|
सक्काळी सक्काळी लिम्बीच डोक उठवल आणि तिला विचारल की बाई ग, नैवेद्यात मीठ का घालत नाहीत? तिन "अगस्ती" च्या कहाणीचा सन्दर्भ देवुन, म्हणुन मीठ वापरीत नाहीत असे सान्गितले! काळे खाणीतले मीठ चालते!
|
प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया...
|
>>>>हि घ्या बाप्पाला माटोळी. वा दिनेश.. मी गोव्याला गणपती आरासात अशी माटोळी पाहिली आहे.. तिथे म्हणे गणपतीच्या वर लाकडाच्या चौकटीला विविध फळे बांधुन.. ती चौकट गणपतीच्या वरच्या बाजूला बांधुन ठेवायची प्रथाच आहे.. मैत्रेयी.. हो.. माझे already दोन मेल्स झाले आहेत.. ते वेगळे होते.. पण त्यामुळे मी स्पर्धेसाठी entry पाठवू शकत नाहियं. दिनेश.. पक्वान्नाची माहिती छान.. तसेच पक्वान्न म्हणजे पक्व - अन्न असेल तर त्याच अर्थ काय??
|
जय गणराया श्री गणराया मन्गल मूर्ति मोरया अश्टविनायक मन्गलदायक तु विघ्नहर्ता तु सुखकर्ता मन्गल मूर्ति मोरया
|
नमामि श्री गणराज दयाल करत हो भक्तनका प्रतिपाल
|
श्री गणेशा जय श्री गणेशा ओम भूर भूव्: स्वाह्: महगणपति देव नम:
|
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता तेरि पार्वति पिता महदेवा ओ गणपति देवा गणपति देवा जय जय गणपति देव गणपति देवा अन्धो को आन्ख देत कोढन को काया बान्झन को पूत्र देत निर्धन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
|
गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा जय जय श्री गणेशा वक्रतुण्ड एकदन्त कपिल गजकर्णक, गजकर्णक, गजकर्णक गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा लम्बोदर विकट विघ्ननाशा धूम्रवर्णा, धूम्रवर्णा, धूम्रवर्णा गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा भालचन्द्रा विनायका गजानना गणाधीप, गणाधीप, गणाधीप गणेशा गणेशा गणेशा गणेशा जय जय श्री गणेशा
|
Lalu
| |
| Thursday, August 31, 2006 - 11:49 am: |
|
|
मोरया! आजचा प्रसाद. एवढा पुरणार नाही. अजून आणा.
|
Asami
| |
| Thursday, August 31, 2006 - 1:30 pm: |
|
|
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
|
Manuswini
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:17 pm: |
|
|
हो बरोबर आम्ही पण माटोळी लावतो चौकटीत जिथे गणपती सजावट करतो त्यावर. हा माझा मुंबईचा घरचा गणपती
|
Manuswini
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:20 pm: |
|
|
|
Dineshvs
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:05 pm: |
|
|
गोयंकाराकडे माटोळी तयारच असते. काहिजण अगदी गणपतीच्या वर तर काहि जण जरा पुढे बांधतात. यात लाल भोपळा, केळ्याचा घड, अननस, काकडी, तवसे, आंबाडे, कारले, पेरु, ओल्या सुपार्या, कच्ची सिताफळे, महारुखाची फळे, डाळिंबे आणि बर्याच प्रकारची रानफुले आणि फळेहि बांधतात. हि माटोळी भरगच्च करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. अलिकडे सफरचंद वैगरे पण बांधतात. यापेक्षा मखर वैगरे आरास फारच क्वचित दिसते. पुर्वी हि सगळी फळे घराच्या आजुबाजुला होत असत. सहज मिळतहि असत. मंगळागौरीच्या पत्रीप्रमाणे, या सगळ्यांचे औषधी गुणधर्म आपसुक माहित होत असत. खरेतर यातल्या ( फळे वगळल्यास ) बहुतेक वनस्पति जंगलात आपसुक उगवतात, त्यांची लागवड कुणी करत नाहीत. पण आता मात्र केवळ या कारणासाठी त्यांची प्रचंड प्रमाणात तोड होते. तृतीयेच्या रात्रीपर्यंत अत्यंत चढ्या भावात हे सामान विकले जाते. नवरात्रीच्या माळेप्रमाणे हि माटोळी रोज बदलत नाहीत, ते सामान एकदाच बांधायचे असते. त्यामुळे चतुर्थीच्या सकाळी हा सगळा माल मातीमोल ठरतो. पणजीच्या बाजारात ढिगाने हा माल वाया जातो. पण तरिही माटोळीचा आकार आणि त्याचा भरगच्चपणा, गोयकाराच्या प्रतिष्ठेचा प्रश्ण असतो. शेवटच्या आरतीच्या नंतर, हि माटोळी लहान मुले लुटतात. त्यासाठी आरतीच्या वेळीच मोक्याची जागा पकडुन, एखादे स्टुल वैगरे हाताशी ठेवले जाते.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:12 pm: |
|
|
गोव्यातल्या श्रींच्या मुर्तीहि थोड्या वेगळ्या चेहरेपट्टीच्या असतात.
|
Manuswini
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:16 pm: |
|
|
बरोबर दिनेश, माझे पप्पा ती माटोळी decoration ला जड होईल म्हणुन side ला बांधतात सध्या तिचा आकार एवढा मोठा नसतो.
|
Seema_
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:48 pm: |
|
|
ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन| तेहनाकं महिमान:सचंत यत्र पूर्वेसाध्या: सन्ति देवा:|| ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे| स मे कामान कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु|| कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नम:|| ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पार्मेष्ठ्यं| राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या सीस्यात सार्वभोम: सार्वायुषेआन्ताधापरार्धात|| पृथिव्यै समुद्रपर्यतांया एकराळिति तदप्येष:श्लोकोभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन गृहे आविर्क्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
|
Arch
| |
| Thursday, August 31, 2006 - 9:01 pm: |
|
|
आपल्याकडे गौरी गणपतीनंतर येतात आणि मग गौरी गणपतीच विसर्जन बरोबर होत काही ठिकाणी. माझ्या south indian मैत्रिणीकडे गौरी गणपतीबरोबर येतात. तिच म्हणण गौरी ही गणपतीची आई मग ती गणपती नंतर कशी येते? मी तिला म्हटल ह्या गौरी माहेरवाशिणी असतात गणपतीकडे आलेल्या. पण मला नीट सांगता आल नाही. कोणी सांगेल का? माझ्या माहेरी त्यांना महालक्ष्मी म्हणतात. गौरी नाही
|
आर्च रिद्धी सिद्धी गणपतीच्या बहिणी आहेत ना? त्याच असतात बहूतेक त्या CBDG आणि आमच्याकडे खड्यांच्या गौरी असतात. त्या कशामुळे ते नाही माहित मला
|
Mita
| |
| Friday, September 01, 2006 - 1:30 am: |
|
|
रिद्धि,सिद्धि गणपतीच्या पत्नी आहेत....
|
मग महालक्ष्म्या कोण? .... ... ...
|
|
|