पुनम मस्तच लिहिला आहेस. मग झाला का तुमच्या कडे महिला दिन?? ;) -भावना.
|
पूनम सही. फक्त नावे बदलली की माझ्याही मैत्रिणींना फिट बसेल हा प्रसंग. शेवट तर अगदी हहपुवा आहे. याला चहा देऊन रंपा काढणे म्हणता येईल.
|
Ashwini
| |
| Friday, March 09, 2007 - 10:10 am: |
| 
|
पूनम, मी नसतं हं cancel केलं असं. अग, किती दुर्मीळ कपिलाषष्ठीचा योग असतो हा नवरे आणि मुलांशिवाय भेटण्याचा. मी तर तो मूळीच चुकवत नाही, ...महिन्यातून एकदातरी. 
|
Dinesh77
| |
| Friday, March 09, 2007 - 10:25 am: |
| 
|
सहीच, पण सगळ्या बायकांना नवर्याने (त्यांच्या त्यांच्या) केलेला चहा पांचट का लागतो???
|
lol पूनम मी पण नसती हो miss केली ladies night out! मेंदी सकाळीच उरकून आले असते पळून . मिल्याच्या हातच्या चहा वर समाधान मानावे लागल्याने शेवट फ़ार करुण झाला आहे महिला दिनाचा

|
Dineshvs
| |
| Friday, March 09, 2007 - 11:32 am: |
| 
|
पूनम, सगळ्या महिला आल्या नाही तर ईतकी धम्माल, आल्या असत्या तर काय झालं असतं ?
|
Nalini
| |
| Friday, March 09, 2007 - 1:13 pm: |
| 
|
काय योगायोग आहे. काल मीही नवर्याच्या हातचा पांचट चहा पिलेय. ह. ह. पु. वा. 
|
Anilbhai
| |
| Friday, March 09, 2007 - 1:52 pm: |
| 
|
कम्माल आहे. सगळ्या बायकाना नवर्याचा चहाच पांचट आवडत नाही. *कोणितरी येवुन म्हणेल 'आता पांचटपणा पुरे'. 
|
Abcd
| |
| Friday, March 09, 2007 - 4:46 pm: |
| 
|
असे अजिबात नाही.माझा नवरा बेस्ट चहा करतो. Better than me
|
Psg
| |
| Saturday, March 10, 2007 - 12:19 am: |
| 
|
ज्यांची नावं या ललित मधे घेतली त्या सर्व हितगूजकर मैत्रिणींचे सर्वप्रथम आभार.. त्यांनी हे दिव्यात घेतले म्हणून बाकी सगळ्यांचे धन्यवाद, आवडल्याबद्दल आणि आवर्जून तसे कळवल्याबद्दल. महिला दिन म्हणून नाही, पण अनेक वेळा बायकांचे उत्साहानी आखलेले बेत या ना त्या कारणांमुळे फ़िस्कटताना पाहिलेत मी.. माझेही अनेक वेळा फ़िस्कटलेत.. तर या निमित्तने म्हणले हे highlight तरी करूया.. कधीतरी मैत्रिणींना भेटायचे झाले तर लंगड्या सबबी तरी देऊ नयेत कोणी असा 'उदात्त हेतू' वगैरे.. आणि अगदीच काही नाही, तर थोडा विरंगुळा, थोडा टीपी म्हणून लिहिले. तुम्ही गोड मानून घेतले, मी खुश आहे!
|
मला तर बोवा आधी ती सत्यकथाच वाटली! 
|
Jayavi
| |
| Saturday, March 10, 2007 - 10:42 am: |
| 
|
पूनम......... एकदम सही लिहिलं आहेस गं....! होतं खरं असंच. पण शेवट वाचून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. खूप छान लिहितेस गं राणी
|
Milya
| |
| Saturday, March 10, 2007 - 1:10 pm: |
| 
|
पूनम छान लिहिले आहेस... पण तुला एवढा शहाणा, समजुतदार नवरा मिळाला असुनही तुझे बेत फ़िस्कटतात तर तुझ्या मैत्रीणींचे काय होत असेल समजु शकतो मी 
|
Manuswini
| |
| Saturday, March 10, 2007 - 6:16 pm: |
| 
|
मिल्या, स्वःताची तारीफ़ करण्याची एकही संधी कोणी सोडु नये असे म्हणायचे आहे का तुला?
|
२९ फेब्रुवारी सोडला तर वर्षाचे ३६५ दिवस महिलांचेच असतात. :-P विनोदाचा भाग सोडला तरी सुशिक्षित महिला आप्ल्या हक्कांबद्दल जागरूक असतात. सुंदर मांडणी आहे.
|
Meenu
| |
| Monday, March 12, 2007 - 9:15 am: |
| 
|
मिल्याच्या हातच्या चहा वर समाधान मानावे लागल्याने शेवट फ़ार करुण झाला आहे महिला दिनाचा >> अगं बाई डीजे माझ्या लक्षातच आलं नव्हतं हो .. आता माझेही डोळे अगदी भरुन आले आहेत .. मिल्या अतुल छान चहा करतो हो .. शिकुन घे बरं त्याच्याकडुन .. आणि समजुतदारपणातही काकणभर सरसच असेल तुझ्यापेक्षा, तर ये हो धडे गिरवायला .. मी आणि पुनम जाउ बाहेर तुमच्या शिकवणीच्या वेळात
|
Hems
| |
| Wednesday, March 14, 2007 - 8:55 am: |
| 
|
वा पूनम ! मस्त लिहिलयस ! वास्तवाला मारलेल्या कोपरखळ्या उच्च !
|