Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
नवीन गोष्ट

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » कथा कादंबरी » नवीन गोष्ट « Previous Next »

Ajjuka
Wednesday, December 07, 2005 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असावा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं.
तसं तिच्याभोवती नैराश्याचे ढग जमण तिला नवीन उरलं नव्हतं. कधी बरं.. हा! रमाकांत.. तिचा नवरा.. तो गेल्यापासून हे असं काहीसं जाणवायला लागलं होतं. म्हणजे तिचं तिच्या नवर्‍यावर खूप प्रेम होतं आणि ती एकटी पडली होती असे काही नाही खरंतर.
रमाकांत जाणारच होता. त्याला ते माहित होतं. ती अशीच कधीमधी काहीबाही विकायला संध्याकाळची यायची. तिच्या चेहर्‍याकडे बघून रमाकांत गरज नसली तरी विकत घ्यायचा. तेव्हा ती होती २० - २२ वर्षांची मुलगी. अधू आईचा संसार सांभाळणारी. एकट्या आईशिवाय तिला नातेवाईक माहित नव्हते.
तर अशी ती काहीतरी विकायला एकदिवस आली आणि रमाकांत नेमकं नको असं म्हणाला. ती उदास होऊन गेली आणि चार दिवसांनी सकाळीच उगवली. डोळे सुजलेले, मनातून घाबरलेली. " आई गेली पर्वा! दवाखान्यात नेलं असतं पण तुम्ही काहीच विकत नाही घेतलंत. पैसे नव्हते. रहायची खोली रिकामी करावी लागली. "
रमाकांत मुळातून हादरला. बिचारा साधा माणूस. वयाने साधारण पन्नाशीला आलेला. अमाप पैसा आणि मागे पुढे कोणी नाही. एवढ्या मोठ्या सुंदर बंगल्यात एकटा रहायचा भुतासारखा. बंगला मात्र तो सुंदर ठेवायचा. ती त्याची गरजच होती. तर रमाकांतला अचानक तिच्या आईच्या मृत्युला आपण जबाबदार असल्यासारखे वाटायला लागले आणि त्याने तुला तू इथेच रहा म्हणून सांगितले. उपकार म्हणून नाही तर बंगल्याची देखरेख करायला म्हणून. बंगल्यामधे कुठेही असुंदर काही असता कामा नये ही त्याची अट होती.


Bee
Thursday, December 08, 2005 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सुरवात उत्तम झाली आहे.

Zelam
Thursday, December 08, 2005 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका सुरुवात छान आहे.
पण नाव दे ना ग गोष्टीला. प्रत्येकवेळी नवीन गोष्ट का?


Ajjuka
Thursday, December 08, 2005 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा घोळच आहे नाव देण्याच्या बाबतीत. यावेळेला कथा पूर्ण झाली की प्रयत्न करीन काही शोधण्याचा.

Kmayuresh2002
Thursday, December 08, 2005 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,शोध शोध.. नक्की एखादे छान नाव सापडेल:-)

Ajjuka
Thursday, December 08, 2005 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर अशी ती रमाकांतच्या घरात दाखल झाली. टापटीपीचे वळण होतेच पण ते गरिबीतले. एवढ्या मोठ्या बंगल्याची व्यवस्था राखताना तिच्या नाकी नऊ यायचे. आधीची housekeeper कसे काम करायची हे सगळे असा तिला प्रश्न पडायचा. ती सोडून गेली तेव्हाच नेमक्या आपण आलो हा योगायोग म्हणजे आपले भाग्य की दुर्भाग्य असाही प्रश्न तिला पडायचा. एवढ्या सगळ्या व्यवस्थेखाली तिचा जीव गुदमरून गेला नसता तरच नवल. चांगलंचुंगलं खायला मिळत असूनही ती ओढलेली दिसायला लागली.
" घरात कुणी आलंगेलं तर तू अशी समोर येत जाऊ नकोस. माझ्या सुंदर घरातली देखरेख करणारी बाईही सुंदरच हवी. इथे काय कमी आहे तुला? पाहिजे ते आहे. पैसाही कमी वाटत असेल तर सांग. मागशील तेवढे देईन पण हे घर आणि घरातलि प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसली पाहीजे. सगळ कसं आनंदी दिसलं पाहीजे. "
रमाकांत चे हे शब्द ऐकून तिला भिती वाटायची आणि मग ती आनंदी रहायचा प्रयत्न करायची. हळूहळू तिला हे हुकमी आनंदी रहाण जमायला लागलं. मग रमाकांतच्या सुंदर बंगल्यासारखी, बागेसारखी तीही हसरी दिसायला लागली.
ती पूर्वी रहायची त्याठिकाणी तिची काही जणांशी ओळख होती ते बंध तिने अजून पूर्णपणे तोडले नव्हते. अधून मधून एका काकूंकडे जाउन यायची ती. असेच एक दिवस बोलता बोलता तिच्या तोंडून ति कुठे रहाते आणि काम करते हे त्यांना कळले. आवडले नाही फारसे त्यांना, पण त्या काही तिला आपल्या घरी ये म्हणू शकत नव्हत्या म्हणून गप्प बसल्या. अर्थातच बातमी पसरली. तिने वस्ती सोडल्यापासून झुरणार्‍या नाक्यावरच्या मुलांना आयते कोलितच मिळाले. आपल्याला कधीही घासही न घालणारी मुलगी केवळ पैसा आहे म्हणून एका म्हातार्‍याबरोबर नुसती रहाते म्हणजे काय.. त्यांना त्यांच्या झुरणार्‍या वेदनेवर औषधच मिळाल्यासारखं झालं.


Bee
Friday, December 09, 2005 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, वाचायला मजा येते आहे. छान लिहिते आहे.

Kusumita
Friday, December 09, 2005 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढच्या कथेची वाट पहात आहे!

Bee
Friday, December 09, 2005 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुसुमिता, ही कथा अजून संपायची आहे.. पुढली कथा नंतर :-)

Kusumita
Friday, December 09, 2005 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला म्हणायचे होते की,याच कथेच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे!

Rupali_rahul
Thursday, December 15, 2005 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान आहे पण पुढचा भाग कधी येणार????

Ajjuka
Thursday, December 15, 2005 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहिते लिहिते... लवकरच लिहिते

Bee
Wednesday, December 28, 2005 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ताईसाहेब.. कधी लिहिणार आहेस? आम्ही वाट बघतो आहे, तेंव्हा वेळ काढ..

Ajjuka
Monday, January 09, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झालं! सगळ्या मुलांना संस्कृतीसंरक्षणाची नशा चढली आणि ती मुलं टोळक्यानी रमाकांतच्या बंगल्यावर आली. मुलं कसली माकडंच ती. त्यांना माहित असलेल्या फक्त एकाच पद्धतीने त्यांनी आपला निषेध नोंदवायला सुरूवात केली. बंगल्याचे दार, भोवतीची बाग आणि बंगल्याची भिंत याचा मनसोक्त नास केल्यावर मग त्यांनी शिव्या द्यायला सुरूवात केली. रमाकांत आणि तिच्यामधे होऊ शकतील अश्या सर्व व्यवहारांची यथेच्छ उजळणी करून तिला कैदेतून सोडून देण्याची रमाकांतला धमकी देऊन ती मुलं निघून गेली.
बाहेरचं दार, बागेतली झाडे, लॉन, बंगल्याच्या भिंती यांच्या झालेल्या दुर्दशेनी आधी चकीत आणि मग दुःखी झालेल्या रमाकांतला हे का नी कशासाठी हे कळायला बराच वेळ लागला. तोवर घरात ती घाबरलेली आणि रडवेली झालेली होती. स्वतः दुःखी होऊन घरात येणार्‍या रमाकांतला गोंधळलेली, घाबरलेली ती दिसली. त्याला पहाताच तिला रडू फुटले अपराधी भावनेचे आणि रडू येतेय याचेही.
" का रडतेस? काळजी करू नकोस मी तुला जायला सांगणार नाहीये यामुळे. अर्थात तुला ही कैद वाटत असेल तर तू जाऊ शकतेस. विचार कर. जाणारच असलीस तर मत्र जाण्यापूर्वी हे सगळ पूर्वी होत तसं करून घे आणि मग जा. चल रडत वेळ घालवू नकोस. " वरकरणी कठोर वाटले तरी ह्या शब्दांनी तिला ताळ्यावर आणले आणि ती कामाला लागली.
पण तिचे काम पुर्ण व्हायच्या आधीच परत एकदा सगळी टोळी येऊन गेली आणि बगेची नासधूस करून गेली. यावेळेला त्यांना तोंड द्यायला तीच होती. " अजिबात घाबरू नकोस. वस्तीत परत ये रहायला. तुला काही त्रास होणार नाही. " टोळीतला एक जण तिला आंगोपांगी निरखत म्हणाला. ती शहारली. तश्याच सुन्न मनानी कामाला लागली.
लवकरच सगळा बंगला पूर्ववत झाला आणि तिने ठरवले आज रमाकांतशी बोलायचेच. " हे माझ्याच्यानं होणार नाही. जोवर मी इथे रहातेय तोवर ती मुलं अशी उतमात करत रहाणार. कितीवेळा निस्तरायचं हे सगळ. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. मला दुसरी नोकरी मिळवून द्यायला तुम्ही मदत करा. "



Daizy
Monday, January 09, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजुका छान लिहीतेस पण जरा लवकर येवु देत पुढचा भाग

Kedard
Monday, January 09, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेझी तुझा गुन्हा अर्धवट सोडलास आणी तिला गुन्हा करू नकोस म्हणुन भाग पाडतेस काय! ~D

Kedard
Monday, January 09, 2006 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका येऊ दे पुढचं बिगीबिगी. एक महिना झाला ती घरी रहायला लागल्यापासुन,
आणी टोळकी पण दोनदा घरी येऊन गेली! पुढचं काय?

तुझी लेखन शैली सुंदर आहे, लवकर लिही पुढचा भाग.


Ajjuka
Monday, January 09, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार आणि डेझी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद... तुम्हाला माझ्या आळशीपणाची किर्ती माहित नाही तर... ज्याअर्थी एक पोस्ट टाकल्याटाकल्या पुढचे लवकर येऊदेत म्हणताय त्याअर्थी नक्कीच माहित नाही. एक पोस्ट लिहून झाल्यावर चांगले चार पाच दिवस गेल्याशिवाय हल्ली कुणी मला लवकर लिही म्हणायच्या भानगडीत पडत नाही हो. सगळ्यांना माहीतीये... एकवेळ मानाचा गणपती घाई करून हलेल पण हा गणपती काही हलणार नाही त्याची त्याची वेळ झाल्याशिवाय.. :-)


Bee
Tuesday, January 10, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर!!!!! अज्जुका, चार पाच दिवस काय ताणतेस.. ह्यावेळी तू चार आठवडे घेतले असशील.. :-)

Daizy
Tuesday, January 10, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे केदार मी तिला पुढ्चा गुन्हा करण्यास भाग पाडते आणि काय रे माझ्या सारख्या नविन मायबोलीकरांनकडुन चुक झाली तरी तो गुन्हा काय ?


Gajanan1
Friday, January 20, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकर लिवा पुढच.... ...... ....


Daizy
Saturday, January 21, 2006 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाईग ! लिही आत्ता लई झाला आळशीपणा

Abhi_s
Saturday, January 21, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अजुका बाई कशाला बिचार्‍या मायबोलिकरांना तर...आअआअआआ....ससससस देता, बस झाल आता,
येऊ देत की तुमची पोस्ट आता,
जास्त आळस बरा नव्हे......





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators