Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्र कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » चित्र कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 09, 200635 01-09-06  10:26 pm

Giriraj
Tuesday, January 10, 2006 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा,सुंदर!

प्रसाद,पुन्हा वाचली आणि पुन्हा नव्याने आवडली!


Seemadhav
Wednesday, January 11, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


(साथ्)

रात्र अघोरी उजळून आली
अथान्ग कोठे वाट निघाली
नभी असावी भीती अनामिक
अन वार्‍याची वाट निराळी..

भरुन याcया दिशा दहा त्या
लख्ख उजेडी शितल छाया
वाटेवरल्या भयाण माझ्या
अंधाराला ओढून न्याव्या..

साथ राहू दे अशी निरंतर
संपून जाईल उरले अंतर
प्रवास नाही जगणे माझे
प्रश्नच माझे असते उत्तर...

दिसेल तेथे उद्या किनारा
लाटान्चाही नसेल तोरा
विरह तुझा हा चंद्रकुमारा
कुणा मागू रे पुन्हा आसरा..

माधव कुलकर्णी


Moodi
Wednesday, January 11, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा माधव बर्‍याच दिवसानी दिसलात. नेहेमीप्रमाणे सुरेल पण वेगळी.

Kunitari
Wednesday, January 11, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माधवराव, झकास.
प्रसाद तुझी पण कविता आवडली.


Diiptie
Saturday, January 14, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhasalalela buruj ani suryasta baghun
jara halavach zhala hota mann
itihasachya athavanitun swatahla kinaryakada netana....
pournimecha chandra panayat utarlala pahila
mhanala thodasa onjaleet bharun gyav te chanderi lena
thodishi badalali latechi zepavnari laya
paulkhuna rekhanari valuhi ali hattana majya hatat
tya sheetal darshananach geli sari nirasha mavalteela
manachi bharali onjal purepur pan
amacya hatala sheelakichi savay asel tar!
themba thembana rikami zhali dudhal zhalar
kahi thembancha zhala chandana
ani kahinche shimpale ,moti
kahi thembanche moti danedar
manawar mazyawar ani ya kagadavar!

Ninavi
Sunday, January 15, 2006 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दीप्ती, मस्तच!!
देवनागरीत प्रयत्न करशील का? अजून मजा येईल वाचायला.


Pkarandikar50
Sunday, January 15, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धसरलेला बुरुज आणि सुर्यास्त बघून
जरा हळवेच झाले होते मन
इतिहासाच्या आठवणीतून स्वत:ला किनार्‍याकडे नेताना....
पोउर्णिमेचा चन्द्र पाण्यात उतरलेला पाहीला
म्हटल थोडेस ओन्जळीत भरुन घ्याव ते चन्देरि लेण
थोडीशी बदलली लाटेची झेपावणारी लय
पाऊलखुणा रेखणारी वाळूही आली हाताना माझ्या हातात
त्या शीतल दर्शनानेच गेली सारी निराशा मावळतीला
मनाची भरली ओन्झळ पुरेपूर पण
आमच्या हाताला शिलकीची सवय असेल तर!
थेम्बा थेम्बाने रिकामी झाली दुधाळ झालर
काही थेम्बान्चे झाले चन्दन
आणि काहीन्चे शिम्पले मोति
काही थेम्बान्चे मोती दाणेदार
मनावर माज्या आणि या कागदावर!

दीप्ती, आता बघ कशी वाटते तुझी कविता वाचायला?
बापू



Pkarandikar50
Sunday, January 15, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिलाच शब्द चुकला वाटत! ढासळलेला असा हवा होता ना? सॉरी
बापू.


Pkarandikar50
Sunday, January 15, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या च नाव चित्रकविता का? शब्दचित्रांसारख्या कविता अभिप्रेत आहेत का?
बापू.


Ninavi
Sunday, January 15, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, अजून एक चुकला..
'वाळूही आली हट्टाने माझ्या हातात'
असं आहे बहुधा.
आणि'काही थेंबांचं झालं चांदणं'

दीप्ती, लवकर शीक देवनागरीत लिहायला बाई!!!

बापू, चित्रकविता म्हणजे इथे पोस्ट केलेल्या चित्रावरून कविता. (आर्काईव्ह बघा वरचा.)


Menikhil
Monday, January 16, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रम्य नदिकाठ......
हा आमच्या नासिकचा गोदाकाठ आहे :-)


Sarang23
Tuesday, January 17, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरच काही सुचल हे चित्र पाहुन... पण एक एक करुन टाकतो.

        गोदामाई

पायाखालची एकेक पायरी मोजुन मापुन
भरुन आलेले डोळे काठाच्या पाण्यात धुवुन
ती परत निघते... पण जायच कुठ?
प्रत्येक पायरी चढताना भरुन येणारा कंठ
भर दुपार, डोक्यावर रखरखीत ऊन
चुकुन पाहिल स्वप्न, होणार पाटलाची सुन
आता पोटात भुकेबरोबर वाढणार पाप
पाटलाचं छद्मी हास्य अन डोक्यात जाणारा ताप
भणाणुन सोडणारा सोसाट्याचा वारा... तशा दिशा
सुसाट मनात शेकडो विचार, सुटकेची मात्र एकच आशा
झाल पक्क कुठे जायच, पुन्हा उतरे एकेक पायरी
आता डोळ्यात प्राण नाही फक्त दिशा चारी
गोदामाई, तुच आई: प्रत्येक पाप पोटात घेते
प्रेत तरंगत पाण्यावर अन हसणार्‍याला रडु येते




Jo_s
Tuesday, January 17, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे चित्र बघून शाळेतली एक कविता आठवली. कळस व पायरीची. कळसाला गर्व होतो पण शेवटी त्याच्यावर कावळा येउन बसतो आणि पायरीवर भक्त देवाच नाव घेत बसतो अशी ती कविता होती. कुणाला येते का?

Ninavi
Tuesday, January 17, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही तीच लाजरी नदी रांगडा काठ
ती पहात होती इथेच त्याची वाट
प्रेमाने होती ओंजळ जेथे भरली
अश्रूंची अर्घ्ये तिथेच घेई पहाट..


Devdattag
Tuesday, January 17, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहिच्या काही चित्र कविता


पुण्यार्थी कधी होउन आम्ही
गेलो फ़िराया तिर्थस्थानी
वेशीवरती पाटी वाचली
स्वागत आशिर्वादाच्या दुकानी

भेटले कुणी नदीकाठी
ज्यांच्या ग़ळी रुद्राक्षाच्या माळा
पायरीवरती भाताची मुद
झाडावरती कावळ्यांची शाळा

करतांना ते चाटून साफ़
आम्हास दिसली कूत्री दोन
म्हणाली आम्हीच राजे इथले
आम्हाला इथे विचारते कोण

उद्वेगाने बोललो त्यांना
जनाची नाही तर मनाची ठेव
निर्लज्जपणे उत्तर आले
कुण्या गाभारी राहे देव?


Jo_s
Wednesday, January 18, 2006 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वाहते संथ ती गोदावरी
प्रेमाचा ओलावा घेऊन उरी
वाहते संथ ती गोदावरी

ठायी जिच्या जीवन आहे
तिच्या तिरावर ईश तो राहे
पुजितं जाती सारेच येथील
हर एक पायरी
वाहते संथ ती गोदावरी

तिच्या दृष्टीत समान सारे
मानव, प्राणी असो पाखरे
सज्जन आणि दुर्जनांचीही
समान सेवा करी
वाहते संथ ती गोदावरी

धंन्य धंन्य ती गोदा माता
वर्णन तिचे करू पाहता
उमजून येते किती आपुली
क्षमता पडे अपुरी
वाहते संथ ती गोदावरी

नसे तिला तरी गर्वही कसला
नदी होण्याचा धर्म तो जपला
वागणे कर्मयोग्या परी
नांदतो ईश्वर जिच्या तिरी
वाहते संथ ती गोदावरी

सुधीर





Pkarandikar50
Wednesday, January 18, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आळंदीला दरवर्षी सन्जीवन सप्ताह मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. रात्री इन्द्रायणीच्या काठी गाण्याचे, किर्तनाचे कर्यक्रम होतात. काही वर्षांपूर्वी, पंडित र्‍हिदयनथ मन्गेशकरांचे गाणे ऐकले. कार्यक्रम सम्पल्यावरहि उत्तररात्रीच्या त्या वातावरणातून मन काहीकेल्या बाहेर पडू शकल नव्हत. त्यारात्री सुचलेली ही कविता

उत्तररात्री, इन्द्रायणीकाठी

उत्तररात्री अगणित लावण्य तीचे,
लक्ष लक्ष स्वरांनी स्नात झाले.
विसरली ती वहायचे, प्रहरभर
जेंव्हा भावगंधर्वाने तीच्या वक्षावर
स्वरांची सप्तपदी रेखाटली.

स्मृतींचे सातशे पदर केंव्हा ढळले,
तीला कसे ते उमगलेच नाही.

उष्टावलेले स्तन्य तीचे, तसेच साकळले
मागे उरले, चैतन्याचे काही लडिवाळ ओघळ.

अजूनहि अतृप्त तिची तृष्णा आकंठते,
दगडी पायर्‍यांवर नि:शब्द कढ पाझरते.

बापू करन्दिकर.




Mavla
Wednesday, January 18, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर भाउ सुरेखच. सुरेख जमली.

Milya
Thursday, January 19, 2006 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! सारंग,देव, सुधीर आणि बापु... सर्वांच्याच कविता छान

Jo_s
Saturday, January 21, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा आणि मिल्या धंन्यवाद


Pkarandikar50
Saturday, January 21, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवा विषय घेऊ या का? घर हा विषय कसा वाटतो, मित्रान्नो? घराची ईमेज अपलोड करण्याचा मझा प्रयत्न फसला आहे,
बापू.


Pkarandikar50
Saturday, January 21, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


घर, माझ्या हिश्शाचे.

हिशेब निघाले, हक्क हिश्शान्चे,
धुसफुसले, वारस-दावे.
अखेरची वाटणी, मध्यस्थ बसले.
'चला, लिहा याद्या, मिटवा बखेडे'
'चल, उचल हे, हो चालता,
तोण्ड तुझे पुन्हा न पहायचे'.
हमरी तुमरी,प्रश्न तत्वान्चे,
खरे तर, निर्लज्ज स्वार्थाचे.

झाले, सम्पले, पडला पडदा,
नाही समाधान, पण वाद मिटले.
परतवली तोण्डे भिन्तीन्ची,
दुभन्गली फरशी,वासे फिरवले.
चुली मोडून, वाटून घेतल्या,
ओढल्या, आंखल्या, सीमा रेषा.
'पदरी पडले, पवित्र झाले,
पुरे विचार, नफा-नुकसानीचा'.

एकच रूखरूख तरी, शिल्लक,
म्हातारी गेली तिकडच्या वाट्याला.
गालावरती सुरकुत्या पाणावल्या,
थरथरली, ओघळली टिपे.
'येते,' म्हणाली, स्वर कांपला,
'साम्भाळ बाबा, घर तुझ्या हिश्शाचे'.

बापू करन्दिकर.





Vaishali_hinge
Sunday, January 22, 2006 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठेतरी मनाच्या कोपर्यात साठलेले कारुण्य बाहेर पड्लेय आसे वाटते...

Diiptie
Monday, January 23, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू लाईट मूड आणि एकिकडे अशी कविता,

Pkarandikar50
Thursday, January 26, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली, दिप्ती, धन्यवाद.घर याच थीमवरची आणखी एक.

शोध, घराचा.

माझ एकदा, घरच हरवल.
निघालो शोधत, करणार काय?
घरंच घर दिसली,
अगणित घर भेटली.

लहानशी घर, मोठी घर,
हवेल्या, खोपटी, बन्गले, झोपड्या.
आतली घर, बाहेरची घर,
खालची घर, वरची घर.

माडीचे घर, घरांवरच्या माड्या
जंगलातली घर, घरांची जन्गल.
उबदार घर, बिलगती घर, चिवचिवती घर,
मिणमिणती घर, कुबट घर, कडकडती घर,
झगझगती घर, उजाड घर, पडकी घर.,
माळावरची घर, मळ्यांतली घंर, तळ्यातली घर,
किनार्‍यावरची घर, तरंगती घर, रूतलेली घर,
घरच घर.

माझ्या घराचा मात्र थान्ग नाही!
'वेडा कुठचा, घर कधी हरवत का?
पत्ता हरवतो, किल्ली हरवते, पण घर?'
'खरच सान्गतो, विश्वास ठेवा,
माझ घर हरवलय'

बापू करन्दिकर.


Vaishali_hinge
Saturday, January 28, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे घर

शुभ्र धवल झाली धरणी
रिमझिमत्या चांदण्या ल्याली धरणी,

शितल जल हे झाले स्तब्ध....
उमटला ठसा चराचरावर

शुष्क काष्ठ ही ल्याले अंगभर,
त्याचे स्वप्न मनी घडीभर....

गगनीचे नभ आज अवतरले अंगणी माझ्या...,
अंधार विरघळला प्रकाश गोठला शुभ्रकणात ताज्या

प्राचीचाही रग वितळला हुरळुनी जीव त्यात मिसळला,

तेजाचे ते रुप वेगळे....
ह्या चंदेरी घराचे माझे..................


Champak
Sunday, January 29, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ale ale ale ale :-)

Mavla
Monday, January 30, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांनीच बोलता येत
अस कोणी सांगितल
तस बोलता येत असतं तर...
तुझ्या डोळ्यात नसतं पाहिल!


Mavla
Monday, January 30, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनावर घेवु नका, गंम्मत म्हनुन सहजच हलकासा आस्वाद घ्या. तसं चित्रातील मुलगी आणि गुलाब यांचं नात मी कवितेत जोडलच आहे, ते सम्जुन घ्या.

चुकुन धडक झालि असतानाही
तु म्हनालीस मला बावळट
पाहुन तुझ रुप मी तेंव्हाच
फ़िदा झालो तुझ्यावर झटपट

प्रेम कविताही केल्या मी
तुझ्या सठी पटापट
तुझ्यच साठी पोरांचा
मारही खाल्ला सटासट

तुझ्याच साठी झालो मी
खुप खुप चावट
इतर मुलिही म्हणाल्या तेंव्हा
मी आहेच असा नटखट

तुझ्याच साठी केला मी
नटा सारखा थाटच थाट
पन तु कधिच नाहि धरली
मझ्या ह्रुदयाची वाट

तुला संगायची मी केली
अखेरची खटपट
त्या सठिच रचला मी
एक चोटासा कट

फ़क्त " गुलाबच " देन्यासठी तुला
केलि तुझ्याशी झटापट
आणि पवित्र प्रेमाच्या बदल्यात
मी मिळवली गालत एक चापट.

मवळा :-)


Gash16
Monday, January 30, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मावळा भाऊ,
तुझी कविता एक नम्बर.....
खरच एक नम्बर.....
दुसरा नम्बरच नाही...
फोटो पोस्ट केल्याच काहितरी सार्थक झाल....

गणेश



Sarya
Monday, January 30, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेका मावळ्या, नगरी लोकांच नाक कापतो का रे? आजपर्यंत कोणी नगरी माणसाने मुस्काटात खाल्ली आहे का पोरीची??? *निदान तस सांगीतल तरी का रे?* असो!!!
छान आहे रे:-)


Vaishali_hinge
Monday, January 30, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मवळा छान मजा आली


घराबाहेर पडतांना

तिळतिळ तुटतो जीव,
किनारा सोडायला तयार होत नाही नाव,

पण असे होउन कसे चालेल
मन म्हणाले थांब तरी
काळ म्हणतो चल पळ!

रोजची सकाळ उगवते अशी
उंबरठा ओलांड्तांना वाटते नकोशी

काळीज कापीत जाते त्याची पाणावलेली नजर
आणि....
सुटतो माझ्या जीवचा ठाव
जणु शरिरावर असंख्य घाव!

मागे वळुन पहायचे नसते धाडस

कारण दारात उभे असते माझे पाडस......





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators