|
Yog
| |
| Monday, December 19, 2005 - 5:34 pm: |
|
|
उन्दीर पळाला.. अरेच्चा उन्दीर पळाला.. तो बघ बर कुठे गेला! लहानपणी काही लागल, खरचटल, की कधी आई, कधी आज़ि, आजोबा वा मामा ही उन्दीर पळाला ची युक्ती वापरत. कडू औषध किव्वा इतर कुठल्याही जडीबूटीपेक्षा निरागस लहान मनाला उन्दीर पळाल्यात आपल दुखण, दुख्ख पळून गेल्याचा कोण आनन्द होत असे. वर्शानुवर्शे हा उन्दीर पळाल्याचा formula अजूनही काम करतो हे निश्चीत. अगदी अलिकडे(त्यालाही तीन वर्शे झाली) हाच formula वापरून करोडो लोकांना गन्डवणारे बुश महाशय अन त्यान्चे खुशमस्करे टोनी महाराज यांनी आता चक्क आम्हाला उन्दीर असल्याची चुकीची बातमी मिळाली असण्याचे सुतोवाच केले.(बुश महाशयांच्या या कालच्या हुडहुडीने ब्रिटनलाही उद्या ताप येईलच). अस आहे की उन्दीर पळाला यातल तथ्य अन सत्त्य आपल्या कळत्या वयात उमगत तेव्हा त्यातून एक गमतिची भावना येते, आई आजीने आपल्या साठी केलेल्या युक्त्या क्लुप्त्यान्बद्दल प्रेम वाटते पण " कस फ़सवल " अस निर्ल्लजपणे सान्गितल गेल तर ती गम्मत न रहाता एक दुर्दैवी विनोद ठरतो अन त्या विनोदाची चीडही येते अन घृणाही. आम्ही सद्दाम ला उन्दरा सारखे बिळातून बाहेर काढू, WTC वर आक्रमण करणार्या भ्याड उन्दरांना खणून काढू वगैरे सतत अशी उन्दीरबाजी करणार्या या द्वयीने मात्र या खोट्या formula पायी किती निरागस, निष्पाप बळी घेतले, प्राचीन संस्कृती लाभलेली किती सुन्दर शहरे उध्वस्थ केली, याला गणती नाही. या अराजकापेक्षा सद्दामची हुकुमशाही बरी होती या निराशवादावर जगाला आणून सोडले. इराक च्या गल्ली बोळातून अन अफ़गाणच्या वाळवंटातून यांन्ना उन्दीर सापडले असतीलही पण wmd नामक एकही उन्दीर अजूनही हाती लागलेला नाही पण त्यापायी खर्च जवळ जवळ २६ दशलक्ष करोड इतका, अन रोज एक दोन तरूण सैनिक मरत आहेत ते वेगळेच. अन हे कमी म्हणून की काय अमेरीकेतल्याच जनतेवर यांनी चक्क गुप्तपणे हेरगिरी चालवली होती. नक्की लोकशाही कुठे आहे हा एक प्रश्णच आहे. अन इतक होवूनही अजूनही आम्हीच विजयी होवू, अतीरेक्यांचा नायनाट होईल इत्यादी वल्गना काही सम्पत नाहीत. अतीरेकी कोण? रशिया विरोधि शितयुध्धात अफ़गाणमधे तालिबान जन्माला घालणारे, सर्व फ़ेमस इस्लामी अतीरेक्यांना एकेकाळी सीआयए च्या पेरोलवर ठेवणारे, अण्वस्त्र शस्त्रास्त्र बन्दी कायद्याद्वारे जगावर दडपशाही लादणारे, की हा विद्वेश सतत मनात ठेवून तरूण मुस्लिम पिढीला गुमराह करणारे? धन्य तो देश अन धन्य ती प्रजा! उन्दीर पळाला या क्लुप्तीमधिल उन्दीर कधी नसतोच तेव्हा त्याचा शोध घ्यायचे नाटक अन त्या नावखाली जगभर खुड्बुड करायचे हे कधी थाम्बवणार? पहिल्या महायुध्धाच्या तहात दुसर्या महायुध्धाची बीजे पेरली गेली होती, हे इतीहासातील वाक्य कायम लक्षात राहीले. त्या लहान वयातही अशा प्रखर वाक्यांचा खोलवर परिणाम झाला होता. पण इतीहासापासून खरच आम्ही काही शिकलो का..? nostradamus च्या भविष्यकथनावर खूप सुन्दर पुस्तके उपलब्ध आहेत. नुकतेच त्यातील एक पुस्तक वाचले तेव्हा आता भोवती घडणार्या घटना खरच त्याने वर्तवलेल्या भविष्याप्रत नेतात काय असे वाटते. " तिसरे महायुध्ध जवळ जवळ वीस वर्षे चालेल अन इस्लाम धर्माचा नायनाट होईल " असे एक भविष्यकथन आहे, ते वाचून अन्गावर काटा आला पण आता ते शक्य होईल काय अशी भिती वाटते. अफ़गाणीस्तानवरिल आक्रमणापासून आज इराक मधिल तीन वर्शे धरली तर गेले एक दशक अमेरिका, ब्रिटन व इतर मित्र राष्ट्रांनी सर्वत्र संहार चालवला आहे. दर महिन्याला अचानक धुमकेतूगत उगवणारे ओसामाचे इस्लाम विरुध्ध इतर जग अशा आशयाचे सन्देश,(या धूमकेतूची शेपूट नेहेमी पाकीस्तानच्या दिशेने वळवळते असे खगोलतज्ञ म्हणतात्) इराक, अफ़गाण मधिल लहान थोरांनी उचललेली शस्त्रे हे सर्व पाहता हा मार्ग नक्की पुढे कुठे जात आहे हे वेगळे सान्गायला नको. पुन्हा एकदा preemptive strike नावाचा नविन कायदेशीर उन्दीर वापरून अमेरिकेने चालवलेला हा गदारोळ एक दिवस अन्गावर उलटल्या वाचून रहाणार नाही. खर तर अत्त्यन्त चुकीच्या, अरेरावीपूर्ण, अन दडपशाही पध्धतीच्या यान्च्या परराष्ट्र(विशेष करून इस्लामिक राष्ट्र)धोरणांतून यांनी खर तर अनेक लादेन जन्माला घातले आहेत. लहान वयात स्वताच्या डोळ्यासमोर आपले आई वडील, मित्र, शहर, राष्ट्र उध्वस्थ होताना पाहणार्या कोवळ्या मनावर खर इतर कुठल्याही brain washing ची गरजच नाही, या घटना इतक्या खोलवर असतील अन ती जखम कायम चिघळलेलीच असेल, त्यातून अमेरिकाविरोधी एक अक्खी पिढीच जणू गली मुहल्ल्यातून जन्म घेत आहे. आज प्रत्त्यक्ष इराक, अफ़गाण मधे रोज काम करणारे, सर्व स्वतः पहाणारे सच्चे पत्रकार हेच ओरडून ओरडून सान्गत आहेत, पण आपल्या हीणकस आकान्क्शा अन कावेबाजपणाचे पिन्जरे घेवून फ़िरणार्या या सत्तांध शिकार्यांना त्याचे काय घेणे? अभिमान अन मगृरी यात फ़क्त " कातडीचा " ( skin color )फ़रक यांनी शिल्लक ठेवलाय. आम्हा भारतीयांपर्यन्त या आगीची झळ्(अमेरिका अन ब्रिटन ने लावलेल्या)प्रत्त्यक्ष स्वरूपात लागलेली नाही, आमचा विद्वेश फ़क्त आई वडिल किव्वा सासूबाईंना visitor visa नाकारला गेल्यापुरताच मर्यादीत आहे. पण आज या घटनांकडे केलेले दुर्लक्ष भारताच्या भौगोलिक, राजकीय परिस्थितीकडे बघता कदाचित पुढे महागात पडेल. तसे होणार नाही असे म्हणुया. भारतात तेलविहीरी नाहीत हे आपल सुदैव? पण भारतात प्रचन्ड प्रमाणात IT/Knowldge/education च्या खाणीतून सोने निघत आहे, american and british outsourcing च्या जंतांवर वळवळणार्या आपल्या समृध्धीच यांना अजीर्ण झाल्यास पुन्हा हेच लोक नविन कायदे, व्यापार बन्धने रुपी एरन्डेल वापरून त्याचा कायमचा निचरा करणार नाहीत याची खात्री काय? पाश्चात्त्य लोक अन देश use and throw संस्कृतीच जोपासत आले आहेत, तेव्हा आपण सावध असावे हेच बरे. उन्दीर, घुशी अन झुरळांचे शहर म्हणून प्रसिध्ध असलेले new orleans अजूनही katerina च्या मलिद्याखाली कुजतेच आहे. माणस नाही निदान त्या उन्दीर घुशीन्चे तरी पुनर्वसन यांना करता आलेले नाही आणि म्हणे महासत्ता. बेवड्याला शुध्धीवर आणायला दारूच लागते त्यातलाच हा प्रकार. ज्या स्वतंत्र, समृध्ध, अमेरीकेची स्वप्ने अन प्रतिमा उरात घेवून माझ्या सारख्या अनेक तरुणांनी आपल्या वयाची काही सोनेरी वर्शे या देशाला दिली त्याचा नागरिक म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे. The land of freedom, The Land of Equal and Justice for all हे बिरूद मिरवणारी तुमची स्वातन्त्र्य देवता अजून किती उन्दीरांशी लपंडाव खेळणार आहे कोणास ठावूक? अन त्या खुडबुडीत किती नाहक पडझड होणार आहे हे त्या nostradamus लाच ठावूक! तसा हा विषय खूपच गम्भीर अन मोठा आहे अन रोज अनेक माध्यमातून अनेक प्रकारे हाताळला जात आहे, पण कालच बुश माहाशयांचा अध्यक्शीय सन्देश अन त्याच्या एक दिवस आधी नेमके conference on global relations वरील माझ्या अगदी खास आवडत्या पत्रकार robert fisk ची मुलाखत पाहिली. तेव्हा मात्र रहावल नाही. सद्दाम ला उद्दाम म्हणता म्हणता उद्दामपणाच्या सर्व परिसीमा आम्ही गाठल्या याची जाणीव झाली. माझ्या दृष्टीने fisk सारखे डोळस, दूरदृष्टी असणारे सच्चे पत्रकार आजकाल दुर्मिळ आहेत अन तशा प्रकारचा डोळस दृष्टीकोन ठेवून पडताळे मागणारी जनताही कमी होत आहे. इतीहास खूप काही शिकवू शकतो, आमची शिकायची तयारी असेल तर, पण आम्ही गुन्तलो आहोत उन्दरांमधून idols बनवण्यात. वेळ मिळाला तर त्या मुलाखतीची transcripts जरूर वाचा. किम्बहुना फ़िस्क ने लिहिलेले अलिकडील पुस्तक "The Great War of Civilisation" हे एक अजन्म सन्ग्रहणीय पुस्तक आहे. हे उन्दीरपुराण त्या मुलाखतीमधील त्याच्याच उत्तराने सम्पवतो : (interviewer)ARRAF: We have about a minute and a half left. In one sentence could you describe what is victory for the United States and Britain here? FISK: Ah, yes, Britain. (Laughter.) I think making our prime minister accountable to his people would be a great victory, because he has led us into the folly of war against what most British people believe should have happened. I pretty much believe the same thing applies in the United States. I think that one thing that this war has done, which is deeply tragic, it has emphasized a failing in the democratic process. More and more of my letters in my mailbag are, more than half of them are coming from the United States, the rest from Britain, are emphasizing the difficulty of being a person who wants to believe in the democratic process, sends their congressman or their member of parliament to seats of power, and then finds that they no longer represent them when they reach the seat of power. That is a major problem in your country, and it is a major problem in mine. Links: http://www.cfr.org/publication/9191/iraq.html (स्वगत : गड्या आपुला गाव बरा, पैसे घेवून तरी खासदार उन्दीरांचा बन्दोबस्त करतो घरा!)
|
Bhagya
| |
| Monday, December 19, 2005 - 7:30 pm: |
|
|
छानच योग. एकापेक्षा एक मार्मिक आणि पटण्याजोगे लेख लिहितोयस.
|
Kandapohe
| |
| Tuesday, December 20, 2005 - 2:05 am: |
|
|
शेवटचे वाक्य वाचून आणि एकूण उंदीर हे शिर्षक वाचून ` सौ चुहे खाके बिल्ली हाज को चली ` आठवले. दिवा घे रे. छान लिहीतो आहेस. आपुल्या गावी परतायचा योग कधी येतो आहे मग?
|
योग, छान लिहिल हेस रे भो! पण ते ते काय करतात यावरच हे भाष्य हे, भारतान काय करायला हव ते कोण लिहिणार?
|
Gs1
| |
| Tuesday, December 20, 2005 - 6:01 am: |
|
|
योग विषय आणि लेखन छानच. पण... ज्या स्वतंत्र, समृध्ध, अमेरीकेची स्वप्ने अन प्रतिमा उरात घेवून माझ्या सारख्या अनेक तरुणांनी आपल्या वयाची काही सोनेरी वर्शे या देशाला दिली त्याचा नागरिक म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे. हे वाक्य म्हणजे कमालीचे उदात्तीकरण आहे असे वाटते. त्या देशाला आपली सोनेरी वर्षे द्यायला कोण जातो ? जास्त पैसे आणि lifestyle यांच्या लोभानेच तिकडे बहुतेक सर्व जण जातांना आढळतात. अमेरिकेलाही स्वस्त कामगार हवेच आहेत. असे करणे चुकीचे आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही, पण हे अवास्तव glorification पटले नाही. बाकी मूळ मुद्दा मान्य. अमेरिका हा भस्मासूर जगाचे नक्की काय करणार आहे ते तो नॉस्ट्राडेमसच जाणे
|
hmmm... जेव्हा क्षेपणास्त्र, आण्विक क्षेत्रात भारत पुढे येऊ पाहतोय हे लक्षात आले, तेव्हा जगातील अनेक बलाढ्य' देशांनी आदळ-आपट केली. बंधनं घातली. अशा संशोधनाशी, तंत्रज्ञानातील प्रगतीशी दुरान्वयानेही संबंध असलेल्या साधनांच्या पुरवठ्यावर भारतावर बंदी घालण्यात आली. पण स्वसामर्थ्यावर आपल्याच देशातील बुद्धिमत्तेने संपूर्ण स्वदेशी साधनसामग्री वापरून भारताने या क्षेत्रांत गरुडझेप घेतली. आणि आंतररराष्ट्रीय दर्जाची निर्मिती केली.
|
Ekanath
| |
| Tuesday, December 20, 2005 - 9:16 am: |
|
|
अनेक जण अमेरिकेत संशोधनासाठी जातात कारण संशोधनासाठी लागणारी उपकरणे भारताला परवडत नाहित. अमेरिकेत वा अन्य देशात जाऊन आवडत्या विषयाचे संशोधन करता येते. अमेरिकेला land of opportunity म्हणतात. तशा opportunity चा वापर करुन स्वतचे आयुष्य समृद्ध करणारेही बरेच आहेत. ह्यातली काही लोक परत देशात येतात, अशीही उदाहरणे आहेत. फक्त पैशासाठीच जातात, अशीही उदाहरणे आहेत. ते सध्या IT मुळे वाढले. जसे पहावे तसे दिसते. कदाचित आपल्याला जे मिळाले नाही, ते इतरांना मिळते, याचा जळफळाट होत असावा.
|
Pama
| |
| Tuesday, December 20, 2005 - 10:36 am: |
|
|
योग छान लिहिलयस. बुश साहेबांची बिनबुडाची भाषण आम्ही इथे नेहमीच एकतो. ते बोलतात ते गुळमुळीत लॉलीपॉप चघळावी तशी तीच तीच वाक्य एकून कान आणि डोळे बधीर झाले आहेत. या अख़्ख़्या अमेरिकेत एकही असा माणूस नाही जो या बुशला जाब विचारू शकतो? पत्रकार विचारतात, आपली मुले बाळे गमावलेले माय बाप विचारतात पण ते त्या बुशच्या कानात शिरत नाही किंवा त्याचे कानाचे पडदे सारून आत ओतले जाते तेव्हा, मला फार दु:ख आहे पण काय करू, माझ्या चुकीचे( कबूल करणार नाही मी ते!) प्रायश्चित्त तुम्हाला केलेच पाहिजे असे उत्तर मिळल्या सारखे वाटते. युध्द्दा आधी UN मधे बाटली नचवुन याच्या कितीतरी पट biological weapons बिळात दडलेले आहेत आणि ही घ्या त्यांची चित्रे म्हणून नाचणारे आता मात्र, अरे! होते की इथेच नेले वाटत कुणीतरी.. अशी निर्लज्ज सारवासारवी करतात याचा जाब या अख्ख्या जगात कुणी विचारू शकत नाही याची चीड यावी की लाज वाटावी? इथे रोजच्या बातम्या एकल्या की जाणवत की सत्ताधारी आणि सामान्य जनता हे दोघे, दोन धृवावर आपण दोघे असे जगतायत. सामान्य माणूस वेगळ्याच जगात आहे. युद्धाबद्दल संताप व्यक्त करून तो आपल्या कामाला लागतो. सत्ताधारे, हो रे बाळा! कळतय मला, म्हणून त्याला चुचकारू त्याच रड थांबवत आणि आपल्या विश्वात जातो. त्या तिसर्या वोश्वात असलेल्या लोकांचे काय याचा मात्र कोणीच विचार करताना दिसत नाही.
|
Rar
| |
| Tuesday, December 20, 2005 - 1:58 pm: |
|
|
'उंदीर पळाला' ही cencept च मुळात ज्यांचा अशा भूलीवर्/समजावण्यावर विश्वास बसू शकतो' अशा लोकांसाठी आहे असं नाही का वाटत? एखादा मोठा माणूस रस्त्यात पडला, तर आपण त्याला ' बघ उंदीर पळाला ' असं नाही सांगायला जाणार, कारण त्याला मुळात ' असा कोणताही उंदीर ' नसतोच हे माहीत असते! ह्या लेखाच्या reference मधे बोलायचं झालं तर लोकं डोळसपणे आपल्या आजूबाजूला, जगात काय चाललयं हे बघत नाहीत. अशा लोकांना कोणी ' उंदीर पळाला ' म्हणून ' फ़सवलं ' तर दोष कोणाचा? so called फ़सवणार्याचा का? का स्वत्:ला फ़सवून घेणार्याचा! CIA in general 'game' करण्यासाठी पहिल्यापासूनच प्रसिध्ध आहे. The Cia's black Ops नावचं i guess John Jacob चं पुस्तक आहे. आणि पुस्तक कशाला रोजच्या बातम्या जरी follow केल्या तरी समजतं की world map च्या almot सगळ्या देशाच्या घडामोडीमधे CIA चा हस्तक्षेप आहे. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा हे आपल्या हातात आहे. कोणतेही राज्यकर्ते ' केवळ लोकांच्या कल्याणासाठी सत्तेवर आलेत' अशी ideal situation कधीच नव्हती आणि नसणार आहे हे अनुभवातुन आपल्याला कळायला हवं. सामान्य लोकांना कोणीतरी फ़सवतय, ह्याचा सगळा दोष फ़सवणार्याला देण्यात काहीही अर्थ नाही. तितकाच दोष फ़सवून घेणार्याचा म्हणजेच आपलाही आहे असं मला वाटतं. आणि खरं सांगायच तर आपणही लहान मुलांच्या बाबतीत ' सोयिस्करपणे ' हे उंदीर पळाला वगैरे म्हणतोच की, त्याला प्रेम माया वगैरेची आवरणं घालून! आपलीच शिकवण आपल्यालाच थोड्या वेगळ्या संदर्भात भोगावी लागतीये इतकच! आणि frankly speaking हे इतक्या वरच्या level चे राजकारण आहे की सामान्य माणसाचे हात तिथे पोचणे खूप अवघड आहे.
|
Yog
| |
| Tuesday, December 20, 2005 - 2:52 pm: |
|
|
मंडळी, प्रतिक्रीयांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! सर्वांनीच काही चान्गले मुद्दे मांडले आहेत. GS1, काहितरी गैरसमज होतोय तुझा, कसलेही उदात्तीकरण नाहिये रे. एक लक्षात घ्यायला हव की वयाच्या चोविशीत इथे येणारे अन पुढील दहा वर्श, शिक्षण, नोकरी, इत्यादीतून पुढे GC किव्वा नागरीकत्व घेईपर्यन्त तरुणांना अनेक समस्या, कष्ट यातून जावे लागते. its not that easy like it used to be in old times याहीव्यतिरीक्त, अमेरीकेचा खजिना भरण्यात त्या तरूणाचा वा कुटुंबियांचाही वाटा असतोच via tax etc . आणि फ़क्त भारतीयच नाही, इथे immigrate होणारे इतर देशातील बरेच जण याच मार्गाने जातात. ठीक आहे काही प्रमाणात समृध्धी, पैसा, सन्धी हे पाहून इथे मनुष्य आला तरी स्वताच्या वैयक्तीक वा कौटुम्बिक समृध्धीबरोबर तो समाजाच्या विकासासाठी प्रत्त्यक्ष, अप्रत्त्यक्ष रित्या हातभार लावतोच की, so giving it a back to the society to make it a better place to live या व्यक्तीच्या प्रामाणिक हेतूबद्दल शन्का आपण घेवू शकत नाही. पण याचा अर्थ असाही नाही की इथे अशी आयुष्याची दहा वर्शे खर्च केलेल्यांनी काही अपेक्षाच ठेवू नयेत. (आजच्या जगात तर माझ्या मते वयाची वीस ते चाळीस वर्शे हा काळ सर्वात मह्त्वाचा. जे काही मिळवायच, जमवायच असत तेच याच काळात नन्तर वय, कुटुम्ब इत्त्यादी अनेक बाबीन्मूळे वेळ निघून गेलेली असते. अपवाद आहेत पण ते फ़क्त अपवाद असतात.)तेव्हा त्या दृष्टीकोनातून विचार केलास तर कदाचित तुला या लेखातील बोच जाणवेल. आणि ते प्रातिनिधीक आहेच असे मि म्हणत नाही, पण इथे आलेल्या माझ्या समवयस्क पिढीमधे तरी ती भावना दिसून येते. Rar, of course उंदीर पळाला हे प्रतिकात्मक उदाहरण आहे, no adult falls for it! . पण तरिही तुझ्या शेवटच्या विधानाशी मि पूर्णपणे सहमत नाही. निवडून देणारे सामान्यच असतात, सामान्यांनीच इतकी ओरड केली म्हणून निदान बुश काहितरी उघड बोलतो तरी आहे. वेळ लागेल, पण हात पोचणे निश्चीत अवघड नाही, albeit its too late, as the damage is already done . बाकी फ़सवणुकीबद्दल एक म्हण आहे, shame on you if you fool me once, shame on me if you fool me twice!
|
Chinnu
| |
| Tuesday, December 20, 2005 - 6:01 pm: |
|
|
तुम्ही फ़ार छान लिहिता योग, यात शंकाच नाही! तुम्ही मांडलेले विषय आणि कोपरखळ्या देणारी उदाहरण, खुपच छान आहेत. ज्या हेतुने तुमचे लिखाण चालते, तो तुमचा जीवनाशय साध्य होवो, हीच सदीछ्छा!
|
Gs1
| |
| Wednesday, December 21, 2005 - 2:07 am: |
|
|
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद, योग. सोनेरी वर्षांबद्दल दुमत नाही. त्या सोनेरी वर्षांचा बराच फायदा अमेरिकेला झाला याबद्दलही नाही. फक्त देणार्याने देतांना ती स्वत : ला दिली की जाणीवपुर्वक अमेरिकेला द्यायची म्हणून दिली याबद्दल दुमत आहे. पण मूळ लेखाचा आवाका बघता हा अगदीच छोटा मुद्दा आहे, त्यामुळे इथेच थांबतो. लेखन छान आहेच. असेच सातत्याने येउ दे.
|
Asami
| |
| Wednesday, December 21, 2005 - 12:03 pm: |
|
|
yaÜga (a vaoLcaa 2020 pha AaNaI maga [qao kaihtrI ilahI ro
|
Giriraj
| |
| Sunday, January 01, 2006 - 2:13 am: |
|
|
लगे रहो योग!अश्या प्रकारचं लिखाण वेळोवेळी झालच पाहईजे!
|
Dineshvs
| |
| Sunday, January 01, 2006 - 12:44 pm: |
|
|
योग, लेखनातील पोटतिडिक जाणवली. याच विषयावर, हल्ली बरेच लेखन होतेय. गोविंद तळवलकरांचा एक लेख हल्लीच वाचला. अमेरिकेत ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी प्रयत्नशील असणार्या टिव्ही, रेडिओ चॅनल्स बद्दल वैगरे त्यानी लिहिले आहे. आणि अर्थातच या अनुषंगाने अमेरिकेच्या मुखवट्या आडच्या चेहर्याबाबत देखील.
|
|
|