|
***************** तुमचे स्वतःचे साहित्य इतर साईटवर पोष्ट करुन, येथे फ़क्त लिंक देता येइल. *****************
Hems
| |
| Monday, February 26, 2007 - 1:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा ! ही छानच आहे कल्पना. आम्ही आमच्या "कला" या संथेच्या site वर "श्रुतीपुस्तके" अर्थात audio books अशी लिन्क ठेवली आहे जिथे mp3 format मध्ये काही पुस्तकातील कथा / प्रकरणे उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वीच्या आपल्या मायबोलीच्या दिवाळी अंकातली माझी "अहेव" ही कथाही आहे. इथे पहा: http://www.calaaonline.com/audio/ahev.mp3 आणि आपला अभिप्राय जरुर कळवा!!
|
Supermom
| |
| Monday, February 26, 2007 - 1:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेम्स, ही लिंक चालत नाही ग.
|
Anilbhai
| |
| Monday, February 26, 2007 - 3:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आता बघा
|
Hems
| |
| Monday, February 26, 2007 - 4:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
SM , बहुधा अनिलभाई ती लिन्क personalize करत होते म्हणून काही काळ चालत नसावी-- आता चालतेय ! धन्यवाद अनिलभाई !
|
Mahaguru
| |
| Monday, February 26, 2007 - 4:58 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेम्स, मी ऎकली कथा . कथा आणि द्रुक्-श्राव्य साहित्याची कल्पना दोन्ही आवडले. काल आपली भेट होवु शकली नाही पण अनिल अवचटांच्या साहित्याचेही audio version करणे चालु आहे असे कळाले.
|
Bee
| |
| Monday, February 26, 2007 - 9:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खूपच छान वाटली ही कल्पना. अनिलभाई, तुम्ही स्वतः तो 'स्वताः' शब्द बरोबर करा पाहू
|
मी Las Vegas body art conference'06 मधे दिलेले मेंदीचे छोटेसे demonstartion. http://www.hennapage.com/henna/video/deepali.wmv
|
Maku
| |
| Tuesday, February 27, 2007 - 3:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
छान आहे दीपान्जलि ....
|
मस्त आयडिआ !!! अभिनंदन !!!!
|
Arch
| |
| Tuesday, February 27, 2007 - 11:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फ़ारच छान. हेम्स, तुझी कथा आधीच आवडली होती पण तुझ वाचनही तेवढच छान आहे. तुला आणि तुझ्या मुलीला ई प्रसरणवर ऐकल. तुझी मुलगी किती अस्खलीत मराठी बोलते. खूपच कौतुक वाटल. Deeps , काय सहजतेने काढतेस ग तू मेंदी. फ़ारच सुंदर. एकदम talented आहेस.
|
Hems
| |
| Tuesday, February 27, 2007 - 6:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
महागुरू आणि अर्च धन्यवाद! महागुरू, बरोबर आहे. येत्या काही दिवसात अवचटांचं पुस्तक येईल तिथे. अर्च , माझ्या लेकीला सांगते गं! अगदी खुष होईल ती !
|
Suvikask
| |
| Wednesday, February 28, 2007 - 2:03 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिपा, फारच सुंदर मेंदी काढतेस तू अगदी सहजपणे great ..... तुझ्या हातावरचे रंगीत tatu सुद्धा लक्ष वेधुन घेतात. हेम्स, काय सुंदर वाचली आहेस कथा... अगदी आवाजांच्या बारकाव्यांसह... तुझा अवाजही छान आहे. फार आवडल.. तुझी कथा, तुझे वाचन, आणी अवाज देखिल..
|
Manuswini
| |
| Wednesday, February 28, 2007 - 3:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेम्स, खुप सुंदर. गोड आवाज, एकदम authentic मराठी बोलणे, नी एकदम touchy , मी तर पुर्ण visualize करत होते. माझ्या आजीची आठवण झाली एकदम. गोरि पान, निळसर डोळे, आम्हा १२- १५ नातवंडांचे अगदी आवडीने करायची उन्हाळ्याच्या सुट्टीत. पण ती छोटी आडवी लाल चीरी लावायची आणि हो तीची पण अशीच पेटी होती जीला ती हात मात्र लावु द्यायची नाही. आजोबा माझे डॉक्टर होते आणि नेहमी तीला चिडवायचे की तुझ्या रूपाने लग्न केले आश्चर्य म्हणजे त्या काळी सातवी शिकलेली माझी आजि चक्क चांगले बर्यापैकी english बोलायची गोव्यात राहुन झालेला आजु बाजुच्या तीच्या christian मैत्रिणींचा परिणाम. हेम्स, sorry हं मी इथे लिहिले, पण मला 'अहेव' ह्या शब्दाचा अर्थ नाही कळला. गोष्टी प्रमाणे मी असा लावला की अहेव म्हणजे अतीव सुंदर, पवित्र असाच ना? दीपाली, छान काढतेस तु मेहेंदी, तुझ्या हातावर टाटु छान आहेत.
|
Zakasrao
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'अहेव' ह्या शब्दाचा अर्थ नाही कळला>>>>>>>>>> मनुस्विनी अहेवचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे सौभाग्यवती असणे. जसे की अहेवपणी मरणे सौभाग्यवती असताना मरणे बरोबर आहे का? कोणी सांगेल का?
|
Supermom
| |
| Wednesday, February 28, 2007 - 9:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो, अहेवचा हाच अर्थ आहे.
|
Safaai
| |
| Wednesday, February 28, 2007 - 9:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हल्ली एक सदस्य प्रश्न कमी विचारतो म्हणून दुसर्या कोणीतरी त्याचा वसा घेतलेला दिसतोय
|
Aashi
| |
| Wednesday, February 28, 2007 - 12:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेम्स, फ़ारच छान. लहानपणी रेडीओवर कथा ऐकायचो त्याची आठवण झाली. एक गोष्ट जाणवली 'आजोळ' मधला 'ज' चा उcचार असाच करतात का? दीपा, सुन्दर किती सफ़ाईदारपणे काढतेस तु मेहेन्दी
|
Bee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सफ़ाइ, तुम्हाला माहितीच असेल की इथे duplicate ID घेऊन इतर कुणाचे नाव बदनाम करणारे काही सभासद आहेत. ह्यातून नेमकं त्यांना काय प्राप्त होतं काही कळत नाही.
|
Suvikask
| |
| Thursday, March 01, 2007 - 5:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
"एक गोष्ट जाणवली 'आजोळ' मधला 'ज' चा उcचार असाच करतात का? " हे मलाही जाणवले... पण लिहायचे राहुन गेले. जहाज च्या ज प्रमाणे याचा उच्चार हवा.
|
Hems
| |
| Thursday, March 01, 2007 - 4:07 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुचेता मनू, Aashi , तुमच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद! मनू , अहेव चा "सौभाग्य" असा अर्थ बरोबर आहे गं. Aashi आणि सुचेता, मी " जीत " मधल्या " ज " सारखाच उच्चार ऐकला आहे " आजोळ " मधल्या " ज " चा. पण "जनाबाई " " राजा " या शब्दांच्या उच्चारंबाबतही मतभेद असतात नेहेमी.प्रांतागणिक उच्चार बदलतात वाटतं या शब्दांचे! प्रमाण भाषेत उच्चार काय होतो ते सांगा बरं कुणीतरी!
|
Manuswini
| |
| Thursday, March 01, 2007 - 6:15 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
thanks ज्यांनी अर्थ सांगीतला त्यांना.
|
Desh_ks
| |
| Sunday, March 18, 2007 - 6:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मायबोलीच्या सर्व रसिकांना नवसंवत्सराच्या शुभेच्छा "पुन्हा घेउनी नवीन आकांक्षांचे नव अंकुर उभे उद्याच्या उंबरठ्यावर नवीन संवत्सर अशुभाला दवडून दिगंती; सदैव मंगलकर दहा दिशा उजळून भरू दे हृदयी सर्वेश्वर" चैत्र प्रतिपदा; शके १९२९; चित्रभानु संवत्सर
|
|
|