Svsameer
| |
| Tuesday, August 29, 2006 - 11:34 pm: |
|
|
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया गणपती बाप्पा मोरया
|
दिनेश, अजुन एक कारण मानतात! खाल्ल्या मीठाला जागणे हा प्रकार माहीत असेलच, तर देवाला मीठ वाढले तर एक प्रकारे त्याला खाल्ल्या मीठाला जाग असे सान्गितल्या गेल्यागत होते, तसे होऊ नये, तसे सान्गितले जाणे म्हणजे चूक हे या भावनेने देवाला मीठ वाढत नाहीत! नैवेद्याला ज्यात्या घराण्याच्या रितीप्रमाणे ठराविक पदार्थ आवश्यक मानले जातात, तर गणपती घरी पाहुणा आलेला असल्याने केलेल्या सर्व जेवणाचा नैवेद्य दाखविला जातो! विशेष पदार्थ जसा की सत्यनारायणाच्या पुजेत शिरा, वगैरे पदार्थ पुजेच्या वेळेस नैवेद्य म्हणुन दाखविले जातातच पण भोजनाचाही नैवेद्य दाखविला जातो, ज्यात पन्चायतनासहीत सर्व इष्ट देव, स्थान देवता वास्तु देवता यान्ना एक, गोग्रास म्हणुन एक आणि पितरान्चा म्हणुन एक असे किमान तीन स्वतन्त्र नैवेद्य दाखविले जातात, यात सोई प्रमाणे स्वतन्त्र पाने केली जाऊ शकतात, पण गोग्रास आणि पितरान्चा स्वतन्त्र पणेच हवेत! बाकी भक्तास जसे वाटेल तसे! चु. भु. द्या. भ्या. गणपती बाप्पा मोरया मन्गल मूर्ति मोरया!
|
| ... | >>>>मोरयाचा अर्थ सांगणार का?
आर्च.. माझ्या माहिती प्रमाणे संत मोरया गोसावी नावाचे श्री गणेशाचे निस्सीम भक्त होते.. त्यांच्या नावावरुन हा शब्द प्रचलीत झाला.. मोरया गोसावींना मोरगावात १४ व्या शतकात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती मिळाली.. त्यांनी मोरगाव मंदीर बांधुन त्यात तिची स्थापना केली.. त्यांनी १६५१ साली जिवंत समाधी घेतली असेही म्हणतात.. दुसरा एखादा अर्थ असल्यास माहिती करुन घ्यायला आवडेल.. बाप्पा मोरया! |
|
Lajo
| |
| Wednesday, August 30, 2006 - 7:05 am: |
|
|
गणपती बप्पा मोरया. शिवतनय वरीश्ठम सर्व कल्याण मूर्तिम परषुकमल हस्ते शोभितम मोदकेन अरुण कुसूम मालम व्यालबध्धो धरम्च मम र्हुदय निवासम श्री गणेशम नमामि
|
संयोजक.. मी 'आपण यांना पाहिलंत का' स्पर्धेसाठी 'संयोजक' या ID ला मेसेज पाठवायला ट्राय केल्यावर मला खालील मेसेज येतो.. 'You have sent 2 consecutive message(s) to this user without receiving a reply. You cannot send another message to this user until you receive a reply.' आता मी काय करु???
|
Gandhar
| |
| Wednesday, August 30, 2006 - 11:44 am: |
|
|
|
अभी (गंधार??) सही.. तू हे चित्र 'गणेश चित्र स्पर्धा ' मध्ये का देत नाहीस..
|
Maitreyee
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:12 pm: |
|
|
दीप तू आधी २ मेसेजेस पाठवले आहेस का संयोजकाना?
|
Lalu
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:16 pm: |
|
|
गणपतीबाप्पा मोरया! बाप्पाला उपाशी ठेवताय, हे काही बरोबर नाही. आजचा प्रसाद.
|
Asami
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:43 pm: |
|
|
ओम गं गणपतये नम ||
|
Seema_
| |
| Wednesday, August 30, 2006 - 3:59 pm: |
|
|
गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम | जेष्ठराजं ब्रम्हणां ब्रह्मणस्पत आ न : शृण्वन्नूतिभि: सीद सादनम ||
|
Megha16
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:07 pm: |
|
|
अरे वा लाडु जिलेबी अरे वा या बीबी मस्त बहार चालु आहे खाद्य पदार्थ ची.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:41 pm: |
|
|
खर्या अर्थाने मोदक हे पक्वान्न नाही. देवाला ज्या पदार्थांचा नैवैद्य दाखवायचा त्यात पाणी वापरलेले नसले तर ते पक्वान्न. सत्यनारायणाचा प्रसाद, दुधात बेसन भिजवुन केलेले मोतीचुराचे लाडु, दुधात पाक करुन केलेले रव्याचे लाडु वैगरे पक्वान्न.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 30, 2006 - 5:08 pm: |
|
|
हि घ्या बाप्पाला माटोळी. माटोळी म्हणजे काय ते अनिलभाई आणि ललिता, सांगतील.
|
Anilbhai
| |
| Wednesday, August 30, 2006 - 5:21 pm: |
|
|
हि माटोळी गंपतीबाप्पाच्या वरती असते बर का. लाकड्याच्या फ़्रेम ला हि अशी सगळी फ़ळे बांधुन ठेवतात. ही फ़ळे फ़ार काळजीपुर्वक घट्ट बांधावी लागतात.
|
देवाला ज्या पदार्थांचा नैवैद्य दाखवायचा त्यात पाणी वापरलेले नसले तर ते पक्वान्न. <<<उकडीचा नाही पण तळलेला मोदक होईल कि मग पक्वान्न ! त्याच्या coating ची कणीक तर दुधात भिजवतात !
|
Arch
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:11 am: |
|
|
दुधात पाणी असत की
|
Bee
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:09 am: |
|
|
आर्चा, दुधात नंतर विकताना पाणी घालताना. धारोष्ण दुध पातळ असते म्हणून त्यात पाणी असते असे नाही. त्याला दुधच म्हणत्यात :-) सीमा, घरी केली का ही जिलबी. काय सुंदर रंग, आकार आला आहे. खंग्री अगदी! केसरच आहे ना ते वर दिसते आहे.. सहीच ग सीमे वाटल नव्हते तू... दिनेश, मस्तच आहे हा फ़ळांचा प्रकार. अनिलभाई धन्यवाद.. गणपती बाप्पाला दंडवत प्रणाम.. !
|
Kandapohe
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:10 am: |
|
|
मनोभावे अर्पण केलेला कुठलाही पदार्थ खरे तर नैवैद्य होउ शकतो असे माझे मत आहे. गणपती बाप्पा मोरया!!
|
Lajo
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:02 am: |
|
|
ओम गंगणपतेय नम:
|