Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 05, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » विनोदी साहित्य » कोटीच्या कोटी » Archive through February 05, 2007 « Previous Next »

Manas6
Wednesday, January 24, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोटीच्या-कोटी..

पूर्वी रीडर्स डायजेस्ट' ह्या प्रसिद्ध इंग्रजी मासिकातुन 'टुवर्डस मो‌अर पिक्चरस्क स्पीच' ह्या नावाने एक सदर येत असे.त्यात अनेक कोट्या-युक्त,खुसखुशीत, व चटकदार वाक्यांचा समावेश असायचा.-'जसे 'व्हाय डज इट टेक अवर्स टु प्रीपेयर द मिनीटस ऑफ मीटींग?'. ह्याच धर्तीवर मराठीतील 'अमृत' ह्या मासिकात 'मुद्राराक्षसाचा विनोद' ह्या नावाने एक सदर यायचे, (आता हे मसिक प्रसिद्ध होतेय अथवा नाही ह्या विषयी मला माहिती नाही). तश्याच प्रकारचे काहीतरी मायबोलीवर यावे म्हणुन हा खटाटोप
--------
* मराठी भाषा गमतीदारच आहे- ज्या पुरुषाला, स्त्री आयुष्यभरासाठी वरते, त्याला नवरा, म्हणजे 'न'वरा म्हणजेच 'वरु नकोस' असे का म्हणतात ते कळत नाही!
**********
'खाकी' वर्दी घातलेल्या प्रत्येक माणसाचा 'अरे, खा की' हाच 'खाक्या' असतो का?
***********
लोणचे घालण्याच्या कृतीला 'अचार-संहिता' का म्हणू नये?
***********
माझ्या 'रमेश' नावाची मित्राची रास त्याच्या नावात 'मेश'(आणि स्वभावात 'मेष') असुन सुद्धा 'वृषभ' कशी?- असा मला नेहमी प्रश्न पडतो
***********
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या आंतर-विभागीय नाट्य-स्पर्धेत पुढील नाटकांना पारितोषके मिळाली असे कळते- १) फिटे अंधाराचे जाळे २) दिवा जळु दे सारी रात ३) मालवून टाक दीप
***********
'कर हा करी, धरीला..' ह्या ऒळी नाट्यगीतकाराला नगर परिषदेत टॅक्स म्हणजेच कर भरताना सुचल्या असतील का?
***********
"अग दमयंती, नळ आला का पहा बरे"- हे वाक्य परवा ऐकले, नाटकात नव्हे; आमचे शेजारी त्यांच्या मुलीला नळ आला का(नगर परिषदेचा), ते बघायला सांगत होते.
***********
माझ्या संगणकाची 'रॅम' बोंबलली, (थोडक्यात- तिने 'हे राम' किंवा 'हे रॅम' म्हटले)
************
ज्यांच्या पत्नीचे नाव संगीता आहे, त्यांना 'संगीताची आवड' असणे आवश्यक असते
***********
परवा पाटी बघितली- दंतवैद्य डॉ.कवळी
***********
सांस-बहूच्या सीरीयल्स ह्या खऱ्या अर्थाने 'धारावाहीक' असतात, कारण त्यात सतत कोणाच्या तरी डोळ्यातुन 'धारा' वाहत असतात!
***********

पुढील वेबसाईटस सुरु करायचा विचार आहे- पहिली म्हणजे चुगल.कॉम आणि दुसरी काथ्याकुट.कॉम. काथ्याकुटचा सदस्य होण्यासाठी चुगल.कॉम चा सदस्य असणे(म्हणजे 'चुगलखोर' असणे) आवश्यक राहील. काथ्याकुटवर 'स्क्रेप-बुक'मधे जास्तीत-जास्त काथ्याकुट करणाऱ्याला पुरस्कार देण्यात येईल.(काथ्याकुटवर खुप लांबुन काढलेले फोटो, अप-लोड करायला बंदी असेल.)
**************
काही सिने-तारका आणि खेळाडूंच्या नावात असे बदल करावेसे वाटले
*उर्मिला मा(झे)तोंड(गोड)कर
*मार्टिना नवराति(ला)हवा...(अजुनही ती अविवाहीत आहे,असे म्हणतात....कोण मी?....बचाओ.ऽ..ऽ..ऽ..ऽ)
* (जवळ)याना गुप्ता.

**************
काही अचाट मराठी भाषांतरे-
एका परग्रहवासीयांवर आधारीत असलेल्या हॉलीवूड चित्रपटाच्या नावाचे-
* क्लोज एनकाऊंटर्स विथ द थर्ड काईंड= तृतीय पंथीयाची जवळून झालेली भेट.
* 'ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स' प्रेसेंटस= विसाव्या शतकातला कोल्हा सादर करीत आहे (ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स ही चित्रपट निर्मीती क्षेत्रातील एक कंपनी आहे)
* ओह, माय स्वीट हार्ट= हे माझ्या गोड हृदया!
*आय एम नॉट फीलींग वेल- माझी विहीर रिकामी आहे
**************
दादरहुन नागपुरला जाणारी 'सेवाग्राम एक्सप्रेस', जाताना,अगदी खेडवळ भासणाऱ्या, इतक्या स्टेशनवर थांबत जाते की, तिला 'सेवाग्राम'च्या ऐवजी 'ग्रामसेवा एक्सप्रेस' का म्हणु नये, असा विचार माझ्या मनात येतो.
***************
मित्राच्या शेजारचे एक वारकरी कुटुंब....नित्यनेमाने पंढरीची वारी करायचे, पण एकमेकांशी नेहमी कडाकडा भांडायचे, त्यामुळे त्यांना तो 'वॉर-करी' संप्रदायातले' म्हणायचा
****************
आमची आजी वाती वळायला बसल्यावर,आमचे आजोबा, हिचा 'वातविकार' बळावला आहे असे म्हणायचे
****************
मायकेल जॅकसनच्या सगळ्या अल्बमसना मला 'शब्दांच्या पलिकडले' असे नाव द्यावेसे वाटते. कारण तो काय आणि कोणते शब्द उच्चारतो हे कोणाच्याही बापाला कळत नाही.
******************
काही नाट्यगीतांची/गीतांची अशी विडंबने सुचली-
*शेजाऱ्यांकडचा दिवाळीतील लाडू खाताना- 'कठिण, कठिण, कठिण किती, स्त्रीचे हृदय बाई.( लाडू खाताना आणि त्याची खोटी तारीफ करताना पुरुषाला किती किती 'वदन-वेदना' होत असतील ह्याचा लाडू बनविताना,जरा सुद्धा विचार केलेला नसतो म्हणून)
* खाणावळीतील 'नुकताच पाऊस पडून गेल्यासारखी' दाळ खाताना- 'वद खाऊ कसे हे वरण ग'
* फटकळ शेजारणीकडे बघुन- 'चंडिका ही जणू'
* नन्याचे बुफे पार्टीत आलू-पराठ्यांवर ताव मारताना पाहुन- 'वेगात पराठे मीच हाणले सात'(नन्याची फुकटच्या पार्ट्यातील पचनशक्ती इतकी दांडगी आहे की, तुम्ही 'सात'च्या ठिकाणी 'साठ' म्हटले तरी काहीच बिघडणार नाही..नन्याचे पोट तर नक्कीच नाही)
* माझा मित्र मकरंदला 'रताळे' विकत घेताना पाहुन- "घेई कंद मकरंद"
********************
कधी कधी आपल्या देशाचा अर्थ-संकल्प पाहुन त्याला 'अर्थहीन अर्थसंकल्प' आणि आपल्या अर्थ-मंत्र्यांना 'अर्थ-हीन अर्थमंत्री' असे नाव द्यावेसे वाटते.
**********************
राधाकाकू कुठलीही गोष्ट उसनी देताना उगीच 'कां-कूं' करतात...पण का..का?
**********************
'झटपट इंग्रजी' वर्गात इंग्रजी शिकलेले,बोलताना, इंग्रजीशी इतकी 'झटापट' का बरे करतात कुणास ठाऊक?
**********************
-मानस६





Runi
Wednesday, January 24, 2007 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेगात पराठे मीच हाणले सात >>>>
मानस सऽहीच.....
रुनि


Gurudasb
Wednesday, January 24, 2007 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस ,
मानलं तुला . आवडलं . हे असलं लिहायला , वाचायला मलाही फ़ार आवडतं .


Meenu
Wednesday, January 24, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही काहि कोट्या मस्त आहेत. पण BB चुकला वाट्ट

Kedarjoshi
Wednesday, January 24, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कर हा करी, धरीला..

Himscool
Wednesday, January 24, 2007 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस सही आहे रे.. पण हे असेच चालू राहीले तर अजून मजा येईल..
मीनू हे योग्य बीबीवर आले असेत तर करंडकाचा विचार केला असता...


Jayavi
Thursday, January 25, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा..... शुरु हो गये गुरु..! लगे रहो :-)

Shyamli
Thursday, January 25, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे जोरात आहे गाडी चालु द्या...
नवीन thread चालु करायला हवा बहुदा mods इकडे बघणार का जरा


Manas6
Thursday, January 25, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी बी चुकला म्हणजे काय? बी बी म्हणजे?

Vinaydesai
Thursday, January 25, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BB = Bulletin Board इथल्या प्रत्येक Discussion thread = चर्चासुत्राला BB असे म्हटले जाते...

कोटीच्या कोटी हा BB आहे..
Smoking हा पण वेगळा BB आहे...


Chinnu
Thursday, January 25, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस, सहीये! दिवा जळु दे सारी रात!! उच्च!! :-)

Saavat
Friday, January 26, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस,
सही! अजुन येऊ देत


Dinesh77
Friday, January 26, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेनट्यांच्या नावात बदल
बिपाशा (कुठे) बसु


Manas6
Friday, January 26, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेनट्यांच्या नावात बदल
बिपाशा (कुठे) बसु
सिनेनट्यांच्या नावात बदल
बिपाशा (कुठे) बसु .. हा हा हा!!


Dineshvs
Saturday, January 27, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिपाशाचा अर्थ बंगालीतही Dark Black Desire ??? असाच आहे.
बाळीचे पाय पाळण्यात दिसले होते वाटते.


Sanghamitra
Tuesday, January 30, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस धमाल आहे.
>> जवळ याना गुप्ता
कम्माल आहे बाई आचरटपणाची.

दिनेश, बिपाशा चा अर्थ मला वाटते कसलेही पाश नसलेली, मुक्त असा असावा.
ते विपाशा असणार असे वाटतेय.
चुभूद्याघ्या.


Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस

सही आहेत ....


Manya2804
Tuesday, January 30, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'खाकी' वर्दी घातलेल्या प्रत्येक माणसाचा 'अरे, खा की' हाच 'खाक्या' असतो का?

खाकी वर्दीवर जी 'म.पो.' अशी पाटी असते, त्याचा अर्थ 'मला पोसा' असा होतो...


Manas6
Monday, February 05, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोटीच्या-कोटी-भाग-२

*जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधील सगळे जण 'जे जे' करतात ते सुंदरच असते, नाही?

*आमच्या शेजाऱ्यांची सून सारखी मालाडला तिच्या माहेरी जात असते, म्हणुन आम्ही तिला, "तिथे तुझी 'मा' तुझे खुप 'लाड' करते, म्हणून तु नेहमी मालाडला जातेस" असे म्हणतो.

*आमच्या ऑफिसमधील एक स्टेनो त्याच्या अनेक मैत्रीणींशी सतत मोबा‌ईलवरुन बोलत असतो; त्याचे नाव सध्या '(मो)बा‌ईलवेडा' असे पडले आहे.

* सध्याची महागा‌ई बघता परमेश्वराला 'भवसागर' पार करण्यापेक्षा 'भावसागर' पार करण्यासाठीच साकडे घालावे असे वाटतेय.

*काही वर्षांपूर्वी एका खाणावळीत जेवायला जात असू; 'अन्नपुर्णा खाणावळ'. तिथे जायला रात्रीच्या वेळेस जरा जरी उशीर झाला तरी सगळे अन्न संपलेले असायचे, त्यामुळे आमचा एक मित्र वैतागून,"ही कसली रे अन्नपुर्णा, ही तर 'अन्न-पुरेना' खाणावळ आहे",असे म्हणायचा.


* एका डोळ्याच्या डॉक्टरने भविष्यासाठी बचत केली नव्हती, कारण त्यांना 'दूरदृष्टी' नव्हती म्हणे!
*ऑर्थोपेडीक सर्जनच्या मुलीचे लग्न ठरल्यामुळे ते 'कंबर कसून' लग्नाच्या तयारीला लागले.

* प्रत्येक अस्थिरोग तज्ञ हा 'हाडाचा वैद्य' असतोच, नाही?

* केशरोपण तज्ञ टक्कल पडलेल्या व्यक्तीचे 'केस-टेकींग' कसे करत असेल?

* एका दंत-विकार तज्ञाचे 'खायचे दात' आणि 'दाखवायचे दात' वेगळे आहे म्हणतात!

* एका डॉक्टरचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे एका पोट-विकार तज्ञाला 'पोटदुखीचा' विकार जडला.

* काही त्वचा रोग तज्ञ हल्ली 'गेंड्याच्या कातडीचे' झाले आहेत असे कळते.


* शेजारच्या बाबुरावांना पायजाम्यात नाडा घालणे जमले नाही, की तो पायजामा बायकोच्या हाती दे‌ऊन " मी नाडी-परीक्षेत आज पुन्हा नापास झालो" असे म्हणतात.

* दूरदर्शन वरील कार्यक्रमांचा दर्जा बघुन, 'सुचना व प्रसारण' खात्याचे नाव बदलून ते 'सुचेना प्रसारण खाते' करावे असे माझा एक मित्र नेहमी म्हणतो.

* नातेवा‌ईकांच्या घरी रात्री खूप डास चावल्यावर, रावसाहेब सकाळी उठुन, 'मला काल रात्री सार्थ डास-बोध झाला' असे म्हणतात.

*आमच्या कार्यालयात कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ आहेत, कामात अतिशय 'थंड'!- माझा मित्र त्यांना, "हे खऱ्या अर्थाने 'कुल'कर्णी आहेत असे म्हणतो.

* न कळणाऱ्या गझलेला 'पझल' का म्हणु नये?

* माझ्या एका मैत्रीणीच्या नवऱ्याचे नाव अविनाश आहे, त्यामुळे आम्ही तिला, "त्याच्या सहवासातील प्रत्येक क्षण तुझ्यासाठी 'अवि-स्मरणीय'च असेल असे म्हणत असतो.

* 'बांगला देश' च्या विरुद्ध कोणीही कितीही शतके ठोका, किंवा त्यांना कितीही मोठ्या फरकाने कितीही वेळ हरवा; त्यांची बिचाऱ्यांची अजिबात तक्रार नसते- त्यांना खरे तर 'बांगला देश' ऐवजी 'चांगला देश'च का म्हणु नये?

* पर्यावरणावरील एका घरगुती, पण गंभीर चर्चेत आमच्या आत्याने' " पर्यावरण जरा बाजुला ठेवा,आधी पिठल्याला पर्याय म्हणुन वरण चालेल का, ते सांगा; कारण घरात बेसन नाहीये " असे म्हणून एकच खस-खस पिकवली.

*केंद्र सरकारची 'इंदिरा आवास योजना'- किती सार्थ नाव आहे, नाही? नेहमीप्रमाणेच सगळे अधिकारी 'आ वासुन 'उभे... ; माझा हिस्सा मला कधी मिळतो ह्याची वाट पहात!...आणि आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना, तिचे संक्षिप्त नाव 'झोपु' आहे, ते काय चुकीचे आहे?( झोपु सदाच आम्ही, तैसा ठराव आहे!)

*माझ्या मित्राचे वडील, आणि दोन आत्या बरेच वर्षांनी एका घरगुती कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.कार्यक्रमात त्य तिघांचा एक ग्रुप फोटो काढण्यात आला; आणि तिघांनाही डायबिटीज असल्यामुळे त्या फोटोला अल्बम मधे 'विलोपले मधुमेहात ह्या' असे सार्थ शीर्षक देण्यात आले.

* अर्थाचा अनर्थ-(घेरी आणून पाडणारा) - सेवा-निवृत्तीनंतर साहेबांच्या निरोप समारंभात त्यांच्याच कार्यालयातील एक महिला कर्मचारी त्यांच्या भाषणात म्हणाल्या," साहेबांचा स्वभाव खूपच मनमिळा‌ऊ....खरे सांगते, साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले हे मला कळले सुद्धा नाही"...सगळीकडे एकच हशा झाल..बा‌ई बुचकाळ्यात पडल्या..साहेबही पडले,पण घेरी ये‌ऊन!.
मानस


Kashi
Monday, February 05, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थाचा अनर्थ......मानस सही आहे रे.. :-):-):-)ह्अ.पु.वा.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators