Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
रिमझिम गिरे सावन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » रिमझिम गिरे सावन « Previous Next »

Giriraj
Friday, December 30, 2005 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन

पावसाचे दिवस... सतत झिरमिर कोसळणारा पाऊस... आपल्या प्रेयसाचं सोबत असणं आणि तश्या वातावरणात निरुद्देश्य भटकत पावसाच्या आणि प्रेयसाच्याही सोबतीचा आनंद.

हा पाऊस असा कधी कोसळला नव्हता असं नाही.पण का मग याच वेळेस ही अनामिक हुरहुर...
याआधीही भिजल्ये होत्ये की मी.

पहले भी यूं तो बरसे थे बादल
पहले भी यूं तो भीगा था आंचल

स्वतःलाच प्रश्न विचारणारी मौसमी चटर्जी,तिला नव्या नवलाईने मुंबई दाखवणारा आमिताभ आणि दोघांच्याही प्रेमाचा साक्षी असणारा,तिच्या मनातली भावना ओळखणारा प्रेमवेडा पाऊस!सगळ्यांनी हे गीत अक्षरशः जिवंत केलय पडद्यावर! चित्रपट आहे ‘मंज़िल’,१९७९ साली केव्हातरी आलेला. गाण्यात पुर्णवेळ पाऊस कोसळत राहतो,मुंबई दिसत राहते आणि मुंबईचा समुद्र प्रत्येक वेळ सोबत करत राहतो त्यांची आणि आपलीही.रस्तेही ओले आणि दोघेही!साडीत असणारी मौसमी आणि सूटात वावरणारा अमिताभ!प्रियकराच्या सोबत असण्याच्या कल्पनेने मोहरलेली मौसमी थोडावेळही त्याचा हात सोडतांना दिसत नाही.

गाण्याची सुरवात होते गिटारीच्या स्वराने.आर.डी. सलाम तुला! किती गाणि ऐकलीत तुझी आणि प्रत्येक वेळी तुझं श्रेष्ठत्व नव्यानेच मान्य करावं लागतं.हळूच लाडीक स्वरात लता गायला लागते..

रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भीगे आज ईस मौसम मे
लगी कैसी ये अगन

गाते कसली... लाडीक तक्रारच ती पावसाबद्दलची! तरीही ती जाळणारी हवीहवीशी भावना एकेका शब्दात हळुवारपणे उलगडत जाते.’लता काय गाते या गाण्यांत’ असं म्हणणं म्हणजे ‘आजचा सूर्यास्त अधिक मनमोहक होता’ हे सांगण्याचा प्रयत्न! ‘सुलग सुलग’ म्हणतांना किती वेगवेगळ्या पद्धतिने
म्हणावं?

अंतरा संपताच गिटार आणि बासरीवरचा सुंदर piece सुरू होतो.इकडे (बहुतेक) आज़ाद मैदानाच्या बाजूने दोघेही जातांना दाखवलेत.रस्त्यावरची तुरळक रहदारी चालूच असते.पलिकडे चार-पाच मजली इमारतींची रांग दिसते काही माड पावसात वार्यावर डोलत असतात.ती त्याचा हात सोडत नाहीच!मग समुद्र,फ़ेसाळलेला,उधाणाला आलेला! त्याच्या लाटा नरीमन प्वाइंटच्या रस्त्यावर आणि कठड्यावर आदळतांना दिसतात.(मला एरवी न आवडणारी)मुंबई खरंच आवडून गेली मला या गाण्यात!(अशीच आवडते ती ‘साथिया’ मध्ये.)
अमिताभला काहीबाही दाखवत असते मौसमी आणि तोही माहीती पुरवत असतो.

पहले भी यूं तो बरसे थे बादल
पहले भी यूं तो भीगा था आंचल

हा असा पाऊस बहुतेक आजच कोसळतोय.मी अशी भिजल्ये होत्ये कित्येकदा;पण आज त्यालाही किती कोसळावं ते कळत नाही आणि मलाही किती बोलू आणि किती नाही असं झालय!ंमौसमी अखंड बडबडत असते.काय बोलते त्याला महत्व कुठेय?कितिदा भिजूनही हे भिजणं कित्ती वेगळं आहे. लताचा एक आलाप जणु जुन्या पावसाच्या आठवणी जागवतो.

अबके बरस क्यू सजन
सुलगसुलग जाये मन

का रे प्रिया यावेळेस हा पाऊस असं काय घेऊन आलाय?

ईस बार सावन दहका हुआ है
ईस बार मौसम बहका हुआ है

हा पाऊसच दाहक झालाय.बहुतेक सगळा निसर्ग वेडावला आहे.हा वाराही कसा झिंगल्यासारखा वाहतोय.हे असं का झालय मलाही?तू माझ्या सोबत असण्याचा तर हा परीणाम नसावा?माझ्यावरही आणि या सगळ्या निसर्गावरही?

जाने पीके चली क्या पवन
सुलगसुलग जाये मन

कोण दिग्दर्शक आहे माहीत नाही पण त्याच्या ताकदिचा अंदाज़ एकाच गाण्यात येऊन जातो.हळुवार भावना नेमक्या आणि सोप्या शब्दांत मांडणार्या कविवर्य योगेश यांना तर लाखो सलाम! ‘रजनीगंधा’ लिहून जाणारे योगेशच हे असलं लिहू शकतात. अमिताभ आणि मौसमी यांच्याबद्दल तर काय बोलावं?

अल्लडपणे मौसमी रस्त्यालगतच्या कठड्यावर चालत राहते.अमिताभ तिला आधार देत सावरत राहतो.नाहीतरी त्यानेच तर वेडावून टाकलय ना तिला! गाणं संपता संपता दोघही एका बाकावर बसतात.त्याच्याकडे पहात त्याचा शब्दनशब्द मनात साठवत ती सगळा दिवस आठवत असल्यासारखी वाटते.मध्येच चेहर्यावरचे चुकार केस बाजूला सारते,पाण्याचे काही थेंब पुसून काढते.त्याच्या खंद्यावर मान टेकवलेलीच असते.बाजूला समुद्र फ़ेसाळत राहतो,वरून पाऊस कोसळत राहतो

भीगे आज ईस मौसम मे
लगी कैसी ये अगन


(या गाण्याआधी आणि नंतर काय आहे,काय होतं किंवा चित्रपटाची कथा काय आहे,मला माहीत नाही.निव्वळ एक गीत म्हणून कोणत्याही कथानकाशिवाय मी त्याकडे पाहतो.)

गिरीराज

Moodi
Friday, December 30, 2005 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच सुंदर लिहिलेस की गिरी तु. आता तुला नगाधिराज म्हणायला हरकत नाही. तू अन तुझ्यासारख्या अनेकाना घाटमाथ्याच्या पावसाचा मनसोक्त आनंद लुटता आलाय म्हणुनच असे मोकळेपणाने तू शब्दात उतरवु शकलास.

अमिताभ आठवला पण किशोरच्या आवाजातील तरलता विसरलास का? तुझे २५ मार्क मी कापले बरका. पुढे किशोरला विसरलास तर याद राख.


Chinnu
Friday, December 30, 2005 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक तरुणी.. सध्यासुध्या दिसणार्‍या एका कॉलनीतुन जात असते. थोडे अंतर चालुन गेल्यावर तिच्या लक्षात येत.. तिचा पाठलाग होत असतो. एक उंचापुरा तरुण तिला तिच्या पाठलाग करतंना दिसतो. ती झपाझप चालु लागते. तो माणुसही वेग वाढवितो. ती almost अपेक्षीत घराकडे पोहचते.. आणि-
तिच्या लक्षात येत. तो माणुस पाठलाग करत नसुन तिच्याचप्रमाणे, त्या घरी ठरलेल्या महफ़िलमधे आलेला असतो.
इतका वेळ रोखलेला श्वास सोडुन आपल्यच वेडेपणाला हसते ती तरुणी!
ती म्हणजे मंजिल मधे मौसुमी आणि तो उंचापुरा तरुण असतो अमिताभ.
मौसुमीच ते ग्वाड हसणे ज्यानेपण miss केल असेल ते त्याने त्याचे निव्वळ दुर्दैव समजाव!

हळुवारपणे महफ़िल सुरु होते आणि गायक असतो साक्षात आपला अमिताभ.
तबल्याची जोड आणि किशोरचे अजुन एक हवेहवेसे.. पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटणारे अलवार असे गाणे म्हणजेच या महफ़ीलीमधे अमिताभच्या तोंडी दर्शविलेले

रिमझिम गिरे सावन..

या गाण्यात पाउस नक्कीच कोसळतो, पण तो असतो मौसमीच्या चेहेर्‍यावरील भावनांचा. ज्या माणसाला तिचा पाठलाग करतांना पहुन तीने त्याला मनात शिव्यानही लाखोली वाहीली असेल, त्याच माणासाच्या सुरांवर आता तिचे हृदय डोलत असते.

जब घुंघरोऊंसी बजती है बुंदे
अरमा हमारे पलके न मुंदे!

किती सार्थ शब्द लिहिलेत या कवीने! ते ' अरमा ' मौसुमीच्या लाडीक चाळ्यातुन अन तिच्या ओठांच्या कडेवरुन निसटणार्‍या स्मितातुन पावसाचे पागोळे होवुन जणु ओघळत असतात.

इकडे मौसुमीचे तारुण्यसुलभ मन रेशमी स्वप्न विणत असते आणि तिकडे अमिताभ आपले गाणे तल्लिन होवुन harmoniyam ची हालचाल करत गात असतो. साध्याश्या कुरतापायजम्यात असलेला आणि खंद्यावर एक शबनम अडकवुन sincere पणे गाणे म्हणणारा अमिताभ! खावुन टकलय त्याने त्या मंद हास्याने..

कैसे देखे सपने नयन
सुलग सुलग जाये मन

मौसुमीची आणि माझी पण चोरी जणु या ओळिने पकडली जाते.. :-) ती आणि मी पण भानावर येवुन आजुबाजु बघुन सावरतो! :-)

महफ़ील मे कैसे कह दे किसी से
दिल बंध रहा है ईक अजनबी से

मनात चालणर्‍या चलबिचलीचे इतके दृष्य वर्णन मला इतक्या प्रकटपणे कुठल्याच हिंदी सिनेम्यात दिसले नाही.

Hats off to R.D. , किशोर आणि तन्मयतेने सादर करणार्‍या अमिताभ आणि मुख्य म्हणजे मौसुमीला!

हाये करे अब क्या जतन
सुलग जाये मन

इथे मौसुमीचे सार्थ हसणे आणि लाजणे बघावे! तीलाही जणु हेच सुचवायचे होते, किती ' जतन ' करु आणि कस करु, ' दिल ' जब बंधही गया उस अजनबीसे!
तिचे हे स्वत : शीच लाजणे तिच्या मनात विणल्या जाणार्‍या गोड स्वप्नांवर शिक्कामोर्तब करतं.

कुणावर मन जडणे आपल्या हतात अजिबात नसते! हा ' दिल ' का पंछी आपल्याला हुलकावणी देवुन, कितीही ' जतन ' करुनही निसटुन, आपल्या आवडत्या माणसाकडे अलगद उडुन जाते. याचा साक्षात्कार, हे सुरम्य गीत घडवुन आणते.

प्रेमाला आणि तारुण्यसुलभ भावनांना भाषा नसते. भाषा असलीच तर, ती रूप लेवुन येते, तिच्या मोहक गुलाबी लाजण्याचे..

भोवताली उडणार्‍या चुकार स्वरांचे थेंब झेलत कधी आपणही गुणगुणतो-

भीगे आज ईस मोसममे
लगी कैसी ये अगन!

यात प्रश्न आपलाच आणि उत्तरही! :-)


-आपली चिन्नु.




Chinnu
Friday, December 30, 2005 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंझिलचे हे गाणे आठवण करुन दिल्याबद्दल गिरीचे आणि किशोरदांचे version आठवल्याबद्दल moodi चे आभार!

नवीन वर्ष सर्वांना खुप सुखाचे जावो हीच सदीछ्छा!


Rahulphatak
Saturday, December 31, 2005 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज, खूप छान लिहिलं आहेस ह्या सुंदर गाण्याविषयी !

ह्या गाण्याविषयी लिहिल्याबद्दल तुला RD चे तुझ्याकडे नसलेले गाणे बक्षीस ! ( कुठले हवे आहे ते सांग म्हणजे आहे का शोधतो ! :-) )

chinnu, किशोरदाच्या गाण्याचेही सुरेख लिहिलेस !

गिरी, चित्रपटही आवडेल तुला.. दिग्दर्शक आहेत बासु चॅटर्जी.
आर. डी. ची कधी टॉप टेन लिस्ट केली तर हे गाणे असेलच .. अर्थात अमर्याद आनंद देणार्‍या गाण्याना नंबर कशाला लावायचे म्हणा !

ह्या गाण्याची लता आणि किशोर ह्यांची versions वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव देतात. दोन्ही गाण्यांची scale वेगळी, picturization वेगळे.. हेवी मेकप केलेली चकचकीत आकर्षक मौशमी किशोरच्या गाण्यात, तर बहुतांशी मेकपशिवाय मोहक लाजरी, नैसर्गिक मौशमी लताच्या गाण्यात !

ह्याच चित्रपटातील इतर गाणीही गोड आहेत : ' मन मेरा चाहे मेहेंदी लगा लू ' , ' तुम हो मेरे दिल की धडकन ' !


Jo_s
Saturday, December 31, 2005 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी आणि चिन्नु
काय लिहीता रे, सुंदरच
डोळ्यां समोर चित्र उभी राहीली, इथे बसल्या बसल्या भिजून गेलो.


Gs1
Saturday, December 31, 2005 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी आणि चिनू, छान लिहिले आहे. माझेही फार आवडते गाणे आहे. किशोरचे जास्त भिडते आणि भावते मला...

Ramachandrac
Saturday, December 31, 2005 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, चिनु.. खुपच छान सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात

Dineshvs
Saturday, December 31, 2005 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या, आता तुला गद्य लिहिण्याईतका पेशन्स आला हे फ़ार महत्वाचे. लिहित रहा.

लॉजिकल अंताक्षरीवर पावसाची गाणी लॉजिक आले, कि एकेक भन्नाट गाण्यांची आठवण निघते.

पण पुण्यात कुठे रे असा पाऊस पडतो. तो आमच्या मुंबईलाच पडतो.


Bhagya
Saturday, December 31, 2005 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरि, छान! असाच लिहित रहा....

Sandeep_bodke
Sunday, January 01, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mumbaitla paaus.... wah....amhi shaletun ghari yetaana, schoolbag raincoat madhe cover karun, muddam bhijat ghari yaaycho kadhi kadhi..agadi ole-chimb hovun...ani dusrya diwashi sardi-khoklyane bejaar... !!
gaye wah din...par wah yaade hamesha rahengi.... aamchya mumbaitach padato asa paaus... :-)

Giriraj
Sunday, January 01, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस पडणे म्हणजे काय आणि मुसळधार पाऊस कसा असतो हे कोकण,तळकोकण आणि गोव्यात कळंतं!
जमल्यास गोव्यातल्या पावसाच्या आठवणी लिहीन कधितरी!


Chinnu
Sunday, January 01, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुला, जो, जी एस आणी रामचन्द्र.. thank you !
गिरी अगदी राहावले गेले नाही म्हणुन इथे लिहीले. आगावुपणाबद्दल क्षमस्व. मला वाटले की दोनही versions एकत्र वाचता आली तर बरं..
जी. एस. मला पण किशोरचे version जास्त भावते! Thanks for sharing..


Yog
Sunday, January 01, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaah ² Ja@kasa ² Giri Ê Agana laagalaIyao tr... lagao rhÜ.. :-)

Kshipra
Sunday, January 01, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, माझी ह्या गाण्याची आठवण लोहगडशी निगडीत आहे. ट्रेकला गेलेलो होतो पावसाळ्यात. एका घळीत थांबलो. जबरी पाऊस होता. तिथे जो ग्रुप होता त्यातील एका मुलाने हे गाणं अतिशय सुरेख म्हटल. बाहेरे सुरु असलेला धुवाधार पाऊस आणि साथीला ते गाण..... सही एकदम. त्यामुळे हे गाणं ऐकल की सगळं ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहत.

Devdattag
Monday, January 02, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज.. कमरेत वाकून कुर्सिनात..
वेड वर्णन.. त्याच पावसात सचैल भिजल्याचा अनुभव दिला

आज फिर उस सावनकी आरजू हैं
जिसकी भिगी बुन्दे दिल को जलाती हैं
समां जायें वो हर एक बुन्द मुझमें
जो बुन्द जिस्म को रुह से मिलाति हैं


Deepanjali
Monday, January 02, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, चिन्नु,
सुरेख !
पण मलाही लता पेक्षा किशोर version जास्त appeal होत :-), गाण्याचा असा 'feel' आणावा तो किशोर कुमार नी च !
कदाचित त्याच्यातल्या उत्कृष्ट actor नी त्याला दिलेली ही देणगी असावी, म्हणूनच कितीही महान गायक music industry मधे असले तरी असा ' खास ' mood पकडावा तो किशोर ने च !


Kandapohe
Monday, January 02, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, चिन्नू मस्तच वर्णन. दोनही versions सुरेख आहेत. मजा आला. Thanks :-)

Giriraj
Monday, January 02, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नु,आगाऊपणा कसला?
तू लिहिल्यामुळे मला किशोर च्या वर्जनविषयी माहीती मिळाली.. नाहीतर फ़क्त ऐकूनच माहित होत ते!
DJ ,मला तारुण्यसुलभ वृत्तिने मौसमीचच version आवडणार ना!
गंमत अशी की मी पुर्वीपासून किशर version ऐकत आलो होतो.फ़ार उशीरा लताच version ऐकायला मिळाल आणि मागच्या पंधरा दिवसांत पहायलाही!

राहुल,अगदी पटल बघ! Top 10 चा उद्योग कश्याला हवा!हे लोक जेव्हा अशी गाणी बनवत असतिल तेव्हा काय मजा येत असेल नाही?

धन्यवाद मित्रहो!


Milya
Monday, January 02, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जियो.... गिरी आणि चिन्नू... अगदी अचुक वर्णन. गाण्याचा mood मस्त पकडलाय तुम्ही शब्दात... नाहितर एरवी एवढ्या चांगल्या गाण्याचे वर्णन शब्दात करणे महा कठीण

पण पुण्यात कुठे रे असा पाऊस पडतो. तो आमच्या मुंबईलाच पडतो. >>> अहो दिनेश तो पाउस अस कुठला पुण्या मुंबईचा नाहीच आहे. तो गिरीच्या मनातला आहे ~DDD

Vaibhav_joshi
Monday, January 02, 2006 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्कीच मनातला मिल्या ... मी तरी पुण्यात सध्या पाऊस पाहिला नाही ... अगदी बुदरानी हॉस्पिटल्च्या आवारत पण नाही .. आयला हे आजारपण इतकं सॉलिड .. (liquid?) असतं होय ... गिरीराज सांभाळ रे बाबा

Deepanjali
Monday, January 02, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाची निरनिराळ्या mood मधली वातावरण निर्मिती चांदनी मधेही सही आहे!
'पर्बत से काली घटा टकराई', 'लगी आज सावन की फ़िर वोह झडी है' गाणी आणि बर्‍याच scenes मधे पाउस छान mood create करतो.
ऋषी कपूर चा एक dialog आहे त्यात,'ये बंबई की बारीश कुछ अलग ही है ना, हमारे दिल्ली मे तो ..... ' आणि त्याच scene नंतर श्री त्याला सांगते, 'मेरी जिन्दगी मे कोई और आ चुका है रोहित' :-).


Charu_ag
Monday, January 02, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी आणि चिन्नु, सुरेख वर्णन.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators