Mahaguru
| |
| Monday, September 18, 2006 - 1:26 pm: |
| 
|
admin, diwali ank vikri idea changali aahe. non-mmaaybolikar use karu shakatil ka? asel tar baaki lokaana pan sangato
|
Admin
| |
| Monday, September 18, 2006 - 2:00 pm: |
| 
|
महागुरू, दिवाळी अंक विक्री सर्वानाच खुली आहे. सवलतीचा दर फक्त रंगीबेरंगीच्या सध्याच्या वर्गणीदारांसाठी आहे.
|
Bee
| |
| Friday, September 22, 2006 - 8:10 am: |
| 
|
Admin,Mod- दिवाळी अंक विक्रिची लिंक पण डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवता येईल का? तसेच लिंक फ़क्त पहिल्या पानावर दिसते, पण एखादा बीबी उघडला तर ती लिंक गायब होते. जर सगळीकडे लिन्क येत असेल तर आणखी बरे होईल असे मला वाटते. दिवाळी अंकाचे वर्गीकरण छान केले तरी जर पाचपैकी एखादा दिवाळी अंक बदलून दुसरा घ्यायचा असेल तर तसे करता येईल का?
|
Giriraj
| |
| Friday, September 22, 2006 - 10:24 am: |
| 
|
बी,त्याच पानावर हे प्रश्न टाक.. किंवा shopping@maayboli.com या पत्त्यावर पृच्छा कर!
|
मा. ऍडमिन, मी दिवाळी अंक ऑर्डर करायचा प्रयत्न करत होते, पण transaction पूर्ण होऊ शकलं नाही. मला ही error दाखवतोय : We cannot process this transaction because there is a problem with the PayPal email address supplied by the seller. Please contact the seller to resolve the problem. If this payment is for an eBay listing, you can contact the seller via the "Ask Seller a Question" link on the listing page. When you have the correct email address, payment can be made at www.paypal.com.
|
Admin
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:26 pm: |
| 
|
मी आताच परत पाहिले email ला काही प्रॉब्लेम नाही. आता पर्यंत बर्याच जणांनी अंक खरेदी केले पण हा प्रश्न कुणाला आल्याचे ऐकिवात नाही. मी paypal च्या लोकांशी बोलतो आहे आणि काय ते तुम्हाला कळवतो. तुम्ही मायबोलीवर नोंदणी केलेला email वापरला असे मी गृहीत धरतो आहे तसे नसेल तर कृपया कळवा.
|
अरेच्च्या, असं झालंय होय! मी गेल्या शनिवारीच माझ्या आयडीचा ईमेल ऍड्रेस बदलला. म्हणून हा conflict झाला असेल का? त्यासाठी काय करावं लागेल? ( पण मला नवीन ऍड्रेसवर activation key आली होती आणि त्यानंतर पोस्टिंग पण केलंय मी. मग असं का व्हावं?)
|
Admin
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:51 pm: |
| 
|
मी आताच paypal च्या लोकांशी बोललो. त्यांनी आणि मी पुन्हा एकदा सर्व विभागात जाऊन सर्व व्यवस्थीत आहे याची चाचणी आणि खात्री करून घेतली. कृपया तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करणार का? तुम्ही कुठलाही valid email वापरु शकता. मी error का येते आहे हे शोधण्यासाठी तुमचा इथला email आणि आमचा ईमेल चाचणी करत होतो. paypal च्या नियमांप्रमाणे तुमचा क्रेडिट कार्ड क्रमांक मला कधीच पहाता येत नाही. पण तुम्हाला काही problem येत असेल तर paypal चे लोक तुमच्या मदतीला 888-221-1161 या क्रमांकावर मदतीसाठी तत्पर आहेत असे त्यांनी मला आवर्जून सांगितले आहे. आपल्याला आलेल्या अडचणीबद्दल दिलगीर आहोत.
|
Admin
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:09 pm: |
| 
|
अंबोले कुटुंबातल्या एका व्यक्तिकडून आताच एक मागणी (२ वेगवेगळ्या संचांची ) व्यवस्थीत पोहोचली आहे. तुमचीच असेल तर मागणी मिळाली आहे आणि सर्व व्यवस्थीत आहे एवढेच कळवायचे होते. मागणी नोंद केल्याबद्दल धन्यवाद आणि सुरुवातीला आलेल्या अडचणीबद्दल पुन्हा एकदा दिलगीर आहोत.
|
Priya
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:16 pm: |
| 
|
मीही काल मागणी नोंदवली होती. बाकी ठिकाणी मागणी मिळाल्याची confirmation e-mail येते तशी या संचांच्या मागणीबद्दल येत नाही का?
|
ते transaction पूर्ण झालं बरं का. धन्यवाद, ऍडमिन. आणि please सारखी दिलगिरी नका हो व्यक्त करू. लाजवताय तुम्ही मला. एक तर त्यात तुमची काहीच चूक नाहीये, आणि तुम्ही ज्या तातडीने त्यावर कारवाई केलीत, तितकी आजवर माझ्या कुठल्याच तक्रारीवर कुणी केलेली मला आठवत नाही. पुन्हा एकदा, आभारी आहे.
|
Lalu
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:30 pm: |
| 
|
प्रिया, e-mail येते. मला आली आहे.
|
Svsameer
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:33 pm: |
| 
|
प्रिया तुझी मागणी (२ संचांची) कालच मिळाली आहे. आणि ते transaction करताना तु जो email दिलेला आहेस त्यावर कालच पोच पाठवली आहे. हितगुजच्या बाहेरुन पण orders येत असल्याने transaction मध्ये दिलेल्या email वरच पोच पाठवत आहोत.
|
Priya
| |
| Tuesday, September 26, 2006 - 4:37 pm: |
| 
|
समीर, लालु - धन्यवाद. परत बघते. कधी कधी spam rules मुळे मेल आपोआप delete होते, तसे झाले असेल कदाचित.
|
माझे ह्याच विषयावरचे पोस्ट मागे डीलीट झाले होते. युरोपात सुद्धा दिवाळी अंक घरपोच मिळतील का, असा माझा प्रश्न होता. धन्यवाद
|
Seema_
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:42 pm: |
| 
|
Admin दिवाळी अंकाबद्दल धन्यवाद. इतकी सुंदर सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल तुमचे मानावेत तेव्हढे आभार कमीच आहेत . माझी एक विनंती होती . अर्थात पुढच्या वर्षीसाठी . आता केलय तस चार चे संच अस न करता सगळे अंक एकत्र ठेवता आले असते का ? वाटल्यास minimum चार अंक घेतलेच पाहिजेत अस compulsion केल तर ? किंवा आता संच केलेत तसेच ठेवुन सुट्टे अंकही विकायला ठेवले तर ? म्हणजे extra आवडेल तो आणखी एखादा अंक घेता आला असता . मी संच घेतला पण मग आणखी दोन वेगवेगळ्या संचातले दोन अंक ही आवडले . म्हणुन just suggestion.
|
Svsameer
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:19 pm: |
| 
|
संपदा दिवाळी अंक जगभरात कुठेही (युरोप मध्ये सुद्धा) घरपोच पाठवले जातील.
|
Shonoo
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:51 pm: |
| 
|
admin खरंच दिवाळी अंक कमीत कमी चार निवडा, आणि मग वरचे हवे तितके किंवा प्रत्येक अंकाची किम्मत कमी जास्त पण कमीतकमी चाळीस डॉलरचे घेतले पाहिजेत असं काही करता येइल का?
|
Svsameer
| |
| Thursday, October 05, 2006 - 7:10 pm: |
| 
|
सीमा आणि शोनु admin नंतर उत्तर देतील. तोपर्यंत मी जे मला माहीत आहे ते लिहीतो. यंदा दिवाळी अंक विक्रीचे पहिलेच वर्ष असल्याने अंकांचे संच केले आहेत. ते logistic च्या द्रुष्टिने आणि वेळ कमी असल्याने करावे लागले. पुढच्या वर्षी अजुन अंक असतील आणी वाचकाना निवड करता येइल कुठले अंक हवे आहेत ते.
|
Admin
| |
| Thursday, October 05, 2006 - 7:50 pm: |
| 
|
सीमा आणि शोनू, तुमच्या सुचना स्वागतार्ह आहेत. आणि समीर ने म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षी नक्की लक्षात ठेवू. हे पहिलेच वर्ष असल्याने आणि एकूण सर्व व्यवस्थापन सोपे जावे यासाठी हे केले आहे. सर्व जगात अंक पाठवायचे असल्याने प्रत्येक व्यक्तिला योग्य अंक गेले पाहीजे ही मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. प्रत्येक अंकाबरोबर वजनही वाढते पण त्याचा टपाल खर्च त्याच प्रमाणात वाढेल असे नाही ( it can jump higher if goes in next slab ). त्यामुळे त्याचे आर्थिक गणितही जमवणे जरुरीचे आहे. या वर्षी त्यात बदल केला तर नवीन गोंधळ होऊ नये म्हणून पुढच्या वर्षी नक्की तुमच्या सुचना अमलांत आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 4:30 am: |
| 
|
ADMIN/Sameer- मलाही सुटे अंक हवे होते आणि वर सीमा जशी म्हणते आहे त्याप्रमाणे किमान चार अंक विकत घ्यावे अशी अट करा परंतू गिर्हाईकांसाठी अंक विकत घेण्याच्या नियमांचे थोडेतरी शिथिलीकरण करा. ह्यावर्षी नाही जमले तर पुढल्या वर्षी तरी जरूर करा. तसेच, जर देशातच जर कुणाला एखाद्या शहरात वा गावात वा खेड्यापाढ्या अंक पाठवायचे असतील तर त्याचीही सोय करा. म्हणजे इथून भेटवस्तूच्या रुपाने अंक पाठविल्या जाऊ शकतात. माझी बहिण खेड्यात राहते. तिला अंक पाठवावेसे वाटते आहे पण सध्या ती सोय तुमच्याकडे नाही. महाराष्ट्रात अंक सगळ्याच ठिकाणी नाही मिळत. मौज वगैरे अंक तर पुण्या मुंबईतच खपतात आणि त्यांची प्रत विदर्भात मिळणे तर दुरापास्तच झाले आहे.
|