Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » मधुमिलन » Archive through March 14, 2007 « Previous Next »

Badbadi
Monday, March 12, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२-३ दिवस सतत साडी नेसल्याने केतकीला कधी एकदा कपडे बदलेन असं झालं होतं. दगिने काढायला म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. इतक्यात बेल वाजली. बघते तर प्रसन्न च होता.

"काय रे, आई बाबांना सोडायला जाणार होतास ना?"
"हो... चाललो आहे. एक काम राहिलं, म्हणून आलो परत वर." असे म्हणत त्याने तिला हातात एक बॉक्स देत मिष्किलपणे डोळे मिचकावले.
"काय?" केतकी.
"उघडून बघ. आणि मी येईपर्यंत घालून बस. मी आलोच."
"सावकाश जाऊन ये रे"
"आज नाही. अब ये दूरी सहि ना जाये..." बाहेर पडता पडता प्रसन्न केतकीच्या पाठीवर ओठ टेकवून गेला.
केतकी मनोमन लाजली.
(आज च्या रात्री या दोघांना एकांत मिळावा म्हणून घरातले सगळे पाहुणे, आई बाबा मामाकडे गेले होते.)

तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात सुंदर सॅटिन चा, लेमन कलरचा २ पीस गाऊन होता. प्रसन्न ने दिलेल्या बॉक्स मध्ये असं काहि असेल हे वाटलंच नव्हतं तिला!!!
कपडे बदलून, चेहरा स्वच्छ धुवून केतकी ने तो गाऊन घातला. खूप गोड दिसत होता तो तिला. आरशात बघून ती स्वत:वरच जाम खूष होती. दोन दिवस सतत त्या मेक-अप मुळे तिला कंटाळा आला होता. केसाला नुसता एक fixer लावला. छान perfume, natural lipstic लावून केतकी टेरेस मधल्या आराम खुर्ची वर डोळे मिटून बसली.

तिचं मन मागे धावत होतं. सगळच कसं अचानक घडत गेलं होतं.
प्रसन्न हा एका मोठ्या IT कंपनीत project lead. मूळचा सोलापूरचा. आई-बाबा डॉक्टर. साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात एक फ्लॅट घेऊन ठेवला होता. प्रसन्न च पुण्यातच settle व्हायचं ठरल्यावर त्या घराचं renovation करायचं ठरलं. एका interior decorator कडे प्रसन्न गेला आणि सगळं ठरल्यावर हि assignment केतकीच्या बॉस ने तिला दिली. घराची रचना, प्रकाशाचे प्रमाण वगैरे बघून केतकी ने कामाला सुरूवात केली. प्रत्येक वेळी ती आणि प्रसन्न भेटायचे तेव्हा केतकी काहितरी नवीन बदल सुचवायची त्याला. तिचे रंगसंगतीचे कौशल्य आफाट होते. बघता बघता अवघ्या ५ महिन्यात केतकीने वॉल restructing पासून furniture, lights सगळे पूर्ण केले. प्रसन्न आणि बॉस दोघेहि तिच्या कामावर खूष होते. शेवटचं पेमेंट करायला प्रसन्न ऒफिस मध्ये आला तेव्हा बॉस ने तिला केबिन मध्ये बोलावलं.

"केतकी, well done young lady"
"Thanks sir!!! I hope Mr. Prasanna is also happy" ती प्रसन्न कडे बघून म्हणाली.
"Oh yes, he is. Actually त्यासाठीच त्यांनी आज लंच ला बोलावलं आहे मला आणि तुला. पण I have got some more important work to do. But you go ahead please"
"सर...."
"प्लीज...." प्रसन्न म्हणाला.
"ऒके. मी इथे बाहेरच बसते. तुमचं बोलणं झालं कि या माझ्या केबिनमध्ये. मग जाऊ आपण"
"Sure!!!" हसत प्रसन्न म्हणाला.

त्याच लंच मध्ये त्याने तिला लग्नाबद्दल विचारले होते. (म्हणजे हे सगळे बॉस ला माहित होतं तर!!!) त्याच्या अचानक प्रश्नाने ती जरा गोंधळली होती. मला थोडा वेळ हवाय असं सांगून ती सरळ घरी गेली. तसा तो पण तिला आवडत होता... पण एकदम लग्न!!! ती आईशी बोलली. आईने तिला कशाचा विचार करायचा नि कशाचा नाही हे समजावलं. त्या सगळ्याचा विचार करता केतकी च्या मनाने होकार दिला. प्रसन्नला तिने हे सांगितलं तेव्हा कसला आनंद झाला होता त्याला :-)

मग काय...त्याचे आई बाबा येउन आईला भेटले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली. सा.पु ते लग्न यामधल्या ३ महिन्याच्या काळात ते दोघं जवळ जवळ रोज भेटत होते.

"केतू, मी या weekend ला पुण्यात नाहिये. treking ला चाललो आहे."
"कुठे??"
"तोरणा"
"मी पण येऊ??"
या प्रश्नावर प्रसन्न खो खो हसत सुटला होता.
"इतकं हसायला काय झालं? नाहि येत मी."
"पर्वती चढली आहेस का कधी? तोरणा किती अवघड आहे माहित आहे??"
"चल, आत्ता चढून दाखवते पर्वती"

प्रसन्न च्या नंतर १५ मिनिटांनी ती वर पोचली होती आणि ते पण धापा टाकत. वर बसल्यावर नकळत त्याच्या खांद्यावर डोक ठेवून ती बसली.
"not bad huh!!! कधी जाऊयात मग तोरण्याला?" प्रसन्न ने विचारलं
"का? आता का? मगाशी किती हसू येत होतं"
"हो, पण पर्वती चढून मला हे सुख मिळत असेल(खांद्यावरच्या तिच्या डोक्यावर डोक टेकवत प्रसन्न म्हणाला) तर तोरणा म्हणजे ..........."
"वा वा...काय विचार आहेत!!! तोरण्याला लग्न झाल्याशिवाय जायचं नाही" त्याच्या खांद्यावरून डोक काढत केतकी म्हणाली.
"चालेल ना. असलं सुख मला लग्नानंतर हि हवंच आहे कि...."
"काय हा निर्लज्जपणा....." उभं राहत केतकी.
"अर्रेच्या, बायकोवर प्रेम करण्यात कसली लाज???"

----------------------------------------------------------------------------------------
"अगं, आपण HM साठि कुठे जाऊयात?"
"कुठेहि....."
"हे काय उत्तर?? सांग ना नीट"
"अर्रे!!! बरं तू सांग...तुला कुठे आवडेल??"
"मला काय... HM साठी कुठलंहि ठिकाण चालेल. तू मिठीत असलीस कि अजून काय हवं?"

हे असं काहि प्रसन्न बोलला कि केतकी लाजून चूर व्हायची.

----------------------------------------------------------------------------------------

"उद्यापासून भेटायचं नाही आपण?" प्रसन्न वैतागून विचारत होता.
"हो. उद्या घरी मुहूर्तमेढ उभी करणार. खूप पाहुणे असतील. परत मेंदि वगैरे...."
"निदान मेंदि दाखवायला तरी भेट कि......"
"ए, मेंदि रंगेल ना माझी? कि नाही?"
"आता हे मला कसं माहित असेल?"
"माठ्या, नवयाचं प्रेम असेल तर मेंदि रंगते असं म्हणतात"
"आईशप्पथ, कसल्या बावळट असता ग तुम्ही मुली. इथे मी प्रत्यक्ष भेटून प्रेमाचे पुरावे द्यायला तयार आहे ते नकोय पण मेंदिवर विश्वास.... जिथे माझं प्रेम तुला कळत नाही ते मेंदिला काय कळेल??"
"चिडू नको ना!!! सहाच तर दिवस आहेत. मग असेनच ना मी."
"हो.... या सगळ्याचा बदला घेणार आहे मी. आत्ता जमेल तितकि झोपून घे. मग कधी पूर्ण रात्र झोप मिळेल असण नाही."

----------------------------------------------------------------------------------------
काल लग्नाच्या दिवशीचे पण सगळे चोरटे सुखकर स्पर्श केतकीला आठवत होते. सप्तपदीच्या वेळी खांद्यावर ठेवलेला हात, मंगळसूत्र घालताना त्याने हळूच मारलेली फुंकर!!! अगदी आज सकाळी पूजेच्या आधी आसपास कोणी नाही हे बघून हळूच ओढलेला गाल. आठवणीने च शहारा आला केतकीच्या अंगावर.
डोळे उघडून तिने घड्याळ बघितले. अर्धा तास झाला.... अजून कसा नाही आला हा?

इतक्यात बेल वाजली. प्रसन्नच होता.... तिला त्या गाऊन मध्ये बघून जाम खूष होता. दारातूनच त्याने तिला एक flying kiss दिली.

"आवडला??" च्प्पल काढत त्याने विचारलं.
बाईसाहेब बेडरूम पर्य़ंत पोचल्या होत्या.

"केतू, वाट बघत होतीस माझी??" तिच्या खांद्यांवर हात ठेवून तिच्याकडे रोहून बघत प्रसन्न विचारत होता.
"तू change करून ये" दुसरं काहितरी बोलायचं म्हणून ती म्हणाली.
"सांग ना....वाट बघत होतीस माझी??" तिच्या केसाचा fixer काढत तो म्हणाला.
तिचे छान मोकळे केस अलगद मानेवर, पाठीवर पसरले.
"जा आधी तू change करून ये"
"कशाला?? थोड्यावेळाने होणारच आहे कि...change!!!!"
त्याच्या या एकाच वाक्याने केतकीची धडधड इतकि वाढली कि लाजून काहिहि न बोलता ती मागे वळून चालू लागली. प्रसन्नने तिचा हात मागच्या मागेच धरला. सोडवून घ्यायचा प्रयत्नहि न करता ती जागीच उभी राहिली.. तसं प्रसन्न ने तिला जवळ ओढली.
पाठमोया तिला सरळ करत म्हणाला "आत्तापासूनच लाजतेस?? कसं व्हायचं देवा माझं"
"परवापासून नुसतं डोळ्यानीच बघतोय.... नऊवारीतील माझी केतू, पैठणी नसलेली केतू...आत्ता माझ्यासमोर हे असे मोकळे केस, अशी लाजरी हसरी केतू. सगळयाच वेळी छान दिसतेस ग. केतू, केतू...... I love u. मला दूर नको ठेवूस."
"ए, माझी मेंदि रंगली आहे. बघ..." हात पुढे करत केतेकी म्हणाली.
"त्या मेंदिपेक्षा चेहयावरची लाली बघ. जास्त सुंदर आहे"
हे ऐकूताच केतकीचे डोळे आपोआप मिटले गेले.
प्रसन्नने तिच्या जवळ जाऊन कपाळावर ओठ टेकले.
इतक्यात केतकी...
"अ...आऊच...."
"काय ग...काय झालं? केतू, डोळ्यात पाणी आहे तुझ्या.....काय झालं"
"काहि नाही. तुझा पाय जोरात लागला माझ्या बोटाला. विरोली मुळे दुखतय ते आधीच. एकदम कळ आली रे."
"काय?? बघू मला. आधी बोलायचं नाहीस का??"
प्रसन्न ने तिला बेडवर बसवलं.
"बघू कुठे ते...."
"अरे इतकं नाहिये बाबा. एकदम धक्क लागला नि कळ आली इतकंच"
"केतू, अग रुतली आहे विरोली बोटात. सुजलय बोट. कसं सहन केलंस?? सांगायचस ना सकाळीच. श्या आता घरात कापूस पण नाही."
हळूहळू अलगदपणे प्रसन्न ने दोन्हि पायातून विरोली काढली. "कशाला ग घालता असलं काहितरी तुम्ही बायका??"
"लग्न दु:खदायक असतं हे कळावं बाईला म्हणून" केतकी अगदी सहज बोलून गेली. पण क्षणात तिला चूक लक्षात आली.
प्रसन्न ने नुसतंच बघितलं तिच्याकडे. shaving kit मधलं antiseptic क्रिम आणून, जखमेवर लावत तो म्हणाला
"असेल दु:खदायक, तरी मी आहे ना.... जखमांवर मलम लावायला, फुंकर घालायला. इतका विश्वास तर आहे ना?"
पायावर मलम लावणारा त्याचा हात हातात घेऊन केतकी म्हणाली "तो विश्वास आहे...नक्किच!!!"
हात काढून घेऊन तो ते क्रिम ठेवून आला.

"प्रसन्न, Sorry....."
हा शांत एकदम. आजच्या या क्षणांची तो किती वाट बघत होता हे तिला माहित होतं. एकतर नेमकं आजच तिला पायाने त्रास द्यावा....खूप अपराधी वाटत होतं तिला.
"बोल ना रे.... sorry म्हणाले ना!!!" त्याचा खांद्यावर डोकं टेकवीत ती म्हणाली.
"केतू, sorry कशासाठी?"
"माझ्यामुळे तुझा मूड spoil झाला.....पण मला ते दुखत नाहिये जास्त. खरंच."
"ओह....असं काहि नाहिये गं. अगं आजच्या क्षणांची प्रत्येकच जण वाट बघत असतो ना!!! तुझ्यासारखी बायको असेल तर कोण वेडा होणार नाही?" तिच्या मांडिवर त्याने डोकं ठेवलं.
"पण म्हणून काय मी फक्त माझाच विचार करेन का ग? जे क्षण मला हवे आहेत ते जर तुला वेदना देत असतील तर मला त्रासच होईल. हे सुख, हा सहवास दोघांनी मिळून घ्यायचा... तुला नको असेल किंवा त्रास होत असेल तरी मी मला हवं तेच कराण्याइतका वाईट नाहिये ग मी"
केतकी मंद हसत होती. प्रसन्नचा हा गुण तिला पहिल्यांदाच दिसत होता. चेष्टेखोर, romantic प्रसन्न इतका समजूतदार, परिपक्व पण होता.
नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते. प्रसन्न तिच्या केसांशी मनसोक्त खेळत होता. तिच्या चेहयावरून बोट फिरवताना, मांडिवर डोकं ठेवून तिच्या डोळ्यात बघताना होणारे तिच्या चेहयावरचे बदल टिपत होता. बोलता बोलता केतकीला कधी झोप लागली कळलंच नाही.

कसल्यातरी आवजाने दचकून केतकी जागी झाली. घड्याळाचा गजर होत होता. प्रसन्नचा हात तिच्या गळ्याभोवती होता, तिला पटकन ऊठताहि येईना. हळूच त्याचा हात बाजूला करत ती उठली. खिडकिच्या पदद्यामागे घड्याळ होतं. गजर बंद केला. बघते तर काय रात्रीचे ३.१५ च वाजले होते. बेडरूम डेकोरेट करताना कोणीतरी हा मध्यरात्रीचा गजर लावण्याचा चावटपणा केला होता. बेडवर झोपलेल्या प्रसन्न कडे तिने बघितलं. छान शांत झोपला होता. तिला झोप लागल्यावर कधी जाऊन तो change करून आला, कधी झोपला काहि कळलंच नाही. केतकी चा पायाचा ठणका थांबला होता.

तशीच किती वेळ तरी ती त्याच्याकडे निरखून बघत होती. शेवटी झोपताना प्रसन्नच्या ओठांवर तिने अलगद ओठ टेकवले. तिच्या केसांमुळे त्याच्या चेहरा पूर्ण झाकला गेला. गजर झाल्यापसून इतका वेळ झोपेचं सोंग घेतलेला प्रसन्न याच क्षणाची वाट बघत होता. केतकीला काहि कळायच्या आत त्याने तिला इतक्या जोरात जवळ घेतलं....

"आआअह........" केतकी
या आवाजाने मिठी सैल करत प्रसन्न "अजून दुखतय?? sorry..."
केतकीला हसूच आवरत नव्हतं..... प्रसन्न कळायचं ते कळून चुकला.....
"मला फसवतेस काय.... थांब आता....सोडतो का बघ....." प्रसन्न तिला अजून जवळ घेत म्हणाला
..................
..............................................
................................
............

त्यानंतर ते दोघे नुसते स्पर्शानेच बोलत होते.
प्रसन्न मात्र मनात ३.१५ ला गजर लावणाया मित्राचे आभार मानत होता.

(समाप्त.)
(हे सगळं पूर्ण काल्पनिक आहे. याचे कोणाशी, कोणाच्या जीवनाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. :-)
पूर्णपणे काल्पनिक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घेणे. काहि सूचना असल्यास नक्कि सांगा.)

Psg
Monday, March 12, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My God!!! बडे, सहीच.. :-)
कसलं romantic लिहिलं आहेस!
हाय!


Abhiyadav
Monday, March 12, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bade..

shabd nahiyet majhyakade..khup ekasandh aani pravahi aahe.

how romantic..



Maku
Monday, March 12, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahich aahe katha ............



Nandini2911
Monday, March 12, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त.. रोमांटीक आणि सही..
एकदम आवडलं.,,


Yogy
Monday, March 12, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahi aahe katha ............

Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे क्युट आहे गं गोष्ट.

Disha013
Monday, March 12, 2007 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, खुप क्युट आणि रोमॅन्टिक होती कथा.
आणि ही पुर्णपणे काल्पनिक असणार, यात कोणताही संशय नाही. :-)


Adi787
Monday, March 12, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि.. खरचं "मधु(र) मिलन". :-)

Dineshvs
Monday, March 12, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे कथा बडबडी. शेवटच्या निवेदनाची खरेच गरज नव्हती. कथा हि नेहमीच वास्तव आणि कल्पना याच्या सीमारेषेवर असते, असावी.

Chinnu
Monday, March 12, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी, गोड आहे हं गोष्ट. :-)

Zakasrao
Monday, March 12, 2007 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा! सकाळीच ही गोष्ट वाचली. मन प्रसन्न झाल. खुप छान आणि रोमॅंटीक लिहिली आहे. मस्तच. हळुवारपणे मोराच पिस अंगावर फ़िरल्यासारख वाटल.

Kandapohe
Tuesday, March 13, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे छानच लिहीले आहेस. केतकी काय सुरेख नाव आहे. प्रसन्न ऐवजी मयूर नाव असते तर 'केतकीच्या बनी' शिर्षक देता आले असते. :P

Rupali_rahul
Tuesday, March 13, 2007 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, मस्त हळुवार, रोमॅन्टीक कथा आहे...

Badbadi
Tuesday, March 13, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

दिनेश, मी बहुतेकवेळा माझ्या काही अनुभवाचा धागा पकडूनच लिहिते. यावेळी तसं नव्हतं म्हणून ते स्पष्ट करावसं वाटलं. न जाणो हे एखाद्याचे/ दिचे खरे अनुभव असतील तर उगाच शंका नको :-) मी केवळ जाणीवेतून लिहिलं आहे हे इथे सांगायचं आहे.

केपी, मलापण केतकी नाव आवडतं. (शाळेतल्या या नावाच्या एका मैत्रीणीच्या काहि गोड आठवणी पण आहेत). राहिला प्रश्न मयुर चा- इथे कहि लिहिताना शक्यतो मी मायबोलीच्या निदान माहित असलेल्या नावांचा वापर टाळते. :-)


Rahulphatak
Tuesday, March 13, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे, काल कथा वाचली. चांगले लिहीले आहेस. सहज आणि ओघवते आले आहे.
रोमॅन्टिक वाचायला टिपिकल बायकी लिखाणामुळे कंटाळा येउ शकतो, पण इथे तसे झालेले नाही ( no offense to anybody here! माझी वैयक्तिक आवड म्हणजे नावड सांगितली :-))

so keep it up ! :-)

(फक्त 'समाप्त' नंतरचा परिच्छेद टाकयलाच नको होता.. निदान वेगळे तरी पोस्ट करायचेस. )


Lalu
Tuesday, March 13, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडी, मला पण आवडले. :-)
RP, >>रोमॅन्टिक वाचायला टिपिकल बायकी लिखाणामुळे कंटाळा येउ शकतो, पण इथे तसे झालेले नाही
अगदी, अगदी. :-) पण "बायकी लिखाण" म्हणजे काय रे? ~D

Abhi_
Wednesday, March 14, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे, समाप्त नंतरचा परिच्छेद वगळला तर बाकी गोष्ट एकदम आवडली :-)

Krups
Wednesday, March 14, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम सहीच ग!!!!
छान लिहील आहेस.


Milindaa
Wednesday, March 14, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे गोष्टीची २ पोस्ट्स होत नाहीत तोपर्यंत
"वा..वा..",
"अजून येऊद्यात",
"ही सत्यकथा आहे का गं / रे?", सत्यकथा सोडा, पण
"तुझाच अनुभव आहे का?" इ. प्रश्न विचारण्याची जी अहमहमिका लागलेली असते त्याकडे बघून बडबडीने टाकलेला Disclaimer अगदी योग्य आहे असे माझे मत आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators