|
Deemdu
| |
| Monday, January 29, 2007 - 12:21 pm: |
|
|
लटपट लटपट लटपट लटपट तुझं चालण मोठ्या नखर्याचं चालणं ग मोठ्या नखर्याच बोलणं ग मंजुळ मैनेचं २ नारी ग नारी ग हे नारी ग हे नारी ग हे नारी ग कांती नवनवतीची कांती नवनवतीची, दिसे चंद्राची प्रभा ढवळी जाई ची रे शेंग कवळी दिसणार सुकुआर नरम गाल व्हट पवळी जशी चवळीची रे शेंग कवळी दिसणार सुकुआर नरम गाल व्हट पवळी तारुनपन अंगात जोष मदनाचा जोरात चालणं ग मोठ्या नखर्याच बोलणं ग मंजुळ मैनेचं २ नारी ग नारी ग हे नारी ग हे नारी ग हे नारी ग रुप सुरतीचा दौल रुप सुरतीचा दौल तेज अनमोल सगुन गहिना जशी का पिंजर्यातील मैना हिच्या साठी कितीकाची जनलोकात झाली दैना हिच्या साठी कितीकाची जनलोकात झाली दैना अशी ही चंचल म्रुगनयना हिच्या साठी कितीकाची जनलोकात झाली दैना निर्मल कोमल तेज विजेच तुटक्या तार्याच चालणं ग मोठ्या नखर्याच बोलणं ग मंजुळ मैनेचं २ नारी ग नारी ग हे नारी ग हे नारी ग हे नारी ग
|
Deemdu
| |
| Monday, January 29, 2007 - 12:33 pm: |
|
|
दर रात सुखची नवसाची नवसाची बाई नवसाची मज झोपच येते दिवसाची आळस येतो भारी ग ऐकत नाही स्वारी ग उगाच खाली येती ग इकडून तिकडे जाती ग त्याना घटका वाटे वर्षाची मज झोपच येते दिवसाची दुपार भारी पोळे ग आपसुक मिटती डोळे ग डुलकी घेता थोडी नविन सुचते खोडी ग हळु चूळ फेकती वासाची मज झोपच येते दिवसाची लेणी लुगडी मोलाचि हज्जारोच्या तोलाची उणे कशाचे नाही ग अडचण एकच बाई ग कशी चुकवु सवय या त्रासाची मज झोपच येते दिवसाची
|
Dineshvs
| |
| Monday, January 29, 2007 - 3:46 pm: |
|
|
झक्की, ह्यो ह्यो पावना, हे गाणे सोडले तर बाकि सगळ्या लावण्याच आहेत. लिहा कि.
|
काय अश्लील लिहितात हो हे झक्की!
|
Deemdu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:46 am: |
|
|
मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे बहरली वीज अंगात उतरले प्राण पायात वार्याचा धरुनी हात अशी बेभान नाचले आज की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे मन वेडे जेथे जाय ते जवळी होते हाय अर्ध्यात लचकला पाय तरी बेभान नाचले आज की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे की घुंगरु तुटले रे &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&& कसं काय पाटील बरंहाय का अहो बरं हाय का काल काय ऐकलं ते खर हाय का? खर हाय का खर हाय का खर हाय का सांगा काल काय ऐकलं ते खर हाय का अहो राव तुम्ही, ते न्हाई तुम्ही, चश्मेवलं तुम्ही न्हाय न्हाय न्हाय न्हाय फेटेवलं तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खर हाय का काल म्हनं तुम्ही जत्रला गेला तमाशात काळिज इसरुन आला खरं का वो पाटील इसरल्या ठाई गवलं का न्हाई आज तरी संगती आनलय का काल काय ऐकलं ते खर हाय का खर हाय का खर हाय का खर हाय का सांगा काल काय ऐकलं ते खर हाय का काल म्हनं तुम्ही तालुक्याला गेला कमरचा ऐवज हरवुन आला केलि वाटमारी सांच्यापारी आज काय शिल्लक ह्रायलय का? काल काय ऐकलं ते खर हाय का खर हाय का खर हाय का खर हाय का सांगा काल काय ऐकलं ते खर हाय का काल म्हनं तुम्ही हिथ तिथ गेला बघता बघता घोटाळा झाला अग बया बया काय झालं पुढं संगातरी थोडं खाली नका बघु अस लाजताय का काल काय ऐकलं ते खर हाय का खर हाय का खर हाय का खर हाय का सांगा काल काय ऐकलं ते खर हाय का &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&& मी तर जाते जत्रला गाडीचा खोंड बिथरला बर न्हाई घरच्या गणोबाला कुणीतरी बोलव दाजीबाला कुणीतरी बोलव दाजीबाला दाजीबा सारखा दीर अख्ख्या दुनीयेमधे न्हाई गोर्या भवजईची त्यांना लई अपुरवाई त्यांची बाईल होइल तिची खरी पुण्याई हेन्द्रट आमच्या नशीबाला हेन्द्रट आमच्या नशीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला दाजीबांचा स्वभाव लई गुलहौशी सजाव्तील घोडा सांगीतल्यासरशी मला पुढ्या घेतील हसून चतदिशी निगह्ता निघता उशीर झाला कुणी तरी बोलवा दाजीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला दाजीबाम्होरं घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत अन होती गुदगुल्या बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या मी लई भुलते रुबाबाला मी लई भुलते रुबाबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला साज शिणगार केला ल्याले साखळ्या तोडे ऐन्याची घातली चोळी अन जरीचे लुगदे अश्यात असावे संगे दाजीबा तगडे दाजीबा तगडे म्होरं माग थाउक जोतीबाला म्होरं माग थाउक जोतीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला कुणी तरी बोलवा दाजीबाला &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&& कुण्य गावाच आलं पाखरु अहो कुण्य गावाच आलं पाखरु बसलय डौलात नी खुदुखुदु हसतय गालात कस लबाड खुदुखुदु हसतय तकमक बघतय हं आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात मान करुन जराशी तिरकी भान हार्पून घेतय गिरकी किती इशारा केला तरी बी अहो किती इशारा केला तरी बी आपल्याच तालात नी खुदुखुदु हसतय गालात कशी सुबक तंच बांधणी ही तरुण तनु देखणी कशी कामिना चुकुन आली अहो कशी कामिना चुकुन आली ऐनेमहालात नी खुदुखुदु हसतय गालात लाल चुटुक डाळिंब फुटं मऊ व्हटाला पाणी सुटं हि मदनाची नशा माईन टपोर डोळ्यात नी खुदुखुदु हसतय गालात
|
Zakki
| |
| Tuesday, January 30, 2007 - 1:01 pm: |
|
|
अहो रॉबिनहूड, सख्या चला बागामंदी रंग खेळू चला... हे कुठल्या देवाचे भजन हो?
|
Manya2804
| |
| Tuesday, January 30, 2007 - 2:15 pm: |
|
|
नेहमीच राया तुमची घाई, नका लावू गाठोडं बांधायला येवू कशी तशी मी नांदायला हो येवू कशी तशी मी नांदायला बाबा गेले हो परगावा निरोप त्यांचा घ्यायाला हवा नाही विचारलं थोरल्या भावा आई गेली पाणी शेंदायला हो येवू कशी तशी मी नांदायला गाव हाय आपला बारा कोस वागनं तुमचं अस हो कसं उन्हातान्हात चालण्याचा त्रास दिल्यात चपला सांधायला हो येवू कशी तशी मी नांदायला हो ????? आज राहू जाउ उद्या सकाळी जेवण करते पुरणाची पोळी भात मी घातलाय रांधायला हो येवू कशी तशी मी नांदायला हो
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:02 pm: |
|
|
थोड्या सुधारणा गाठोडं नाही गठुडं गाव हाय आपलं बारा कोस डोकं तुमचं असं वो कसं उन्हातान्हाचा चालण्याचा त्रास दिल्याती चपला बांधायला हो शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सण वर्षाचा आहे दिवाळी अशी आहे बहुतेक गायिका रोशन सातारकर.
|
Manya2804
| |
| Wednesday, January 31, 2007 - 5:49 am: |
|
|
दिनेश, चुका सुधारल्याबद्दल धन्यवाद !
|
|
|