आठवण करून देतो. इन्टरनेटला कॉम्प्युटर लागतो कॉम्प्युटर चालवायला वीज लागते. ती आहे का धरणगावात? सध्या आणि पुढील अनेक वर्षे ग्रामीण भागात दळण दळण्यासाठी आणि पिण्याचे पाणी काढण्यासाठी सुद्धा वीज मिळणार नाही हे उघड दिसत आहे. जी वीज निर्माण होणार आहे ती मुम्बईत २४ तास सप्लाय ठेवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. हे नुकतेच मुम्बईतले ए. सी. चालू ठेवण्यासाठी ग्रामीन भागातील वीज टाटाने ओढली होती हे पाहिले असेलच. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात इन्टरनेटवर आधारीत कायमस्वरूपी काही करता येईल असे वाटत नाही....
|
पूर्वीचे ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण ८०:२० होते तेव्हा आपली धोरणे ग्रामीण विकास, शेती यावर आधारीत होती आता हे प्रमान ५०:५०; झाले आहे त्यामुळे शहरी मतदार वाढून शहरी आमदारांची संख्या वाढली आहे. नाशिकला दोनच्या ऐवजी शहरातून चार आमदार येणार आहेत. त्यामुळे विधान मंडळात शहरी लोकप्रतिनिधी वाढत आहेत वाढणार आहेत. ते त्यांचे मतदार म्हणजे शहरी लोकसंख्या यांच्या हितसंबंधांची कालजी घेणार हे तर उघड आहे. शहरी लोकसंख्येचे बहुमत झाल्याने सरकारच्या धोरनांवर शहरी बाबींचा प्रभाव राहणार आहे... शहरी रस्ते, पाणी पुरवठा या बाबत मोठी बोम्ब चालू असते. माध्यमेही शहरातच. शहरातले प्रश्न हे माध्यमांचे स्वत्:चे असू शकतात उदा. लोकमतच्या कार्यालयात वीज नाही पाणी नाही. ग्रामीण प्रश्नाबद्दल माध्यमांचे तादात्म्य राहणार नाही.ग्रामीन भागातील जनतेचे काही प्रश्न आहेत हे क्रमाक्रमाने माध्यमे, सत्ताधारी आणि शेवटी भद्र समाज विसरत जाणार आहे. आजवर ग्रामीण लोकसंख्या ही खरी ग्रामीन भागाची बार्गेनिंग पॉवर होती ती दिवसे दिवस क्षीण होत जाणार आहे आणि ग्रामीण भागातील जिणे अधिक दुस्तर होत जानार आहे....
|
Satishm27
| |
| Thursday, April 05, 2007 - 1:35 pm: |
| 
|
पाटील, "ग्रामविकासा"करीता इन्टरनेट,माहीती तंत्रज्ञान नक्कीच उपयोग होऊ शकतो.... तंत्रज्ञानाचा शोधच मुळत विकासकरिता झाला ना? पण "विकास योजना" राबवणारी सरकरी / खासगी / सामाजीक यत्रंणा आहे कुठे? robeenhood , आपल विश्लेषण सामाजिक,राजकीय बदलांची अभ्यासपुर्ण माहीती देणारे आहे. तुम्ही ह्या विषयावर लिहीत जावो!!!!! (तुमचा छंद जोपासून बर का.... Hobbies/Interests: खोड्या करणे
)
|
आज अग्रोवन मध्ये गाईचे डोहाळ जेवण असे व्रुत्त आले आहे. चांगली गोष्ट आहे. अग्रोची लिंक मला देता येत नाही म्हणून. ज्यांना जमते त्यांनी क्रिपया सगळ्यांसाठी ते व्रुत्त उपलब्ध करुन दिली तर बरे होईल.
|
Santoshi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:03 pm: |
| 
|
ऍग्रोवन स्पेशल.. गाईचे डोहाळे जेवण..! http://www.agrowon.com/AgroWon/04102007/NT000FBDF6.htm
|
robeenhood शहरे फ़ुगू नयेत म्हणून लोकांनी गावात थांबायला हवे ना. आज जर 50-50 स्थिती होत चालली असेल तर ती आणखी वाढायला नकोच. नाही तर शहरात श्वास घेणेही अवघड होऊन बसेल. म्हणूच लोकांनी खेड्यात थांबावे असे वाटत असेल तर आजचे धोरण चालणार नाही. आज मुंबईत २४ तास वीज पुरवठा आहे, आणि खेड्यात १६ तास लोडशेडींग आणि ८ तास वीज पुरवठा. कसं मुंबई फुगणार नाही. नव्या शिकलेल्या पिढीने गावात थांबावे असे वाटत असेल तर त्यासाठी ग्रामविकास आवश्यक आहे. त्यासाठी गावात थांबण्यासाठी उत्साहवर्धक घडायला हवे.
|
Aaspaas
| |
| Thursday, May 10, 2007 - 3:31 pm: |
| 
|
चिंतामण, बरोबर बोललास, आजचे धोरण चालणार नाही. धोरणात बदल हवा. युवकांनी गावात थांबायला हवे आणि त्यांनी विकास घडवायला हवा, त्यांना हवा तसा,गावाच्या नेमक्या गरजा ओळखून, पण निसर्गाला सांभाळून. हे सर्व करण्यासाठी ज्येष्ठांबरोबर युवकांची गरज आहे. स्थानिक युवकांबरोबर मिळून शहरातील युवकांनी खरा विकास होण्यासाठी (म्हणजे रस्ते, पैसा भरपूर नव्हे). यासाठी आपल्यासारख्यांनी किमान एका तरी गावाशी संबंध ठेवावेत (हे गाव आपले मूळ गावही असू शकते) विकास कोनाची वाट पाहून होणार नाही कि जयंती, देऊळ यावर पैसा खर्च करून. आपल्या मूळ गावात जरी संपर्क केला तरी हळू हळू प्रश्न तरी कळायला लागतील. बाबा आमटे म्हणतात की आपण समस्या सोडवण्यापेक्षा ती समजून जरी घेतली तरी पूरेसे आहे. फारच अर्थपूर्ण वाक्य आहे हे. नाही? चिंतामण ही पोस्ट ७-८ दिवसापूर्वीची आहे पाठवायला उशीर लागला.
|
मडळी ग्रामविकास नाही पण शेतकर्यांसाठी चांगली बातमी.
|