Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
snacks corner (साप्ताहिक सदर्) : गे...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » ललित » snacks corner (साप्ताहिक सदर्) : गेट « Previous Next »

Yog
Sunday, December 11, 2005 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगी वरील अलिकडेच वाढवून दिलेल्या जागेत हे लिहायच होत, म्हणजे लिहीलही पण तिथे मात्र युनिकोड मधली माय मराठीची ती पाय मोडलेली तर कधी खोक्यात बन्दिस्त झालेली अवस्था पहावेना. म्हटल तूर्तास इथेच लिहू,मग रंगीबेरंगी ठिक झाल की mod महाशय साफ़ सफ़ाई करायला मदत करतीलच!

snacks corner :
गेट

गेट्स महाशयांनी भारतभेट पूर्ण केली ती एका नविन IT Centre च्या उद्घाटनाने.
कर्नाटक आणी तामिळनाडू एकमेकांसाठी,अगदी आपतकालीन परिस्थीतीत सुध्धा कुठल्याही धरणांची गेट्स उघडणार नाहीत पण गेट्स साहेबांन्नी हे नविन मोठे गेट उघडून पुन्हा एकदा प्रगती नक्की कुठे होत आहे हे निदर्शनास आणून दिले.
बरे झाले म्हणा, आपली अर्थव्यवस्था सुधारतेच आहे त्यात ही आणखीन भर. आता अजून तीन ते चार हजार युवक युवती ढोर मेहेनतीच्या घाण्याला जुम्पतील. आता रात्री अपरात्री बसून की बोर्ड वर बोट आपटायची म्हणजे ढोर मेहेनतच की, शिवाय अशी करीअर वाली सूनबाई असली की घरातील सर्व काम करायला पुन्हा सासूबाईंची ढोर मेहेनत. आणि नक्की कोण जास्ती मेहेनत करत आहे हे बघायला नवरोबा असतोच कुठे देशात, तो तर एखाद्या on shore project वर. असो तर माझ्या laptop troubleshooting चे सर्व tech support calls आता अगदी शम्भर टक्के, हमखास अण्णांच्या कचेरीत जातील अन मग कदाचित फोन वर माझ्याच मित्राचा आवाज ऐकून दुनिया गोल आहे हे मला पुन्हा एकदा उमगेल. भले!

सध्ध्या आकांक्शा पुढती जिथे गगन ठेन्गणे या धरतीवर पुन्हा एकदा IT मधे प्रगती होत आहे अन तिकडे रोज एक तरी शेतकरी गगनाकडेच कूच करतोय. राजकारण, अर्थकाराण, समाजकारण, निराशकारण काहिही का कारण असेना, रोज एक शेतकरी मरतोय हे मात्र सत्त्य आहे. निदान निराशाकारणावर उपाय म्हणून सन्त वाहिनी किव्वा फ़ेमस योगी लोकान्चे सकाळी केबल वर योगाभ्यासी कार्यक्रम तरी आहेत. म्हणजे शेतकरी निदान झाडाला टान्गून घेण्यापेक्षा शीर्शासनात उलटे पण जमिनीवरच टान्गून बघण्याचा एक शेवटचा उपाय तरी करुन पाहील. पण इतर कारणांवर उपाय काय?
तरी मि भारतातील माझ्या software मित्रांना गमतीने म्हणतो, असेच चालू राहिले तर तुमचे पगार लाखात्(महिन्याला) जातीलही पण सर्व अन्न धान्य बहुदा आयातच कराव लागेल. म्हणजे खिशात दमडी पण वाण्याकडे कवडी. यातली अतीशयोक्ती सत्त्य स्वरुपात उतरेल की काय अशी भिती मात्र आताशा जास्तीच वाटू लागलीये. कृशीप्रधान देशाकडून खुषीप्रधान देश ही आपली वाटचाल विस्मयजनक आहे.

त्यातच पुन्हा पन्चमहाभूते सध्ध्या भारतावर असन्तुष्टच दिसत आहेत, त्यापुढे गेट्स साहेबांचेही काही चालत नाही तर आपण पामर काय करणार? enter key दाबून हवे तेव्हा उन,पाऊस,थन्डी पाडू शकणारा program आम्ही आर्यभट अन भास्कराचार्यांचे वंशज लिहू शकू का..?
मिडीया(फ़क्त आइडीया) अन IT एव्हडी दोनच क्षेत्र तरुणांसाठी जास्ती करून उपलब्ध दिसतात किव्वा आकर्षित करणारी दिसतात अन सरकारची सर्व धोरणेही त्याच अनुशन्गाने राबवली जात आहेत. पण मूलभूत गरजा अन सोयी सुविधांच्या नावाने मात्र बोम्ब कायमच आहे. एरवी दिवे गेले की हे काय नेहेमीचच अस म्हणणार्‍या सदाशिव पेठेतही आजकाल इन्व्हर्टर अगदी चिल्लर मधे खुन्टीला लटकतायत अस ऐकून आहे. हे आमच्या प्रगतीच ठळक उदाहरण म्हणता येईल का ज्या दिवशी PMT च्या फ़ुफ़्फ़ुसांना अचानक ठसका लागल्याची बातमी front page वर येईल तो दिवस आपल्या प्रगतीचा दीन असेल हे माहीत नाही. सध्ध्या तरी शेयर बाजारचे निर्देशान्क सापशिडी खेळल्यागत टणाटण उड्या मारून मोठी शिडी घेवून वर जात आहेत अन त्याच्याशी स्पर्धा करणारे आकडे " फ़क्त " शेतकर्‍यांच्या आत्महत्त्येचे आहेत.
पण आपल्याला काळजी करायच कारण नाही ते त्यान्च त्यान्च काय ते बघून घेतील, आपण बर अन आपल घर बर. किम्बहुना करोडोंच्या देशात दोन चार माणसे दर पाच दहा मिनिटाला मरतात अन त्याच्या दुप्पट पैदाही होतात्( minority च सन्तुलन राखायला नको?), त्यात काय नवल?
वेळात वेळ काढून आम्ही असन्ख्य आकडे लक्षात ठेवून असन्ख्य sms करतोच आहोत ना, नाही म्हणजे नविन पिढीच्या प्रगती साठी अजून सामान्य मनुष्या कडून किती अपेक्षा ठेवाल? आधीच gas cylinder च्या वाढत्या वजनाखाली(पैशाच वजन, गॅस च नव्हे, ते कमीच भरत) आम्ही दबलेले, घरातल्या पन्ख्यापेक्षा विजेच्या मिटर मधल ते चक्र वेगाने फ़िरतय्(अस नाशिककर म्हणतात),प्लॅस्टिक बन्द झाल्यापासून कचरा उघड्यावर भिकरावणार्‍यांची गैरसोय होतीये, त्यात पुन्हा हे नसत शेतकरी झेन्गट कुठे मागे लावताय..?
सबकुछ अलबेल आहे की. म्हणजे अबू सालेम तुरुन्गात आहे, अमिताभ आता लिकवीड डायेट वरून सॉलिड डायेट वर आलाय, सचिन ने नवा विश्वविक्रम केलाय,लालूराज्(बिहार मधिल्)सम्पलय,फ़ेमस मायबोली युनिकोड मधे आलीये,आशाजींन्ना grammy nomination मिळालय,म्रुणाल कुलकर्णीच्या लाडीक बटांतून कवी जन्माला येत आहेत,मध्यम वर्गातील घरातूनही निदान एक व्यक्ती तरी dollar मधे कमावतीये,अन सौभाग्याचे टाटू जोपासले जातायत... इतकी भरभराट अन उत्क्रान्ती होत असताना हे काय शेतकरी अन हरितक्रांती च घेवून बसलो मि.
बरं बरं मि शान्त होतो अन त्यामागे एक आशावाद आहे, म्हणजे स्वप्नातून उत्पन्न झालेला..
(स्वप्न बघायला काय लागतय?झोपच ना? ती तर आजकाल आम्ही उघड्या डोळ्यांनी पण घेतच असतो की.)

स्वप्न अस की मी एका मोकळ्या शेतजमिनी लगतच्या वाटेने चक्क पायी चाललो होतो अन तितक्यात बाजूला यामाहावरून एक व्यक्ती गेली. यामाहावर होता तरी एकन्दरीत सदरा, धोतर अन पगडी बघून म्हटल शेतकरी असावा, जरा थाम्बवून विचारल, काय दादा यन्दा कुठल रब्बी पिक घेताय?(स्वप्नातही तोंडातून रगबी निघाल नाही म्हणजे ही बहुदा आमच्या आईची पुण्याई किव्वा शाळेत आमच्या तेली सरांनी शेतकी हन्गाम अन पिकाचे प्रकार घोटवून घेतलेल्या धड्यांचा परिणाम असावा).
तसा तो गडी बाईकवरून उतरला, त्याने फ़ुरसत मधे ती रस्त्याच्या कडेला लावली, आपला camera mobile बन्द केला, मस्त पैकी एक नवरतन किमाम ची गोळी तोन्डात भरली(कितीही आधुनिक झाला तरी शेवटी आपल्या मूळांना घट्ट धरून ठेवल होत त्याने किव्वा old habbits die hard? ) अन म्हणला, यन्दा काय चिन्ता नाय बघा, no worry एकदम जोरात पिक घेतलय, आता या अवेळीच्या पावसाने अम्बा डागाळला तरी चालल. मि आश्चर्यचकीत होवून म्हटल वा,वा!शेतकर्‍यान्ना चान्गले दिवस आले तर, कुठल पीक हे?
तेच की आपल, FireFox!

समृध्धीच असही एक नविन गेट उघडेल यात मला तीळमात्र(सन्क्रान्तीचे वेध लागलेत बघा) शन्का नाही!


Moodi
Sunday, December 11, 2005 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग अरे हसवता हसवता डोळ्यात पण पाणी आणलस बघ. नेमके सुरेख अन लोकांच्या मनातले विषय निवडतोस पण ते ललीतच्या ऐवजी V&C मध्ये मांडायचे होते रे.

ही खरी खुरी समस्या अगदी खुबीने मांडलीस. देश चाललाय तुफान प्रगतीकडे अन मात्र खाऊ घालणाराच शतकानुशतके मागे चाललाय.
अर्थात त्याचेच खाण्याचे वांदे झालेत तर तो कुठुन देणार आपल्याला अन काय पिकवणार?
उगीच आपण नाचायचे तालावर मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरा मोती. माझा मामेभाऊ चेष्टेने म्हणायचा की मेरे देशकी धरती ऊंदीर पत्र्यावरती खुडबुड करती, मेरे देश की धरती.

या उंदीररुपी अनेक कायद्यानी अन काही स्वार्थी राजकारण्यानी शेतकयाची भरलेली शेते चरुन, खाऊन नष्ट केलीत.
मूळात जे नेते शेतकरी आहेत त्यानी आता याच प्रश्नाची तोड लावायला पाहिजे, उदा. शरद पवार. याना शेतकर्‍यांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यानीच पुढाकार घ्यायला हवा.

मागे शेतकर्‍याना वीज फुकट म्हणून चुना लावुन सत्ता मिळवली देशमुख अन मंडळींनी. पण या शहाण्यानी हा प्रश्नच सोडवायला नको होता का? शरद पवारने लाख बोलुन अन समजाऊनही ह्यानी श्रीमंत शेतकर्‍यांचा फायदा करुन दिला, पण गरीब बिचारे शेतकरी दडपले जात आहेत व्याजाच्या विळख्यात.

हे सबसिडी प्रकरण म्हणजे काय असते अन त्याचा शेतकर्‍यांसाठी उपयोग काय हे मला कुणी समजाऊन सांगेल काय?


Dineshvs
Sunday, December 11, 2005 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, अगदी योग्य लिहिले आहेस. आपली प्रगती (?) आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या शेतकर्‍यापर्यंत पोहोचलीच नाही.
सगळीकडे केबल टिव्ही आहे, पण पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.
सगळी धरणे गाळाने भरलीत. ऊसाशिवाय काहि पिके असतात, हेच शेतकरी विसरलेत.
पण तरिहि अगदी वैयक्तिक पातळीवर काहि कौतुकास्पद प्रयोग होताहेत. ईथे गोव्यात भाताशिवाय ईतर कुठलेच पिक न घेणारे काहि जण आता मसाल्याची पिके लावु लागलेत. आजच एका स्पाईस फ़ार्मला भेट देऊन आलो. ईथे कोकणात केशर सोडले तर सगळी मसाल्याची पिके घेता येतात, अगदी व्हॅनिला सुद्धा.
पण तरिही, पाण्याचे नियोजन आपण करायला शिकू तो सुदिन.
माझ्या जन्मा आधीपासुन गंगा, कावेरी जोडायचे संकल्प होताहेत. माझ्या हयातीत ते पुर्ण होणार आहेत का ?


Bhagya
Sunday, December 11, 2005 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, खूप सुंदर लिहिलस. पहिलेपासून शेवटपर्यन्त सगळं पटण्यासारखं आहे.
बिलबुवांच्या समोर राहुल बजाज यांनी तुझ्या ह्या लेखातल्यासारखेच विचार स्पष्ट मांडले.


Seema_
Sunday, December 11, 2005 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

v and c करायची इcछा नाही तरीही आणि शेती आणि IT दोन्हीशी संबंध आहे म्हणून ......
IT उद्योग वाढल्यामुळे शेतकर्‍यांची प्रगती थांबते आहे का? कि MS न project आणल्यामुळे शेतकर्यांचा र्‍हास होतो आहे ?. शेतकर्‍यांच्या अधोगतीची कारण वेगळी आहेत . उगाच या परस्परवलंबी गोष्टी आहेत अस म्हणण्यात काय अर्थ आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सार्वत्रीक परिस्थीती नक्कीच नाही . नुस्त जरा सांगली कोल्हापुर जिल्ह्यात येवुन बघा . शेतकर्‍याला शेतीशिवाय दुसर काही ( firefox??????? ) करण्याची वेळ अजुन तरी आली नाही


Giriraj
Monday, December 12, 2005 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे योग! छान उपरोध दाखवला आहेस!
सीमा,यात काही बाबी तितक्या अभ्यासपूर्वक नसतिलही पण कोल्हपूर आणि सांगलि म्हणजे महाराश्ट्र नव्हे हेही तितकंच खर!
आणि मुळात हे ललित म्हणून लिहिल आहे हे अधिकच बर कारण V &C होणे हा वाक्प्रचार कुप्रचारकच आहे!


Meggi
Monday, December 12, 2005 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yaÜgaÊ tuJao laoK naohmaIca Cana Asatat.. AaiNa p`%yaok vaoLI naivana ivaYayaalaa hat GaalaNaaro..

Yog
Monday, December 12, 2005 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Seema,
यासारखा लेख म्हणूनच मि रंगीबेरंगी वर लिहीणार होतो(एक चिन्तनपर किव्वा जे वाटतय वाचतोय अन दिसतय ते लिहीणं इतपतच यामागचा हेतू). unicode problem सम्पला की यापूढे तिथेच लिहीणार आहे. मुद्दा हा, की या लेखातून एखादी बाजूच चूक वा बरोबर असे कुठेही अनुमान काढलेले नाही..किव्वा IT मूळे शेती वा शेतकर्‍यांचे नुकसान होतय असा संबंधही दूरान्वये देखिल जोडलेला नाही. गिरी ने म्हटल्याप्रमाणे फ़क्त तफ़ावत अन विरोधाभास दाखवणे हा हेतू. so just take it in that perspective! :-)


Champak
Monday, December 12, 2005 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, शेती म्हंजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी १०० गायी म्हशी घेवुन दुध डेअरी काढायचं माझ एक स्वप्न हे! अन पाॅलीहाउस बांधुन त्यात फ़ुलशेती करायची हे अन एक ५ एकर पेरु ची बाग करायची हे!:-)

चांगले लिहिलेस! साहेबांचा वाढदिवशी छान चिंतन केलस


Moodi
Monday, December 12, 2005 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नद्या जोडुन भारत संपन्न करणे हे सावरकरांचे स्वप्न होते, माझे पण आहे.
माझ्या गावासारखे सुख कुणालाच मिळणार नाही. लहानपणापासुन उन्हाळ्यात दर ८ ते १५ दिवसानी पाणी तर आता अजुनही ६ ते ४ दिवसानी पाणी, कित्ती मज्जा नाही. शेतकर्‍याची तर माझ्यापेक्षा जास्त मजा.


Chinnu
Monday, December 12, 2005 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाळ्यात जळगावी हीच मज्जा अजुनही असते moodi ! योग, तुम्ही कळकळ छान मांडलीत.

Seema_
Monday, December 12, 2005 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी कोल्हापुर सांगली म्हणजेच महाराष्ट्र अस म्हणन्याचा प्रयत्न मी कुठ केलाय का?
शेतकर्‍यांच्या समस्या असल्या तरी त्यावर मात करुन इथल्या शेतकर्‍यानी आजही शेती हेच आपल उत्पनाच मुख्य साधन ठेवलेल आहे आणि त्यात तो सुखी ही झालाय हे सांगण्याचा उद्देश होता माझा . म्हणुण ते उदा . दील
नीट वाचा कि राव.
~D~D
योग मग रंगीबेरंगी मध्ये लिहिल की वेगळ्या perspective मधुन निषेध करायचाच नाही का? ~DD
TP बद्दल क्षमस्व

Atul
Monday, December 12, 2005 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,
तुमच्या लेखात अजुन एक विरोधाभास दिसतो तो असा की, तुम्हाला तुम्ही सोडुन इतर सर्वानी शेती करावी असे वाटते


Yog
Monday, December 12, 2005 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खि खि खि.. .. ..


Gs1
Tuesday, December 13, 2005 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकट चिंतन आवडले.
शेती हा भरवशाचा आणि फायदेशीर व्यवसाY कसा करता येईल यावर अनेक व्यक्ती, सम्स्था, नेते काम करत आहेत.

बाकी, माझ्यापुरते सांगायचे झाले तर मी यावर्षिपासून शेतकरी झालो आहे आणि गोपालकही. आता पुन्हा डॉटकॉम सारखा क्रॅश झाला तर उपाशी रहायची वेळ येणार नाही...


Lampan
Tuesday, December 13, 2005 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saQyaa ITvaalao laÜk Barpur pOsao kmavatat tr maga hIca laÜkM XaotImaQyao pOsaa ka gauMtvat naahIt ÆÆ kr vaacavaNyaasaazI laÜkMcaI marNaacaI QaDpD caalau Asato .. %yaasaazI mutual fund ,LIC AsalaM barca kaya kaya maI Aajaubaajaulaa pahtÜ pNa (atlao Ôrca qaÜDo laÜk XaotImaQyao pOsaa gauMtvatat AsaM ka Æ ka naahI AapNa eKadI CÜTIXaI jaimana d<ak Gaot Æ ³Aaplyaa maatRBauimacyaa tukD\yaalaa d<ak GaoNyaacaM Aavaahna Bauimapu~aMnaa kravaM laagatya hI KrÜKr koivalavaaNaI baaba Aaho....´
ikMvaa jaÜ XaotkrI kama krtÜya %yaacyaabarÜbar kahI vyavahar kÉna %yaalaa madt krt Æ yauit sarkarcyaa kaLat saaKrXaaLa caalat hÜ%yaa Aata %yaa qaaMbaNyaacyaa maagaa-var Aahot AsaM maI 2 3 idvasaapuvaI-cyaa poprmaQyao vaacalaM ..%yaacaM krNa pOXaacaa AaBaava hoca AsaNaar.. ka naahI AapNa eKVa pÜTitDIkInaI kama krNaaáyaa iXaxakalaa d<ak Gaot Æ .. Da^@Tr klabaagaaMcaa iva&anaaEama Aaho pabaLmaQyao ijaqao sagaL\yaat pihlaa
WLL tower ]Baarlaa gaolaa ... iktI laÜk inadana kutuhlaanaItrI h AaEama baGauna AalaI ikMvaa AapNa %yaalaa taMi~k dRYT\yaa kaya madt kÉ XaktÜ ho pahuna AalaI Æ tumacaI nausatI BaoThI itqalyaa laÜknaa ]%saah do[la ...
maI jao ilaihtÜya %yaacaa (a pÜsTXaI iktpt saMbaMQa Aaho ho malaa za]k naahI pNa manaat AalaM mhNauna ilaihtÜya..


Bsa
Tuesday, December 13, 2005 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग..... चिन्तन करायला लावलेस..

हा विषय डोक सुन्न करणारा आहे.


Dineshvs
Tuesday, December 13, 2005 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाडाचा शेतकरी नसलेल्यानी शेती करायची ठरवल्यावर काय काय होते ते साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात अवश्य वाचा.

Vaibhav_joshi
Tuesday, December 13, 2005 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग ... हे कसं सुचतं छान छान तुम्हाला ? .... असं सुंदर ललित लिहिणारे नक्की कसे जन्माला येतात?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators