|
Shrini
| |
| Friday, March 09, 2007 - 1:25 am: |
| 
|
सिग्नल लाल झाला आणि तिची आलीशान, वातानुकूलित गाडी चौकात येऊन थांबली. दिवसभरात करायच्या कामांची मनात उजळणी होत असताना तिचे लक्ष सहज डावीकडे गेले. तिथे एका 'धूम' बाईकवर बसलेला, तगडा, अतिशय देखणा तरूण, काचेतून थेट तिच्याकडेच रोखून पहात होता. ती क्षणभर गोंधळली. आपला काळा रंग, सामान्य चेहरा तिच्या पूर्ण परीचयाचा होता. तिच्या तल्लख बुद्धीमुळे जरी ती यशस्वी झाली असली, तरी तिच्याकडे दुसर्यांदा पाहण्याचे कष्ट एखादा सामान्या मुलगाही घेत नसे. आणि आज तर हा देखणा तरूण आपल्याकडे अगदी टक लावून पहात आहे... तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच फोल ठरला. पुन्हा जेव्हा तिची नजर त्याच्या चेहर्याकडे वळली तेव्हा तो तिच्याकडे पाहून हलकेच हसला. तिच्याही नकळत त्याचे हास्य तिच्या चेहर्यावर शतवर्धित झाले. कदाचित या युवकाला अंतर्दृष्टी असावी, आणि त्याने आपल्या बुद्धी - मनाचे सौंदर्य पाहीले असावे, असा एक विचार तिच्या मनाला चाटून गेला... आपल्याला आतापर्यंत आलेले कटू अनुभव, झालेली उपेक्षा, पचवलेली दारूण निराशा, हे सर्व तिने बाजूला सारले आणि त्या युवकाकडे पहात हात हलवला. इतक्यात सिग्नल हिरवा झाला. आपल्या बाईकला धूम वेग देत तो युवक क्षणार्धात निघून गेला. आणि मग तिला आठवले, आपल्या गाडीच्या काचा 'टीटेड' आहेत!
|
Princess
| |
| Friday, March 09, 2007 - 2:16 am: |
| 
|
छान सुरुवात आहे. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
|
Shrini
| |
| Friday, March 09, 2007 - 3:48 am: |
| 
|
Princess, गोष्ट एवढीच आहे. माझा हा देखील प्रयत्न फसला म्हणायचा... अस्तु!
|
Princess
| |
| Friday, March 09, 2007 - 3:57 am: |
| 
|
)))))))))) गोष्ट एवढीच असली तरी छानच आहे. पण तु समाप्त लिहिले नाहीस त्यामुळे कळले नाही. प्रयत्न फसला नाहीये.
|
मला वाटलंच होतं की एवढीच गोष्ट असेल.. श्रीनिच्या आधीच्या कथा वाचून... खूप सुन्दर आणि मनाला स्पर्शुन जाणारे गोष्ट.. लघुकथा हा तुमचा हक्काचा प्रांत आहे..
|
Ajjuka
| |
| Friday, March 09, 2007 - 5:43 am: |
| 
|
माझी गोष्ट वाचतेय असं वाटलं मला.. 
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 6:09 am: |
| 
|
अरे संपली देखिल ही कथा. मला वाटलं श्रिनिनी आता कादंबरी लिहायला घेतली. तर ही सुक्ष्मकथा निघाली. कथा लय आवडली श्रिनि.
|
Psg
| |
| Friday, March 09, 2007 - 7:00 am: |
| 
|
श्रिनी, सही पंच आहे! मस्त!
|
Shyamli
| |
| Friday, March 09, 2007 - 7:11 am: |
| 
|
आणि मग तिला आठवले, आपल्या गाडीच्या काचा 'टीटेड' आहेत!>>> माझा आवडता प्रकार शेवटच्या ओळीत पंच आवडेश
|
Shrini
| |
| Friday, March 09, 2007 - 8:26 am: |
| 
|
प्र्तिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार! .. 
|
Ashwini
| |
| Friday, March 09, 2007 - 9:58 am: |
| 
|
मधूनच धूमकेतूसारखा काय उगवतोस रे? जरा नियमीत लिहीत जा की. बाकी लघुकथा मस्तच आहे.
|
shrini, uttam ahe katha. short and sweet.
|
Asami
| |
| Friday, March 09, 2007 - 11:39 am: |
| 
|
भंते घेतलेल्या break चे सार्थक करताहात
|
Chinnu
| |
| Friday, March 09, 2007 - 3:05 pm: |
| 
|
श्रिनी मस्त! ... ...
|
सही कल्पना, श्रीनि! सुरुवात वाचताना मला बेटीची कथा आठवत होती 'इदं न मम'..
|
Ana
| |
| Friday, March 09, 2007 - 3:25 pm: |
| 
|
श्रिनी खास, आवडेश.. ..!
|
Supermom
| |
| Friday, March 09, 2007 - 3:28 pm: |
| 
|
छानच. शेवट एकदम अनपेक्षित अन सुरेख
|
Disha013
| |
| Friday, March 09, 2007 - 9:01 pm: |
| 
|
छान आहे 'इटुकली गोष्ट'. शेवट खासच.
|
Jayavi
| |
| Saturday, March 10, 2007 - 12:47 am: |
| 
|
श्रीनी..... खूपच सुरेख!! शेवट Terrific !!
|
Manuswini
| |
| Saturday, March 10, 2007 - 4:48 pm: |
| 
|
poor thing तिला बिचारीला तेव्हढाच आंनद जोर का धक्का धीरे से होता पण
|
Pendhya
| |
| Saturday, March 10, 2007 - 5:01 pm: |
| 
|
श्रीनि, छान " प्रसंग " घेतलास. ( प्रसंग, म्हणण्याला, तुझा आक्षेप नसावा, असे गॄहीत धरुन ) . असेच छोटेछोटे, वेगवेगळे प्रसंग, सर्वांच्या दैनंदिन जीवनात नेहमी घडत असतात.
|
Shrini
| |
| Monday, March 12, 2007 - 3:30 am: |
| 
|
प्रतिसादाबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद! अश्विनी, 'नियमितपणा हा प्रतिभेचा कर्बवायू आहे...' :D
|
|
|