|
Dineshvs
| |
| Tuesday, May 09, 2006 - 3:58 pm: |
|
|
नलुताई, मी तिकडे गेलो होतो तेंव्हा तिथे जायला हवे होते, असो पुढच्यावेळी नक्की.
|
Nalini
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:25 pm: |
|
|
दिनेशदादा, तुला पुढच्या वेळी जरा निवांत यावे लागेल म्हणजे सगळीकडे मनसोक्त फिरता येईल.
|
आमचा य प्रकल्पातला खारीचा वाटा आहे तरीही अभिनंदना बद्दल मन :पुर्वक आभार.
|
Storvi
| |
| Friday, May 12, 2006 - 7:32 pm: |
|
|
अभिनंन्दन! फ़ारच चांगलं काम करताहात
|
नलिनी... फ़ारच चांगले काम केलस... शाळा.उभारणे हेच मुख्य काम आहे आज!!! बर्याच गावात लोकं मंदीर उभारतात... पण मला तर... आपल्या गावासाठी सगळ्यात मोठे काम म्हनजे शाळा उभारणे.. हेच वाटते...!!! एक भारतीय नागरीक म्हणुन मला तुझा अभिमान वाटतो, तसेच एक नागरीक म्हणुन तुझे आभारही मानावेसे वाटतात, so thanks !!!
|
Shravan
| |
| Friday, June 02, 2006 - 8:09 pm: |
|
|
नलिनी, तुमचे कामाबद्दल अभिनंदन. शाळेबद्दल भविष्यात येणार्या काही अडचणींबद्दल आमच्या गावाकडच्या शाळेच्या अनुभवावरुन सांगू इच्छीतो. मी इथे जे बोलणार आहे ते काही लोकांना अप्रस्तुत वाटू शकते पण भविष्यातील शाळेच्या द्रुष्टीने ते हिताचेच आहे हे मी आत्ता या क्षणी ठामपणे सांगतो. ही जी शाळेची इमारत लोकसहभागाने उभी राहात आहे तीची नोंदणी करताना ती ग्रामपंचायत च्या नावानेच करुन घ्या. त्या संस्थेच्या नावाने अजिबातही करु नका. हे संस्थाप्रमुख प्रत्येक गावात जमीन, इमारत लोकांकडून बांधून घेतात व स्वत: बळकावतात. सरकारी भाडे त्यांना परस्पर मिळते. तसेच भविष्यात संस्थेची कार्यपद्धती खराब झाली व इमारत आपली नसली तर आपण त्यांना शाळा सोडा असे सांगू शकत नाही; याउलट जर इमारत आपली असेल तर आपण त्यांना आपण शाळा सोडायला सांगू शकतो व आपण हवी ती संस्था बोलावू शकतो किंवा ग्रामपंचायतीचे नियंत्रण ठेऊन शाळा चालवू शकतो. आता कदाचित ती संस्था चांगली असेल मात्र १०-२० वर्षांनंतर ची परिस्थिती वेगळी असू शकते. आमच्या गावामध्ये गेल्या वर्षापासून आमचा शाळेच्या संस्था प्रमुखाशी संघर्ष चालू आहे. त्या माणसाला शाळेच्या शैक्षणीक दर्जा बद्दल काही देणे-घेणे नाही. फक्त पैसे गोळा करणे हाच एकमेव उद्देश. टिपीकल शिक्षणसम्राट. गेले चार वर्ष शाळेचा निकाल ५० टक्के हि लागत नाही. त्या संस्थेतील शिक्षकही त्या माणसाच्या कारभाराला कंटाळले आहेत. शिक्षकांकडूनही हा आडमार्गाने पैसे काढत असतो त्यामुळे शिक्षकांचे हि शाळेकडे नकळत दुर्लक्ष होते. आम्हाला त्या संस्थेकडुन शाळा काढायची आहे मात्र नंतर मुले बसणार कुठे? शाळेची सगळी इमारत गावाने बांधली, जागा गावाची मात्र शाळा संस्थेच्या नावे. आता आमच्या समोरही दुसरा पर्याय नाही. गेली वर्षभर आम्ही त्याच्याकडून होणार्या आर्थिक पिळवणूकीविरुद्ध, फसवणुकीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहोत. पण संघर्ष करणार किती? आम्ही आता शिक्षण क्षेत्रातील च कुणीतरी चांगला जाणकार अधिकारी शोधत आहोत. हे सगळे टाळता आले असते जर शाळेची इमारत आमची (गावची) असती तर. म्हणूनच हा सल्ला मी तुम्हाला देतो. गावच्या लोकांना परिस्थिती समजावुन सांगा. मला तिथली परिस्थिती कशी आहे माहीत नाही पण माझा अनुभव या निमित्ताने मला आवर्जुन सांगावासा वाटला.
|
|
|