Mepunekar
| |
| Monday, September 04, 2006 - 4:04 am: |
| 
|
माज़्या माहेरी उभ्या गौरी असतात, २ उभ्या आणि २ त्यांच्या खाली बसलेल्या. गणपति गौरि बरोबर विसर्जन होतात. 
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 6:03 am: |
| 
|
ह्या बीबीवर मी २र्यांदा येतो आहे. मी बरेच मिस केले असे दिसते. मला वाटल होतं इथे आरत्याच असतील तर केवढी छान माहिती मिळाली. हा एक उपक्रम छान चाललाय की सगळे जण नैवेद्य, घरचे गणपती, गौरींबद्दल इथे चर्चा करत आहे. खूप आवडला. मी इथे विदर्भातील गणपतीबद्दल लिहितो. विदर्भात, गौरीपुजनाला महालक्ष्मी म्हणतात. गौरी हा शब्द खूप कमी जण वापरतात. कोकणात खड्यांच्या गौरी बसवितात ह्याचे एकमेव कारण म्हणजे पुर्वी कोकणात घरोघर अठवराविसे दारिद्रे असायचे. त्यामुळे इतके गोडधोड पदार्थ सामान्य माणसाला झेपत नसे. म्हणून खड्यांच्या गौरी बसवितात. हे मी एके ठिकाणी वाचले आहे, माझे मत नाही. असो. विदर्भात महालक्ष्मीचे मुखवटेच उभे करतात. जसे आपण मुलगा झाला की गणपती बसविण्याचा घाट सुरू करतो. तसे जेंव्हा घरी सुन येते त्यावेळी महालक्ष्मी बसविण्याचा घाट घातल्या जातो. आमच्या घरी सर्व नातेवाईकांकडे महालक्ष्मीपुजनाचा घाट असाच घातला गेला आहे. सुन घरात आली की, पाठोपाठ महालक्ष्मीपुजनाचा घाट घातला जातो. आमच्याकडे ज्या दिवशी महालक्ष्म्या जेवतात त्यादिवशी खूप कठिण पथ्य पाळावे लागते. एक म्हणजे घर झाडू नये, पायाखाली अन्न येता कामा नये. दुसरे म्हणजे महालक्ष्मी जेवताना त्यांच्याकडे पाहू नये. बघितले तर घोर पाप घडते, अनर्थ येऊ शकते. म्हणून महालक्ष्मीला जेवणाचे ताट दाखविले की तिथे अर्धा तास कुणीही फ़िरकत नाही. पहिला घास हा विड्याच्या पानांचा असतो. आणि आपण जसे गणपतीला मोदक करतो तसे महालक्ष्मीपुजनाला 'आम्बील आणि कथील' असे दोन पदार्थ करावेच लागतात. त्यांचाच खरा मान असतो. अम्बील आणि कथिल हे दहा दिवस टिकते. ते कसे टिकते हे माहिती नाही. तुम्ही जर १०व्या दिवशी जरी गेलात तरी तुम्हाला केळीच्या पानात अम्बील आणि कथिल खायला मिळेल. विदर्भा गुढी देण्याचा आणखी एक खूप वेगळा प्रकार आहे. गुढी देणे म्हणजे, एका कामटीत हळद लावून उजळविलेले वस्त्र कामटीभोवती गुंडाळणे आणि ती कामटी मग महालक्ष्मीच्या निर्यांमध्ये लपवून ठेवणे. असे करताना आपली इच्छा बोलणे. जर वस्त्र आणि कामटी वेगळी झाली तर समजावे ती आपल्याला पावली. नाहीतर पुढल्यावेळी अजून तनमनधनाने तिची सेवा करावी. ये प्लीज प्रतिक्रिया द्याल का मग अजून लिहितो.. नाहीतर नाही... मंडळी अजून फोटो येऊ द्या.. मज्जा येत आहे..
|
बी, लिहित रहा रे भो! वेगवेगळ्या प्रथा समजतात!
|
Asami
| |
| Monday, September 04, 2006 - 2:24 pm: |
| 
|
बाप्पा मोरया रे , बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
|
Dineshvs
| |
| Monday, September 04, 2006 - 4:21 pm: |
| 
|
बी छान लिहितो आहेस. आमच्याकडे महालक्ष्मी हि नवरात्रीशी जोडलेली आहे. हा आहे माटुंग्याच्या फुलवाल्यांचा गणपति. यावर्षी खास जाणवले ते कि या मुर्तीचा चेहरा, खास दाक्षिणात्य धाटणीचा आहे.

|
दिनेश.. लिंबलोण म्हणजे काय.. एका गाण्यातही हा शब्द आहे.. तसेच अम्बील आणि कथिल म्हणजे काय..?? ते दहा दिवस टिकते म्हणजे १० दिवसच का?? की अशी श्रद्धा आहे? बी अठवराविसे म्हणजे अठराविश्वे का?? की अजुन दुसरा शब्द आहे?? वर काही ठिकाणी देवी देवतांचा कोप होईल असा उल्लेख आला आहे.. तसेच गणपती बसवण्याचे सुद्धा काही कडक नियम आहेत असे ऐकले आहे. पण मनाला हे पटत नाही. देव कशाला भक्तांवर रागवेल? कशाला कोपेल?? की हा देवाची भिती घालण्याचा प्रकार??
|
मस्त आहेत सगळ्यांचे गौरी - गणपती चे photo! बी , छान लिहित आहेस , तू चक्क विदर्भातला असूनही पण ' तांबूल ' ऐवजी विड्याचा पानांचा नैवेद्य शब्द वापरलास सीमा , मस्त लिहिलं आहेस . एकदम homesick वाटले वाचून !
|
Lajo
| |
| Tuesday, September 05, 2006 - 12:43 am: |
| 
|
आमच्या घरी (ओस्ट्रेलिआत) आम्ही दीड दिवस गणपती बसवतो. सकाळी प्रतिस्थापना पूजा करतो, संध्याकाळी महाप्रसाद असतो.
|
अरे वा.. मला वाटते पुढच्या गणेशोत्सवात 'माझ्या घरचे गौरी गणपती' असा एक वेगळा बीबी असावा आणि त्यात प्रत्येक मायबोलीकर.. ज्यांच्या घरी गौरी / गणपती येतात.. त्याने त्याचा फोटो टाकावा.. अशारितीने त्यांनी आरास करण्यासाठी घेतलेली मेहनत.. कल्पना.. सर्वांना पाहता येतील.. शेजार्यांच्या गणपतीचे फोटोही देण्याची व्यवस्था ठेवावी..
|
Bee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 7:14 am: |
| 
|
मी वर अठराविसे असे लिहायचे होते. मागेच शब्दार्थाच्या बीबीवर अनुदोनने सगळ्यांना सांगितले होते की तो शब्द अठराविश्वे नाही. कारण्- १८ X २० = ३६० म्हणजे जवळजवळ एक वर्ष. तर असे वर्षाचे ३६० दिवस जिथे दारिद्र्य असायचे त्याला अठराविसे दारिद्र्य म्हणण्याची पद्धत रुढ झाली. पुढे विसे चे विश्वे झाले आणि आजकाल पुस्तकांमध्येही अपभ्रंशच वापरला जातो. पण ती चुक लक्षात घ्यावी आणि बरोबर शब्द वापरावा. असो.. तांबूल मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. विदर्भात, महालक्ष्मीचा प्रसाद कुणी खरकटा उष्टा टाकत नाही. पत्रावळी आणि केर टाकण्यासाठी घरासमोर समुद्र निर्माण केला जातो. समुद्राला अर्पण केलेले निर्माल्य पावन होते म्हणून घरासमोर केलेला आडवा खोल खड्डा त्याला समुद्र म्हणून संबोधिले जाते. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!!!!!!
|
Bee
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:13 am: |
| 
|
गणपतीच्या प्रसादाला विदर्भात वाटलेल्या डाळीची चटणी ठेवतात. ती इतर कुठे आहे का?
|
Sanyojak
| |
| Tuesday, September 05, 2006 - 12:06 pm: |
| 
|
या सत्यनारायणाची पूजा करू आणि प्रसाद घेऊन सत्यव्रत घेउयात.  आज च्या दिवशी १०८ सत्यनारायणाचे दर्शन घ्यायचे म्हणले तरी सहज शक्य असते गणपती बाप्पा मोरया!!!
|
Asami
| |
| Tuesday, September 05, 2006 - 1:14 pm: |
| 
|
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जांकी पार्वती पिता महादेवा
|
Prajaktad
| |
| Tuesday, September 05, 2006 - 3:10 pm: |
| 
|
बाप्पा मोरया! छान आहे सगळ्यांच्याच घरचे गौरी-गणपती.मलाही घरच्या गौरी-गणपतीची आठवण येतिय.. सासरच्या गौरी बसवण्याचा योग अजुन आला नाही. पण,माहेरी गौरी(महालक्ष्मी)चा फ़ार मोठा सोहळा असतो.मोठी आरास असते.एक तर पाहिर्यांची आरास किंवा मग झोपाळा,मोरावरच्या अशी वेगवेगळी आरास असते. श्रावण सुरु होतो तेव्हाच तयारिला सुरवात होते.. " गौरी आल्या सोन्याचे पावली रुप्याचे पावली " म्हणुन गौरी येतात आणी तिन दिवस घर अगदी प्रसन्नतेने भरुन जाते.जरि वस्त्रात आणी सर्व दागिने लेवुन देविंना सजवन्यात येते.लाडवानी त्यांची पोट भरण्यात येतात.गव्हाचा चौक घालण्यात येतो.५ किंवा जास्त फ़राळाचे पदार्थ मांडली जातात.गौरी जेवणाला हळदिकुंकु असते. गौर जेवणाच्या दिवशी गणपती बाप्पालाही उचलुन गौरींच्या मधे बसवतात.. गौर विसर्जनानंतर बाप्पा परत त्यांच्या जागी प्रस्थापित होतात.
|
मी सुद्धा माहेरच्या गौरी फ़ार मिस करते...कारण सासरी फ़क्त दिड दिवसाचा गणपती असतो... आणि गौरी तर नसतातच...आणि त्यतुनही भारतात नसल्याने तर ते पण नहीच... ईथे सगळ्यांच्या घरच्या गौरी-गणपतीचे फोटो पाहून का होईना मन आनंदून गेले...जुन्या आजी असतानाच्या आठवणी आणि गौरी गणपतीच्या दिवसातील आजीची आणि आईची चालू असलेली लगबग आठवली...खरेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा आजीच्या आणि आईच्या स्वरूपात मूर्त रूपात उभ्या आहेत असे वाटायचे... आता त्या जुन्या आठवणी आल्या की मग मन आपोआप उडत उडत माहेरी जाते.
|
जर आजून कोणी घरच्या गौरींचे फोटो काढले आसतील तर पोस्ट कराल का?...गौरी नुसत्या फोटोत बघून सुद्धा किती छान वाटते आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 06, 2006 - 1:07 am: |
| 
|
मला आवडलेली एक साधीसुधी आरास. हा आहे पापा पगली चौकातला गणपति.

|
Asami
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:05 pm: |
| 
|
श्री गणेशाय नमः | नारद उवाच | प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् | भक्तावासं स्मरेनित्यमायुःकामार्थसिद्धये || प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् | त्रुतीयं क्रुष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकम् || लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च | सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् || नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् | एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् || द्वादैशतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः | न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो || विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् | पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् || जपेद्ग़णपतिस्त्रोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् | संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः || अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् | तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः || इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||
|
Kashi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 2:42 pm: |
| 
|
गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!!!!!! सिगापूर मधिल गणपती बाप्पा
|
Miseeka
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:54 pm: |
| 
|
आज अन्नतचर्तुर्दशि आहे,गणपति च्या विसर्जनाचा दिवस.म्हणुन आपण गणपति कडे हे मागणे मागुया आणि त्याचे आशिरवाद घेवु या. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा||१|| गुन गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी||२|| न लगे मुक्ति आणि सम्पदा सन्तसन्ग देई सदा||३|| तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासि||४||
|