खाता खाता या जन्मावर शतदा प्रेम करावे खाण्यासाठी जन्म आपुला याचे ध्यान करावे कधी खावे पोहे खिचडी कधी समोसा वडापाव कधी देशाबाहेरील मेनु चढलाय त्यांना भलताच भाव लागले कधी पोटात दुखु तरी सोडु नये खाण्याची साथ डॉक्टरचे मोठे बिल भरूनी द्यावा त्याच्या खाण्याला हात मी ही खावे तू ही खावे ज्याने त्याने खात रहावे खाद्यजीवनाच्या या रंगी खाद्यप्रेमींनी रंगुन जावे
|
Aaftaab
| |
| Tuesday, August 29, 2006 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खाद्यप्रेमीनी रंगुन जावं असं हाय माझं हाटेल येकडाव याल, तर च्यालेन्ज देतोय, पुन्हा पुन्हा यावंच वाटेल भेळ मिसळीचा तिखट झटका जिलेबीची गोड वेटोळी वडापाव, भज्जी चोविस तास अन सणाला पुरणाची पोळी अळूची भाजी तर पेशल हाय, अन भातावर झणझणीत रस्सा अजून मठठा न पापड यायचं हाय उठू नका राव बस्सा असा सगळा घरगुती मामला अन येकदम माफक रेट आयला जेवन्यासाटी तर जीवन हाय मग खावा की राव भरपेट
|
मग खावा की राव भरपेट थेट परब्रम्हाशी भेट आता कशाला उद्याची बात जगा वर्तमानात थेट भूतकाळची भूते भयंकर समर्थ आहे भोळा शंकर गतजन्माच्या बर्थडेची तुम्ही विसरा की हो डेट जगा वर्तमानात थेट पटकथेचे कामच त्याचे चित्रगुप्त म्हणे भविष्य रचे उगाच त्याच्या भविष्याचा विचारु नका हो रेट जगा वर्तमानात थेट जीवन म्हणजे अवीट गाणे सप्तसुरांचे मधुर तराणे गुणगुणता दिसे 'आज' सर्वत्र आनंदाचे गेट जगा वर्तमानात थेट
|
जगा वर्तमानात थेट असे म्हणणे नको साथ स्वप्नांची लाभो प्रत्येक वेळेस स्वप्न बघू नका असे सांगत कोणी नाही त्यात मारु कितीही भरारी कोणी अडवित नाही वर्तमानात न मिळे ते स्वप्नात मिळते या स्वप्नांच्या जोरावर भविष्य उद्याचे घडते गतकाळ येतो कामी त्यातून मिळते शिकवण कुठे उठायचे कुठे नमायचे सांगतो गतकाळ म्हणूनच लक्षात ठेवून गतकाळ घेवून भविष्याची शिरोदी जोडीला स्वप्नांची भरारी मग जगा वर्तमानात थेट. विद्या
|
मग जगा वर्तमानात थेट? अहो पाहीलात का कांद्याचा चा रेट? १० रुपयायचा कांदा चाळीस ला मिळतो बाकी काही परवडत नाही म्हणुन मी आवंढाच गिळतो जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी कशी करावी आम्ही शेतकर्यांनी तोडांशी हात मिळवनी सरकारी पाव्हणा वरुन करल पाहानी कोणाला सुनवायची आम्ही आमची कहानी? काय करायचे हे सरकारी कामकाज्य येऊ द्या आतातरी बळीचे राज्य माह्या सारख्या बळीला वामणाने मारल अवतार म्हनुन त्याला तुम्ही सुध्दा पुजल काय कराव कळत नाही बळीच राज्य काही पुन्यांदा येत नाही आता फक्त एकच उपाय मरणा शिवाय नाही तरणोपाय मरणा शिवाय नाही तरणोपाय.
|
Chandya
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मरणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून किटकनाशकाची बाटली आणली शिंची त्यात सुद्धा भेसळ निघाली साली हॉनेस्टीची दुनियाच नाय राहिली आमची हि म्हणाली त्या पेक्षा, कोकची बाटली तरी प्यायची म्हटले मग मरण गेले उडत यायचे तेंव्हा येईल ते कशाला बसावे कुढत त्यापेक्षा एकसोएक छापत राहू कविता अन् तोंडामध्ये रंगवू बनारसी मघई विडा शब्दांची अन् रंगांची उडू दे अशी पिचकारी चला खेळू या कल्पनेच्या आविष्काराची होळी...
|
Hems
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मरणाशिवाय नाही तरणोपाय मग काय, बनावे गोगलगाय? गोगलगाय नि पोटात पाय असला कसला हा उपाय त्यापेक्षा सरळ उठावे आपले गाणे गात सुटावे डरत नाही आम्ही म्हणावे आभाळी पाहावे हिरवे रावे श्वासावरती होऊनि स्वार संदेहांवर करुनि वार स्वप्ने पाहावी अचाट अपार अन वारू न्यावा अटकेपार
|
सही. .. .. .. वारु नेलाही मी अटकेपार भिमथडी च्या तट्टांना पाजु घातले यमुनेचे पाणी, काय माहीत मला कोठे नेईल ही जिंदगानी वार्याचा वेगावर झालो मी स्वार पण हाय घरच्याच आनंदीने केले पाय उतार अन वरुन म्हणते मी भोळ्या सांबाचा अवतार परत जन्म घेईन म्हणतो नव्याने उभा राहीन म्हणतो राम राज्य आणीन म्हणतो मराठी पुढे नेईन म्हणतो
|
Ashwini
| |
| Wednesday, August 30, 2006 - 12:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मराठी पुढे नेईन म्हणतो आणि पुढे जायलाच भितो असा कसा मराठी माणूस डबक्यातच उड्या मारतो बल्ले बल्ले करत पंजाबी येतो भांगड्याने हृदय जिंकून जातो केम छे करत गुजरातीसुद्धा रडीचा डाव हसत जिंकतो बंगालीबाबू सुरेल काव्याने हृदयाला संमोहीत करतो अन् मद्रासी समुद्रापार मद्राशाला खेचून नेतो आम्ही मात्र अटकेपारचा झेंडा अजून स्मरत राहातो इतिहासाच्या ओझ्याखाली आणि पुरते दबून जातो आता वेळ आली आहे इतिहासाला निरोप देण्याची नवी स्वप्ने नव्या आशा घेऊन भविष्याला सामोरे जाण्याची
|
Paragkan
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भविष्याला सामोरे जाण्यासाठी गोळा करायला हवी हिम्मत उद्याचे मोजमाप करण्या आधी पडताळायला हवी 'आज'ची किम्मत कळलेत का कधी कुणाला अजब हिशेब या जगण्याचे? काय जमा? अन् खर्च किती? कि आकडेच नुसते गिरवायचे? प्रश्न तसे असंख्य आहेत्; उत्तरांचीही ददात नाही क्षणाक्षणाचे मांडोत कुणी ताळेबंद शेवटी म्हणे 'शिलकीत काही उरत नाही'
|
Devdattag
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शिलकीत काही उरत नाही हाच तर खरा प्रॉब्लेम आहे आमच्यापेक्षा पगारावर देणेकर्यांचाच जास्त क्लेम आहे अहो आमचा सुपुत्र अगदी धोनींचा महेंद्र आहे सोसायटीतली गल्ली त्याच्या सरावाचे केंद्र आहे दहा घरांचे टीव्ही वगळता बाकी सगळे क्षेम आहे तसं आमचं कन्यारत्न ऐश्वर्या पेक्षाही रुपवान आहे आणि आमचं घर आता मेक अप कीट्सचं दुकान आहे गल्लीत कन्येचा आता लॅकमेचे शोरूम म्हणून फेम आहे तशा आमच्या हिच्या मागण्या काही अनेक नाही तिच्याकडे नाही असं साडिचं एकही मेक नाही दुकानातल्या प्रत्येक गोष्टींवर तिचे फ़ार फार प्रेम आहे अशी आमच्या कुटुंबाची फळं अतिशय गोड आहेत फक्त चवळीच्या बीजाला इथे वालाचे मोड आहेत आता मात्र या झाडांच अगदी वाकलेल स्टेम आहे कारण आमच्यापेक्षा पगारावर देणेकर्यांचाच जास्त क्लेम आहे
|
वा वा... फारच सही सुरू आहे! येऊ द्या आता पुढची कविता 'कारण आमच्यापेक्षा पगारावर देणेकर्यांचाच जास्त क्लेम आहे' या ओळीपासून सुरू होणारी...
|
Sati
| |
| Wednesday, August 30, 2006 - 11:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कारण आमच्यापेक्षा पगारावर देणेकर्यांचाच जास्त क्लेम आहे जमा थोडी खर्च अधिक मजेमजेचा गेम आहे!! गोडबोली बंकबाला हासत येते दारी हळूच गळा टाकून जाते क्रेडिटकार्डाची दोरी उठता बसता, खाता पिता शाॅपिंगचा नेम आहे||१|| होम फायनान्सचा कधी फोन कोणी देतोय पर्सनल लोन वेल फर्निश्ड टेरेस फ्लट माझासुद्धा एम आहे २||
|
वेल फर्निश्ड टेरेस फ्लट माझा सुद्दा ऐम आहे अर्धा पगार लोनच्या हफ्त्यात फेडायचा रेग्युलर नेम आहे लहानपणी आईला म्हणले, खोर्याने पैसे आणीन काय माहीत मला, लोन कंपनीच माझे खोरे नेईन स्टेटस च्या ह्या गप्पा नकोतच मला काय करायचय ते फर्नीचर, नी तो बंगला बास पुरे झाले आता असे राहाने भविष्याची सोय बघत वर्तमाणात कुढने
|
Ashwini
| |
| Wednesday, August 30, 2006 - 3:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भविष्याची सोय बघत वर्तमानात कुढणे आणि किड्यामुंग्यांसारखे मरत मरत जगणे आता नको असे हे जीवन लाजिरवाणे कुणीतरी यावे अन् बदलावे हे जिणे पारतंत्र्य कधीच संपले पण मने अजून जोखडातच सशक्त अन् सुबुद्ध समाज दूर अजुनी आहे स्वप्नी युगायुगात जन्म घेण्याचे वचन दिले होतेस ना अजून धर्माला यावयाची किती बाकी आहे ग्लानी? सांग कृष्णा अजून किती दिवस तू पाहाणार आहेस या अन्यायाला बाजूला ठेव तुझं द्रष्टेपण अन् आता उद्धार ह्या भारतधर्माला
|
Aaftaab
| |
| Thursday, August 31, 2006 - 8:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
उद्धार अता ह्या भारतधर्नाला, तम दाटुन आला|| माणुसकीचे निशाण मिटले जीव घ्यायला सगळे उठले शत्रू सारे भवती जमले, कसे कळावे कोण दुजा अन कुठला तो अपुला? तम दाटुन आला|| येति संकटे चहूदिशांनी घात माजला देशद्रोहिनी रक्त रंजली भारतजननी पूर, आक्रमण, स्फोट न संपे विघ्नांची माला. तम दाटुन आला|| राजकारणी भ्रष्टाचारी लुटती जनतेचीच तिजोरी पामर जगती बिना शिदोरी सोडवि यातून, तूच अनंता तारक आम्हाला तम दाटुन आला|| पुढची 'तम दाटुन आला' इथून सुरू करा..
|
माझी एक शंका आहे. इथे एकाच्याच अनेक कविता आल्या तरी चालणार आहे काय? संयोजक या शंकेचे निरसन करतील काय?
|
Devdattag
| |
| Thursday, August 31, 2006 - 9:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे केवळ STY आहे म्हणून ही कविता काल आमच्या मित्राचा तम सकाळीच दाटून आला नेहमीप्रमाणे तो आपली पोस्ट V & C वर टाकून आला हल्ली खरंतर त्याच असं वागणं अगदी नित्यनेमाचे झालं होतं सगळे म्हणतात तसं त्याचं डोकं कधीच कामातून गेलं होतं कधी दिसे त्याला हिरवा रंग तर कधी लाल तलवार कधी भगवा निळ्याचा संग कधी कृष्ण सरकार मजा बघण्या दूर बसोनी कधी कुणाचे पाय खेचणे शिवराळ जरा भाषा करूनी कधी कुणाला पीन टोचणे कधी कुठला बुरखा घेऊनी छाप्याचे मग काटा होउनी स्व:ताचाच चढवितसे भाव ह्याचे 'डुप्लिकेट आयडी' ऐसे नाव
|
मनिषा हे STY आहे. स्पर्धा नाही त्यामुळे तु कितीही कविता टाकु शकतेस. आफ़ताब सही.
|
हे मला डुप्लिकेट आय डी च नाही कळल खरच
|