Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 21, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » झुळूक » Archive through January 21, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Saturday, January 20, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दे मला आणून आता
राहिलेले क्षण जरासे
ना तरी झाले जुने ते
तू दिलेले वण जरासे



Vaibhav_joshi
Saturday, January 20, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवांनी ...
पाळला निर्धार नाही
वेदनेला ....
आज पारावार नाही


Vaibhav_joshi
Saturday, January 20, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहिले आहेत
सारे चेहरे मी
मुखवट्यांना मानतो
आता खरे मी


Meenu
Sunday, January 21, 2007 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहिले आहेत
सारे चेहरे मी
मुखवट्यांना मानतो
आता खरे मी >>>

तु असं म्हणल्याने मित्रा,
बघ किती गोंधळ उडालाय ..
मुखवटा खरा की चेहरा माझा,
आता मलाही प्रश्न पडलाय ..


Meenu
Sunday, January 21, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा असं आहे तर ..
तुला भेटायला येताना मुखवटा चढवुनच येईन म्हणते,
माझा चेहरा तुला रुचला नाही तर ..?


Meenu
Sunday, January 21, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वण राहीलेत म्हणतोस,
म्हणजे भरलीये तर जखम ..
राहीलेले क्षण देईन रे,
भरल्यावर ही जखम ..


Meenu
Sunday, January 21, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वण राहीलेत म्हणतानाही,
वार करुन गेलास ..
तेव्हा नव्हतास असा,
आता माझ्याही पुढे गेलास ..


Meenu
Sunday, January 21, 2007 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदनेचं खापर,
आठवांवर फोड ..
दुसर्‍याला दोष द्यायचं,
आता तरी सोड ..


Poojas
Sunday, January 21, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेदनेला आसवांचा शाप आहे..
आठवांना चिंतणेही पाप आहे...??
झेलताना वार मी..तरबेज झालो
दोष देणेही आता..मज माफ आहे..!!!!!!!!



Poojas
Sunday, January 21, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळाची कारणे स्मरणार नाही...
वेंधळ्या वार्‍यापुढे हरणार नाही..
जो स्वत्: उध्वस्त आहे.. अन दिशाहीन..
त्यापुढे हतबल कधी ठरणार नाही..!!!!!!


Shyamli
Sunday, January 21, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांगु नको अजुनी
वादळाची कारणे
अपुरीच घातली तु
भोवताली कुंपणे

श्यामली!!!


Shyamli
Sunday, January 21, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय अजुनी तुजकडे
आठवांचा गाव आहे?
हास वेड्या, बघ अजुनी
जगण्यास जरा वाव आहे

श्यामली!!!


Shree_tirthe
Sunday, January 21, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं आणि तिचं
प्रेमाचं नातं
लोकांच्या घरचं
काय जातं?

असं जळू नका हो
आमच्यावर
बंद दारामागे
का केलं तुम्ही रात्रभर?

आम्ही काही केलं
तर बिघडलं कुठे?
तुमचीच पुनरावृत्ती
केली ईथे.

ति माझी मी तिचा
तुम्ही कोण कुठले?
प्रेमाच्या विरोधात
तुमचे हात उठले?

श्री


Devdattag
Sunday, January 21, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ओळखीच्या लोकांनी मज ओळखण्याचे सोडले
मीही मग जगणे मुखवट्यावरच सोडले
आले काही अनोळखी बोलण्यासाठी जरी
मीच माझ्याशी अता बोलण्याचे सोडले


Devdattag
Sunday, January 21, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणाले मी अता
वादळांना घाबरतो
होती इथे जरा आगळी जराशी
मी त्या झुळकेस थोडा घाबरतो


Shree_tirthe
Sunday, January 21, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! वा!!! देवदत्त मस्तं.

Shree_tirthe
Sunday, January 21, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलं तोडले म्हणून
काटे मरत नसतात
दुसरं फुल येणार
या आशेवर जगत असतात

श्री


Meenu
Sunday, January 21, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी नसतं आसपास,
तेव्हा मुखवट्याशिवायची मी असते ..
पण खरं सांगायचं तर,
मुखवट्यातच मी जास्त बरी दिसते ..


Meenu
Sunday, January 21, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखवटा काढुन स्वतःकडे,
बघायची हिम्मत होत नाही ..
खरं तर तेच कारण आहे ना,
की मी मुखवटा उतरवत नाही ..


Sanghamitra
Sunday, January 21, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


विचार करत होतेच हल्ली
परत करावेत तुझे क्षण.
पण ते मात्र मागू नकोस
प्राणात खोल रुतलेले वण.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators