|
लग्ना नंतर ३ वाढदिवस, ३ Valentine, २ लग्नाचे वाढ दिवस, २ दिवाळ्या आणी असेच अनेक सण-समारंभ आले नी गेले. आले नी चक्क गेले.याच उदाहरणा सोबत स्पष्टिकरण अस ,स्मिता नावाच्या मुलिच्या चेहर्यावर कधिही स्मित न येणे म्हणजे ती केवळ नावाची स्मिता, बरोबर कि नाही, अगदि १००% बरोबर. तसच नावाचे सण आले व गेले त्यात सण आल्या सारख वाटल हि नाही वा वाढदिवसाच्या दिवशी माझा पहिला वाढदिवस आहे अस ही दुर दुर ही भासल नाही. (पहिला म्हणजे लग्ना नंतर पहिला; तस मी नेहमीच आपला १६ वाढदिवस वा साजरा करायचे पण लग्नानंतर नेहमी म्हणजे निदान काही वर्षे १८ वा करणार होते; not to tell any body but just to avoid ligal complications nothing else) जरा अति detail स्पष्टि करणा साठी excuse me हं! पण लग्ना नंतर आपोआपच सवय होते बायकांना sorry मुलिंना कोणत्याही गोष्टीत खोलात शिरण्याची व त्या गोष्टीला अनेक वेळा उगाळुन तिचा चोथा झाला असला तरी चावण्याची. पण संसारात सार चांगल्या बाजुने पाहायच असत म्हणुन या गोष्टीला ही मी just a part of communicational development असच consider करते. लग्नानंतर ची माझी आणखी एक उपल्ब्धी म्हणजे "अखंड प्रवचन" आता तुम्हाला वाटेल मी अगदी आध्यात्मीक वै. झाले की काय संसार सुरु केल्यावर ;पण तस आहे ही आणी नाही ही, ही प्रवचन त्याच "चोथा" झालेल्या गोष्टींची असतात. (ज्यांचा लाभ मला हि नसतो तर इतरां ना काय डोंबल होणार.) उदाहरणा सोबत स्पष्टिकरण ज्या प्रमाणे संत समाज सुधारणा करण्यासाठी 'कारणांची' वाट बघत नाही त्या प्रमाणे मला हि प्रवचन सुरु करण्यास 'कारण' लागत नाही आणी एकदा का मी सुरु झाले मग कधि कधि तर "गिनिज" बुकवाल्यांनी "अखंड" बोलण्या चा माझा 'साहसी पराक्रम' नोंदायला जरुर जरुन प्रकटाव अस कौतुक? माझ्या प्रिय श्रोत्यांना, श्रोत्याला "आमच्या ह्यांना" होत. तसा त्यांचा ही वाटा मोलाचा हो माझ्या ह्या "अखंड बडबड" बडबड रडण्यात. (not to tell anyone but "आमचे हे" व त्यांनी केलेल्या चुकाच तर माझे प्रेरक आहेत.) असो. जरा धाप लागलि हो पण होते कुठे मी सणांच्या गणितात की गिनिज बुकात. हे असच होत हो गेल्या २ वर्षांपासुन असते मी झुमरी-तलैया ला अन पोहचते Disney फ़्लोरिडाला. काय सांगत होते नी काय बोलतेय. हं तर मुळ विषय ३ १८ वे Birthday, ३ valentine, २....सारे सण-समारंभ आले नी गेले पण आमच मेल नशिबच फुटक. आमचा वाढदिवस, दिवाळी याच कोणला मेल काही नाही, याच्याशी कोणला घेण देण नाही. त्यामुळे काही घेण्या देण्याचा प्रश्नच नाही. आता काय सांगु तुम्हाला,(not to tell any one but तुम्हाला म्हणुन सांगते हो) काल का परवा इतका मोठा सण येवुन गेला, इतका मंगल दायी, शुभ मुहुर्त दर महिन्यात का येतो ? अहो १४ Feb बद्द्ल बोलतेय मी. पण शुभ काय नी मंगल काय; आमच 'शुभ मंगल सावधान' झाल्या पासुन सारे शुभ मंगल क्षण सावधान झलेत कायमचे. कधी विश्राम घेवुन येतिल आमचे कडे ते त्या 'गजानाना व्यालेनटाईनलाच' ठाउक. न एक फुल, न एक गजरा, अहो फुलाची कळी-पाकळि ही नही, देवापुढच वाळक फुल ही चालल असतो हो मला, पण कसच काय? कसली १४ फेब न कसची Valentine treat. कसकस झाल बाई मला, जिव भरुन आला अगदि इतक्या मोठ्या पर्वाला आमची मेली पर्वाच नाही अगदि परवा पर्यंत लोणी लावुन. किति किति लाडि-गोडि केली, मस्का मारला पण काही नाही हो काही काही हाती आल नाही इतके पापड लाटुन.लोकांची उदाहरणही दिलि, लोक ही पर्वणी कशी कशी साजरी करतात याची पण उदाहरणही दिलि पण आमची ओंजळ 'खाली'. (म्हणी सह स्पष्टीकरण "पालथ्या घड्यावर पाणी", "नवर्या पुढे वाचली गीता".) दोनाचे चार नाही चांगले ४०, ४००, ४००० ४.......झालेत हो 'शब्द' माझ्या शब्द्कोशातले, भाषेचा संसार वाढला म्हणायचा लग्ना नंतर ; हि हि एक प्रोग्रेस/development/"उपलब्धी नाही का लग्ना नंतरची.असो. परत भरकटण्या आधी मुळ मुद्या कडे आलेल बर नाहि तर नेहमी प्रमाणे सार इकडच-तिकडच, 'मागच' बोलुन होइल व मुळ विषय आपला बाजुलाच. (not to tell anyone but नेहमी प्रमाणे म्हणजे लग्ना नंतर नेहमी प्रमाणे) १४ फेब आली नी गेलि. तशी नुसतिच नाही गेलि मझ्यात "मी रायटर बनना चाहति हुं" अशी आग पेटवुन गेली. मेरा नवरा जो अब तक मेरे लिए गुढ रहस्य आहे, त्याच मै सबको मेरे शब्दोंसे introduction करवाना चाहति हुं इसलिये 'मी रायटर बनना चाहति हुं' (not to tell anyone but लग्ना नंतर मिळालेल्या communication development, भाषा वाढ, "अखंड प्रवचन" यांचा समाजाला नको का उपयोग व्हायला) आता तुम्ही म्हणाल इतका सोस आहे मग सोबत त्यांच्या मी कशी? not tell anyone but बाई माणसाच हेच तच मेल चुकत "त्यांच्या वर केलि प्रिती"
|
वाचकांनो, मायबोलिकरांनो हा माझा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. झेलुन घ्या Please. चु.भु. सांभाळुन घ्याल ही आशा.
|
Psg
| |
| Saturday, February 17, 2007 - 12:11 am: |
| 
|
छान लिहिलं आहेस परिणीता
|
परिणीता छानच आहे हं प्रयत्न. काही कोट्या तर एकदम सही आहेत. थोडंसं editing केलं असतंस अजून तर जास्त सोपं झालं असतं.
|
|
|