|
Mavla
| |
| Tuesday, January 17, 2006 - 5:11 am: |
|
|
नमस्कार दोस्तहो, म्या आन्खिन येक भिडु, नवा हाय पन अनोल्खि नाय, रान्गडा असला तरि कविच हाय............मावळा सलाम नमस्कार आदाब अन मुजरा... मराठीचे येडे पाहिले, की चेहरा व्हतुय हसरा... कुनी पन काही पन, कुठुन पन फ़ेकायच... कविता नाय कळत पन उगाच शब्दान्ना जोखायच? लागला नेम लागला, पन याच BB वर फ़ेकायच... कारण रोजच बदलतो ईथे, पहिला दुसरा नी तिसरा मराठीचे येडे पाहिले, की चेहरा व्हतुय हसरा... सगळेच साले फ़ेकाडे, पन कट्ट्यावर जरा टेकायच कविता कुनाला कळते ईथे? उगाच कही फ़ेकायच वही ईकली पेन ईकला आता कवितेला ईकायच कारण रोजचाच शिम्गा अन येकदाच येतोय दसरा मराठीचे येडे पाहिले, की चेहरा व्हतुय हसरा... सलाम नमस्कार आदाब अन मुजरा... मराठीचे येडे पाहिले, की चेहरा व्हतुय हसरा...
|
halo,everyboby,pahilyanda ch maaybolichi site ughadali aani khjina hati lagala aase vatale, mhanun lagech mazehi nav nodvun takale, sagalyanche reply vachun gamat vatate aani kavita tar superbbbbb....mhanun mhatale aapanhi bhag ghevun pahava pan marathi akshare type kartana gondhal hotoy ex, kamal cha l, d aani itar kahi ,kase lihayache ? your new addition .
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:47 am: |
|
|
वैशाली इथे बघ कसे लिहायचे ते. शक्यतो \dev2 असे लिहून सुरुवात कर, नाहीतर ही खाली देवनागरी लिहिलेली खिडकी आहे ना तिथे click कर. /hitguj/messages/1/41.html?1137400536 .
|
Shyamli
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:52 am: |
|
|
वा वा रांगड्या मावळयाचि शब्द्फेकपण छान आहे त्याने काढलेल्या फोटोंप्रंमाणे अरेच्या खरच ग मुडि मझ्या लक्शातच नाहि आल
|
माज़ी एक कवीता............................. जगने...................... आयुश्याच्या सुटलेल्या कोड्याने हरखुन जावे..जसे पाकळी पाकळीत फुल उमलुन यावे, ..........................दुखाच्या अश्रुनी भिजु द्यावी धरती मिळ्तो ओलावा मग मातीला, त्यातुनच जन्म घेते जगन्याची जिद्द उन पाउस वार्यासन्गे जसे रानफुल मित्र रानचा सुसाट वारा......................वरुन उनपावसचा मारा,.........सोशिते ते फुल डोलत भन्नाट तसे जगावे सन्नाट...................
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:58 am: |
|
|
अरे बाबानो तो फोटोवाला हा mavla नाहिये, तो मलेशियाचा mawla आहे. नगरवाले मावळा कविता झकास आहे! झुळुकेत पण प्रवेश करा.
|
Thank you Moodi, Mawala mast ma....st..nagarkar
|
Mavla
| |
| Tuesday, January 17, 2006 - 1:11 pm: |
|
|
नमस्कार, मी मावळा, नविन सभासद. खरेतर सुरवातीला समजेच ना, के कुठे ही कविता post करु? काहीच्या काही कविता य विभागात? की, विनोदी साहित्य या विभगात? अखेर विनोदी साहित्य या विभगातच नविन thread करुन टाकव असं वाटलं म्हणुन इकडे नविन सभासद असल्याने नियमांशी अनभिज्ञ. औपचारिकता समजुन घ्यावी. चु. भु. द्या. घ्या. पोरी महागात पडतात! खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात! तुम्हाला काय? मला काय? सर्वांना पोरी आवडतात... पोरगी मात्र पटत नाही नुसत्याच गोट्या होतात..... चिकनी म्हणा हेकनी म्हणा सगळ्याच पोरी फ़िरवतात.. जास्त जवळ जावु नका काना खाली ओडतात... खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात! हा नडतो तो भांडतो दहा जनं हाणतात... पोरगी रहाते दूर पोरच भांडणात पडतात... कधी सेंट कधी लिप्स्टीक नुसतिच पावडर थापतात... अन आपण मारला डोळा की बापाला जावुन सांगतात... खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात! कधी सिनेमा, कधी नाटक नुसता खिसा बघतात... नुसतं ठेवुन वासावर ख़िसा मात्र कापतात... याला फ़िरव त्याला फ़िरव दहा लफ़ड्यात अडकवतात... आणि एकच kiss मागितला, तर ठणठ्ण्णाणा करतात... खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात! ग़ोरी असो, काळी असो सगळ्याच पोरी खास सजतात... गोड असो, तिखट असो सगळ्याच गळ्याला फ़ास असतात.... आहो पोरींच काय विचारता? पोरान्नां बघुन हसतात... अन, गळाला लागला मासा की, केसाने गळा कापतात... खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात! Mavla
|
वरिल मावळ्याची कविता वाचुन त्या कवितेचे सहज उत्तर लिहिले पण ते कुठ्ल्या विभागात पाठ्वायचे ते न कळल्याने येथेच देत आहे, क्रुपया चु. भु. द्या.घ्या. खरच सांगते पोरांनो जाऊ नका वाट्याला पोरींच्या चोरांनो तुम्हाला काय मला काय प्रेमाची गरज सर्वांना पोरींना प्रेम चालते ३४;लफडे३४; मात्र रुचत नाही म्हणुन पोरगी पटत नाही चिकना म्हणा हेकणा म्हणा सगळेच पोरी फिरवतात......... जास्तच जवळ जायला करतात नाही आली तर लगेच दुसरी पकड्तात,............ खरच...... प्रेम महागात पडते.... म्हणुन सांगते पोरींनो प्रेम महगात पडते.... हा नडतो तो भांड्तो दहा जण हाणतात....... प्रेम रहाते दुर, हे प्राणी उधळ्तात चौखुर खुर.... कधि सेंट कधि लिपस्टिक. नाहितर नुसतेच लवलेटर देतात....... अन मारुन डोळा, त्या अमुर्त प्रेमाचा करतात चोळामोळा........ टवाळक्या करित चौकाचौकात उभे रहातात जात नाहित कामाला, अन पोरिने सांगीतले बापाला तर काय झाले धाप लागायला खरच सांगते पोरांनो जाऊ नका त्यांच्या वाटेला चोरांनो कधि सिनेमा कधि नाटक, ३४;दिलाचे यांच्या कायम उघडे फ़ाटक रिकामा खिसा चाचपतात, नुसते ठेउन लग्नाच्या अमिषावर पोरीला मात्र गुंतवतात, हिला फ़िरव तिला फ़िरव.... दहा लफ़डी करतात,..... एकच किस दे म्हणुन अंगचटीला येतात, लग्न कर म्हटले तर भिन्नाट पळतात खरच सांगते पोरींनो प्रेम महागात पडते! गोरी असो काळी असो यांना कोणीही चालते, गोड असो... तिखट असो पोरींना हळवे श्वास असतात एकाच लवलेटरने त्यांना प्रेमाचे आभास होतात,... अहो..पोरांचे काय विचारता काहि खर नाही त्यांच गळाला नाही लागली तर राॅकेल टाकुन पेटवता......
|
Shyamli
| |
| Wednesday, January 18, 2006 - 5:56 am: |
|
|
सहिये ग वैशालि एकदम आजकाल खरच तसच चाललय
|
Psg
| |
| Wednesday, January 18, 2006 - 5:59 am: |
|
|
वैशाली क्या बात है! तोडीस तोड, किंबहुना वरचढ आणि खर उत्तर!
|
वा ... मस्तच चाललंय ... गंमत म्हणून ... कृपया राग मानू नये पोरी भारी की पोरं भारी भारीच चाललाय दंगा दोस्तांनो हे आवरा आता गावात झालाय शिमगा दोघंबी ह्ये इसरून जावा चेहरा करून हसरा व्हनार बगा शिमग्याचाबी दोन मिंटात दसरा
|
नाही रुसवे नाही फ़ुगवे कुणी नाही भारी नाही कुणी हलके, शब्दांचे हे खेळ फ़सवे पण ३४;विनोदचे३४; सत्यातले स्वरुप नेहमीच आणते डोळ्यात ३४;आसवे३४;
|
Maanus
| |
| Wednesday, January 18, 2006 - 9:49 am: |
|
|
मस्तच... मला एकदम पिंजरा मधला एखादा पोवाडा चालु आहे असे वाटले...
|
Mavla
| |
| Wednesday, January 18, 2006 - 1:07 pm: |
|
|
वैशाली जी, सुरेख टोला. सुरेखच. कविताही छानच.
|
Pama
| |
| Wednesday, January 18, 2006 - 3:31 pm: |
|
|
मावळा, वैशाली.. सही.. good ones !! मिटींगा.. मिटींगा... सदोदीत करता तुम्ही त्या मिटींगा, तरी दावतो बॉस' साहेबी इंगा'. रात्रंदिनीची ती मर मर, खप खप, परी घालते ती' पिंक स्लीप' पिंगा. किती मान मोडा, किती डोळे फोडा, तरी रोज होतो' सागरापार' दंगा. मागू नका' रेज' आल्या न गेल्या, नसतो बरा दूर देशाशी पंगा.. नित्य पाळीत जाता' मृत्यू च्या ओळी', असावा परी सर्व व्यवहार नंगा. कुणी जाल जेव्हा उच्च पदाला, ठेवाल तेव्हा का ओळख सांगा?
|
Milya
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:02 am: |
|
|
मावळा, वैशाली सहिच जुगलबंदी हम तुम मूव्ही आठवला..
|
Swapn
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:53 pm: |
|
|
स्त्री आणि पुरुषाची लढाई हि युगा युगान्ची तरी ओळख अर्धी रहाते एकमेकानवाचुन या दोघान्ची नसेल तिमिर तर प्रकाश कसा पडेल नसेल रुसवा तर प्रेम कसे कळेल वय चढता घेतील दखल एकमेकान्ची मिणमिनत्या डोळ्यात मग फुलतील फुले अशृन्ची रुसवे फ़ुगवे भान्डण सारे तरुणाइच्या कविता अन गाणे आनन्तच्या वाटेवर ओळख पटेल स्वप्नाची किम्मत कळते जेव्हा जाणीव होते नसण्याची
|
Pendhya
| |
| Friday, January 20, 2006 - 1:42 am: |
|
|
वैशाली, ... पण <"> विनोदचे <"> सत्यातले, स्वरुप नेहमीच आणते डोळ्यात <"> आसवे <">... असे लिहून बघा. ... पण " विनोदचे " सत्यातले, स्वरुप नेहमीच आणते डोळ्यात " आसवे " .
|
हो, प्रयत्न करते....माझी टाइप करण्यात काहितरी चुक होतेय थ्यक्स
|
Menikhil
| |
| Friday, January 20, 2006 - 12:55 pm: |
|
|
म्या तिला फोन केला रातच्याला म्हटला जाऊ उद्या जेवायला हळुच तिन हो म्हणुन लावल मला नाचायला हाटेलात जवा मी गेलो तवा ती व्हती बसलेली आरश्या समोर तोण्ड रन्गवत ऐटीत खुर्चित बसलेली मला बघताच बोलावले तिने वेटरला चिकन हण्डी, मटण करी, ऑर्डर दिली, 'जल्दी ला!' म्या बी यकदम खुशित म्हटल येती का फिरायला हसत हसत नाही म्हनून चाट लावला खिशाला यकदम कुठूनतरी येक उपटसुम्भ आला बघता बघता म्हायासमोरून तिला घेऊन गेला मि बी असा सोडतुया का त्याला? कानामागुन येउन नेतो मझ्या ऐश्वर्याला? जाता जाता हाताला त्यच्या मी बी हिसका दिला म्हसका लाउन, त्याच्या बिलात म्या बी लोचा केला
|
Mavla
| |
| Sunday, January 22, 2006 - 2:15 am: |
|
|
निख़िल भाउ काय राव, खर सांगा हा स्वानुभव कि मुलिंविशयीचा द्वेश? का उगाच गंम्मत?
|
Menikhil
| |
| Monday, January 23, 2006 - 4:42 am: |
|
|
फक्त इम्याजिनेशन..... आपल्याला कुठे कोणी गर्लफ्रेण्ड आहे
|
Champak
| |
| Monday, January 23, 2006 - 10:39 am: |
|
|
मझ्या ऐश्वर्याला? >>>>>>>>> निखिल पोरा... जपुण र्हा, म्या हिथंच हे
|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 11:13 am: |
|
|
वाटलच होत की तू अजुन कसा आला नाहीस!!!
|
Mavla
| |
| Monday, January 23, 2006 - 11:58 am: |
|
|
अरे लोक म्हणतात.... आम्ही प्रोमाला घान केलं..... ख़र ख़ोट तिलाच माहित, जिनं आम्हाला बदनाम केलं.... बाबाहो गम्मत बरका उगाच मनावर घेवुन नका, नाहि तर त्या निखिल भौ सारख मला बी पिडताल.
|
वैशाली , मावळा , खरच ' हम तुम ' ची गाणी आठवली . ' ये गोरे गोरे से छोरे ' ' लडकी क्यूं न जाने क्यूं '
|
Mi_anu
| |
| Tuesday, January 24, 2006 - 2:32 am: |
|
|
('पिणे','मांसाहार' दोन्हीशी संबंधित नसताना अशा अनेक ठशातल्या मांसाहारी परदेशी मेजवान्या अनुभवल्यावर विरंगुळा म्हणून जन्मलेली ही कविता. 'मांसाहारी' आणि 'मद्यप्रेमी' यांना टोमणा मारण्याचा अथवा वाईट म्हणण्याचा कोणताही हेतू अभिप्रेत नाही.) पुन्हा एका संध्याकाळी, जमती कचेरीतील मंडळी.. काठोकाठ पेले मद्याने भरती, 'तुला काय' मला प्रश्नती.. मी म्हणे,'रस द्या फळाचा, वा चालेल पेला 'कोक'चा'.. आनंदे भिडती पेल्याना पेले, मीही रसपेल्याने 'चिअर्स' केले.. गप्पांना आता येईल उधाण, पेल्याची ऊंची तितके प्रमाण.. मीही रिचवते रसाचे प्याले, मन माझे केव्हाच दूरदेशी गेले.. 'काल साहेबाने अमक्याला झापले, तमक्याने बघा माझे प्रमोशन ढापले'.. गप्पांत आता आवाज अनेक, पण विषय 'कचेरी' हाच एक.. हळूच मीही केले कानाचे द्रोण, डोक्यात साठवले ज्ञानाचे ते कण.. चला आता झाली 'डिनर'ची वेळ, जमवा काटे सुरे चमच्याचा मेळ.. टेबलापाशी झाली रांग मोठी, तयार हो तू कोडे सोडवण्यासाठी.. 'नको ही कोंबडी, नको शेजारचे डुक्कर, घे ती भाज्या स्पष्ट दिसणारी कोशिंबीर' ताट घेऊन मी बसे निवांत जागी, कसे जगावे या काटेसुर्यांच्या जगी.. सुरीने हळूच कापावे सॅलडपान, कि काट्याने करावे तोंडाच्या स्वाधीन? ठेवावे काटासुरी बशीत समांतर, कि त्यांचे बनवावे चिन्ह 'गुणाकार'? हुश्श! चला एकदाचे सॅलड संपले, आता शिष्टाचारही जास्त न उरले.. सर्व गप्पांत गुंग,सरक चटकन दाराकडे, राहीलेच कि मानणे 'आभार' यजमानाकडे.. 'आभार, छान गेली ही संध्याकाळ', जावे आता घरी,खावे चटकन वरणफळ.. संपली एकदाची ही पण मेजवानी, पुन्हा नको अशी सांज कंटाळवाणी..
|
Mavla
| |
| Tuesday, January 24, 2006 - 10:06 am: |
|
|
अनुरधाजी मस्त कविता. खरच आपन स्वत: त्या मेजवानी मधुन फ़िरुन आल्यासरखं वाटयला लागल आहे. आणि खर्च पार्टिमधे आपला छान " पोपट " झाला की काय आस वाटायला लागलय.
|
Jo_s
| |
| Saturday, January 28, 2006 - 10:31 pm: |
|
|
अनुराधा मी ही मावळाशी सहमत
|
Devdattag
| |
| Monday, January 30, 2006 - 8:18 am: |
|
|
वैभव आणि वैशालिजी ह्यांच्या क्षणांवर आधारीत... क्षण खरंच असतं प्रत्येक क्षणाला स्वतंत्र अस्तित्व? का असतं प्रत्येक क्षणाच आपल्या अनुजांशी बंधन? असते प्रत्येकाची नाळ एकमेकांना जोडलेली.. इथे प्रत्येक क्षण पाहतो वाट येणार्याची एका नव्या आयामाच्या प्रतिक्षेत घडवतो तो नविन शिल्प असतो एक वेडा आशावाद आलोच मी फ़िरून जन्माला तर सोपवतो मी माझ्याकडच सगळं राहिलंच आत्ता काही तर.... पण काही क्षणांना येते कधी विरक्ती मग तुटतात बंधन शिल्लक राहते नुसती माति आकार द्यायचा कुणासाठी? नसतोच काही सोपवण्याचा भाव मग येणार्या क्षणांनी काय करायचं घ्यायची त्यांनी आपल्या प्राक्तनावर शंका? का त्यांनी सुद्धा सोडून द्यावी जिगिशा ठेवायची आपली शिल्पेही ओबडधोबड.. घडवायची राहून गेलेली
|
Mavla
| |
| Monday, January 30, 2006 - 10:36 am: |
|
|
देवदत्त हा " काहिच्य काहि " कवित विभाग आहे. क्षण तिकदे कविता विभागत आहे. तेन्व्हा हि कविता तिकडे टाकली तर बर होइल.
|
|
|