|
Gajanan1
| |
| Friday, December 23, 2005 - 10:24 am: |
| 
|
हिरव्या हिरव्या पानाआडून जणू सूर्यच उगवला. शब्द लोपले, काव्य हरपले, गळाही दाटला. निसर्गाच्या करणीपुढे काव्यप्रतिभेचा उतरला नक्षा. दिक्षित, दिक्षित कशी हो दिलीत अशी शिक्षा.
|
नुसतं सूर्यफूल असण्या पलिकडे तुला एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे तुझ्या प्रत्येक पिवळ्या पाकळीचे तुझ्या असण्यात खास महत्व आहे जवळ आल्यावर कळले फुला दूरून सगळीच सारखीच फुले प्रत्यक्षच भेटुया म्हटले तर एक एक अनंत आभाळ खुले तुषार जोशी, नागपूर
|
सोनसळी ग पिवळी घेइ हिरवा पदर मधोमध फुलारून कसे मोत्याचे झुम्बर सोनसळी ग पिवळी कशी कोवळी नाजुक कुठे नजर लावून कुठे कशी जवळिक सोनसळी ग पिवळी कळले ग तुझे गूज गगनातल्या रवीशी तुझे चाले हितगूज
|
Paragkan
| |
| Tuesday, December 27, 2005 - 10:32 am: |
| 
|
Good one Sumati!
|
Chinnu
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:33 pm: |
| 
|
वा वा सुमती. उत्तम अगदी!
|
सुमती, गोड, कविता! तुषार, नागपूर
|
Phdixit
| |
| Tuesday, January 03, 2006 - 5:41 am: |
| 
|
वा मित्रांनो तुम्ही कमालच केली मस्त कवीता आहेत सगळ्यांच्या एकदम झकास........
|
|
|