Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 28, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » STY » पद्य STY: कल्पना एक आविष्कार अनेक » Archive through August 28, 2006 « Previous Next »

Sanyojak
Sunday, August 27, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कल्पना एक आविष्कार अनेक
आपल्यामध्ये खूप सारे कवी आहेत (आयला इथे पण!) खूप जणांना खूप सार्‍या कविता सुचतात (नको... नको...!) आणि बर्‍याच जणांना बर्‍यापैकी कवितेचं अंग आहे (कुठाय,कुठाय... बघू बघू!!) तर अशा समस्त कविजनांसाठी श्री गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ विशेष योजना जाहीर करत आहोत(योजना... वा
वा... काय सवलत बिवलत मिळणार काय!)

योजनेचं नाव आहे 'कल्पना एक आविष्कार अनेक'(दिदी दिदी आविष्कार को अनेक भी कहते है?) शुऽऽऽ चावाटपणा न करता योजना नीट ऐका... तर योजनेचं नाव आहे 'एक
कल्पना अनेक अविष्कार'
(आयला येवढे आविष्कार, कसं काय होनार या कवितेचं!) शुऽऽऽ अजिबात डांबरटपणा न करता नीट ऐका योजना...

तर सालाबाद प्रमाणे यंदाही श्री गणरायाच्या आगमनाप्रित्यर्थ साजर्‍या होत असलेल्या हितगुज गणेशोत्सवात पद्य STY गुंफला जाणार आहे. या पद्य STY चं नाव आहे
'कल्पना एक आविष्कार अनेक'
म्हणजे इथे एक कल्पना दिली जाणार त्याचे आविष्कार अनेक जणांनी अनेक पध्दतीने करायचे... (म्हणजे नक्की काय रे भाऊ?)

या योजनेमध्ये, सुरुवातील इथे एक कविता दिली जाईल, आपण त्या कवितेची शेवटची ओळ घेऊन स्वतची पुढची कविता रचावी... आणि मग या नवीन कवितेची
शेवटची ओळ घेऊन अजून कोणी पुढची कविता रचावी... यंदाच्या पद्य STY
मधे कुठलीही कथा रचायची नाहीये, नियम फक्त एकच आहे, की आधीच्या कवितेतल्या शेवटच्या ओळीतले सर्व शब्द नव्या कवितेतल्या पहिल्या ओळीत आले पाहिजेत.... (सर्व शब्द म्हणजे सर्व शब्द, कर्ते, कर्मं, क्रियापद.म, विशेषणं, सर्वनामं इ इ. अर्थात या शब्दांचा क्रम नव्या कवितेत जुन्यासारखाच राहिला पाहिजे असं नाही. शिवाय जुन्या ओळीतले सर्व शब्द घेऊन त्या शिवाय अधिक शब्द
नव्या ओळीत घेतले तरी चालतील, तसेच विभक्ती आणी प्रत्यत बदलण्यास प्रत्यवाय नसावा )

अर्थातच नेहमीप्रमाणेच, कवितेचा कोणताही प्रकार वापरला तरी चालेल (छंदबध्द, मुक्तछंद, गझल, चारोळी, ओवी, पोवाडा इ इ कोणताही काव्यप्रकार)... अर्थातच आपण जे पोस्ट करू ती आपली स्वतची रचना असणं बंधनकारक आहे.

आणि हां... कल्पना एक - आविष्कार अनेक साठी देण्यात आलेली कल्पना आहे:
'जीवन'

(म्हणजे आपले आविष्कार्: जीवन म्हणजे काय, कोणी जगायचं, कुठे जगायचं, का जगायचं, कसं जगायचं, कसे जगतो आहोत, इ इ काहीही जीवनाशी संबंधित असणं अपेक्षित आहे)

शेवटी सगळ्यात महत्वाचं, या योजने अंतर्गत या STY मधे भाग घेणार्‍या सर्व कवी मंडळींना मंडळातर्फे एक शाल आणि
श्रीफळ ईमेलद्वारे घरपोच पाठवण्यात येईल!

ही घ्या पहिली कविता आणि लागा कामाला!

पहिली कविता:

अताशा आम्ही असेच जगतो
दगड बनून...

एखादी पावसाची सर येते
अन जातेही थोडंसं भिजवून
अन एखादी कभिन्न रात्र कधी
जातेही आम्हाला थिजवून
पण
तरीही आम्ही असेच जगतो
दगड बनून

(पुढच्या कवितेच्या पहिल्या ओळीत 'दगड बनून' हे दोन शब्द असायलाच हवेत, याहून जास्त शब्द असले तरी चालतील आणि यांचा क्रम बदलला तरी चालेल!

उदा. पुढच्या कवितेची पहिली ओळ्:

'बनून दगड जगायचंच कशाला'
किंवा 'फुलत होते दगड तेंव्हा फुलं बनून' अशी काहीही होऊ शकते!....

होऊन जाऊद्या!
)


Rhasva_bee
Sunday, August 27, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दगड बनून, खडक चिणून
जगतो आम्ही मधून मधून

सभोवतीच्या अन्यायाला
दुर्लक्षित हो पूर्ण करून
रक्त ओघळे प्रिय आईचे
अम्हास त्याचे काय म्हणून

वैर्‍याचीच हि रात्र अजूनी
दिवसहि होतो अंध वरून
षंढांना परी आठव येतो
गत जन्मीचे बंध स्मरून

शरीर जळते, जळुद्या त्याला
ठेवायाचे काय ऊरून
असे तुम्हा जर हाव तयाची
विकून टाका भाव करून

दगड बनून, खडक चिणून
जगतो आम्ही मधून मधून


Prasad_shir
Monday, August 28, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा र्‍हस्व बी...

STY च्या कल्पनेची perfect नस पकडली आहे तुझ्या कवितेतून...

आता पुढची कविता 'जगतो आम्ही मधून मधून' हे शब्द पहिल्या ओळीत असलेली हवी... करा रे कोणीतरी continue ..


Prasad_shir
Monday, August 28, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods

संयोजकांच्या पहिल्या पोस्ट मधले लाईनब्रेक्स जरा गंडले आहेत. शक्य झाल्यास ते जरा सुधारू शकाल का म्हणजे पोस्ट वाचनीय होईल?


Deepstambh
Monday, August 28, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुन मधुन जगतो आम्ही
रोज रोज मरतो आम्ही
रात्रीचा दिवस.. दिवसाची रात्र
रात्रंदिवस करतो आम्ही

वाहत्या जखमेला कपाळाच्या
मलमपट्टीत लपवतो आम्ही
अमर होण्याचा जल्लोष बहाणा
आजन्म करत.. राहतो आम्ही

पाण्यासाठी डोळे.. डोळ्यात पाणी
तरंगणारे देह पाहतो आम्ही
पोटासाठी पाण्यासाठी.. पोटच्या लेकरासाठी
युद्धभुमीवर धावत.. राहतो आम्ही..

तसे मधुन मधुन जगतो आम्ही
रोज रोज मरतो आम्ही
काळोखात चाचपडत.. दूर क्षितीजावर
बुडालेल्या भास्करा.. शोधतो आम्ही..


Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगतो आम्ही मधुन मधुन
जमेल तसं
कधी असं
कधी तसं
कधी प्रचंड पाउस
मोठ्ठा महापुर
त्यातही हातात हात घेउन
परस्परांना सावरत
शोधतोच की जगण्याचे नवे सुर||
कधी धडाम धाम
एकच वेळी अनेक भीषण स्फोट
मानसिक धक्का वगैरे
पण पुन्हा उठुन उद्या
येतोच की कामाला
बांधतोच की मनं परस्परांची
घट्ट फ्रेंडशिप बैडने कायमची.
असु दे मग मनात कितिही धग||
आरतीच काय
महाआरतीही करतो
दिवाळीची मोजही लुटतो
ईद मुबारक म्हणत
ख्रिसमसलाही मेरी म्हणतो
जुन्याला निरोप देताना
विषारी दरु पितो- साक्षात मृत्युही जवळ करतो
एकमेकांचे हात हातात घेऊन
मानवी साखळीने सार्‍या वाईटाचा निषेधही करतो
अन
परस्परांना happy new year ही म्हणतो
आणि जगलोच की इतके दिवस
भितो की काय कोणाला
पुढच्या वर्षीही जगुच असे||


मनिषा लिमये





Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाच ओळीवरुन दोघांच्या कविता आल्या आहेत मला टायपाला वेळ लागला. पण मी सुरु केले तेव्हा दीपस्तंभ यांची कविता तिथे नव्हती. आता काय

Manishalimaye
Monday, August 28, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर माझ्या कवितेची सुरुवात अशीही असायला हरकत नाही
बुडालेल्या भास्करा शोधतो आम्ही
जगतो आम्ही मधुन मधुन
aani puDhe

Prasad_shir
Monday, August 28, 2006 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टायपायला झालेल्या विलंबामुळे असं थोडंफार व्हायची शक्यता आहेत...

तर आता मनिषाच्या कवितेच्या शेवटच्या ओळीवरून (पुढच्या वर्षीही जगूच असे!) पुढची कविता येऊ दे!



Vidyasawant
Monday, August 28, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोधतो बुडालेल्या भास्करा आम्हीही तुला
कितीही दिसलास तरी..
तु पुर्वीचा भासत नाहीस
तुझ किरण ते सोनेरी लख्ख..
तुझ्यामधुन दिसणार ते
पावसानंतरच इंद्रधनुष्य
तुझ निरागसपणे येण
मध्य होताच चटका देण
आणि जाताना पुन्हा ते निरागसपणे जाण
विसरायला लागलो आहोत आम्ही ते सार
खरतर चुक मुळीच तुझी नाही
आम्हीच बांधल्या त्या उत्तुंग इमारती
तुझ दर्शनही आता
लपाछपीचा खेळ झालाय..

आता धडपड चालली आहे तुझ्या किरणासाठी
म्हणुनच बनवतो आता फ़्रेंच खिडकी
करतो असाही प्रयत्न
सुर्योदय, सुर्यास्त पहायला
करतो मग समुद्राची सफ़र
तुला बुडताना बघायला आवडत आम्हाला

..पण मग आम्हीच केलेल्या गर्दीत
शोधतो बुडालेल्या भास्कराला.

विद्या



Vidyasawant
Monday, August 28, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे आता?
अगोदरची वाचायला आणि त्यावरुन करायला वेळ लागला.
मी दोघांची पण वाचली पण दीपस्तंभ ची अगोदर होती म्हणुन त्यावरुन केली.
आता तुम्हीच सांगा काय ते


Devdattag
Monday, August 28, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या वर्षीही जगू असेच
कधी शोधत बुडालेल्या भास्कराला
तर कधी पाठ फिरवत उजाडलेल्या रात्रीकडे

कधी जगू पहात अर्घ्य देणार्‍या प्रत्येक दु:खिताकडे
मग येतिल काही दिवस भिजवणारे
त्या अर्घ्याने आलेल्या भरतिने
मग जगू ओंजळीत साठवत ते थेंब


खरंतर वाटतं
लावावा शोध आपल्याच भास्कराचा
आपणच द्यावं त्याला अर्घ्य
नियंत्रीत करावं भरतिला

पण मन मात्र धजावत नाही
वाटते भिती तरीही
अडकलो त्या भरतीच्या गर्तेत तर
नसतो विश्वास आपल्या(?) अश्रूंचा

म्हणूनच मग शोधत बुडालेल्या भास्कराला
जगावं लागतं ओंजळीत साठवत भरतीचे थेंब


Aparnas
Monday, August 28, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक्स, मी इथे पुढची कविता टाकते आहे

Sanyojak
Monday, August 28, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी छान चालले आहे. प्रत्येक जण रुमाल टाकून आपली जागा बळकट करत आहे पण तसे करताना फार वेळ सुद्धा घालवू नका कारण इतर अनेक जण बाहेर तिष्ठत उभे आहेत. तेव्हा येवूद्या पटापट.

गणपती बाप्पा मोरया!!


Aparnas
Monday, August 28, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओंजळीत भरतीचे थेंब साठवत जगावं लागतंच की!
मग असं निराश नाही व्हायचं,
प्रत्येक थेंबात शोधायचा एक सूर्य
आणि सूर्यफुलासारखं प्रसन्न हसायचं

मावळत्या भास्करालाही
त्या थेंबांचंच अर्घ्य द्यायचं
आणि उगवणार्‍या चंद्रासंगे
निशिगंध होऊन जायचं

टिपूर चांदण्या रात्रीला
आपल्या गंधाने सजवायचं
आणि उगवणार्‍या सूर्याला
दंव होऊन भिजवायचं

चढत जाणार्‍या सूर्यासंगे
आता आकाश होऊन उजळायचं
आधीच आली मृत्युची झुळूक,
तर मातीत मिसळून जायचं!



Prasad_shir
Monday, August 28, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या, देवदत्त, अपर्णा.... छानच आहेत कविता...

मंडळी... येऊ द्या आता पुढे!


Zelam
Monday, August 28, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मातीत मिसळूनच तर जायचं
हे आठवतच का जगायचं

कधीच का नाही आम्ही
आकाशाकडे बघायचं

दुसर्‍या मुखी घास देऊन
आम्ही मात्र गलितगात्र

उभा जन्म मातीत काढून
का आळवावे मृत्यूस्तोत्र

आता मात्र घेणार आहोत
ऊंच ऊंच भरारी

पाखरांशी स्पर्धा करत
करू इंद्रधनुष्यावर स्वारी


Paragkan
Monday, August 28, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idea chhaan aahe re prasad! Good going.

Maitreyee
Monday, August 28, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! मस्त चाललेय इकडे :-)

Kedarjoshi
Monday, August 28, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वारी करायची इंद्र धनुष्यावर
म्हणुन घेतली मी झेप
विमान परवडत नाही म्हनुन
उचलली स्कुटी पेप

खड्यांतुन गाडी हाकताना
मोडल माझ कंबरड
जे " यम " रोड वर " सुभद्रा " दिसताच
खाउन घेतल धिरड

अचानक एक आक्रीत घडल
उडप्याच्या दुकानात मराठी गान वाजल
गाण ऐकत म्हणल अजुन एक धिरडे खावे
खाता खाता या जन्मावर शतदा प्रेम करावे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators