Princess
| |
| Friday, January 19, 2007 - 4:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जे काही मी लीते, समजुन घेत जावा नसेल समजत तरीही वाचत राव्हा.
|
सकाळी उठुन नवकविने टाकली एक चुळुक आनंदाने नाचत सुटला "व्वा! हि बघा नवि झुळुक"! चालवुन घ्या हो!!
|
R_joshi
| |
| Friday, January 19, 2007 - 5:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मनी इच्छा एक वसे झुळुकेने फुलवावि मोरपिसे परी हे त्या लोकांसहि न जमे जे म्हणति स्वत:स जुने प्रिति
|
Suvikask
| |
| Friday, January 19, 2007 - 5:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काही लिहायचे आहे पण सुचतच नाही सगळ्यांच्या कविता मात्र मी वाचतच राही +++++++++++++++++++++++++++++ शेवटी म्हटल घ्यावा हात साफ़ करून वाचतीलच सगळे मला माफ करुन नाहीतर बसतील गप्प जीव मुठीत धरून +++++++++++++++++++++++++++++
|
R_joshi
| |
| Friday, January 19, 2007 - 5:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
निराशेच्या गर्द काळोखात किरण आशेचे असायचेच प्रवाह वाहता असला कि जीवन तेथे फुलायचेच फुलण्यासाठी मीही कधी आले होते प्रवाहापाशी कोमजलेली लतिका पाहिली वधारलेल्या वृक्षापाशी नाद उपेक्षेचा होता सळसळना-या पानांमधे झुळुकेचा गारवा हि लुप्त झाला कोमजलेल्या लतिकेसंगे.... कोमजलेल्या लतिकेसंगे..... प्रिति आता मी हि लिहिते मनावर घेउ नका.
|
"आपल्यासाठी कुणीतरी डोळे भरावे प्रत्येकाचीच असते अपेक्षा, कारण... जगात विश्वास ठेवतात जास्ती अश्रुंवर,शब्दांपेक्षा" गणेश(समीप)
|
नाद उपेक्षेचा होता सळसळना-या पानांमधे झुळुकेचा गारवा हि लुप्त झाला कोमजलेल्या लतिकेसंगे....>>...PRITI kharokhar sundar lihile aahe.
|
Meenu
| |
| Friday, January 19, 2007 - 7:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पुनश्च हरी ओम .... .....
|
Mankya
| |
| Friday, January 19, 2007 - 7:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रिति छान लिहिलयस .....! माणिक !
|
मिल्या, किरू, मीनु, पूनम, प्रिन्सेस,मनिषा काय हे? भ्रमर तुझ्यासाठी पेशल खरं म्हणजे तुलाच सगळ्यात जास्त मार्क देणार होते पण नाही तो मान मीनूचा. उरात, घरात आणि प.. रा.. त... तशी मी रोजच इथे येते. आज जरा जास्त हसले मात्र.
|
Abhi_
| |
| Friday, January 19, 2007 - 8:48 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अशक्य आहात सर्वजण... .. .. .. ..
|
>> वधारलेल्या वृक्षापाशी प्रीति तुला वठलेल्या म्हणायचंय का? किंवा बहरलेल्या? वधारणे म्हणजे (भाव) वाढणे.
|
Ajjuka
| |
| Friday, January 19, 2007 - 9:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अंगावरचे दीप पेटलेले.. गात्रांत उत्कट थरथर ओठातून शब्द नादलेले.. खुपलीच नाही काठाची जर.. ही मीच? मीच.. अशीच.. उत्कट..
|
R_joshi
| |
| Friday, January 19, 2007 - 11:28 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
संघमित्रा मला वधारणेचाच अर्थ आपेक्षित आहे. बाकि ज्यांना हि कविता कळली असेल त्यांना मला काय म्हणायचे आहे हेहि आपसुक कळेल.
|
प्रीती छान लिहलयं!! झुळुका त्याच असतात गारवाही तोच असतो कधी कधी पानांतून उष्ण वार्याचा झोत असतो म्हणून का लतिकेने कोमेजायचे वृक्षालाच जबाबदार धरायचे कधी फुलांच्या ताटव्यातही गाजर गवत उगवायचेच तिकडे कश्याला लक्ष द्यायचे सर्वांगानी फुलायचे फुलता फुलता शब्दगंधाने झुळुकेला दरवळवायचे
|
काचंनगंधा आणी प्रीती बरोबर आहे तुमचे म्हणणे, "तिकडे कश्याला लक्ष द्यायचे सर्वांगानी फुलायचे फुलता फुलता शब्दगंधाने झुळुकेला दरवळवायचे " मला वाटतं आता तरी जुने छान कवी नवीन कवीनां समजतील! गणेश(समीप)
|
R_joshi
| |
| Saturday, January 20, 2007 - 2:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कांचनगंधा सुरेख कोमल लतिका ती वृक्षाच्या छायेतच जगणार वृक्ष ही तिला मायेनेच जपणार काव्याच्या श्रावणधारा सतत येथे बरसणार फुलणा-या लतिकेसंगे झुळुकही थुईथुई नाचणार प्रिति
|
Poojas
| |
| Saturday, January 20, 2007 - 6:50 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नाही नाही.. म्हणता म्हणता उठले शब्द.. ..पेटले रण.. झुळुकेवरती झुळुका आल्या.. लिहीत सुटले सगळेच जण.........!!!!!!!!!....![](/hitguj/clipart/lol.gif) ![](/hitguj/clipart/talker.gif) दोस्त लोक.....झक्कास लिहितायत हा सगळेच.... लगे रहो..!!! चला byeeeee...happy weekend !!!!
|
आज मी माझी कहाणी आठवाया लागलो रोखलेल्या आसवांना वाट द्याया लागलो
|
भाग आहे शांततेने छत पुन्हा शाकारणे सांग मी सांगू कुणाला वादळाची कारणे?
|