Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 03, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » गणेशोत्सव » Archive through September 03, 2006 « Previous Next »

Kmayuresh2002
Friday, September 01, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया!!!

Rahulphatak
Friday, September 01, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया !!!

Limbutimbu
Friday, September 01, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिद्धी सिद्धी या पत्नी हे बरोबर!
गौरी किन्वा गौर्‍या, या गणपतीच्या बहिणी मानल्याहेत, माहेरपणाला येतात ते बरोबर हे!
काही जणात खास करुन देशस्थात त्यान्नाच लक्षुमीरुपात पुजल जात व त्यासाठी मुखवटे, घागर कळशी किन्वा पत्र्याच्या स्टॅण्डवर साडी नेसवुन उभी गौर सजविली जाते!
कोक्यान्च्यात खड्याच्या गौरी, चान्दीच्या वाटीत ठेवुन देवघरात पुजिल्या जातात!
ज्यान्च्याकडे मुली असतील, मनुष्यबळ असेल आणि उभ्या गौरीही असतील तर तेथिल थाटमाट आणि आरासीची हौस याला सीमा नस्ते! :-)
महालक्षमी म्हणुन का पुजतात या बाबत असे स्पष्टीकरन देता येते की ज्यान्चे कुलदैवत हे विष्णुरुपाचे आहे जसे की केशव वगैरे तर त्यान्च्यात देवीचे रुप पुजताना लक्ष्मीची कल्पना करतात तर ज्यान्चे कुलदैवत शन्कराचे रुप हे जसे की व्याडेश्वर वगैरे, तर ती लोक देवीचे रुप पुजताना उग्र दुर्गेची अर्थात "पार्वतीची" रुपे पुजतात, ती लोक लक्षुमीची स्वतन्त्र पणे पुजा करतात.
ज्यान्चे कुलदैवत विष्णुरुप हे त्यान्ची कुलदेवता लक्षीरुपातली देवता असते जशी की अम्बेजोगाईची देवी वगैरे! :-)
तर ज्यान्चे कुलदैवर शन्कररुपी हे त्यान्ची कुलदेवता दुर्गारुपातील असते जशी की तुळजाभवानी वगैरे!
चु. भु. द्या. घ्या! :-)


Asami
Friday, September 01, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओम गं गणपतये नमः ||

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम्
विघ्न - निघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनन्तकम्

सुरासुरेंद्रैः सिद्धैन्द्रैं.ः स्तुतं स्तौमि परात्परम्
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम्

इदं स्त्रोत्रं महापुण्यं विघ्न्शोकहरं परम्
यः पठेत् प्रात्रुथाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते


Dineshvs
Friday, September 01, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अयाचितोपस्थितमम्बु केवलं रसात्मकस्योडुपतेश्च रश्मयः |
बभुव त्स्याः किल पारणाविधिर्न वधवृत्तिव्यतिरिक्तसाधनः ||

कालिदासाच्या कुमारसंभव मधले पार्वतीचे वर्णन.
आज गौराई जेवणार, पावसाचे अनायासे मिळणारे पाणी आणि
चंद्रकिरणांवर जगुन, तिने केलेल्या साधनेचे बळ आपल्यालाहि लाभु दे.


Dineshvs
Friday, September 01, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आजोळी. नदीकाठचे पाच खडे तांब्यात ठेवुन त्यात तेरड्याची रोपे ठेवतात आणि मग त्यावर साडी वैगरे नेसवुन पितळेचा मुखवटा लावतात. हि गौर म्हणजे पार्वती. म्हणजेच आदीमाया. हि खरे लोकदैवत. मराठ्यांमधे तिला समिष नैवैद्य दाखवतात. त्यावेळी गणपतिला झाकुन ठेवलेले असते.
गौरीला न्यायला शंकरोबा पण आणतात. आणि मग त्या तिघाना निरोप दिला जातो.
लोकगीतात गौरीला खुप मानाचे स्थान आहे. स्वाभिमान, तपस्या यांचे ती प्रतीक आहे.

उमा म्हणे यज्ञी, माझे जळाले माहेर

किंवा

रुणुझुणुत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा
मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात मला, मिळु दे उबारा

अश्या गीतात ती आपल्याला भेटतेच.
शक्तीची साडेतीन पिठं म्हणजे, यज्ञात जळालेल्या तिच्या शरिराचे, तुकडे ज्या ठिकाणी पडले ती स्थाने, आहेत.


Seema_
Friday, September 01, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश आमच्याकडे पण अशीच असते गौर .
पण आमच्याकडे तेरड्याच्या झाडामध्ये थोडी झेंडुच्या फ़ुलासकट फ़ांद्या,दुर्वा,आघाडी याना एकत्र करतात . मग पांढर्‍या चाफ़्याची पाच पान बाजुला लावुन याचा गुच्छ तयार करतात आणि तो रिकाम्या तांब्यात ठेवतात .
मुखवटे वगैरे नसत .
मग दुपारनंतर नदिवर, boring वर किंवा ओढ्यावर, किंवा विहिरीवर सगळ्या मुली बायका जातात. सगळ्या जणि इतक्या नटलेल्या असतात ना!! जणु त्याच गौरी सारख्या दिसत असतात. पुढे band लावलेला असतो. आनि मागे हि मिरवणुक. नदीवर पाच खडे घेवुन त्याची पुजा करुन ते या तांब्यात टाकतात आणि पाणि भरुन वरती ती गौर ठेवतात.

ओढ्यावर शंकराच मंदिर होत . अगदी चित्रात काढल्यासारख. मग झिम्मा, फ़ुगडी वगैरे खेळ खेळले जायचे. चिरमुरे,भेंड बताशे वाटायचे. मग घरी आल्यावर गौरीची स्थापना करायची. मग हळदीकुंकु.

गौराक्का एक दिवस शेपुची भाजी,भाकरी आणि एक दिवस पुरण पोळी जेवायची.
आई नैवेद्य दाखवताना इतकी तृप्त असायची ना ! मला तर तीच गौर होवुन आली आहे अस वाटायच .

इतके सुंदर दिवस होते ना ते!! आता सुद्धा आमच्याकडे तशीच गौर बसवली जाते. त्याच style चा गणपती आणला जातो आणि त्याच्या शेजारचा छोटा मातीचा गणपती सुद्धा त्याच कुंभाराच्या घरातुन येतो.
फ़क्त आम्ही बहीनी तीथ नसतो इतकच.
आई सांगत होती आता तो कुंभार फ़ार वाकलाय. त्याला काम होत नाही. त्याची मुल मोटार लावलेल चाक वापरुन भांडी तयार करतात.
पण गणपतीत मात्र अजुनही तो ते मातीचे गणोबा तयार करतोच.
वरती मोटोळीचा उल्लेख निघालाय म्हणुन आमच्याकडे फ़ळाच्या माळा करतात. शेंगदाने,चुर्मुर्याच्या पण माळा तयार करतात आणि त्या गणपती समोर बांधतात.

एरवी मी इतकी homesick होत नाही. बहुदा वय वाढेल तस आठवणी पण बोथट होत जातात. पण गणपती आणि दसरा दिवाळी ला मात्र जुने सगळे दिवस आठवतातच. आणि मग आश्चर्य वाटत रहात कि इतके पटकन कसे संपले ते दिवस. बहुदा बालपणातले हे दिवस म्हणजे त्या bombay मिठाई सारखे असतात वाटत.
जिभेवर ठेवुन आस्वाद घ्यावा तोवर संपुन पण जातात.
पण मागे रेंगाळणारी ती चव मात्र विसरता विसरु येत नाही.
आपण फ़ार मोठे झालो नाही याची तेवढीच एक खुण.




Rachana_barve
Friday, September 01, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंमत आहे ना. मी मागे माझ्या एका south indian कलीगशी गणेश उत्सवाबद्दल बोलत होते. विषय कार्तिकेयावर घसरला. मग मी सांगीतल आमच्यात कार्तिकेयाला बायका आवडत नाहीत. जर त्याच्या समोर कोणी बाई गेली तर तो चिडतो. जर देवळात तो असेल तर त्याला पाठ करून बसवतात.
तर तो म्हणे त्यांच्यात कार्तिकेयाचे लग्न लावतात आणि गणपती बॅचलर आहे. म्हणजे गणपती बायकांचा राग नाही करत पण त्याच लग्न झालेल नाही आणि I guess कार्तिकेयाच्या २ बायका आहेत. मग मी confirm केल की तोच ना गणपतीचा भाऊ तर तोच तो..
:-O कस ना?


Maitreyee
Friday, September 01, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग साउथ चा अय्यप्पा म्हणजे कोण? मला तोच कार्तिकेय वाटायचा! अय्यप्पाच्या मन्दिरात पण बायका चालत नाहीत!
btw सीमा, छान लिहिलयास. तुझ्या बीबी वर ठेव.:-)


Mrinmayee
Friday, September 01, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, खूप छान लिहिलस! तुझ्या मनातली गौरीला नेवैद्य दाखवल्यावर तृप्त दिसणार्‍या आईची प्रतीमा अगदी माझ्याही डोळ्यांसमोर आली! "मला तर तीच गौर होऊन आली आहे असं वाटायचं"... फार आवडलं!!
आजच सहकारनगर BB वर मी विचारत होते कुणाकडे तेरड्याच्या झाडांच्या गौरी बसतात का अन इथे तुमचे postings वाचायला मिळाले. नागपुरला माझ्या माहेरी पण तेरडीच्या झाडांचीच गौर असते. गौरी विसर्जानाच्या दिवशी उगाचच उदास वाटतं.


Arch
Friday, September 01, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहेरी दिड दिवसाचा गणपती असतो. एक दोन आठवड्यापासून सगळी तयारी चाललेली असते गणपतीच्या आगमनाची. गणेश चतुर्थीला दर्शनासाठी खूप गर्दी होते. कधीच कुणाला आमंत्रण द्यायला लागत नाही. सगळेच आपले. दुपारच प्रसादाच जेवण होत न होत तोच संध्याकाळची लोक यायला लागतात. मी घरी असताना जेवढ्या उत्साहाने मोदक, रांगोळी वगैरे करायची तेवड्याच उत्साहाने आता माझी भाचेमंडळी करतात सजावट. गणपती घरी गेले की घर अगदी सुनंसुनं होत. घर कस गजबजलेल असत. वहिनीपण अगदी आईच्या उत्साहाने सगळ अजून करते त्याचही कौतुक वाटत. इतकी वर्ष झाली माहेर सोडल्याला पण मृ आणि सीमा म्हणता तशा आठवणी मात्र जाग्याच रहातात.

Mrinmayee
Friday, September 01, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरी जेवतात त्या दिवशीची एक गम्मत आठवली. वर्षानुवर्ष आमचं एकत्र कुटुंब! भलं मोठं नांदतं गाजतं घर! गौरी जेवतात त्या दिवशी साणाची जेवणं संध्याकाळी असायची. घरातलीच २० माणसं! त्यात बाहेरून येणार्‍यांची भर! ५० माणसांचा स्वयंपाक सकाळपासून सुरु असायचा. दिवसभर घरात छान वास दरवळायचे. माझ्या आत्या, आम्ही मुली फार वैतागायचो कारण नुसते वास घ्या, पण रात्रीशिवाय जेवण नाही, आणि वड्यांसारखे गरम गरम पदार्थ चाखायला तोवर वाट बघायची! जरा भुणभुण केली की आजी म्हणायची, "नैवेद्याचे ५ वडे काढा बाजुला अन यांना द्या चाखायला गरम वडे! शेवटी काय माझ्या माहेरपणाला आलेल्या गौरी तर ह्याच!" वर "खा मेल्यांनो नैवेद्याआधी" हे देखील असायचं!

Dineshvs
Saturday, September 02, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौरी विसर्जनाच्या दिवशी मुंबईच्या चौपाटीवर वेगवेगळ्या गौरींचा सोहळा असतो. मुखवट्याच्या, चित्राच्या अनेक गौरी असतात तिथे.
एका दाक्षिणात्य गौरीचा आगळाच प्रकार असतो. एका ताटात वा ताम्हणात झेंडु वैगरे फुलांची रास रचलेली असते. त्याभोवती अर्धगोलाकार कडे रचुन त्या बायका गाणी म्हणत फेर धरतात आणि मग तिचे विसर्जन होते.
माझ्या आजोळी भाजी भाकरीचा, कढी वडीचा, पुरणपोळीचा, सोळा भाज्यांचा असे वेगवेगळे नैवैद्य असतात गौरीसाठी.


Kmayuresh2002
Saturday, September 02, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू सुखकर्ता तू दुखहर्ता
तुच कर्ता आणि करविता...
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया


Asami
Saturday, September 02, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू सुख्कर्ता तु दुःखहर्ता विग्नविनाशक मोरया
संकटरक्शी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया ||


Himscool
Sunday, September 03, 2006 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या घरचा गणपती


Asami
Sunday, September 03, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुक्लांबरधर.म विष्णुं शशिर्वर्णं चतुर्भुजं
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप शांतये ||


Upas
Monday, September 04, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकं प्रियं
निर्विघ्न कुरुमे देव सर्वकर्येषु सर्वदा..!!


LT,गौरी म्हणजे गणपतीच्या मातोश्री असाव्यात असं मला तरी वाटतं.. पार्वतीची रुपे.. ते गाणं नाहीये का.. गौरी तनया ( म्हणजे मुलगा ) भालचंद्रा देवा कृपेच्या तू समुद्रा..

Upas
Monday, September 04, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरचे गौरी आणि गणपती

Kmayuresh2002
Monday, September 04, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओंकार स्वरुपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुज नमो.. तुज नमो..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators