|
Yog
| |
| Thursday, December 15, 2005 - 7:13 pm: |
|
|
(काही तान्त्रिक बिघाडामूळे, कुठल्याही " जादु " मूळे नव्हे, साप्ताहिकी या आठवड्यात दोनदा प्रदर्शीत केली गेली त्याबद्दल दिलगीर आहोत.) आजची साप्ताहिकी : खसखस. गेले काही दिवस एक नविनच खसखस पिकली होती, आहे.. अन साधी सूधी नाही खास लोकांची खास खसखस. बरोबर ओळखलत, खासदारांची लाच घेण्याची खसखस. माफ़ करा ह, लाच हा शब्द जरा अगदीच कोरडा अन कायदेशीर वगैरे वाटतो, आपण प्रश्णोत्तराची खसखस म्हणू. आता हेही काही खर तर नविन नाही. पण रामशास्त्री प्रभूणेंची नविन पैदा झालेली रिमीक्स वंशावळ म्हणा किव्वा सोनाराने कान टोचले म्हणा, या नव्या टोचण पध्धतीच्या sting operation पत्रकारीतेतून अशा बड्या धेन्डांना नको त्या वेळी नको तिथे टोचल्याने सर्व बिन्ग फ़ुटत आहेत. हे खासदारांच प्रकरण त्यापैकीच एक. आणि इतर राज्यकर्ते जणू आपण त्या गावचेच नाहीत वा हे आधी पाहिलेच नाही या गान्धीजींच्या माकडांच्या थाटात आता मात्र बोम्ब मारत आहेत, अगदी त्यात सोनीयांच्या पायाशी आपली सर्व अस्मिता वाहिलेले " पॉवरवाले " पण आहेत. जे पकडले गेले ते आपल्या नशीबाला दोष देत असतील अन जे अजून पकडले गेले नाहीत ते अधिक सावध होतील. यातून अशा गोष्टी पूर्णपणे बन्द वगैरे पडतील इतकी महान अपेक्षा नाही पण निदान लोकान्च्या मनात भिती बसली तरी पुष्कळच. पण इतक होवूनही यान्च्या नावाने उलटी बोम्ब मारणारे पुन्हा निवडणूकांच्या वेळी मोजणी करायला पुढे असतीलच. (मला वाटायच मत मोजणी होते, पण निकाल तर पेटी मोजणीवर ठरतात.) पण सन्ताप येतो तो याचा की या गेंड्यांना फ़क्त निलम्बीत केले? म्हणजे कायदेशीर कारवाई काही नाही? मला वाटल होत लाच देण वा घेण दोन्ही दखलपात्र गुन्हा आहे. मग फ़क्त निलंबनावर यान्ची सुटका कशी काय तेही तात्पुरते. आयुष्यभर यांना कुठल्याही सरकारी वा खाजगी कचेरीत नोकरीवर न घेण्याचा काही कायदा नाही का? किम्बहुना लोकांनी निवडून दिलेल्या(अस तेच म्हणतात्) या लोकप्रतिनिधींसाठी अधिक कडक वा कठोरच शिक्षा हवी. एरवी यान्च्या घरातील सकाळच्या टिन्ग टॉन्ग पासून रात्री पर्यन्तच्या सर्व टान्ग टून्ग कारभाराची बिले सरकार म्हणजे पर्यायाने आपणच भरतो ना? diplomat नावाखाली यांना इतर सवलती मिळतात ते वेगळच अन या शितांबरोबर भोवतालच्या भुतावळी लवाजम्याचा खर्चही आपणच देतो, मग त्या बदल्यात यांना कठोर नियम लावले तर बिघडले कुठे? अर्थात अजूनही आपली घटनाच जिथे मागासलेली आहे तिथे काय बोलणार? कुणिही उभे रहा, पैसे टाका, बाईच्या, स्वामीच्या नाहितर मौलानाच्या पायावर लोळण घ्या मग सर्व खास दारं तुमच्या साठी खुली. मला वाटत आमदार अन खासदार हे शब्द पूर्वीच्या दिवाने आम अन दिवाने खास यातून आले असावेत. आम म्हणजे सामान्य जनतेचा दरबार, खास म्हणजे फ़क्त राजे दरबारी वा मंत्री मंडळासाठी. भारत सरकारने ही परम्परा पण कौतुकास्पदरित्या टिकवली आहे. जयपूर च्या प्रसिध्ध किल्ले, वा city palace मधे गेल की दिवाने आम मधे सर्वत्र कावळे शिटलेले, फ़ुटलेले चौथरे, भेगाळलेली छते, अन दिवाने खास मधे मात्र अजूनही चान्गली डागडूजी, मन्द सुवासिक अत्तरे, झालच तर आरसे, सगमरवर वगैरे. वाह! त्याचनुसार खासदाराची मौज अन चन्गळ आमदारापेक्षा अधिक, अन त्यानुसार यान्चे देण्या घेण्याचे रेट्सही अधिक असतील. त्यातही काही मराठी अन ब्राहमण नाव पाहून अधिक धक्का बसला. थोडक्यात त्या धक्क्याने जाग आली अन सत्ता अन लालसा जात पात धर्म भेद मानत नाही हे पटल, त्या अर्थाने आपली लोकशाही पूर्णपणे धर्मनिरपेक्षच म्हणायला हवी. एकेकाळी ब्राह्मण मनुष्य म्हणजे शेन्डी तुटेल पण संस्कार सोडणार नाही म्हणून प्रसिध्ध होता, अन आता सत्तेसाठी शेन्डीच काय, कमरेच सोडायला देखिल कुणि मागे पुढे पहात नाही. वृत्तपत्रात प्रसिध्ध झालेले एकेक चेहेरे म्हणजे रेशन अन तेलाच्या दुकानावर बसलेल्या त्या तेलकट्ट लट्ठ शेटजी सारखेच भासतात, फ़क्त " किती गळतय " यावर लक्ष! मि म्हणतो यांनी रीतसर एक दुकान थाटाव लोकसभेच्या बाहेर, अन " आज का भाव " म्हणून पाटी टांगावी निदान धन्दा अधिकृत तरी होईल नाहितर लवकरच लोकसभेबाहेर एक का दस, दो का बीस, करत यान्चे दलाल प्रश्णोत्तरांचा एक अदभूत सट्टा सुरू करतील अन मोठीच पन्चाईत होवून बसेल. या निमिताने पुन्हा एकदा टोचण्(कन्त्राटि भाषेतही याचा अर्थ अगदी चपखल बसतो बघा, असे की रस्त्याच्या कडेला अनधिकृत वहान उभे केले की पालीकेची गाडी येवून ते उचलते, त्याला टोचण म्हणतात. म्हणजे निवडून वेगळे करणे, गळ लावून उचलणे.)कारवायांच( sting operation ) कौतूक होत आहे. आपल्याकडे सावळा गोन्धळच इतका आहे की देशप्रेमाने वगैरे भारलेल्या तरूणांनी टोचण करियर चा जरूर विचार करावा, यश हमखास अन job satisfaction guaranteed! आता राजकारणात अशी खसखस तर तिकडे क्रिकेट मधिल दादाची दादागिरी मोडून काढल्याची खसखस. हा सर्व " पॉवर " गेमच आहे काय अशी शन्का मात्र येते. की राजकारण अन क्रिकेट दोन्हिकडे एकाच वेळी गडबड हा निव्वळ योगायोग समजायचा का? सध्ध्या गान्गुलीला भानामतीने(बारामतीने नव्हे)घेरल्यागत भासत असेल. जाईल तिथे पत्रकार अन कॅमेरा चा गोतावळा त्याला घेरतो. अन आश्चर्य म्हणजे त्याला जणू सक्तीने निवृत्त करायचा घाट आमच्या " आवड निवड " समितीने घातला आहे. ठिक आहे म्हणा कधी गान्गुलीनेही अधिकारांचा गैरवापर करून कुणाच्या तरी शेपटावर पाय दिला असणार त्याशिवाय हे बोके इतका खार खावून नसतील. डाल्(मिया) अन रसगुल्ल्याची सवय जडलेल्यांनी आता खास महाराष्ट्रीय झणझणीत मिसळीची चव घ्यायला तयार रहाव हेच खरं. मात्र एक आहे, बिन्डोकपणाच सूत्र मात्र " आवड " समितीने कायम ठेवलय त्यात काही बदल अपेक्षित नाही. आकडेवारी अन फ़ीटनेस च्या निकषावर तर सचिन,सेहवाग्(तरूण रक्त अन प्रतिमा असलेल्या सन्घात अस ऐन उमेदीच्या काळात केस गळणे शोभून दिसत का? मग अनफ़ीटच की तो), अन आता गम्भीर देखिल सहा महिने बाहेरच बसायला हवे होते(सचिन होताच्) पण राष्ट्रीय दैवतांचे असे दगड बनवून कस बरं चालेल त्यांना आम्ही कायमचा शेन्दूर फ़ासलेलाच आहे तुम्ही माना किव्वा नका मानू. स्टिव वॉ च्या सन्घाविरुध्ध(ऑस्ट्रेलियात मुलांना " F " ची बाराखडी शिकवतात काय असा मला दाट संशय आहे) तेव्हा डोळ्यात डोळे घालून " भ " ची बाराखडी ऐकवणारा निदान तशी रोखठोक मानसिकता(बॅट ने नाही तर निदान शब्दांनी तरी ठोक्) आपल्या सन्घात रुजवणारा गान्गुलीच होता अन तेव्हा ती पिकलेली खसखस आम्ही आवडीने चघळली होती. पण आता? राजकारण, क्रिकेट मग बॉलिवूड कसे मागे राहील? ही तर आपली तीन दैवते आहेत. सध्ध्या तिकडे लग्नाची खसखस पिकली आहे, म्हणजे खर्याखुर्या, पडद्यावरील नव्हे. नशिली आखे वाल्या फ़रदीनने(फ़रदीनने नुसत बघितल तरी उसाच्या रसाचा रन्गही तपकिरी होतो म्हणे, something like brown sugar )एकेकाळच्या(?) hot अभिनेत्री मुमताज च्या मुलिशी लग्न केले. खर तर या खान घराण्यातील इतकी नाव अन इतक्या जोड्यांनी पडद्यावर एकमेका बरोबर भूमिका केल्या आहेत की खरी खुरी नाती सुध्धा " ताटातलं वाटीत " केल्यागत वाटतात. तर अर्थातच चान्दीच्या ताटातून सोन्याच्या वाटीतला हा सोहळा नुकताच सम्पन्न झाला म्हणे. अरेरे! गान्गुलीच एक हक्काच जेवण हुकल असेल. आता आतल्या गोटातील बातमी अशी आहे की पपा बडे मिया बिग बी यांनी आता अभिषेक ला सान्गितल आहे की बाबारे आजकाल लोकप्रिय आहेस तेव्हाच उरकून घे, अलिकडे मिही जरा थकलोय, आता तुझ्या आईलाही घरकाम होत नाही, (अमिताभ खास चन्द्रकांन्त गोखले स्टाईल पोटतिडकीने मराठी बोलतोय, समजून घ्या.. नाहितर जया आणि घरच काम?)पुन्हा उशीर केलास तर हातची चान्गली स्थळं निघून जातील. अर्थात मोठ्यांच्या सर्व गोष्टी मोठ्याच तद्वतच यातील स्थळं हा शब्द मात्र लग्नानतर जायच्या हनिमूनच्या स्थळासंबंधी आहे! वडीलांच्या मराठमोळ्या विनन्तीला मान देवून अभिषेकनेही आता खास मराठमोळ्या स्टाईलने राजा " रानी " च advance बुकींग कराव हेच बरं. कालाचा महिमा अजब असतो हेच खर. पूर्वी फ़राळाच्या करंज्या, कधी लाडू, कधी अनारसे, इत्यादी मधे छान खसखस घालून पदार्थ बनवले जायचे, काय खमंग चव येत असे. आता अलिकडे आईला होत नाही तेव्हा बाजारातील खड्यांचा फ़राळही आम्ही खसखस समजून गोड मानून खाल्ला. तर मुद्दा काय, आम्हाला फ़राळ हवा असतो, तेव्हडेच जरा तोन्डाला चर्वण. असाही जमाना publicity चा आहे, तेव्हा जितका रवन्थ तितके बाईट्स! अलिकडची ही सर्व खसखस हाही त्यातलाच एक प्रकार.
|
Lampan
| |
| Friday, December 16, 2005 - 12:15 am: |
|
|
jaÜrdar laoK .. sakaLI sakaLI KmaMga ÔraL imaLalaa AaiNa DÜ@yaalaa BauMgaa laagalaa ...
|
Yog, अजून वाचतोय.. पण दिवाने ' आम ' दार आणि ' खास ' दार हे खास आहे ! लेखाचे नाव बदलून खासखास ठेव
|
Paragkan
| |
| Friday, December 16, 2005 - 10:05 am: |
|
|
Good one re !
|
Chinnu
| |
| Friday, December 16, 2005 - 11:26 am: |
|
|
योग, , निकाल खरोखरच पेटीमोजणीवर अवलंबुन असतो.. सही!
|
Supriyaj
| |
| Friday, December 16, 2005 - 12:47 pm: |
|
|
yog,phaar chhan lihila.n aahes.योग, फारच चांगला लेख लिहिला आहेस. with a fantastic observation.
|
Prajaktad
| |
| Friday, December 16, 2005 - 2:30 pm: |
|
|
योग!जबरी टिपलय रे सगळ.... दिवाने ' आम ' दिवाने ' खास ' तर मस्तच!.
|
Pama
| |
| Friday, December 16, 2005 - 2:47 pm: |
|
|
योग, good one!perfect observations
|
Gs1
| |
| Saturday, December 17, 2005 - 1:20 am: |
|
|
मस्त रे योग. आता दर आठवड्याला अशी खसखस पिकू दे
|
Giriraj
| |
| Saturday, December 17, 2005 - 4:10 am: |
|
|
वाह! अश्या एखाद्या सदराची कमी होती मायबोलीवर! मस्तच केलंस!
|
Champak
| |
| Saturday, December 17, 2005 - 1:30 pm: |
|
|
योग, तुला अश्या प्रकारच्या लेखनातुन काय अभिप्रेत आहे?
|
Milya
| |
| Monday, December 19, 2005 - 3:33 am: |
|
|
योग छान लिहिले आहेस.
|
|
|