Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
gauMjana

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२६ ( २००४ - ०५) » माघ » ललित » gauMjana « Previous Next »

Rachana_barve
Thursday, March 10, 2005 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नवीन घरात रहायला आल्यानंतरची ती माझी पहिली मैत्रीण. गुंजन. नावाप्रमाणेच एकदम मंजूळ आवाजाची आणि नाजूक साजूक. तिचं हिंदी सुद्धा इतका नाजूक वाटायच की ती ते बोलायची म्हणून नाजूक साजूक भासायच देवच जाणे.
माझ्याच वयाची पण तिच्यात माझ्यात जमिन आसमानाचा फ़रक. तिची माझी ओळखच मुळी चुकून झाली. नेहमीप्रमाणे मी सुट्टीमधे घरी आले होते. टळटळीत दुपार असल्याने बाहेर पडायची इच्छा नव्हती. असच सानीयांच एक पुस्तक घेऊन बाहेर अंगणात बसले होते. आणि वाटीत चिवडा, कपात चहा. सुखाची परीणीती दुसरी कोणती असते..
" पढ रही है आप? " नाजूक आवज कोणाचा इतका? म्हणून वळून पाहिले तर आमच्या घराच्या आणी त्यांच्या मधल्या कठड्यजवळ रेलून ती उभी होती.
हो अस मानेनेच मी तिला उत्तर दिले. आणि उठून तिच्या जवळ आले. डोक्यावरून घेतलेला पदर. पाणीदार डोळे, सरळ नाक, गोरी गोरीपान. मला ती बघताक्षणीच आवडली. " मै गुंजन. आप लोग यहा नये दिखते है " मला तिचे नावही तिच्याइतकेच आवडले.
" हा मै इधर नही रहेती. बॅंगलोर मे रहेती हू. ममी पापा इधर रहते है. " माझ हिंदी ऐकून मलाच कसतरी व्हायला लागले होते
" अकेली रहती है आप बॅंगलोर मे? " तिने कुतुहलाने मला विचारले.
" हां अकेलीच रहेती हू. तुम्हारे घर मे कौन कौन है "
सासु सासरे, दिर नणदा, नवरा ऐकून मलाच धक्का बसला. किती वयाची असेल ही. १८, २०..
"love marriage किया क्या? " मी मिस्किल्पणे तिला विचारले.
तशी ती लाजलीच. " जी नही. "

गुंजनची आणि माझी मैत्री पटकन जमली. एकतर तिच्या स्वयपाकावर मी बेहद खुश आणि तिला कुठेतरी जायला यायला माझी सोबत मिळायची म्हणून ती माझ्यावर खूष.
एकदा असेच कठड्यावरून उडी टाकून मी सरळ तिच्या घरी घुसले. सासू, सासरे north मधे कुठेतरी गेल्याने गुंजनकडे जायचा रस्ता एकदम मोकळा झाला होता.. घरी कोणी नसल्याने गुंजनदेखिल मोकळेपणाने बोलायला लागली होती.
रोज सकाळ पासून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही कोणत्याही विषयावर बोलून ख्या ख्या करायचो. ती चहाबरोबर मस्तपैकी काही तरी बनवायची. कधी पकोडे, कधी नुसतीच कोरडी भेळ, तर कधी तिखट मिठ लावून तेलाचा बोट लावलेले पापड....

गुंजनची रोज सकाळी १० वाजता पुजा चालायची. हे अजून एक माझ्यासाठी attraction होते. कारण एकच की तिच्याकडे एक अतिशय देखण्या कृष्णाची मुर्ती होती. आणि त्याहीपेक्षा देखणी तिची पुजा. सुबकतेने ती फ़ुल करंडीत रचून ठेवायची. स्वछ केलेल देवघर आणि त्यात उभी असलेली एकच २ फ़ुटी कृष्णाची पंचधातूची मुर्ती. काळजीपुर्वक ती रोज तिला पुसायची मग चंदन गंध लावून मोगर्‍याचा हार कधी जुईचा हार त्याला घालायची. मग कण्हेरीची फ़ुल, गुलाबाची फ़ुल खोचून डोळे मिटून ती काही श्लोक आरत्या म्हणायची. लक्ख पुसलेला पितळ्याचा दिवा, कसलीशी घममाट करणारी उदबत्ती. तो देखणा कृष्ण अजूनच देखणा व्हायचा...

गुंजनचे सासु सासरे तसे दिल्लीत रहायचे. अधूनमधून ते इथे यायचे. तशी ती त्यांच्या बद्दल फ़ार कमी बोलायची. त्यातल्या त्यात नणदे विषयी भरभरून बोलायची. नवर्‍याबद्दल मात्र ती कधी उत्साहाने बोललेली मला आठवत नाही.
" गुंजन तुम कभी अपने मिया के बारेमे नही बोलती. शरमाती है क्या " मी तिला कित्तीदातरी थट्टेत बोलायचे
" जी नही. लेकिन उनके बारेमे क्या बोलना. पापाजी जिनसे बोले उनकेसाथ शादी बनायी. "
तिच्या नवर्‍याला बघण्याचा अजूनतरी योग आला नव्हता. कसा असेल तिचा नवरा. तिच्याचसारखा नाजुक साजूक. किती प्रेम करत असेल तो गुंजनवर. मी आपल्या विचारातच असायची. गुंजन तिच्या नवर्‍याचा विषय काढल्यावर फ़ार अवघडल्यासारखी व्हायची म्हणून मग मीही तो विषय काढायचे नाही.

आई बाबा अमेरिकेत गेल्यानंतरची गोष्ट. मी नोकरी सोडून सरळ पुण्याला आले होते. त्यामूळे तशी पडीकच होते. एके सकाळी घराच्या दाराची बेल वाजली. घाईघाईत वाजवल्यासारखी आणि मग वाजतच राहिली. मी आपल लोळत काहीतरी टीव्ही वर बघण्यात गुंतले होते. दचकूनच मी बाहेर येऊन दार उघडले.
" गुंजन? " तिचा चेहरा बघून मी दचकलेच. " क्या हुवा? "
" वो अभीतक नही आये. कल रातसे राह देख रही हू. " गुंजनने रडतच जवळ जवळ सांगीतले. माझा जिव भांड्यात पडला. अग गेले असतीत कुठेतरी. येतील. कामात अडकले असतील. पण तिची समजूत काही पटेना. शेवटी मी कायनेटीक काढली.
" मालूम है किधर काम करते है? "
" जी हा वो कमीन्स मे काम करते है. "
मी गाडी कमिन्स च्या दिशेने सोडली. पण रस्त्यातच गुंजनच्या नवर्‍याची स्कूटर दिसल्याने आम्ही मगे वळालो. ती त्याची माझी झालेली पहिली भेट. गुंजनचा नवरा काहीतरीच होता. काळा, केसाळ धिप्पाड.. आणि उग्र चेहर्‍याचा. पण ते विचार बाजूला सारून चला आता मनसोक्त भेत तुझ्या नवर्‍याला अस काहीस तिला चेष्टेत सांगून मी घर गाठले. तिच्या नवर्‍याच्या जोरजोरात ओरडण्याने मी थोडीशी घाबरलेच. काय करतो आता हा माणूस विचाराने. न रहावून मी बाहेर येऊन गुंजनला हाक मारली तशी तिच्या नवर्‍याचा आवाज थांबला. मी तशीच तिची 5-10 मिनीटे वाट बघीतली पण आतली शांतता आणि कोणी बाहेर आले नाही बघून मी निमुटपणे आत गेले.

गुंजन त्या नंतर बरेच दिवस दिसलीच नाही. मग माझे इतर उद्योग सुरु झाल्याने मी देखिल बर्‍यापैकी बीझी झाले. गुंजनची हकीकत आईला फ़ोनवर सांगीतल्याने तिने मला नसत्या भानगडीत पडू नकोस अशी सक्त ताकीद दिल्याने मी गप्पच बसले होते. पण अमेरिकेत जायला फ़क्त महिना उरलेला असताना मी न राहवून गुंजनकडे जाऊन तिला मी जात असल्याची बातमी दिली.
क्षणबर तिच्या डोळ्यात पाणी चमकल्यासारखे वाटले.
" बहोत अच्छा. वहा जाके भुलेंगी तो नही ना? "
" अरे ऐसे कैसे भुलुंगी तुझे. "
" हम लोग भी जा रहे है. किधर वो तो अभीतक मालूम नही. "
" क्यु नोकरी दुसरी मिली क्या तुम्हारे husband को? " मी आश्चर्यानेच तिला विचारल. त्यांनी हे घर भाड्याने घेतल होत मला ठाऊकच होत.
" नही. कामसे निकाल दिया उनको. तिसरी बार हुवा है ये. अब वो पिके आते है और " पुढचे तिने शब्द गिळले असावते. मी काहीच बोलले नाही. ही इतकी शांतपणे कशी काय सांगू शकते मला.
" तुम कुछ action क्यु नही लेती? "
ती नुसतीच हसली. काहीच न बोलता ती तिथून उठली. तिने त्या दिवशी ३ तास खपून मला जेवायला बोलावले. पण बाकी सगळ बोलली तरी ह्या विषयावर ती बोलायला काही तयार नव्हती.

जाण्याची डेट तिने परत परत मला विचारून घेतली. नंतरच्या कामाच्या रगाड्यात मी थोडी तिच्याबद्दल विसरूनच गेले. कधीतरी मधेच तिच्या नवर्‍याचा चिडलेला आवाज मला ऐकू यायचा. पण गुंजनचा आवाज कधीच मी ऐकला नाही. जाण्याच्या दोनच दिवस आधी गुंजन घरी आली. ती इतक्या दिवसांमधे दुसर्‍यांदाच आमच्याकडे आली होती. तिचा चेहरा बघून मी दचकले. तिच्या कपाळावर जखम आणी हातावर वळ उमटले होते. मी ये क्या हुवा गुंजन विचारल्यावर ती कधी नव्हे ते नुसतेच मुसमुसत रडत राहिली. मी तिच्या केसात थोपटत राहिले.
" मै पोलिस मे कंप्लेंट करू क्या गुंजन? क्यु सबकुछ सहेती हो? चलो मै आती हु तुम्हारे साथ "
अस काहीस बोलत मी तिला थोपटत होते. तशी तिने डोळे पुसले. आणि हसली.
" नही रहेने दो.. तुम क्या परसो चली जाओगी. फ़िर मै किधर जाऊ. तुम्हारे जैसी पढी लिखि नही हू. कौन देगा मुझे नौकरी. अब तो मै पेटसे भी हू. किधर जाउंगी. और हमे आदत है ये सब सहेनेकी. मां ने भी यही किया था. सास ने भी अब मेरी बारी है. ये सब तो होता ही रहेता है " तिच्या बोलण्यावर सुन्न होऊन मी तिच्याकडे बघत राहिले. जाताना तिने एक छोटेसे पुडके माझ्या हातात दिले आणि तिथून ती निघून गेली. त्या पुडक्यात एक छोटासा कृष्ण होता. गुंजन नंतर मला दिसलीच नाही. मी नंतर आईला एकदोनन्दा तिच्याविषयी विचारले तशी ते तिथून गेले असल्याचे इतकेच कळले. मला खूप वाईट वाटते की मी तिला पत्ता विचारला नाही. पण मला खात्री नाही तिने तो मला सांगीतला असता की नाही.

परवा वुमन्स डे ला गुंजनची खूप आठवण झाली. आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकले नाही की केले नाही ह्याची खंतही.


Limbutimbu
Thursday, March 10, 2005 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rcanaa
AXaa Asan#yaÊ hjaarat laaKat gaunjana Aist%vaat Asatat
%yaalaa Xatkanca doXa kaLaca banQana naahI ho
naahI banQana jaatIpatIcao vaa Qamaa-cao
iEamant AsaÜ vaa garIbaÊ savaNa- AsaÜ vaa dilatÊ sauiXaixat AsaÜ vaa AiXaixatÊ XahrI AsaÜ vaa ga`amaINa
AXaa gaunjana BaoTtca rhatat
doXaÜ doXaI BaoTt rhatat
frk AsatÜ p`maaNaacaa....

jaKmaovar maIz caÜLayalaa kuNaI ivacaaÉ nakaÊ PlaIjaÊ kI tI pujat Asalaolaa ÌYNa kaya krt hÜta²


Sanghamitra
Friday, March 11, 2005 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rcanaa KrM Aaho ka gaM ho.
AgadI geniunely ilaihlaMyasa.
ilaMbaU mhNatÜ to KrMya. Aro ilaMbaUÊ ijaqaM maaNasaM Aahot itqaM ho hÜtca rhaNaar.
AaiNa KrMtr caaMgaulapNaa ha %yaa maaNasaatca Asalaa paihjao. %yaacaa Garacyaa pirisqatIXaIÊ iXaxaNaaXaIÊ saÝMdyaa-XaI kahI saMbanQa naahI.


Paragkan
Friday, March 11, 2005 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmm ....

Mitraa
Friday, March 11, 2005 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kup calaibacala JaalaI vaacaUna²²...
Ôar Cana ilaihlayasa rcanaa


Prajaktad
Friday, March 11, 2005 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Xabd²....qaaMbalao²
karNa manaatlaI p`%yaok KL\baL ÊXabdat baaMQata yaot naaih²...

rcanaa ²laoKnaXaOila ]%ËuXz²


Mita
Saturday, March 12, 2005 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DÜLo AÜlaavaUna gaolaI gauMjana..

Chandya
Saturday, March 12, 2005 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RB Cana ilaihlao Aahosa. jar AnauBaivat nasaola tr tuJyaa laoKnaXaOlaIsaazI double XaabaasakI.

Parnheen_jhaad
Sunday, March 13, 2005 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kupca ]<ama ilaihlaosa rcanaa .. ekdma kaLjaalaa laagalao gaM²




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators