|
Seemad
| |
| Thursday, January 26, 2006 - 7:59 am: |
|
|
वैशालि सुन्दरच, सयी तुझी येते ग सय वाटते डोळाभरुन पहावे तुला ग दुर तु दुर मी दोन देशी आपण आस धरु कशी ग येशील तु, भेटशील तु कधि ग वाटते कधि पाखरु व्हावे, उडत तुजपाशी यावे हात हातात घेवुन हलकेच मन मोकळे करावे ........ मन मोकळे करावे....
|
धन्यवाद..... दोघी प्रतिक्रीयाही तितक्याच छान आहेत
|
Tarang
| |
| Friday, January 27, 2006 - 11:29 pm: |
|
|
नमस्कार दोस्तहो, माझा पहिलाच छोटासा प्रयत्न...... नात छान टीकवण्यासाठी प्रत्येक नात्या बरोबर उडायला हव त्या साठी प्रत्येक नात्या बरोबरच आकाश वेगळ हव....
|
AayauYyaavar baÜlaNyaasaarKo baroca kahI baakI Aaho tU saÜbat Aahosa mhNaUnca jaIvanarNasaMga`ama ijaMkNyaacaI ]maod kayama Aaho ....
|
Ninavi
| |
| Saturday, January 28, 2006 - 6:53 am: |
|
|
तरंग, तुझी चारोळी वाचून मला माझी एक जुनी आठवली.. प्रेम बंधन होऊ नये सतत पायात घोटाळणारं प्रेम म्हणजे भक्कम पाठबळ यशापयशात सांभाळणारं प्रेम म्हणजे मोकळं आभाळ चार पंखांवर पेललेलं प्रेम म्हणजे सुख-दुःख तू मी मिळून झेललेलं
|
Tarang
| |
| Saturday, January 28, 2006 - 12:59 pm: |
|
|
अप्रतिम निनावी..... मला ग्रुप चि माहिती कुठे मिळेल??
|
Jo_s
| |
| Saturday, January 28, 2006 - 10:18 pm: |
|
|
आयुष्यावर बोलता बोलता आयुष्य गेलं सरून लक्षात आलं आता तेव्हा डोळे आले भरून
|
माझे माझे म्हणत माझे विश्व हाती आले, तुकड्या तुकड्यात विखुरलेले ते माझे आयुष्य होते की.... हातात आलेले क्षणांचे जीवन होते काही कळत नाही........ गुढ हे उकलत नाही....
|
Shyamli
| |
| Sunday, January 29, 2006 - 12:37 pm: |
|
|
वा! बयाच दिवसांनी झुळकेवर जाग दिसतेय छानच लिहिलय सुधिर, वैशाली
|
वैशाली तुमचा dilemma मला तरी कळला कारण योगायोग असा की मी ह्याच विचारात असताना काल एक कविता लिहीली होती ती पोस्ट केली आहे.गूढ उकलायला मदत होईल की नाही कोण जाणे पण तुमचे विचार त्याहूनही पुढे गेले तर तुमचीही एखादी कविता वाचायला मिळेल ही अपेक्षा
|
Jo_s
| |
| Sunday, January 29, 2006 - 10:31 pm: |
|
|
धंन्यवाद वैशाली ---------------------------- माझं माझं म्हणत गोळा करतो बरच काही कवटाळताना त्या मायेस मीच मला सापडत नाही
|
Santotar
| |
| Monday, January 30, 2006 - 5:30 am: |
|
|
Mitrano, Marathi kase type karayche mahit nahi. Krupa karun mala madat kara.
|
वैभव, गुढ नक्कीच उलगडले आहे ग्रेट कसे ते कवितेत पोस्ट करतेय...... ........!
|
Devdattag
| |
| Monday, January 30, 2006 - 8:40 am: |
|
|
स्वत:ला शोधण हा खरंतर वेळ घालवण्याचा खेळ आहे कारण.. डोळ्याचा आणि बुद्धीचा इथे कुठे मेळ आहे?
|
Niru_kul
| |
| Monday, January 30, 2006 - 9:04 am: |
|
|
मित्रानो आणि मैत्रिणीनो, मी आहे एक नवा कवी, कागदावर भावना सान्डणारा; कवितेच्या माध्यमाद्वारे, मनाशी मने बान्धणारा. माझ्यासारख्या नवकवीला तुमच्या या झुळूकेत तुम्ही स्थान द्याल का? माझ्या काही कविता पाठवत आहे. कशा वाटल्या ते कळवावे. १. मन कितीही कठोर केलं तरी, तुझा विरह मला सहन करता येत नाही; तुझ्यावर मरणं जमतं म्हणुनच तर, तुझ्याशिवाय मला जगता येत नाही. २. हल्ली मी भावनेला मोकळं सोडत नाही, कारण ती मोकाट बनते; शब्दाची भिन्त घातली की मात्र, मग कविता बनते. ३. तुझं नाव सर्वासमोर घेणं, मी मुद्दामच टाळतो; अन एकान्तात बसुन मग, तुझ्या आठवणी चाळतो.
|
|
|