|
Bee
| |
| Wednesday, November 23, 2005 - 3:25 am: |
|
|
रात्री नऊ वाजता झोपलेली वनू एक वाजता उठली तेंव्हा तिची निम्मी झोप झाली होती. तिने विचार केला असेच जर रोज लवकर डोळे लागले तर किती बरे होईल! अजूनही तिच्या कानात मोझार्टचे स्वर तरंगत होते. आजूबाजूला पाहिले तर देवाजवळील दिवा मंद तेवत होता. बहुतेक दिव्यातील तेल सरले असावे म्हणून ज्योत निळी हिरवी होत जात होती आणि पांढर्याशुभ्र भिंतीवर फ़िकट पोपटी उजेड पसरला होता. खिडकीतून दिसणारी सव्वीश मजली ईमारात एखाद्या उंचच उंच पहाडासारखी वाटत होती कारण पौर्णिमेचा पूर्ण चंद्र नुकताच तिच्यामागे सरकला होता आणि दिसत होती ती फ़क्त नारींगी रंगाची आभा! तिने आपला एक पाय अलगद वर उचलून दुसर्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला तो भिंतीवर तिच्या कमनीय बोटापावलाची छाया पडली. तिच्याकडे बघत बघत तिला आठवले अरेच्चा किडनी बीन्स मधे आपण पाणी टाकलेच नाही तशी ती उठून बाहेर आली आणि दरवाजा उघडताच समीच्या अंगावर कोसळली. समी म्हणजे सहत्रबुद्धे मीराचे एक गोड नाव. तिच्या पासपोर्टवरून तिची ही एक ओळख झाली होती.
|
बी पुढची कथा येउ देत लवकर...
|
ती काही काळा नंतर येईल.
|
अंजली अस का बोलतेस तु मी वाट बघत आहे ना??? आणि मी बी ला म्हणाली आहे तु का उत्तर देत आहेस?
|
रुप अग मी पण वाट बघते आहे कधीची. मग मी आपला समज करुन घेतला की जसे नाव दिले आहे त्याप्रमणेच next part येईल.
|
|
|