Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:08 am: |
| 
|
३ते ४ वर्षापुर्वी सर्फ़िंग करता करता मी वेबवर रस्ता हरवले व मायबोलिच्या जाळ्यात अडकले. नंतर मायबोलीची भ्रमंती हा छंदच जडला. सर्वांचे लेखन आवडत होते. परंतु स्वत्: लिहावे असे प्रकर्षाने वाटले नाही. एकदा अशीच मायबोलीतून भटकत असताना चित्रकवितेत जाउन पोहोचले. तिथे कोणीतरी एका बुंदिच्या लाडवाचा फोटो टाकला होता, आणी त्यावर कविता करण्याचे आवाहन केले होते. तो बुंदिचा ताजा रसरशीत, पिवळाधमक, मोठा लाडु पाहुन पटकन उचलुन खाउन टाकावा अशी तीव्र ईच्छा मला झाली. आणि त्यावर कविता? मनात म्हटले, या मायबोलीकरांना दुसरा धंदा दिसत नाही. लाडवावर कोणी कविता लिहिलि आहे का? लाडू कसा खावा, किती खावा, कसा करावा हे विचारा? असे म्हणत मी तेथुन पलायन केले. त्यानंतर काहि दिवसांनी मला वाटायला लागले, काय हरकत आहे आपणही प्रयत्न करायला? डोक्याला थोडा ताण दिला, पण काहि सुचले नाही. विचार करु लागले ललित लिहावे का? पण ललित म्हणजे काय? हेच मुळी महित नाहि तर पुढे काय कपाळ लिहिणार. प्रवास वर्णन रसभरीत करायला जमणार नाहि, लघुलेख कशाशी खातात माहित नाही. कविता लिहायल प्रतिभा लागते ती आपल्याकडे नाहि. डोक्याला ताण देउनहि निष्पत्ति शुन्यच. शेवटी काय नाचता येईना अंगण वाकडे!!! मधेच एकदा मला तो बुंदिचा लाडु आठवला. म्हटले त्या लाडवावर काय कविता लिहिल्या गेल्या आहेत ते तरी पाहु? या उद्देशाने चित्रकविता सदरात गेले. परंतु "आर्काईव्ह" या बेट्याने तो सुंदर लाडु गिळंक्रत केला होता. त्याच्या पोटाला हात न लावता नविन चित्रे पाहु लागले. त्यातील एक चित्र मला फार आवडले. चार ओळी त्या चित्रावर जमतील का? असा मलाच मी प्रश्न केला, आणी डोके खाजऊ लागले. माझ्या खोपडित ट्युबलाईट पेटते का? हे डोक्याला पुन्: ताण देऊन पाहीले. आणी काय आश्चर्य मला चक्क बिचार्या ओळी सुचल्या. परंतु ती कविता मला मायबोलीवर टाकण्याचे धाडस होईना.. वाटले माझी कविता कोणाला आवडलीच नाहि तर? त्यावरिल प्रतिक्रिया काय येतील? या साशंकतेने घाबरुन गेले. मला एक सुन्दर कल्पना सुचली. मी मझी पहिली कविता टोपण नावाने टाकली. झाले उलटेच, माझे कौतुक केले गेले, मला प्रोच्छाहन मिळाले, आणि मला एका पाठोपाठ एक अशा अनेक चित्रकविता सुचत गेल्या. प्रत्येकाच्यात ही प्रतिभा असते, फक्त ती जागृत करावी लागते. मायबोलीने जागृत केलेल्या या माझ्या अस्मितेवर, मी पुढे मराठी मंडळाच्या अनेक कार्यक्रमात निवेदनाचे काम केले, चित्रकविता तर लिहिल्याच, पण कविताहि केल्या, परंतु हा लेख पहिलाच!!!!! कळावे लोभ असावा ही विनंती. -अरुंधती टोपकर
|