Amitpen
| |
| Thursday, December 08, 2005 - 9:36 pm: |
| 
|
वैभव, देवदत्त, निनावी, ध्रुव........मस्त!...
|
Jo_s
| |
| Friday, December 09, 2005 - 12:01 am: |
| 
|
देवदत्त, निनावी, ध्रुव........मस्त!... वैभव ग्रेटच
|
सर्वांना मनापासून धन्यवाद दोस्त्स ... bee .... तुमची प्रतिक्रिया आवडली देवदत्त ... मस्तच पमा ... माणसाने व्यसन सोडायची भाषा करु नये ... शेर खास! ध्रुव ... सुरेख आहेत सगळ्याच .... निनावी ... तुमचे शेर वाचुन तुम्हीच ठरवा कोण पामर ते ...
|
Ninavi
| |
| Friday, December 09, 2005 - 7:04 pm: |
| 
|
आता माझा धीर वाढला.... (भोगा आता आपल्या कर्माची फळं..) तैसे आम्ही दुनियेस या केव्हाच होते सोडले आज आम्ही मृत्युलाही थक्क करुनी सोडले प्राण हरण्या फेकलेला पाश परते मोकळा ते आम्ही पायी तिच्या केव्हाच होते सोडले....
|
Pama
| |
| Saturday, December 10, 2005 - 12:21 am: |
| 
|
तुझ्या सोबत जगण्यासाठी एकदा फिदा व्हावे, विरहाच्या तगमगण्यासाठी एकदा जुदा व्हावे. असे कधी म्हटले तुला अंतर आम्ही देऊ? आलाच क्षुद्र मृत्यू, त्याची गळाभेट घेऊ.
|
Pama
| |
| Saturday, December 10, 2005 - 12:33 am: |
| 
|
आसक्तीच्या विराणीला हाक देऊनी येतो मी कुठल्याशा मधुकणाचे विष पिऊनी घेतो. हाय! नसावी तुझ्या दारी माझ्या साठी भीक, बसलो आहे या जगण्याचा अर्थ मी लावीत.
|
Pama
| |
| Saturday, December 10, 2005 - 12:43 am: |
| 
|
चढली नाही या मद्याची धुंदी मला अजून, खुणवित आहे ती कामिनी पहा कशी लाजून, चषकामधले अमृत ती, डोळ्यांनी मजला देते, धुक्याआड ती इंद्राच्या दरबारी मज नेते.
|
Pama
| |
| Saturday, December 10, 2005 - 12:59 am: |
| 
|
अक्षर अक्षर जुळवून तुझे नाव कोरले आहे, आज तुझ्या भवतीचे मी पाश तोडले आहे तगण्यासाठी उसना माझा श्वास पुरेसा आहे, तू नसल्यावर या जगण्याचा काय भारोसा आहे?
|
Pama
| |
| Saturday, December 10, 2005 - 1:09 am: |
| 
|
मला एकदा तरी अस, मस्त जगून बघायचय, प्रेमात तिच्या घट्ट घट्ट गुरफटून बसायचय. धुंद धुंद म्हणातात तस, चांदण्यात भिजायचय मृत्यू येई पर्यत तिच्या मिठीतच असायचय..
|
Chinnu
| |
| Saturday, December 10, 2005 - 3:13 am: |
| 
|
पमा, वरच्या पैकी पहीली फ़ार आवडली ग
|
पमा... फ़ारच सुरेख, लाजवाब. अजुन येउदे
|
वैभवा....काय लिहु.....काय वाटते ते सांगायला शब्द हि सुचेनात...सही असेच अम्हाला त्रुप्त कर..... निनावि..पमा एकदम मस्तच
|
मी ही प्रयत्न करतो.... चुभुदेघे हा सडा प्राज्क्ताचा सांगतो आज बघ मला इथे आली होतीस काल अन बैसलीस क्षणभर या इथे काय हा वेडेपणा असा बघ माझा जाहला येत होतो रोज अन कालच नाही आलो मी या इथे
|
Ninavi
| |
| Sunday, December 11, 2005 - 6:00 pm: |
| 
|
तोच पडतो प्रश्न वारंवार की हे का असे? सरळमार्गी चालणार्याचे जगी होते हसे फूल जे जे वेचण्या जावे, निघे ते कागदी हात जोडावे, तिथे पाषाण निर्मम का दिसे
|
Ninavi
| |
| Sunday, December 11, 2005 - 6:18 pm: |
| 
|
वाटते येथे जगायाची न अपुली लायकी नाही मैफ़ीलीत या रुचणार अपुली गायकी गूढ या मंचावरी अदृष्य पडदे शेकडो नायकाचे सोंग काढुनी वावरे खलनायकी
|
Ninavi
| |
| Sunday, December 11, 2005 - 6:43 pm: |
| 
|
का अश्या साध्याच गोष्टी कठिण आता जाहल्या साद प्रतिसादात या भिंती उभ्या का राहिल्या संशयाची आरशी चढली कशी डोळ्यांवरी भरवशाच्या राहिल्या ना आपल्याही सावल्या...
|
Pama
| |
| Sunday, December 11, 2005 - 7:36 pm: |
| 
|
तिच्यासाठी झुरणे आता नवे नाही मला, सोसत आहे मूकपणे मी किती तापल्या झळा रोज निशेल परतुन येतो पुन्हा तोच पारव, पंख मिटुनी गातो आहे तोच पुन्हा मारवा
|
तू नाही म्हटलंस यापेक्षा काहीतरी म्हटलंस यातंच सुख आहे. जिथे वारा कधी फिरकलाच नाही तिथे वादळसुद्धा झुळूक आहे!
|
वैभव, नेहमीप्रमाणे खासच.... पमा, काय छान चारोळ्या आहेत.. निनावि, खुपच छान आहेत सगळेच शेर.... ह्या वेळची झुळूक वेगळी आहे आणि म्हणूनच बहुतेक छानच आहे. अभिजीत, शेवटची ओळ.... तिथे झुळूकसुद्धा वादळ आहे अशी केली तर.... बघ ह माझे आपले Suggestion
|
बाजी जिंकण्याचा आम्हांस कोण अट्टहास आम्हांस हरविण्याचा तिलाही कोण ध्यास शेवटी एकदाची तिनेच केली मात आमच्याच घरावरुन गेली तिची वरात
|
आम्ही म्हणालो पावसाला तिला भिजवु नको आधीच लाजरी सखी आणखी लाजवु नको तो म्हणे मी बरसतो तिलाच बिलगाया वरचेवर ना तरी पडता दोस्ता दुष्काळ तुझ्या ह्या धरतीवर
|
इश्क काय आहे दोस्तहो विचारु नका आम्हां धुंद नशेत आहो पुकारु नका आम्हां फ़ेसाळता प्याला जरूर पण सांडत नसतो कधीही इश्कास चव्हाट्यावरती आम्ही मांडत नसतो कधीही
|
जिंदगीभर जीवनाला आम्ही बेजार केले सारेच घाव आम्ही हसण्यावारी नेले अखेर हवीहवीशी ती एक घटिका आली एकाच घावात आम्हां दोघांची सुटका झाली
|
तिच्या प्रेमाइतके निखळ प्रेम ना कुठले समजले आम्हां परंतु जरा उशीरा समजले आजही ती लाभता ह्या जगास आम्ही जिंकू दोस्त पण तिच्या कपाळी परकेच आहे रे कुंकू
|
बरयाच नवसांनंतर ती अमुच्या स्वप्नी आली मिठीत घेवुनी हळुवार ओठ ठेवले गाली दुर्भाग्य आमुचे ऐसे की काळ जणू थांबला सकाळ होईपर्यंत तो एकचि क्षण लांबला
|
कुठपर्यंत जावुनी शेवटी थांबतात हे रस्ते चालावे तितुके खरेच का लांबतात हे रस्ते कश्यास मोह पाडती मुशाफ़िरास हे रस्ते ? सोबती म्हणावे खरे की मुडदेफ़रास हे रस्ते ?
|
भावलो ना जिंदगीस उपाय नव्हता काही तैसेच जगण्यातही अपाय नव्हता काही आता मात्र पुरे जाहली आम्हांस ही अवहेलना जिंदगीस नित्यनेमाचे मरणेही पाहवेना?
|
एकवार आम्हीही आयुष्य घेतले आवराया म्हटले नीटनेटके आता सुरू करावे जगाया रात्र झाली काळरात्र .... कार्य ते नव्हते सरले उजाडत आले तेव्हा जीवन नव्हते उरले
|
जे आले तसेच नेहेमी स्वीकारले मी सारे मी उरात रोखुनी धरले मनस्वितेचे वारे उदास नयनी त्यांना कधी न दिसली वावटळ उन्मळलो आणि म्हणाले वादळ होते न्यारे
|
सतत जिंदगी करीतच होती अमुचा असा पाठपुरावा जिथे जिथे जमलेले सख्य तिथे तिने आणला दुरावा तिला फ़सविण्या जीवावर खेळून पथ्य एक पाळले आम्ही चिरंतन राहो प्रेम म्हणूनी ... व्यक्त मुळी ना केले आम्ही
|
वैभव निनावि पमा मस्त सुरु आहे..... झुळुक एक्दम बहरलि आहे.....
|
हाय वैभव....शब्दांच्या चांदन्यात मस्त नाहतो आहे
|
निशब्द भावनांना तु सखे समजुन जा.. स्वप्नवेड्या या मनाला तु थोड सावरुन जा चांदणे नाही नभी अन चन्द्रही नाही उगवला.. भाग्य माझे संपताना आज तुच थोड बरसुन जा
|
सारे काही खरे सखे तुला सांगायचे आहे कधिचे.. मी तोडलेले नाते जुने सांधायचे आहे कधिचे.. ओठाआडच्या शब्दाना करुन वाट मोकळि.. एकदाच मनासारखे मला वागायचे आहे कधिचे
|
काय आणि किती कवतुक करावे ह्या दोस्तान्चे? वैभव, पमा, निलय, निनावी.. फारच छान. झुळूक खरेच मनाचा विरन्गुळा झालीय तुमच्यामुळे. एखाद्या दिवशी झुळूक उघडून बघायला झाले नाही तर चुकल्यासारखे वाटते. कोणीतरी मनावर घेउन 'निवडक झुळूक'चे सन्ग्रह प्रसिद्ध करायला हवेत. हातोहात खपतील. त्याहिपेक्षा महत्वाचे, मराठी कवितेचा नव उन्मेष काय चीज आहे ते जरा प्रस्थापितान्ना कळेल. आगे बढो, दोस्त. बापू करन्दिकर
|