|
Maanus
| |
| Tuesday, February 21, 2006 - 6:26 pm: |
| 
|
हे पहा फोटो GTG Gang Close Up Antique Style You can click on button 'All Sizes'; which is just above the photograph to view large photo
|
हे घ्या फोटो
आदित्य, स्वाती, झक्की, वरदा
|
अनि, आरती, स्वाती, अदित्य, अजयकुमार, झक्की, माणूस
|
अनिलभाई, माणूस, अनि, आरती

|
झकी, समीर, वरदा, सन्दीप आणि लाडूचा डबा

|
अनिलभाई, लपलेला माणूस, अनि, आरती जान्हवी, देवेन, लाडूचा डबा

|
वरदा, समीर, सन्दीप, अनि, आरती

|
बाकी फोटो, आणि मोठी size ( फोटोची) लवकरच टाकतो....
|
Zakki
| |
| Tuesday, February 21, 2006 - 7:17 pm: |
| 
|
एक स्पष्टीकरण्: लाडवाचा डबा जरी माझ्यासमोर होता, तरी मी एकहि लाडू खाल्ला नाही. मधुमेह! आणि मी जरी सतत बडबडत होतो, तरी लोक हसत होते, नि लक्ष देऊन ऐकत होते हे लक्षात घ्या!

|
Arch
| |
| Tuesday, February 21, 2006 - 7:26 pm: |
| 
|
आणि मी जरी सतत बडबडत होतो, तरी लोक हसत होते>> झक्कि, लोक तुम्हाला हसत होते. ~D
|
Ninavi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 8:15 pm: |
| 
|
आले.. आले.. लाडवांच्या डब्याचे तीन फोटो आले. थॅंक्स, विनय. 
|
Pendhya
| |
| Tuesday, February 21, 2006 - 8:51 pm: |
| 
|
विनय, सगळे फ़ोटो छान आले आहेत. आणी मुख्य म्हणजे, फ़ोटोच्या खाली नावं असल्याने मंडळींना ओळखायला सोपे गेले. आभार!
|
Ninavi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 9:05 pm: |
| 
|
बरं बरं, हा घ्या वृत्तांत : || श्री ( स. वे. स. ठि. अ. श.) व्यंकटेश प्रसन्न|| रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी न्यू जर्सीस्थित हितगूजकरांचा ए. वे. ए. ठि. अ. श. मा. भे. प्र. ब्रिजवॉटर येथील व्यंकटेशाच्या देवळात संपन्न झाला. सर्वप्रथम कडाक्याची थंडी, येथील काही ( अ-जर्सीकर) लोकांनी येण्या/ न येण्या/ फोन करण्याचा घातलेला धाक, ललितवरील लडिवाळ बोलणी, या सार्याला न जुमानता हा प्र. यशस्वी करणार्या NJ करांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन! आता हायलाईट्स: १. ठरल्या दिवशी, ठरल्या जागी, ठरल्या वेळी येण्याचे ठरलेले सर्वजण उपस्थित होते. २. मी स्वतः कुणालाही काळे की गोरे न पाहिल्यामुळे जरा चिंतेत होते. विनयचा फोटो तेवढा त्यांच्या पुस्तकामागे पाहिला होता. सुदैवाने देवळात मला प्रथम तेच भेटले. स्वतः कॅफेटेरियाच्या दिशेला जात त्यांनी मला ' आल्यासारखं व्यंकटेशाचं दर्शन घेऊन या' अशी प्रेमळ सूचना केली. शिवाय अनिलभाई आणि झक्की आधीच आलेले असून वरती देवळातच आहेत अशीही माहीती दिली. मी माझे बेटर हाफ श्री. अजय आणि हाफ तिकीट लेक आदित्य यांच्याबरोबर तातडीने वर जाऊन सगळे वयस्क चेहरे निरखून आले. पण मला काही त्यातले हितगूजकर ओळखता आले नाहीत. तेव्हा पुन्हा खाली कॅफेटेरियात जाऊन विनयने पकडलेले बाक आम्हीही पकडले. लवकरच सर्व पात्रांची एंट्री झाली. इथे फोटोतील क्रमाने पात्रपरिचय करून द्यावा: सौ. व श्री. जान्हवी ( हा आयडी, नाव माहीत नाही), सौ., श्री., चि., व कु. अनिलभाई, सौ. व श्री. कानिटकर, श्री. संदीप बोडके ( हाच आयडी आणि हेच नावही!), श्री. व सौ. आरती कुळकर्णी ( हाच आयडी आणि हेच नावही!), निनावी ( हा आयडी आणि नाव.. ते तर नाहीच!), अजय आणि आदित्य ( यांची ओळख आधीच झालेली आहे), झक्कीकाका ( हे पमा या आयडीनेही लिहीतात असं कळलं), विनय देसाई ( हाच आयडी आणि हेच नावही!) आणि फोटोत न आलेले श्री. माणूस ( हा आयडी, नाव सागर) यावेळी निनावी यांच्या भ्रमणध्वनीवर ' पमा' नाव सांगणार्या एका व्यक्तीचा ध्वनी आला. झक्कीकाकांचा तो(ही) आयडी नुकताच कळल्यामुळे उपस्थित लोक जरा चपापले. तरीही ' नाहीतरी निनावीचाच फोन आहे.. वीकेंडला फ्री मिनिट्स असतीलच तिला' असं म्हणत सर्वांनी या पमाशीही बोलून घेतले. यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात खाणे आणि गप्पा झाल्या. म्हणजे झक्कीकाकांनी पुणेकरांबद्दल अनुद्गार काढायला सुरूवात केली आणि इतरांनी हसून त्यांना प्रोत्साहन दिले. मागे पुण्याच्या एका GTG ला गार्डन रेस्टॉरंटमधे सर्वांच्या नाश्त्याचे पैसे आपण कसे दिले आणि वृत्तांतात कुण्णीच त्याचा उल्लेख कसा केला नाही अशा काही करूण कथांचाही यात समावेश होता. आरती यांनी शनिवारवाड्यात आणि लाल महालात ( महाराजांबरोबर?) फूलबॅट ( ?) खेळल्याच्या रोमहर्षक आठवणी सांगितल्या. पेशव्यांना येणार्या पत्रांवर पत्ता ' कुळकर्ण्यांच्या वाड्यामागे' असा लिहीत असत अशीही माहिती या वेळी मिळाली. यानंतर निनावी यांनी ( अपने हाथसे) करून आणलेल्या बेसनाच्या लाडवांचा सगळ्यांनी समाचार घेतला.. झक्कीकाका सोडून. ( त्यांना बहुधा मग कौतूकही करावे लागेल अशी भीती वाटली असावी!) असो. ( पण लाडू बाकी मस्तच झाले होते.) कुणीतरी निनावीला ( कविता करण्यापेक्षा) तुम्ही याची रेसिपी का पोस्ट करत नाही.. असंही विचारण्याचं धाडस केलं. ( आणि तिने तातडीने हा प्रश्न अनुल्लेखाने मारला.) यानंतर गार्डन रेस्टॉरंटच्या किश्श्याला बळकटी आणण्यासाठी झक्कीकाकांनी ' चहा/कॉफी माझ्यातर्फे' असं जाहीर केलं. चहा सुंदरच होता. ( त्या अर्थी खरंच पैसे दिले असावेत.) यानंतर कॅफेमधली गर्दी वाढायला लागल्यामुळे वर देवळात जाऊन बसावे असा विचार पुढे आला. पण देवळात त्याहून गर्दी होती. त्यामुळे दुर्दैवाने प्र. आटोपता घ्यावा लागला. बाहेर श्री. माणूस यांनी सर्वांचा एक ग्रूप फोटो तीन वेळा काढला. ( पण त्यांनी निदान पोस्ट केला.. बाकीही कुणी कुणी आत फोटो काढले होते असं आठवतंय, त्यांचं पुढे काय झालं कोण जाणे!) असो. जाता जाता.. यानंतरचा प्र. उन्हाळ्यात विनयच्या घरी करायचे ठरले आहे.
|
निनावी सही लिहिलायस व्रुत्तान्त आत्तापासून आपण पुढच्या ए.वि.ए.ठि. च ठरवायला घेउ म्हणजे कदाचित जास्त टाळकी जमतील
|
Badbadi
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:23 am: |
| 
|
निनावी, हा वृत्तांत सुवर्णाक्षरात लिहून ठेव ग.. NJ GTG झाल याची नोंद सुवर्णाक्षरात च हवी
|
Bee
| |
| Wednesday, February 22, 2006 - 5:36 am: |
| 
|
वरच्या फोटोंमधे अजयकुमर ऐवजी अक्षयकुमार असायला होते का तो फोटो बराचसा अक्षयकुमार सारखाच दिसतो निनावी, वृतांत जमला. झक्की आणि पमा एकच आहे हे माहिती नव्हते. इतके उघड उघड duplicate ID ची नावे सांगितल्याबद्दल आभारी आहे
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 22, 2006 - 5:35 pm: |
| 
|
फोटो बर्याच लोकानी बघितले असावेत..(डब्याच्या फोटोत काय बघतात कोण जाणे?) वृतांताची जबाबदारी वरदावर होती, पण ती हसतच बसलेली दिसते.. वरती पुढच्या एविएठिची तयारी करा म्हणे... लोकहो, Original Photo ची लिंक माझ्या रंगिबेरंगीवर आहे... 
|
Anilbhai
| |
| Wednesday, February 22, 2006 - 6:00 pm: |
| 
|
सुरवातीचा अर्धा तास, वरदा आणि आरती एकमेकाना हाय्/फ़ाय करत बसल्या होत्या. शेवटी कंटाळुन आम्ही त्याना एकमेकापासुन दुर बसवले. 
|
विनय मी नाही आर्ती लिहीणार होती व्रुत्तान्त. तुम्ही जरा नीट आठवा बर.
|
Megha16
| |
| Thursday, February 23, 2006 - 3:42 am: |
| 
|
फोटो खुप छान आले आहेत. नाव दिल्यामुळे सगळे ओळ्खता आले. निनावी लाडू ची रेसीपी लवकर पोस्ट कर.
|
अर्रे व्वा! अनिलभाईन्ना जिरेटोप घातला की शिवजयन्तीच्या चित्ररथाची सोय होइल असे नाही का कुणाला वाटत? सुरवातीचा अर्धा तास, झक्की आणि अनिलभाइ एकमेकाना हाय्/फ़ाय करत बसले होते. शेवटी कंटाळुन आम्ही त्याना एकमेकापासुन दुर बसवले. DDD
|
अन ते झक्की नागपुरी येकदमच हेऽऽ दिसतात! म्हन्जे आपल कस? पुणेरी दिस्तात! मला काय वाटल होत की झक्की नागपुरी म्हन्जे कुणी तरी रौद्र चेहर्याचे, सरदार बिरदार, एकेका बाजुला दोन दोन नागपुरी सन्त्री राहतील येवढ्या मोठ्ठ्या भरघोस झुपकेदार मिशा, दाढी वगैरे वगैरे असेल.... छ्याऽऽऽऽ हे तर अगदीच पुणेरी निघाले हो! DDD
|
Zakki
| |
| Thursday, February 23, 2006 - 4:43 pm: |
| 
|
एव्हढ्या सुंदर सुंदर बायका फोटोत असताना तू म्हातार्या लोकांचे, तेहि पुरुषांचे, फोटो कशाला बघत बसलास लिंबूटिंबू? ' अबे झक्की, भैत्ताड है क्या तुम? ' घे बोललो की नाही अगदी नागपुरी माणसांसारखे. नशीब तुझे मीच बोललो. ती ह. ह. आली असती याहून काय काय वाईट ऐकावे लागले असते!

|
झक्की आता तुम्ही ' आ HH मुझे मार' या म्हणीप्रमाणे वागता आहात... लिम्ब्या, झक्कीना सरदार म्हण एकवेळ पुणेरी म्हणू नकोस... वरदा, तू आणि आरती मिळून लिहा असं म्हणालो होतो मी...
|
|
|