|
Shrini
| |
| Tuesday, January 09, 2007 - 2:25 am: |
|
|
लहानपणीच त्याला उमजले होते की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, पण हा वेगळेपणा काय आहे हे मात्र त्याच्या ध्यानी येत नव्हते. आणि मग एका साक्षात्काराच्या क्षणी त्याला उमगले की आपक्याकडे भव्य, प्रभावी, फेनधवल हस्तीदंत आहेत. त्यांच्याचमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरतो, आणि त्यांच्याचमुळे इतर आपला मत्सर, द्वेष करतात... त्यांच्या या प्रतिक्रीयेला तोंड कसे द्यायचे ? मग त्याने त्या हस्तिदंतांचे एक चिलखत घडवले, आणि ते परीधान केले. या चिलखतामुळे तो अधिकच झळाळून उठला, आणि लोकांच्या देवषभावनांचे तीर त्यावर आपटून निकामी झाले. पण हस्तिदंती झाले तरी कुठलेच चिलखत अभेद्य नसते हे त्याला अजून समजायचे होते. ते समजावून दिले तिने. जिची धार प्रत्यक्ष प्रकाशाचेही पापुद्रे काढेल अशी थंडगार सेरिपी तिने त्याच्या चिलखतावरून अलगद फिरवली, तेव्हा ते चिलखत फुलासारखे उमलले व त्याच्या छातीतून रक्ताची धार वाहू लागली. तो शुद्धीवर आला तेव्हा ती निघून गेली होती आणि त्याच्या चिलखताचे दोन तुकडे बाजूला पडले होते. तो मोठ्या कष्टाने उठला, आणि पुनश्च हरी ओम म्हणत त्याने आपले सर्व कौशल्य पणाला लावून ते चिलखत सांधले, ते रत्नांनी सजवले आणि आपल्या अंगावर चढवले. मात्र यावेळी, चिलखताला आतून पोलादी अस्तर लावायला तो विसरला नाही. त्याच्या चिलखताचे नवे रूप पाहून सगळ्यांचे डोळे दिपले. आधीपेक्षाही हे चिलखत अधिक तेजस्वी आहे यावर सर्वांचे एकमत झाले. त्याच्या प्रयाणानंतर लोकांनी मोठ्या कौतुकाने ते चिलखत एका काचेच्या कपाटात जतन करून ठेवले आणि ते पहायला प्रवासी लांबलांबच्या गावांवरून येऊ लागले. लोकांनी ते चिलखत सर्व बाजूंनी पाहीले, त्याचा अभ्यास केला, त्यावर प्रबंध लिहीले. पण त्या चिलखताच्या आत कोणी डोकावले नाही, आणि त्यामुळे तेथे पडलेले रक्ताचे डागही कोणाला दिसले नाही! ('जी. ए. कुलकर्णी' यांच्यावर लिहीलेले 'गूढयात्री' हे पुस्तक वाचताना सुचलेली कथा.)
|
Abhijat
| |
| Tuesday, January 09, 2007 - 2:54 am: |
|
|
shrini मस्तच खूप दिवसांनी जी एं च्या शैलीतले काही वाचायला मिळाले.
|
श्रिनी मस्तच.. एकदम गूढ..
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:41 am: |
|
|
श्रिनी पुढेहि भाग असेल कथेचा तर लिहि. वाचायला खरच आवडेल.
|
Ashwini
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:25 am: |
|
|
श्रीनि, पुनरागमन जोरात आहे. मस्त चाललय.
|
Bee
| |
| Tuesday, January 09, 2007 - 9:38 pm: |
|
|
श्रिनि, चिलखत छान आहे. पण मला वाटतं depth जरा कमी पडली.
|
|
|