Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
जावे बर्फाच्या गावा... ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » जावे बर्फाच्या गावा... « Previous Next »

Pama
Tuesday, December 13, 2005 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा माझा आणि बर्फाचा संबंध माझ्या आयुष्यात बर्‍याच उशिराने आला. लहानपणी गाडीवर बर्फ घसून त्याच्या गोळ्यावर निळ्या, काळ्या, नारंगी रंगाच सरबत टाकून चांगला चोखून चोखून तो गोळा अगदी दात दुखेपर्यत खाल्ला होता. पण ते तेव्हढच. आईस्क्रीम आणि दूध कोल्ड्रिंक प्रकार होते, पण त्यात बर्फ कुठे? फ्रिज नामक चम्त्कारिक यंत्रात बर्फ बनवता येतो हा शोधही मला बर्‍याच उशिरा लागला.
मी काही फार पुर्वीची गोष्ट सांगत नाही, पण मी पुणेकर असल्याने आमच्या काळी अस नव्हत हे वाक्य वयाच बंधन न ठेवता छातीठोकपणे सांगायचा हक्क मला प्रिय पु. लं. नीच दिलाय नं! त्यामुळे आमच्याकाळी बर्फ नव्ह्ता, हे अगदी बिनदिक्कत सांगू शकते मी. तशी मी मुंबईकर आणि नागपूरकरही आहेच, पण त्याचा प्रत्यय येइलच नंतर.
तर म्हणत काय होते, या बर्फाबद्दल आकर्षण मात्र बेफाम होत. भुगोलाच्या धड्यात शिकल्यापासून माहीत होते कि जगाच्या पाठीवर असे अनेकानेक देश आहेत जिथे आपल्याकडे जसा सततधार पाऊस पडतो तसा सतत बर्फ पडतो. वर्षातून सहा महिने अर्फ पडत असून सगळ गोठलेल असत. अशा काही जागा भारतातही आहेत अशी मौलिक भरही भुगोलानेच माझ्या ज्ञानात घातली होतीच. नाही म्हणायला सिमला नामक एका शहराची रसभरित वर्णन आजोबांकडून ऐकली होती. त्यांच्या काळी ते सिमला, काश्मीर अशा ठिकाणी फिरायला गेले होते हे ऐकून माझ्या लहानपणीही आम्ही ते अगदी एव्हरेस्टच शिखर चढून आलेत अशा कुतुहल मिश्रित अभिमानानं त्यांच्या बर्फात कशी धमाल केली या कथा ऐकत असू.
ही बर्फात वेढलेली आणि वाढलेली शहर कशी असतील याबद्दल खूप खूप कुतुहल होत. तिथली माणस कशी जगत असतील, तिथे भाजीपाला कसा पिकत असेल, अशे अनेक भोळे भाबडे प्रश्न पडत. त्याबद्दल बर्‍याच आख्यायिकाही ऐकल्या होत्या. तिथे म्हणे नळ सोडला कि पाण्या एवजी बर्फच पडतो, तोंड उघडल कि वाफेचा बर्फ होऊनच बाहेर पडतो, तिथेले नदी नाले थिजतात आणी लोक त्याच्यावरूनच चालत जातात. या सार्‍याचस गोष्टींच कोण आश्चर्य आणि अप्रृप होत. कश्मीरचा दाल सरोवर गोठल्याची एकदा बातमी ऐकली होती आणि हा समज आजूनच पक्काझाला होता. चित्रपटातील हिरो- हिरोईनला बर्फातून घसरताना, थंडी गुलाबी म्हणत नाचताना गातानाही बघितल होतच नं!
पण अशा प्रदेशात आपल्याला जायला मिळेल, नुसत जायला नाही तर अनेक वर्ष तिथे रहायला मिळेल हे मात्र स्वप्नात देखील वाटल नव्हत. आणि सत्यात उतरल तेव्हा कुठे सिमला, काश्मीर नाही तर थेट अमेरिकेत मजल मारली.
अमेरिकेत जायच म्हणजे थंडीची जय्यत तयारी हवीच. हे अर्थात मी अमेरिकेच्या उत्तरेत जात होते म्हणून!! पहिल पाऊल या अमेरिकेच्या धरतीवर ठेवल म्हणण्यापेक्षा बर्फावर ठेवल म्हणण माझ्याबाबतीत अधिक योग्य ठरेल. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर मुंबईच्या रणरणया उन्हातून पहिल बर्फ दर्शन झाल ते मात्र Paris च्या विमानतळावर. मुंबईच्या थंडीतही अतीच झाल अस म्हनण्यासारखा एक स्वेटर घातलेला होता. येताना भरपूर गरमकपडे घेऊन ये, अस नवर्‍याने बजावून सांगितल होत म्हणून हा स्वेटर आणि पायमोजे इतक्यावर भागेल अस वाटल होत. अगदीच हुडहुडी भरली तर असावा आपला, म्हणून अजून एक स्वेटर होता. विमानतळ आणि विमान हे दोन्ही गरम ठेवतात एव्हढी जुजबी माहिती होतीच. Paris च्या विमानतळावर उतरल्यावर आता पुढच विमान दुसर्‍या ठिकाणी घ्यायच आणी त्यासाठी दारातच उभी असलेली बस घेऊन जायच अशी मौल्यवान माहिती मी माझ्या मोडक्या फ्रेंच आणि हवाईसुंदरीच्या मोड्क्या इंग्रजीच्या मिश्रणातून मिळवली. विमानतळातून बाहेर बस पर्यत फक्त अर्धा मैलाच अंतर होत. बाहेर पाऊल ठेवल मात्र आणि मी अगदी हाडापर्यत गोठली. थंडीचा हा नमूना मला नवाच होता. बस मधील इतर प्रवासी मला एखादा झू मधला प्राणी बघावा तस बघत होते. माझी इतकी धिटाई बघून त्यांना बहुदा माझ कौतुक वाटत होत अस्सा मी समज करून घेतला.
आजूबाजूला साचलेला बर्फ बघून मला धन्य धन्य झाल. आता मी नक्कीच स्वर्गात जाणार याची खात्री त्या क्षणाला मला झाली. पुढला प्रवास सुखरूप झाला आणि मी boston ला पोहचली तेव्हा संध्याकाळचे ४ वाजले होते. विमानकपनीनी माझ सामान Paris विमातळावरच ठेवण्याची खबरदारी घेतली होती आणि आता घरपोच आणून देऊ अस प्रेमळ आश्वासनही देऊन टाकल. त्यामुळे एका ब्यागेसह मी अनेक महिन्यांनी भेटलेल्या नवर्‍याला डोळ्यात साठवत विमानतळाबाहेर पडले तेव्हा मिट्ट काळोख होता. कालच बर्फ पडून गेला हे कळल्यावर मी जरा हळहळले. घाबरू नको आता बर्फच बर्फ बघायचाय असा, दाखवतोच तुला बर्फ असा प्रेमळ(?) सल्ला एकत मी घर गाठल तेव्हा मला अंधाराशिवाय काहीच दिसल नाही.

क्रमश


Chinnu
Tuesday, December 13, 2005 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL पमा! सहीच ग. अगदी अस वाटतय की तु माझ्या मनातलच लिहीत आहेस! येवु द्या अजुन..

Pama
Tuesday, December 13, 2005 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचे काही दिवस बर्फ न पडल्याने माझी दारूण निराशा झाली. चार दिवसांपूर्वी पडलेला बचाकभर बर्फ किती दिवस बघायचा? एव्हड्या चार दिवसात बर्फात पहिल्यांदा चालणारा माणूस हमखास पडतोच, medical insurance आहे ना तुझा? अशी काळजीयुक्त चौकशी अनेकजणांनी केली. तेव्हढाच वेळ मिळाला म्हणून दोन दिवसात एक जाडजूड बर्फात घालण्याच jacket , टोपी, चांगले गरम पायमोजे, हात मोजे असा जामानिमा मी तयार करून ठेवला. ५ दिवस बर्फ न पडल्याने मी नाराज होऊन लवकरच म्हणजे रात्री ९ ला पंढरपूरच स्टेशन गाठल होत. दुपारी ४ वाजता अंधार बघण्याची सवय नसल्यामुळे फार अस्वस्थ होत होत. शिवाय करायला काही नाही, बाहेर जायच तर थंडी मी म्हणत होती. अजून तरी थंडीची तितकीशी सवय झाली नव्हती आणी त्यावेळी गाडीही नव्हती आमच्याकडे. पुन्हा या अंधारामुळे अस्वस्थ होत, भूक लागत नाही, कंटाळा येतो, सारखी झोप येते आणि बरच काही होत त्याला 'winter blues' किंवा winter depression' अस आधिकच depress व्हायला लावणार नावही आहे याचाही मला शोध लागला.
तर या depression का काय त्यामुळेच असेल, मी झोपी गेलेली होती. आणि अचानक,'उठ उठ,' अशी आरोळी मारत अनेक लोक माझ्या खोलीत आले. जरा जागी झाल्यावर मला घराच दार उघडून उभ करण्यात आल. आणि मी बघतच राहिली.
अवघ्या २ तासा पूर्वी सगळ स्वच्छ होत आणि आता मी संपूर्ण पांढर्‍ई झालेले झाड वेली, घरं, रस्ते गाड्या बघत होती. कोणीतरी आकाशातून रांगोळी टाकावी तसा पांढरा शुभ्र बर्फ भुरभुरत होता. आता पर्यत चांगला इंचभर तरी साठला होता. सगळी कडे शांत होत, रस्त्यांच्या दिव्यात तो पांढरा थर चांदीसारखा चकाकत होता. रस्त्यावरून गाड्या जात नसल्यामुळे भराभर बर्फाची उंची वाढताना दिसत होती. सगळ कस नितळ, स्वच्छ, अगदी मनाला भुरळ घालणार. कितीही तास बघत बसाव त्या पडणार्‍या बर्फाकडे. सतत कोसळणारा पाऊस म्हणजे अगदीच रानटी वाटतो या भुरभुरणार्‍या बर्फा समोर. हे म्हणजे कस एकदम नाजूक, आवाजही न करता चोर पऊलांनी दारात येऊन पडणार. एखाद्या चित्रकारानी नवीनच चित्र काढाव आणि त्याचे रंगही अजून ओले आहेत अस वाटाव. उगाच कुठे बोटही लावल तर सार चित्र फिस्कटायच. किती साठवू आणि किती नको अस वाटत होत. अशा सुंदर वातावरणात आणि निसर्ग रम्य ठिकाणी कविमनाला प्रेरणा नाही मिळाली तरच नवल!
आमच गाव लहान आणि त्यातून घर जरा हमरस्त्यापासून दूर त्यामुळे हे चित्र बराच वेळ कुणी पुसल नाही. काही वेळानी जवळपास ४ इंच बर्फ साठला आणि मग कमी कमी होत थांबला.
'अरे, आता इतक्या उशीरा कशाला', अस म्हणत असतानाच आत चल बर्फात, फेरून येऊ',म्हणत नवर्‍यानी जवळ जवळ ढकलतच बाहेर काढल. त्यानंतर आम्ही दोघे आणि त्याचे २-३ मित्र असे मनसोक्त उंडारलो बर्फात. ताजा बर्फ असल्यामुळे भुसभुशीत होता, पाय चांगला आत रुतत होता आणि घसण्याची भिती नव्हती. भरपूर बर्फाचे गोले करून फेकाफेकी झाली, एकमेकांना बर्फात लोळवून झाल. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळण द्याव आणि त्याच मन भरेपर्यत त्याने खेळत बसाव तस खूप खेळलो. घरी येऊन छान गरमगरम कॉफीचा मग हातात घेऊन खिडकीपाशी उभ राहून जेव्ह बाहेर बघितल तेव्हा जरा हळहळलीच. मघाच ते सुंदर चित्र पार विस्कटून गेल होत. आम्हीच विस्कटल होत ते. मग जरा राग आला स्वताचा, काय गरज होती हे अस वागायची? पण लगेच दुसर्‍या मनानी समजूतही घातली. अग, अशी अनेक चित्रे तुला बघायला मिलणार आहेत आता. किती साठवशील आणि किती जपशील. त्या दिवशी अगदी गाढ झोप लागली.
आणि खरोखरच काही दिवसांनी मात्र सवय होत गेली आणि पहिल्या बर्फाच ते नाविन्य कुठल्या कुठे गेल. आता'नेमेची येतो मग पावसाळा', तस हे काय रोजचच आहे. इतकच नाहे तर आता, अरे देवा, उद्या बर्फ का? म्हणजे रस्ते तुंबणार, गाडी पार्कींगाचा प्रश्ण( आता आम्ही वेगळ्या ठिकाणी राहतो, गाडीही आलीय पण दारात लावायची सोय नाही, रस्त्यावरच पार्क कारावी लागते कारण आमच्या apartment मधे पार्कींगची सोय नाही!), बर्फ साफ करा, दूध ब्रेड आजच आणून ठेवा अश्या अनेक प्रश्नांपर्यत प्रगती केली आहे मी.


क्रमश


Pama
Tuesday, December 13, 2005 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या वर्षी खूप फोटोही काढले बर्फाचे. सगळे घरी पाठवले. त्याबरोबर उलटटपाली अनेक प्रश्न आणि सल्लेही आले. बापरे! केव्हढा तो बर्फ!!, कसे करता तुम्ही, गाडी अडकत नाही का? रस्ते साफ कोण करत?, पडू बिडू नका हं, सांभाळून गाडी चालवा, थंडीच जपा, अमूक खा, तमूक खाऊ नका. आणि अशे अनेक अपेक्षित आणि अन्पेक्षित फुल टॉस चुकवत आम्ही आमची बर्फाळ अनुभवांची संख्या वाढवत होतो.
बर्फ पडला कि मुलांची मात्र मज्जाच मज्जा असते. शाळा हमखास बंद होतात आणि मग दिवसभर बर्फात खेळायला त्यांना रान मोकळ मिळत. jacket , टोप्या, हातमोजे, मफलर अशी सगळी तयारी करून ते उतरणीच्या जागी plastic किंवा लाकडाच्या घसरगुंड्या घेऊन खेळत असतात. काही वेळा त्यांचे आई बापही त्यांच्याबरोबर खेळताना दिसतात. snowman बनवणे हे तर प्रत्येकाच परम कर्तव्यच आहे. बर्फाचे मोठाले गोल करून छान snowman तयार करतात ही मुल. कधी कधी २-३ snowman एकाच अंगणात बघायला मिळतात. कधी कधी एक वितळत असतो आणि दुसरा बनत असतो. त्याच्या गळ्याभोवती छानसा मफलर गुंडाळलेला असतो. नाकाचाजागी गाजर खुपसलेल असत. काळा चेंडू किंवा तत्सम काही घेऊन त्याच्या डोळ्यांच्या खोबणीत डकवलेले असतात. हातात काठी किंवा लांब दांड्याचा झाडू असतो. आणि हसरा चेहेरा काढलेला असतो. हे snowman फार लोभसवाणे दिसतात. परवा तर एका दुकानात snowman किट बघितला. त्याला घालायचे मफलर, नाक, कान, डोळे, तोंड आणि काठी असा सगळा संचच होता. आणा आणि बनवा snowman . बर्फात सगळा जामानिमा घालून दुडुदुडु धावणारी मुल फारच गोड दिसतात.

बर्फ जास्त पडतो तेव्हा गाडी चालवणे म्हणजे कसरतीचच काम आहे. रस्ते बर्फानी गुळगुळीत झालेले असतात. अर्थात इथले रस्ते सारखे साफ करत असतातच. रस्त्यावर मीठ( हे खाण्याचे मीठ नाही हे सांगणे न लगे) टाकत मोठमोठे ट्र्क जात असतात. मिठामुळे बर्फाचे वितळून पाणी होते व रस्ता साफ करण्यासही त्यामुळे मदत होते. दुसर्‍या गाड्या plough घेऊन लगेच बर्फ रस्त्याच्या किनारी ढकलतत. पण फारच बर्फ पडतो, म्हण्जे अगदी snow storm येतो तेव्हा, बर्फ पडण्याचा वेग काढण्याच्या वेगा पेक्षा जास्त असतो आणि storm मधे सोसाट्याच वार असल्यामुळे नीट दिसतही नाही, त्यामुळे हे काम मंदावत. त्यावेळी मात्र कुणालाच घराबाहेर पडण्याची परवानगी नसते.
storm येऊन गेल्यावर बाहेर पडण्याचा प्रताप केलाय एकदा. अगदी घराच्या कोपर्‍या पर्यत येऊन वळणावर बर्फ साफ न केल्यामुळे गाडी रुतून बसली आणि हलायच नाव घेईना. बर्‍याच प्रयत्ना नंतरही ती इंचभरही हलली नव्हती, उलट अजूनच रुतून बसली. ३१ डिसेंबरचा दिवस असल्याने छोट्या गावात सगळ सामसूम होत. रस्त्यावर चिटपाखरू नव्हत. तेव्हा सेलफोनही नव्हता. गाडी tow करायला फोन करून बोलवाव तर २ तास लागतील अस सांगण्यात आल. समोर घर दिसत असून उपयोग नव्हता. शेवटी गाडीत जे चौघ होतो, त्यांनी रस्त्याला साष्टांग दंडवत घातला आणि हळुहळु गाडी खालचा बर्फ उकरून उकरून काढला. जवळपास अर्धा तासानी गाडी बाहेर निघाली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.
त्यानंतर अनेक गाड्या अनेक टिकाणी बर्फात अडकलेल्या बघितल्या. 'अरे अरे! बिचारे' , अस म्हणत गाडीतील हिटर मोठा करायचा आणि पुढे जायच, दुसर आम्ही काय करणार?
गाडी घसरणे हा तर एक दिव्य अनुभवच असतो जो प्रत्येकानी घेतेलेलाच असतो. अगदी हळू चलवून सुद्धा गाडी घसरतेच, तो तिचा हक्कच आहे. कधी ती १८० चा कोन करून वळते तर कधी ३६० चा ही करते. समोरची आणि मागची गाडी थांबली तर ठीक नाही तर दोघांचा कपाळमोक्ष ठरलेला.त्यावेळी आतल्या माणसांच्या मानसिक अवस्थेचे वर्णन न केलेले बरे.
बर इतक असताना लोक बाहेर पडायचे थांबतात का? तर नाही. आता नेमके त्यांचे Christmas, Thanksgiving असे सण त्याच वेळी येतात त्याला ते तरी काय करणार? खरेदी तर करायलाच हवी नां. मग मोठ मोठे malls भरगच्च भरलेले असतात. इतक्या पिशव्या घेऊन चालायच म्हणजे जवळात जवळ जागा शोधणे भाग आहे. कुणी गाडी जवळ दिसला कि लगेच दुसरी गाडी तिची जागा घ्यायला असतेच मागे. मग तो सांगतो, नाही मी फक्त पिशव्या ठेवतोय. कि वरात चालली पुढे. एक मोठ मजेशीर दृश्य दिसत. आजकाल keyless entry च्या गाड्या असतात. त्यामुळे mall च्या पार्कींग मधे इकडून तिकडून पुक, पुक पुक.. असे आवाज येत असतात. हे म्हणजे कुणी तरी आपल्याला हाक मारून बोलवत आहे अस वाटत. म्हणजे मालक तू कुठे' विचारतो, अन गाडी पुक, मी इथे शोध मला अस खेळ खेळत असते. मालक वैतागून इतक्या थंडीच तुला अत्ताच काय खेळायचय?' नक्की असच म्हणत असणार याची माला खात्री आहे.
बर्फाच्या दिवसात sking करायला जाणे हा इथला सगळ्यात मोठा विरंगुळा. पण sking करताना हात पाय मोडतातच अस मला विश्वसनीय सूत्रांकडून कळल्यामुळे मी त्याच्या वाटेला कधी गेले नाही.
'तुमच्याकडे आल पाहिजे हां एकदा snow season मधे' या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईकर व्हावे. जरूर या, पण मागच्या आठवड्यातच असा अंदाच वर्तवलाय कि आता खूप मोठ snow storm येणार आहे. अहो मागच्या वर्षी एकूण ४० इंच बर्फ पडला, या वर्षी नक्कीच तो record मोडणार अस दिसतय. हे सांगायला विसरू नका. आमच्या मुलांना कशी जाम सर्दी होते या season ला तेही सांगा. गाडीनेच या पण पार्कींगची सोय नाही हे स्पष्ट करा. हे सगळ जवळपासहून येणार्‍या पाहुण्यांसाठी.
भारतात मात्र सगळ्यांना याच season मधे येण्याच आग्रहाच निमंत्रण द्या. याच एकचा snow मधे. घरात मस्त हिटर असतो, सगळे mall दुकान heated असतत. मस्त रजई घेऊन झोपून रहायच. बर्फात फिरायला जायच. हे सगळ रसभरित वर्णन करून सांगा. म्हणजे तुम्ही नागपूरकर हे अजून पक्क होईल.
पण बाहेर बघितल का? आज चक्क ऊन पडलय. तापमान फक्त ० आहे, तरीच गरम होतय. मी आता मस्त फेरफटका मारून येते, भेटूच नंतर. पण snow seaon असे पर्यत आमच्या घरी यायला विसरू नका हं!! :-)



समाप्त.





Chinnu
Tuesday, December 13, 2005 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप सुंदर पमा. छान लिहिलेस. मी आधी म्हटल्याप्रमाणे खरच मनातलच लिहिलस तु. बाकी तु नक्किच नागपुरचीच! :-)

Kedarjoshi
Tuesday, December 13, 2005 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow. me Indianapolis la rahat hoto. ya varshi matra Sacramento la ahe Dec. madhe. Maagcha Dec aathavla.

Kmayuresh2002
Tuesday, December 13, 2005 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा,
सुरेख वर्णन.. केवळ पद्य नव्हे तर गद्य लिहिण्यातही चांगली माहीर दिसतेस तु:-)


Lampan
Tuesday, December 13, 2005 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahI vaNa-na Aaho ...

Moodi
Wednesday, December 14, 2005 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच लिहिलयस पमा.
मी १० वीत असताना एकदा आमच्या गावात थंडीत बर्फ हवेत भुरभुरला होता तेव्हा फार मजा आली होती. अन इकडे आल्यावर मग ३ दा बर्फ पाहिला. फोटोही काढले. पण आम्ही फार खाली असल्याने ही मजा कमीच. पण तू मस्तच लिहिलेस. कवयत्री बरोबर छानशी लेखिका पण बनलीस. शेअर करीत रहा असे अनुभव, निदान शरीराने नसलो तरी मनाने येऊ अमेरीकेत.


Dineshvs
Wednesday, December 14, 2005 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पमा छान. पहिला बर्फ़ पडताना भुरुभुरु पडत नाही तर त्याच्या ईवलाश्या चांदण्या आडव्या घरंगळत खाली येतात. त्या जीभेवर झेलायला फ़ार छान वाटते. अगदी वय विसरुन खेळ खेळायचो मी हा.
पण बर्फ़, गारा सगळे मी भारताबाहेरच बघितले.


Pama
Wednesday, December 14, 2005 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्नू, केदार मयूर, लंपन, मूडी आणि दिनेश.. सगळ्यांना धन्यवाद. सहज सुचल ते लिहिल. खर म्हणजे बर्फाच्या खूप खूप आठवणीआहेत, पण सगळच कस लिहिणार?
एक मात्र खर बर्फाच आकर्षण अजूनही कमी झालेल नाही. अगदी कधी कधी कंटाळा येतो, पण' तुझ माझ जमेना, अन तुझ्यावाचून करमेना'.. अस आहे माझ आणि बर्फाच.:-)


Sashal
Wednesday, December 14, 2005 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे पमा, मुंबईकर नसतात हो असे .. मी कधी येऊ सांग?

Giriraj
Thursday, December 15, 2005 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पमा,कालच मौज मधला बर्फ़ाविशयीचा लेख वाचला!
मस्त लिहिलाहेस!


Divya
Thursday, December 15, 2005 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा फ़ारच छान लिहीले आहे. बघना बर्फ़ तोच पण सौंद्र्य दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याला सगळ्यात सुंदरता दिसते. मला पण घरात बसुन बाहेरचा पडलेला बर्फ़ बघायला खुप खुप खुप आवडते, पण थंडी नकोच. बाहेर पडलेल्या पांढरा शुभ्र बर्फ़ एखाद्या स्थितप्रज्ञ सारखा भासतो, अगदी शान्त, याला बघता बघता आपलही भान हरपाव. आणि गंमत म्हणजे प्रत्यक्ष बर्फ़ पडताना नाही थंडी वाजत आधी किंवा नन्तरच जास्त वाजते. असच लिहीत रहा.


Sas
Friday, December 23, 2005 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा खुप खुप छान लिहील आहेस.
वाचतांना वाटल की माझेच सारे अनुभव तु टिपलेस.
Simply Great!

Suniti_in
Thursday, December 29, 2005 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा सुंदर वर्णन केल आहेस. मला तर जाम इच्छा होत आहे बर्फ पहाण्याची. पण इथे CA मध्ये पडत नाही.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators