|
Chaffa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 3:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!! साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास अढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ. च्या प्रेमळ कटाक्षावरुन संकट येणार हे तर आता नक्की झालं मग मी बापडा आपला नेहमीप्रमाणे येणार्या लाटेला तोंड द्यायला तयार झालो. यथासांग सगळे चहापानादी सोपस्कार पार पडल्यावर चिरंजीव अक्की तोफ़ झाडते झाले. " पप्पा आपनेको ना एक पेट पाळ्नेका है" ईती. अक्की. याचं एक कळत नाही मी मराठी,माझी मराठी हा आमचा बाणा असल्याने अक्कीला चांगल्या मराठी शाळेत टाकला आणी पुढे ईंग्रजीत आमच्या सारखा मार खाउ नये म्हणुन पुढे निम ईंग्रजी मधे घुसवले पण प्रत्यक्षात याच्या मुखातुन नेहमी रेशनिंगच्या धान्यासारखी भेसळयुक्त हींदी झरत असते आता सुद्धा आपले राष्ट्रभाषेवरचे प्रेम माझ्यासमोर उतू घालवत म्हणाला " पप्पा आपनेको ना एक पेट पाळना है". तंद्रीतुन बाहेर येत मी जरा जोरातच विचारले "काय रे? ही तिनतिन पोटं पाळतोय ते काही कमी वाटतय का ?" अहोऽऽ, तुमचं आपलं काहीतरीच, पेट म्हणजे पाळीव प्राणी म्हणतोय तो "चि. अक्की कडे कौतुकाने पहात सौ. म्हणाली. आणी ईतक्या वेळची शांतता भंग करत संकटाची त्सुनामी माझ्यावर कोसळली. क्रमश
|
Sakhi_d
| |
| Thursday, March 15, 2007 - 12:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चाफ़ा ईबलीसपणा करायचा सोडुन तु इकडे कुठे आलास?? पण सुरवात छान आहे....
|
Zakasrao
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे वा चाफ़ा लगे रहो.
|
Chaffa
| |
| Friday, March 16, 2007 - 11:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्राणी पाळायचा आणी तोही आपल्या घरात? मी करवादलो पण इथे माझ्या वाटण्या न वाटण्याचा काही फ़रक पडत नाही हे ईतक्या वर्षाच्या अनुभवाने सिध्द झालेलेच होते तरीही मी प्रतिकार करायचा एक दुबळा प्रयत्न करुन पाहीला अक्कीवर उखडत म्हणालो कार्ट्या ईथे आपल्याला रहायला नाही जागा मग तुझा पाळीव प्राणी कुठे ठेवायचा? हत्तेच्या आहो आपली गलरी आहे की एवढी नाहीतरी काय ठेवलय तिथे रद्दी शिवाय माझ्या ग्रंथ संग्रहाला खुशाल रद्दी म्हणुन मोकळी होत सौ ने अक्कीची बाजु घेतली आणी आता आपली बचावफ़ळी पुर्णत कोसळल्याची मला जाणीव झाली. अरे पण ईतके दिवस आपले त्यावाचुन काही आडले होते का कोसळणारी बाजु सांभाळायचा एक केविलवाणा प्रयत्न करत मी विचारता झालो. आहो, तुम्ही फ़ार जुन्या काळात वावरताय आजुन आजकाल असे पेट्स पाळणं म्हणजे फ़शन झालीये म्हंटलं सौ फ़णकारत म्हणाली नाहीतरी तुम्हाला काय कळतय फ़ॅशन म्हणजे काय ते नेहमी आपले शर्ट आडकवला की निघाले काही मचिंग आहे की नाही ते पहाणं तर सोडाच पण साधा टाय सुध्दा निट बांधलेला नसतो. आता मात्र माघार घ्यायची वेळ आली हे मला जाणवले त्यातल्यात्यात माघार जरा यशस्वी पणे घ्यावी म्हणून म्हणालो ठीक आहे पण कुत्रा मांजर हे असले प्राणी नकोत मला आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त करावे लागते त्या पेक्षा तुम्ही दुसरा एखादा चांगला आणी उपयोगी प्राणी पाळायच पहा. मनात विचार केला निदान दोन दिवस तरी घरात शांतता लाभेल आणी दुसर्याच दिवशी माझा हा विचार किती पोकळ होता ते दिसुन आले. क्रमश
|
Maku
| |
| Saturday, March 17, 2007 - 11:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
aare chffya lavakar lihi naaa
|
Chaffa
| |
| Sunday, March 18, 2007 - 11:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दुसर्या दिवशी घरी आलो तर आजचे वातावरण काही वेगळेच वाटत होते थोड्क्यात घराचे देवनार होणार ही चिन्हे दिसायला लागली होती आणी बळी अर्थात मीच असणार याची खात्री होतीच म्हणा, पण तरी माझा इवलासा जिव मुठीत धरुन मी वावरत होतो फ़क्त आजचे मरण उद्यावर ढकलता येइल का याचाच विचार करत होतो पण तेही नशीबात नव्हते.! चहाच्या कपाबरोबरच पुढचे वादळ आंगावर आले काय हो.! कालचा विषय अर्धवट टाकलात तो.? सौ. विजेसारख्या कडाडल्या. नाही गं.! मी फ़क्त इतकेच म्हणालो की कुत्रा मांजर असले प्राणी पाळण्या पेक्षा एखादा लहानसा प्राणी पाळता आला तर पहा वादळात छत्री उघडण्याचा माझा प्रयत्न. तोवर चि. अक्की नावाचे चक्रीवादळही त्यात सामील झाले, पप्पा मेरेपास है ना लिस्ट, नेहमीप्रमाणे राष्ट्रभाषेच्या गारा पडायला लागल्या. आता शरणागती हाच शेवट्चा मार्ग उरला होता म्हणुन मी आपली छत्री आपलं शस्त्रे टाकली. ताबडतोब अक्कीने खिशातुन एक भलीमोठी यादिच बाहेर काढली. अचानक मला आज हवा जरा जास्तच गरम असल्याची जाणीव व्हायला लागली अक्कीचे यादी वाचणे चालु झाले ( यालाच बहुतेक यादवी म्हणत असावेत,) कुत्रा, मांजर, नको म्हणुन सांगीतले तरी यादीत होतेच! झालच तर ससा, कासव,पोपट, पुढे पांढरे उंदीर या शब्दाबरोबरच एक किंचाळी उमटली आणी मी समजुन गेलो कमीत कमी एक प्राणी तर घटला. पण ही यादी जशी पुढे सरकायला लागली तसे माझे हातपाय गार पडायला लागले मघाची वातावरण गरम असल्याची भावना हळूहळू बदलायला लागली. पुढे साप, अजगर ही नावे ऐकुन तर मला हूडहूडीच भरली. शेवटी पुन्हा एकदा माघार घेत मी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकाची निवड करायला सांगितली. आणी दुसर्याच दिवशी आमच्या घरात टिम्मीचे आगमन झाले. ते मांजराचे गोंडस पिल्लू पाहून मलाही उगिच विरोध केला असे वाटायला लागले. दोन तिन दिवस घरात फ़क्त या टिम्मीचाच विषय चालु असायचा. आज की नै टिम्मीने असे केले, आज तसे केले टिम्मीच्या कौतुकाला नुसते उधाण आले होते. अखेरिस त्या मर्जारजातीने आपले खरे स्वरुप उघड करायला सुरुवात केली. संघ्याकाळी नेहमी प्रमाणे थकुन भागुन घरी आल्यावर चहा मिळेलच याची खात्री देता येइना! कारण घरातल्या दुधाचा कधी फ़न्ना या टिम्मी कडुन उडवल्या जाइल याचा भरवसा नसायचा. माझ्या बुटातुन मोजे पळवणे हा त्याचा लाडका छंद झाला होता त्यामुळे कधी निळा हिरवा कधी काळा जांभळा अश्या रंगिबेरंगी मोज्यांचे जोड वापरणे माझ्या नशीबी आले.कितीही लपवले तरी एका दिवशी एका खवचट मित्राच्या लक्षात आलेच पण असाच दुसरा एक जोड माझ्या घरीपण आहे असे सरदार छाप उत्तर देउन मी वेळ मारुन नेली हळू हळू टिम्मी आपली किर्ती आजुबाजुलाही पसरवायला लागला. शेजारच्या काकु नेहमी संध्याकाळी कपभर दुध मागायला येउ लागल्या, कारण टिम्मी. आता ही ब्याद घरातुन जाइल तर बरे असे वाटायला लागले आणी एके दिवशी तो शुभदिन उजाडलाच! रविवारी दुपारी मस्त सुटीचा आनंद घेत वर्तमानपत्र वाचत पडलो होतो आणी स्वयंपाक घरातुन एक जोराची किंकाळी आणी पाठोपाठ लाटणे भिरभीरले. सौ. आतुन ज्वालामुखी सारख्या विस्फ़ोटक पद्धतीने बाहेर आल्या आणी टिम्मीच्या नावाने शंख करत झाला प्रकार वदत्या झाल्या " मेल्याने शेजारच्या घरातुन मासे पळवुन माझ्या किचनच्या कट्ट्यावर आणून टाकले" आता सापडूदेच मेला पाठीत लाटण घालते त्याच्या." मी आपला भोळे पणाचा आव आणत म्हणालो "अगं ते मांजर जर मेले तर मग बघ आपल्याला सोन्याचे मांजर घेउन काशीला जायला लागेल बरे! आणी मग तुझा तो हार मग कसा करायचा.? यावर बरेच आकांड तांडव झाल्यावर अखेरीस टिम्मीची रवानगी दुर कुठेतरी करायचा असा ठराव बहुमताने पास झाला एक मताने नाही कारण चि. अक्की याचे मत त्याच्या विरोधात होते अर्थात भारतीय राजकारणाच्या अलिखीत नियमा प्रमाणे बळाचा वापर करत त्याचे तोंड बंद करण्यात आले हे जाणकारांनी ओळखले असेलच. तर या बहुमताच्या जोरावर मी टिम्मीला घरापासुन बर्याच लांब अंतरावर सोडून आलो आणी सुटकेचा एक मोऽऽऽठ्ठा निश्वास सोडुन सकाळी नेहमीप्रमाणे पाट्या टाकायला ऑफ़िसात निघुन गेलो. पण माझे ग्रह आजुनही योग्य स्थानी आलेले नव्हते! याचे प्रत्यंतर घरी आल्यावर लगेच आले. क्रमश
|
|
|