Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
toro maoro baIca mao ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » toro maoro baIca mao « Previous Next »

Divya
Tuesday, December 13, 2005 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम लव या शब्दांमधेच जादु आहे ना? अगदी सगळ्यांना भुरळ पाडणारी. प्रेत्येक तरुण तरुणींच स्वप्न आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा, तो आपण शोधावा म्हणजे आपल लव मॅरेज व्हाव.. एक गोड स्वप्न. चित्रपटां मधुन दाखवतात तस गाणी गुणगुणायला लावणार काहीतरी थ्रील असलेल आपण करतोय, आमिर खानच्या पहला नशा या गाण्यासारख तरंगत ठेवणार.

शाळेतल्या काही नववी दहावी च्या मुलांच्या तोंडी सुध्दा असत तर माझ किनी त्या मुलीवर प्रेम आहे...प्रेम म्हणजे काय नक्की कळालेलही नसत त्या वयात प्रेम सुध्दा होत, हसु आल ना.. गंमत नाही वस्तुस्थिती आहे. कॉलेज मधे तर तारुण्याचा नुसता सळसळता उत्साह एखादी मुलगी नुसती आवडायचा अवकाश लगेच तिच्यावर प्रेम जडते अगदी love at first sight हीच ती जिच्या मी शोधात होतो आणि मग तिच चिंतन सुरु आभ्यास नको, करीयर नको ते काय रे नंतर करता येइल... फ़क्त तिने मला हो म्हणाव... काय कमी आहे माझ्यात... ती अशी का करते? नाही का म्हणते?..... तु हा कर या ना कर तु है मेरी... हिरोंचे आदर्श आहेतच समोर. या सगळ्या भुलभुलय्यात वेळ आणि वय कस भुरकन निघुन जात. मुलगी नाही करीयर नाही. अगदी दहावी बारावीत बोर्डात आलेले सुध्दा या मोहजालात फ़सतात.

नाहीतर काही जणांना ती हो म्हणते मग सुरु होत अफ़ेअर गुपचुप भेटण्यातली गोडी जरा जास्तच रंगत आणते... शेवट गोड झाला तर लग्न होते, विरोध झाला तर जास्तच प्रेमाला धार येते, मग पळुन जाउन लग्न अजुनच थ्रील... तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अन्जाना.... बर्याचदा हे अन्जाना बंधन शारिरीक आकर्षण असत ते नव्याचे नऊ दिवस सरल्यावरच कळत पण तो पर्यन्त बराच लेट होतो. आधी किती कौतुक असत आपल लव्ह मॅरेज आहे हे सांगायला, अगदी स्वताला नशीबवान म्हणत असतो पण खटके उडायला लागले कि वाटत कुठे डोक गाहाण ठेवल होत प्रेम करताना कुठे बोलायची सोय नाही राहीली. खरच सोय राहीलेली नसते आपलेच दात आणि आपलेच ओठ.

मग काय प्रेम वगैरे सब झुठ का? का ते फ़क्त चित्रपटात दाखवतात ते खोट खोट भातुकलीच्या खेळासारख, खर प्रेम आहे का नाही जगात? हो आहे ना नक्कीच आहे पण खर प्रेम जाणुन घ्यायचा प्रयत्न किती जण करतात? शारीरीक आकर्षण हे एका मृगजळासारखे असते त्याच्या पाठीमागे धावुन नाहक दमछाक मात्र होते. एखादी व्यक्ती आवडण म्हणजे प्रेम होत का? प्रेमात पडायला फ़क्त आवडण पुरेस आहे का? चित्रपट तुम्हाला स्वप्न विकतात. प्रेमाच स्वप्न बघायला कोणाला आवडणार नाही पण स्वप्नात आणि वास्तवात फ़रक असतो हेच लक्षात घेतल जात नाही.

प्रेम हे सहवासाने निर्माण होते.प्रेम होण्यासाठी ती व्यक्ती आवडण तर जरुरी आहेच पण त्या ही पेक्षा गरज आहे त्या व्यक्तीला आपण पुर्ण ओळखण, त्याच्या गुणांइतकच दोषांसकट ती आवडण, त्याच्या स्वभावातल्या खाचाखोचा कळण आणि आपलेही प्रॉब्लेम्सची, गुणावगुणांची माहीती असण आणि त्याला ती व्यक्ती ऍडजस्ट होइल अशी खात्री, विश्वास म्हणजे प्रेम. नुसत तुम्हाला प्रेम वाटुन उपयोग नाही त्या ही व्यक्तीला तितक्याच ऊत्कटतेने तुमच्याबद्दल वाटते का? हे बघणही जरुरी आहे नाहीतर ते एक तर्फ़ीच होइल.

आजकाल लव मेरेज करणार्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्याचप्रमाणात घटस्फ़ोटांची सुध्दा. कारण प्रेम म्हणजे शारीरीक आकर्षण हेच समीकरण बर्याचदा असत. कुणीतरी आपल्यावर प्रेम करणार असाव यात आपल्याला समजुन घेणार असाव हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामानाने ऍरेन्जमॅरेज बरेच यशस्वी होतात कारण त्यात थोड ऍडजस्टमेन्ट करायची मानसिक तयारी असते, तेवढा वेळ द्यायची तयारी असते.

आजकाल चित्रपटात आणि मालिकांमधे जास्ती करुन आढळणारा विषय म्हणजे ex-marital affair . त्यांना फ़क्त जे विकत घेतल जात तेच बनवायच असत आणि विकायच असत, बाकी आपण जे दाखवतो त्याचा जनमानसा वर काय परिणाम होतोय याच्याशी त्यांना काडीच देणघेण नसत. होउ घातलेल्या हिरोंची प्रतिमा लग्नानंतर सुद्धा परत प्रेमात पडणार्याची, त्यात पण काहीतरी थ्रील. पण एव्हाना बरीच मॅच्युरीटी आलेली असते त्यामुळे सगळेजण त्या वाटेला जात नाहीत पण जर मॅच्युरीटी कमी पडली, जबाबदार्यांपेक्षा त्या थ्रील मधे गोडी वाटली तर ती व्यक्ती स्वताबरोबर बरोबरच्या लोकांच आयुष्य बरबाद करते. लग्नाआधी अफ़ेअर हा मॅच्युरीटी नसतानाचा केलेला येडेपणा म्हणुन सोडुन देता येइल पण लग्नानंतर या गोष्टी फ़ारच सिरीयस होतात.

आता चित्रपटातल बघुन कोणी असे उद्योग करेल का? एक दुजे के लिये रिलीज झाला तेव्हा आत्महत्या करणार्या युगुलांच प्रमाण वाढल होतच. ते कशाला डर सारख्या चित्रपटामुळे तरुण मुलांच मुलींना त्रास देण्याच प्रमाण वाढल होत, त्या हिरोगीरीतच धन्य मानण्याच. किती प्रमाणात चित्रपट आपल्या टीनएजर्स वर प्रभाव टाकु शकतात हे इथेच कळते. मग जे दाखवतात तेच खर अस मानल तर त्यांच तरी चुकल कुठ? स्मिता तळवलकरच्या सातच्या आत घरात या चित्रपटात वास्तवाच रियलाइज झालेले तरुण तरुणी फ़ार छान दाखवले आहेत. हे माझ आयुष्य आहे मला मी पाहिजे ते करेल हे चित्रपटातच शोभणारी वाक्य आहेत हे कळेपर्यन्त बरच पाणि पुलाखालुन गेलेले असते.

आपल्याकडची शहरातली संस्कृती ही पाश्चात्यांच्या वळणावर जाउ पाहातेय कदाचित थोडी फ़ार गेलीही आहे म्हणा त्यांना हे ठाउक नाही कि हीच संस्कृती एक असुरक्षितता पण घेउन येतीये. एक इन्सेक्युरिटी जी आपल्या लाइफ़ पार्टनरची गॅरेन्टी न वाटणारी, परस्परांमधला विश्वास कमी करणारी. गरज आहे आपल्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची. प्रेम आणि आकर्षण यातील सीमारेषा सांगण्याची. त्यांना दुरदृष्टीने त्यावर विचार करायला लावण्याची. त्यासाठी आइवडिलांचे मुलांशी मैत्रीपुर्ण संबंध असायला पाहिजेत. विरोधाला विरोध न करता त्यांच्या कलाने त्यांना समजाउन सांगण्याची जास्त गरज आहे. आणि स्वता तरुणांनी यावर विचार करुन नक्की प्रेमाचा अर्थ शोधण्याचीपण, त्यातच त्यांच्या सुखाच समाधानाच सार दडलेल आहे.


Meggi
Wednesday, December 14, 2005 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ivacaar caaMgalao maaMDlao AahotÊ idvyaa. pNa Ajauna ]dahrNao dota AalaI AsatIÊ qaÜDM ivas~\t ilaihta AalaM AsatM

Apurv
Wednesday, December 14, 2005 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ivaYaya AgadI yaÜgya va kaLacaI garja AÜLKUna inavaDlaa Aaho. far Cana p`karo maaMDlaa Aaho. KrcaÊ yaÜgya maaga- daKvaNaaro ica~pT AaiNa maailaka (aMcaI kmaI Aaho AaiNa kÜNaI banavalaoca tr to evaZo p`BaavaI hvao kI tÉNa ipZIlaa AakYau-na GaotIlaÊ Aqavaa pXcaa%ya ivacaaraMcya tulanaot to kalabaa( vaaTtIla. p`pMca naavaacaI ek maailaka AitXaya ]%ËuYT hÜtI. AjaUna AXyaaMcaI garja Aaho.

Moodi
Wednesday, December 14, 2005 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या मस्त लिहिल आहेस, थोड मोघम वाटतय. समर्पणाची भावना आता कमी होत चाललीय, अपेक्षा वाढुन मला हे हवच, अन मी ते कसेही करुन मिळवणार ही जिद्दी वृत्ती निदान प्रेमात तरी नको वाटते.
डर सारख्या पिक्चरमुळे आधी होती ती विकृती जास्त वाढली हेही खरे.


Sas
Wednesday, December 14, 2005 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Divya खुप छान लिहीलय
Keep it up

Rupali_rahul
Saturday, December 17, 2005 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या छान लिहिल आहे.
त्या पकाव सास - बहु मालिका त्यांतिल एकएकाची दोन दोन लग्ने त्यांची अफ़ेअर बघण्यापेक्षा काहितरी जिवनात उपयोगी पडणारी माहीती किंवा शिक्षण देणारे कार्यक्रम चालु केले तर बर होईल. तसे तर नको ते बोअरिंग दाखविण्यपेक्षा आत्ता जे रीऍलिटि शोज होत आहेत ते नक्किच स्वागतर्ह आहेत पण त्यातिल रिऍलिटी कित्ती खरी आहे त्याबद्द्दल जास्त शंका येते. काय म्हणुन ते आपल्या पब्लिसिटीसाठी करत नसतिल???
पण तुझा मुद्दा मला फ़ारच आवडला..
मूडी तुला माझे अनुमोदन आहे.


Nilyakulkarni
Saturday, December 17, 2005 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या एकदम छान विषय आहे.. अपुर्व खरच प्रपंच मालिका कौटुबिक बन्धिलकि दाखवनारीच होती...म्हनजेच अनुकरन करन्यासाठी खुप काही आताही आहे...फक्त आपले डोळे उघडे असले पाहीजेत असे म्हन्टले पाहिजे.
माझ्या महितल्या दोघानि लव मरेज केले ४ वर्ष झाले पन मुलिचे बाबा अजुनही तिच्याशी बोलत नाहीत... मग या दोघानि काय मिळवले... असेही वाटते ना आता त्यानच्या मुलांना आजोबा आजी यांचे प्रेम मिळेल का... कोनी म्हनेन वडलानि नको का समजुन घ्यायला..
असुदे....

खरोखरच खुप प्रकाश टाकला पाहीजे या विषयावर....



Anjalisavio
Saturday, December 17, 2005 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप तु म्हणतेस ते अगदी योग्य आहे. पण आज असे उपयोगी कार्यक्रम जर दाखवले तर कोण बघणार आहे? आणि ज्यांच्या साठी हे असतील ते बघणार आहेत का? कदचित नाही. अग आजकाल तर त्या सासु सुना , दुसरे लग्न अशीच रद्दी चांगली खपते.
मार्गदर्शन म्हणशील तर मला एक सांगावेसे वाटते निदान माझ्या बाबतीत तरी.
माझे माहेर मराठमोळे आणि सासर गोव्याचे (ख्रिश्चन). सगळ्याच गोष्टि खूप वेगळ्या होत्या. घरात जरी बाकी कुणी नसले तरी आणि सासुने खूप जमवुन घेतले तरी कधी खूप चिडचिड व्ह्यायची, वादावादी व्ह्यायचि . पण ह्यात सगळ्यात सांभाळुन घेतले ते नवरोबाने आणि ट्रेनच्या मैत्रिणींनी. दोनही घरुन लग्नाला जबरदस्ती ने परवानगी मिळाली होती. (मिळवली होती हा शब्द जास्त योग्य आहे) मुलात काही दोष नाही फ़क्त आपल्या जातीचा नव्हे धर्माचा नाही. बास. पण घरुन नाही म्हटले तरी नाराजी होतिच. त्यामुळे सणवार तर केले पण एक उपचार म्हणुन. ही जागा शेवटी भरुन काढली ती ह्याच मैत्रिणींई. ग्रुप मधल्या सगळ्या जणी मिळुन कोणाची मंगळागोर, कुणाचे डोहाळजेवण, केळवण, बाळंतविडे करत. उन्हाळ्यात भरतकाम चालायचे, कधी विणकाम चालायचे. तो ट्रेन मधला एक दिड तास फ़क्त आपल्या हक्काचा फ़क्त आपल्या स्वताचा. ह्यात आपल्या शंकाचे निरसन व्हायचे, मैत्रिणी एकमेकांना सल्ले द्यायच्या ( चांगलेच सल्ले) . ह्यामुळे मनातिल मळभ ही लगेच निघुन जायला मदत मदत होते. ह्याच ट्रेन संस्क्रुति वर बरेच जणांनी नाके मुरडली होती. पण जर काही चांगले मिळत असेल तर लोकांनी घ्यावे. ofcourse काय चांगले काय वाईट हे ठरवण्या इतकी आपली कुवत हवी.
नंतर पुढे ठाणे सुटले , ट्रेन संस्क्रुती गेलि पण इथे आल्यानंतर खूप busy असुनही फ़ार एकटं वाटायला लागले आणि एक दिवस अचानक मायबोलि विषयी कळले. आधी फ़क्त वाचत होते , कुठे काय चालतेय ते बघत होते. मनात खूप काही होते , खूप काही विचारायचे होते, पण माहित नाही जमत नव्हते. शेवटी एक साधाच प्रश्न पण खूप दिवस भेडसावत होता, विचारलाच. ५ वर्षाच्या मुलाला शाळेत रोज डबा काय द्यायचा? काय विचारता प्रत्येकाने आपले विचार दिले. तोच आपले पणा तेच प्रेम पुन्हा मिळाल्याचा अनुभव आला.

मला वाटते विषय भरकटला पण सांगावेसे वाटले ए आणि कुठे लिहावे हे कळले नाही. निलेश तुमच्या म्हणण्या प्रमाणे अनुकरण करण्यासाठी आजही खूप काही आहे. सगळ्यात महत्वाचे मायबोली वरचे मित्र आणि मैत्रिणि ज्यांना तुम्ही हक्काने काहिही सल्ला विचारु शकता..

हे पोस्ट इथे जर योग्य नसेल तर please उडवु शकत.

Champak
Sunday, December 18, 2005 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरिल ललित लेखाचे प्रयोजन समजले नाही. पण डर अन रिंकु पाटील सारख्या प्रकरणाचा पुन्हा पुन्हा उदाहरण म्हणुन उपयोग करुण प्रेमासारख्या तरल भावणेकडे दुषित नजरेणे पाहिले जातं, हे चांगले नाही!
तरुण वयात मुलाला मुलीबद्दल अन मुलीला मुलाबदाल आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. तसे झाले नाही तर ते अनैसर्गिक अथवा अनियमित ठरेल. हे माहिती असुनही ह्या नैसर्गिक आकर्षणा ला विकृती मानणे चुक हे! अर्थात ह्या आकर्षणापायी आततायी कृती करणार्‍यांचे समर्थन होउ शकत नाही. पण विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडुन घडलेले प्रकार पुढे करुण समस्त तरुणाई ला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले ज्जावु नये!

असे च एक निखळ प्रेमाचे उदाहरण...
http://www.esakal.com/20051218/rashtriy8.html


Divya
Sunday, December 18, 2005 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक तु माझा लेख नीट वाचलाच नाही, मी अस कुठे काय लिहीले रे कि प्रेम करुच नये? प्रेमासारख्या तरल भावनेकडे दुषित नजरेने पाहीले जाते??????? असा सुर आहे का माझ्या ललितचा?
बा बा रे मला प्रेमाचा अनुभव पण नाही आणि माझी त्यात PHD पण नाही, आजुबाजुला जे बघीतल त्यावरुन जे लिहावस वाटल ते लिहील नीट वाच जरा.


Divya
Sunday, December 18, 2005 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meggi ,अपुर्व, मुडी sas , निल्याकुलकर्णी, रुपाली अंजली धन्यवाद. खरतर लेख जास्त विस्तृत उदाहरणासह लिहायला पाहीजे होता पण उदाहरण द्यायचे टाळले. अपरिपक्व वयात केलेले प्रेम हे यशस्वी होत नाही हेच म्हणायचे होते. मालिका अणि चित्रपटांचा प्रभाव हा तरुणांच्या मनोवृत्तीवर पण खोलवर होतो. प्रेमातील विकृत मनोवृतीचा जन्मही अशाच गोष्टीतुन होतो.ज्यांच्या निष्पाप मुली या मनोवृत्तीला बळी पडतात त्या पालकांसमोर तुम्ही उभ पण राहु शकणार नाहीत इतका या चित्रपटांविषयी संताप आणि असहाय्यता काय असु शकेल हे कळते. रिंकु पाटील सारख एखाद दुसरेच प्रकरण बाहेर येत अशा कितीतरी मुली असल्या मुलांच्या त्रासानी सफ़र होतात. गल्लीच्या टपर्यांवर बसुन येताजाता पोरींची छेड काढणार्या मवाली मुलांच तरी काय?

Champak
Sunday, December 18, 2005 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ते जनरल लिहिले होते! ह्या लेखाबद्दल नाही!

मी म्हटले होते कि मला प्रयोजन कळले नाही :-(



Divya
Monday, December 19, 2005 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउदे रे चंपक, फ़ार प्रयोजन ठरवुन ललित लिहायला मी मोठी लेखिका नाही सहज वाटल म्हणुन लिहील. तस सिरीयसली काही नाही.

Apurv
Monday, December 19, 2005 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idvyaaÊ sahja vaaTlao mhNaUna ilaihlaosaÊ pNa baroca mah%vaacao mau_o maaMDlaosaÊ jasa p`oma AaiNa XaairrIk AakYa-Na (a maQaIla frk na samajaNyaacao pirNaamaÊ TV, Movies AaiNa mau#yata pXcaa%ya saMsaÌtIcaa AaplyaavarIla p`BaavaÊ AaplaI saMsaÌtI maagaasalaolaI samajaNyaacaI caUkÊ vagaOro vagaOro....




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators